Wednesday, April 11, 2012

कुंडलिनी जागृती - Kundalini Jagriti in Marathi

४ प्राणायाम - अ---पूर्वार्ध --- प्राणायाम म्हटल्यावर आपल्यासमोर श्वाशोछावासाचे प्रचलित प्रकार येतात. जे आजच्या समाजात मोठ्या प्रमाणात शिकले, शिकवले जातात. त्यालाच आपण प्राणायाम सामाझतो ते मुळात सर्वस्वी चूक आहे. श्वाशोछावासाशी प्राणायामाचा संबंध असला तरी तो खरोखरच अगदी थोडा आहे. खरा खरा प्राणायाम साधण्यासाठी ज्या अनेक क्रिया कराव्या लागतात त्यांपैकी श्वाशोछावासाचे नियमन हि केवळ एक क्रिया आहे. प्राणायाम म्हणजे प्राणांचा आयाम म्हणजे संयम. प्राण म्हणजे विश्वरूप चालवणारी शक्ती जिचा औंश आपल्या देहातही वास करत असतो त्यावर संपूर्ण विजय मिळवणे. हा प्राणायामाचा खरा अर्थ आहे, आणि हेतू आहे. साऱ्या विश्वाचे ज्ञान मिळवायचे झाले तर माणसाला अनेक जन्म पुरणार नाहीत म्हणून ज्या शक्तीच्या योगे ह्या सर्व विश्वाचा व्यापार चालला आहे, ते त्याचे मूळ, म्हणजे, जो प्राण, तो जाणणे, त्यावर स्वामित्व मिळवणे, म्हणजेच प्राणायाम होय.
सागरातील पाण्याचा एक बिंदू हा त्याचा एक भाग असतो औंश असतो. त्यामुळे त्या बिंदुला जाणल्याने सर्व सागराला जाणले जाते. त्याच प्रमाणे आपल्यातील प्राणांवर ताबा मिळविता आल्यास समस्त विश्वावर ताबा येतो हे सरळ आहे.
ज्या गोष्टी त्याच्या जवळ आहेत त्यांना जिंकण्यापासून प्राणाला जिंकायची सुरुवात करायची आहे. आपल्याला सर्वात जवळची गोष्ट म्हणजे देह आणि मन. जो प्राण विश्वात सर्वत्र खेळत असतो त्याचा जो अंश आपले हे शरीर आणि तो प्रानौंश आपल्याला सर्वात जवळचा आहे. म्हणून त्याच्या पासून सुरुवात करयची. ******** हे लिखाण वाचून कोणीही आपले आपण प्रयोग करू नयेत

 कुंडलिनी जागृती - Kundalini Jagriti in Marathi

 आज पासून नेहमीप्रमाणे राज्योगाचा पुढील भाग क्रमशः सुरु राहील. शुभम भवतु.
यम नियम ---- आत्तापर्यंत आपण सर्व प्रकारची पूर्व तयारी कशी करायची ते पाहिले. यमाच्या आचरणाने वृत्ती सात्विक बनवायच्या आहेत. आणि नियमांच्या अभ्यासाने देह, मन, आणि बुद्धी परिपक्व बनवायची आहे. कि जेणेकरून कुंडलिनी शक्ती सोसायला आपण समर्थ होऊ.
हा विषय समजण्यासाठी मी आपल्याला एक उदाहरण देतो ते आजच्या पिढीला नक्की भावेल. शरीर आणि मन ह्यांचा संबंध कॉम्पुटर च्या हार्ड वेअर आणि सोफ्ट वेअर सारखा आहे. तिथे दोघे जशी एकमेकांना अनुरूप असायला हवीत तसेच शरीर आणि मनाचे आहे.
आता ह्या योगाचा मुख्य हेतू जो ---कुंडलिनी जागृती--- त्यासाठी साधना कशी करायची त्याचा विचार करायचा आहे. त्यासाठी मनाला स्वस्थ करायचे आहे, शांत करायचे आहे, स्थिर करयचे आहे, रिकामे करायचे आहे स्वच्छ करायचे आहे. मन हे आपले शुक्ष्म शरीर आहे त्यामुळे मन स्थिर ठेवायचे तर शरीरही स्थिर ठेवायला हवे. त्यासाठी योग्य त्या स्थिर आसनाची आवश्यकता आहे त्यासाठी ह्या अष्टांग योगाचे पुढचे अंग आसन.
३ आसन --- स्थिरासन --- देहाला त्रास होणार नाही असे आसन. आणि ते हि दीर्घ काल स्थिर राहणारे असणे आवश्यक आहे. ह्यात योगासनातील सर्व प्रकार येतात. माणसाच्या देहाच्या ताकदीप्रमाणे, कुवतीप्रमाणे गरजेप्रमाणे व प्रवृत्तीप्रमाणे दीर्घ काळ स्थिर राहता येईल असे आसन आपण आपल्यासाठी निवडायचे असते. बहुतौंशी लोक पद्मासन ह्या आसनाचा वापर करतात. पण काही कठोर तपस्या करणारे शिर्सःसानाचा हि वापर साधनेसाठी करतात. किंवा त्याही पेक्षा कठीण अश्या आसनांचा वापर करतात. एकापायावर उभे राहून असलेली आसने, वगैरे. वास्तविक आसनाची निवड आपल्याला सहज सोसेल अशी असायला हवी. पण कठोरते मुळे देहबुद्धी जाण्यास मदत व्हावी ह्या विचाराने काही जण अशी अघोरी आसने स्वीकारतात. कंबरभर पान्यात उभे राहून सुद्धा साधना करतात. तेव्हा आसन कोणते असावे ते आपण आपले अनुभवून ठरवावे लागते. पाठीचा कणा ताठ ठेवणे अत्यावश्यक आहे. निव्वळ ताठ बसण्याने आपल्याला असे लक्षात येईल कि आपल्या मनात चांगलेच विचार येतात. साधानेमधून निर्माण होणाऱ्या शक्तीप्रवाहा बाबाद्त्च्या सर्व काही घडामोडी ह्या पाठीच्या कान्याम्धून होत असतात त्यामुळे त्याला जराही बाक असल्यास साधनेला त्याचा अडथळा येईल. आपण जर नीट निरीक्षण केलेत तर आपल्याहि हे लक्षात येईल कि जी नेहमी माणसे ताठ बसतात ते जास्त प्रसन्न यशस्वी आत्मविश्वासू असतात.
 
क-(नियम)--- स्वद्ध्याय --- म्हणजे वेदाध्ययन ---- वेदांचा अभ्यास करणे. आजच्या युगात ज्या सर्व प्रकारच्या अभ्यासाच्या शाखा आहेत त्या सर्व वेदान्माद्ध्ये आहेत. १४ विद्या आणि ६४ कला ह्या सर्व शाखांमधून आपण आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही एका किंवा अनेक शाखांचे शिक्षण घेऊ शकतो. हा अभ्यास खूप व्यापक स्वरूपाच आहे. त्याचे अध्ययन करणे म्हणजे राजयोगी हा पर्यायाने ज्ञानी सुद्धा असायला हवा. त्याचं बुद्धीला सूक्ष्मता आलेली असायला हवी. कारण त्याशिवाय त्याला गुरूने सांगितलेले समजणार नाही. स्वाध्याय ह्याचा दुसरा अर्थ स्व-अध्याय असाही आहे. कारण कोणताही अभ्यास सखोल करायचा असतो त्यावेळी तो स्वतःचा स्वतः करायचा असतो. किंबहुन अभ्यास हा स्वतःचा स्वतःच करायचा असतो. गुरु फक्त तो कसा करायचा ते सांगत असतो. आणि ज्यावेळी द्विधा मनस्थिती होईल त्यावेळी योग्य तो मार्ग दाखवणे हेच फक्त गुरुचे काम असते. मी जन्माला आलो. त्यानंतर ---- उपडा वळू लागलो -- पुढे सरकू लागलो -- रंगू लागलो -- बसायला लागलो -- उभे राहायला लागलो -- चालायला लागलो. -- शब्द बोलायला लागलो, -- व्याकरण न शिकता ऐकून ऐकून वाक्य समज पूर्वक म्हणायला लागलो. ह्या पैकी कोणत्याही क्रियेच्या वेळी माझी उत्सुकता जिज्ञासाच मला पुढे नेत गेली. तीच जिज्ञासा मला इतर सर्व सोडून केवळ राजयोग अभ्यासायला लावेल. आज स्पून फीडिंग होते. म्हणून विद्यार्त्याला समजत नाही निव्वळ पोपट किंवा पढत मूर्ख तयार होतात. आणि मग वास्तविक जगात जगायला कठीण जाते. आपल्याकडे शिक्षण म्हणजे पाठांतराची स्पर्धा झाली आहे. आणि माहितीलाच आम्ही ज्ञान सामाझातो. ती हि बऱ्याच वेळा अर्धवट असते. किंवा एकाच गोष्टीच एखादाच पैलू आपल्याला महित असतो त्यावरू आपण स्वतःला बरोबर समजतो पण त्याच गोष्टीचे इतरही अनेक पैलू असू शकतात. हि जाणीव ठेऊन वागल्याने गैरसमज होत नाहीत. निव्वळ माहिती म्हणजे ज्ञान नसून, आपल्याला असलेली माहिती, स्थळ, काल, वेळ, गरज, ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन कशी वापरायची त्याची जाण असणे म्हणजे ज्ञान. हि जाण नाही हे आजचे सामाजिक वास्तव आहे म्हणून कलहात कलह असे समाजाचे दुर्धर स्वरूप झाले आहे. त्यासाठी जरा गांभीर्याने अभ्यास करण्याची गरज आहे. माहितच वापर स्थळ, काल, वेळ, परिस्थिती, हेतू ह्यासार्वांचा विचार करून करता येणे ह्याला ज्ञान म्हणतात. त्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता असते. ती स्वध्यायाने तयार होते.
ब-(नियम) --संतोष --- समाधान ---- एव्हढे सर्व कष्ट देह आणि मनाला देऊन तप करायचे तरीही मन सतत प्रसन्न ठेवायचे. समाधान सतत प्रसन्न राहणे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे आगर. आपण कि नाही, खरोखरच बऱ्याच वेळा विषन्न असतो. करणे काहीही असतील पण प्रसन्न नसतो हे खरे. अर्जुन विषाद योग हा एकच योग आपण सर्वच दीर्घ काळ अनुसरत असतो. हे ऐकायला जरा वाईट वाटेल पण खरे आहे. आजच्या काळाचे ते वास्तव आहे. कारण आपल्या आनंदाला काहीना काहीतरी कारण लागते. त्याशिवाय आपण आनंदी राहत नाही. आनंदासाठी आनंद जर अनुभवला तर मी काय म्हणतो त्याची प्रचीती येईल. तसे नसते तर आज तरुण वर्ग सुद्धा ज्या अघोरी रोगांना बळी जातांना दिसतो ते तसे झाले नसते. प्रेमाचा अभाव त्यात अहंकार राग, त्वेष, भीती हि त्याची करणे आहेत. आपला आनंद फक्त, यश, कीर्ती, पैसा, आणि वासना ह्या सामावलेला आहे. आणि हे सर्व सतत कसे मिळतील. इथे प्रेमासाठी प्रेम, तसा आनंदासाठी आनंद, तशी प्रसन्नता हवी. मग सिद्धी चालत येतील. तपाने शरीर व संतोषाने मन तयार ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे वीज जशी धातुतून त्या धातूला इजा न करता सहज वाहू लागते आणि तिची रुपांतरे निरनिराळ्या रुपात करते, तशाच सिद्धी आपल्या देहातून सहज प्रवास करतील आपल्याला आलिंगन देतील. आणि विविध प्रकारे प्रकट होतील. पण त्यात गुंतून पडायचे नाहीये. कारण राजायोग्याचे अंतिम ध्येय मुक्ती आहे.
२ नियम --- ह्या मद्ध्ये अ-तप, ब-संतोष, क-स्वद्ध्याय ह्या तीन गोष्टी येतात. तापाने शरीर तयार करणे आणि देहबुद्धी घालवणे संतोषाने मन तयार करणे आणि स्वध्याने बुद्धी तेजस्वी सूक्ष्म करणे.
अ -(नियम)-तप --- तप म्हणजे साधना. साधनेत अनेक प्रकार येतात. ते रोज नियमाने पाळणे अत्यावश्यक आहे. राजयोगाच्या साधनेत मना बरोबर आपण आपल्या शरीरालाही योग्य त्या सवयी लावायच्या असतात. आपले शरीर जणूकाही एक मशीन आहे अश्या प्रकारे त्याला बनवायचे जेणेकरू ज्या ईश्वरी शक्तींची आपण आराधना करणार असतो, त्या शक्ती धारण करायला आपले शरीर तितकेच बलवान असायला हवे. बारीक सारीक रोग सुद्धा त्याला शिवता कामा नाहेत. समजण्यासाठी एक उदाहरण देतो. आपल्याला विद्दुत शक्ती माहित आहे. लाकूड किंवा तत्सम पदार्थाला स्पर्श झाला तर विद्दुत शक्ती त्यातून प्रवाहित होत नाही. आणि जिच्यातून ती प्रवाहित होत नाही तिच्यामधून कोणताच परिणाम (फळ) व्यक्त झालेला आपल्याला दिसत नाही. पण धातूला त्यातही तांबे, रूपे, सोने ह्यांना विजेचा स्पर्श झाला तर त्यातून ती वाहू लागते व आपला परिणाम दर्शविते जसे. त्या त्या धातू प्रमाणे उष्णता, प्रकाश, गती वगैरे शक्तीत तिचे रुपांतर होते. तसेच इथे आहे आपले शरीर त्या आपल्याला अपेक्षित असलेल्या सर्व प्रकारच्या शक्तींना धारण करून आवश्यक ते परिणाम साधण्यासाठी - अनुभवण्यासाठी सुयोग्य - समर्थ (समर्थ म्हणजे दिसायला जिम बिल्ड नव्हे) बनवणे हे ह्या साधनेत अपेक्षित आहे. त्यासाठी आणि मनाला सराव व्हावा ह्यासाठी तप केले जाते. देहबुद्धी नष्ट करणे हा तप करण्या मागचा मुख्य उद्देश आहे. तप म्हणजे सातत्य असाही अर्थ आहे (practic makes a man perfect) तपाचे अनेक प्रकार आहेत. आणि पद्धतीही अनेक आहेत. त्यातही व्यक्ती परत्वे निवड करणे योग्य होते. काही जण तर मुद्दाम कठोर तपश्चर्या करतात. म्हणजे साधने साठी सुखासन म्हणजे सोपे सहज आसन घ्यायच्या ऐवजी शीर्षासन वगैरे कठीण आसनातच साधना करायची. हेतू हा कि देहाला स्वतःहून इतका त्रास त्यायचा कि देहबुद्धी समूळ नसत झाली पाहिजे. खुन्द्लिनी शक्ती हि पाठीच्या कण्याच्या मुळाशी असते व तिला जागृत करून मस्तक पर्यंत न्यायचे म्हणजे माणूस मुक्त होतो असे म्हणतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेण्यासाठी उलटे राहून उपासन करायची असाही काही जणांचा ग्रह असतो. एकूणच सर्व प्रकार अत्यंत कठोर आहे. पुराण काळात तर शेकडो हजारो वर्षे आपस्चार्या केल्याचे वर्णन केलेले आढळते. देहबुद्धी घालवणे म्हणजेच देहाहंकर घालवणे, म्हणजेच आत्मबुद्धीचा विकास करणे. भगवंताला समोरासमोर जाणण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी, शरीर व मन दोन्ही तयार करणे आणि बुद्धीनेही परिपक्व होणे कि जिच्यामुळे मी भगवंताला जाणू शकणार नाही ह्याची जाणीव होणे. आणि मन उन्मन होणे घडेल.
 
राजयोग --- पूर्वतयारीचा पहिला अध्याय झाला ---- राजयोगी होण्यासाठीची पूर्व तयारीचा एक अद्ध्याय इथे पुरा झाला. आत्तापर्यंत झालेल्या विवेचनावरून आपल्याला ह्या योग साधानेसाही पूर्व तयारी कशी आणि किती कठोरपणे करावी लागते ह्याचा अंदाज आला असेल. कारण इथे निव्वळ मुक्ती नाही तर जडावर म्हणजे भौतीकावर सुद्धा स्वामित्व मिळवायचे आहे. मानवी देहात कुंडलिनी नावाची शक्ती असते असे म्हणतात. ती जागृत झाल्यास ती माणसाला मुक्ती मिळवून देते. किंबहुना मुक्ततेसाठी ह्या शक्ती जागृतीची नितांत आवश्यकता आहे. असे आहे तर मग इतर योगांचे काय? त्याच्या अभ्यासानेही मुक्तीच मिळते असे म्हणतात. इतर योगाचे सुद्धा अंतिम फळ कुंडलिनी जागृतीच आहे. पण त्यासाठी वेगळेपणाने आणि विशेष प्रयत्न करणे अभिप्रेत नाही. ही प्रगती हळू हळू काही जन्मात व्हावी हि अपेक्षा आहे. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे मनुष्य आणि ईश्वर ह्यांचे नाते लोखंड आणि लोह्चुम्बाकास्रखे आहे. लोहचुंबक जसा त्यच्या संनिद्ध्यात आलेल्या लोखंडाला सहज आपल्याकडे ओढून घेतो तसे ईश्वर प्रत्येक जीवाला आपल्या कडे ओढून घेत असतो. पण लोखंडावर जसा गंज असतो तसे माणसाच्या मनावर इच्छांचा गंज असतो तो बाजूला केला किंवा झाला तर तो सहज ईश्वराला चिकटून जाईल. हा न्याय याच्यायावत जीवाला लागू आहे. निव्वळ मुक्तीची इच्छा व्हायलाही काही जन्मांची तयारीच लागत असते. इथे तसे नाही थेट कुंडलिनी जागृती करणे हेच एकमेव ध्येय आहे. अनेक जन्मांच्या अनुभवांनी जीवाला मुक्तीची गरज भासते. तिचे तळमळीत रुपांतर होते. इतके कि केवळ हि जाणीव उराशी बाळगूनच जो जीव जन्मतो. त्याच्यासाठीच राजयोग आहे. म्हणून साधनही तितकीच कठोर आहे. इतरत्र कोठेही लक्ष न देता फक्त ह्या शक्तीवर लक्ष केंद्रित करून आपण तिला स्वाधीन करून घेणे हे राज्योगाचे ध्येय आहे. एकाग्रता जितकी जास्त तेव्हढे यश नक्की आणि लवकर हा सरळ सरळ सिद्धांत आहे म्हणून राजयोगी इकडे तिकडे न रमता थेट ईश्वराला जावून भिडण्यासाठी इतका आटापिटा करतो. अर्थात असा माणूस जन्मावाच लागतो. हे हि आत्तापर्यंतच्या विवेचनावरून आपल्या लक्षात आले असेलच. मी मागे म्हटल्या प्रमाणे ह्यासाठी लागणारी पूर्वतयारी आपल्याला उत्तम माणूस बनण्यासाठी नक्की उपयोगी पडेल. हा ह्या लिखाणाचा हेतू आहे. आत्ता कुठे एक पायरी पुरी झाली. यम आणि नियम ))))अंगवळणी पडले(((( कि दोन पायरया चढलो असे म्हणायला हरकत नाही. अर्थात बाकी सर्व अभ्यास सुद्धा एकीकडे चालू ठेवायचाच असतो. आत्तापर्यंत जे काही वाचले ती हि साधनच आहे. ते साधनेचे बाह्यांग आहे. उद्यापासून नियम म्हणजे तप, संतोष व स्वद्ध्याय म्हणंजे काय ते पहायचे आहे. ह्याच्या अभ्यासाने शरीराला तयार करायचे आहे. देहबुद्धी नष्ट करायची आहे. मनाने स्वतःच्या मनात प्रवेश करायचा आहे. आणि वेदाभ्यासाने बुद्धीला विकसित करायचे आहे. तयार राहा हे सर्व करायला.
 
इ-(१ यम) अपरिग्रह --- परिग्रह म्हणजे दानाचा स्वीकार अ म्हणजे नाही म्हणजे - कोणत्याही प्रकारचे दान न स्वीकारणे. कोणाही कडून कोणत्याही कारणाने दान स्वीकारायचे नाही. माणसाच्या इच्छा त्याच्या दानाबरोबर आपल्याकडे येतात. त्या चांगल्या असतील तर ठीक आहे. त्याने मिळवलेला पैसा जर चुकीच्या मार्गाने लुबाडून दुसर्यास फसवून त्रास देवून मालवला असेल तर त्या त्या व्यक्तींचे त्याला मिळालेले तळतळात आपल्याला भोगायलाच लागतात. इतर माणसांचे सोडा पण हाच नियम आपल्या वाडवडिलान कडून आलेल्या पैशाला सुद्धा लागू आहे. आपल्या वाडवाडीलांचे पैसे आपण जे वारसदार म्हणून स्वीकारतो तेही इथे चालत नाही. कारण त्याबरोबर त्यांचे नशीब सुद्धा आपल्याला भोगायला लागते. इथे राज्योगात तर आपण निव्वळ मुक्ती धडपडत असतो. नव्हे नव्हे विश्वावर स्वामित्व मिळवू पाहत असतो. त्यामुळे. दान स्वीकारल्यामुळे येणारे आपले दास्यत्व व
दुसर्याचे स्वामित्व आपल्यावर येते. ते तर इथे जराही मंजूर नाही. कोणाहीकडचे धन घ्यायचे नाही. अन्न घ्यायचेच झाले तर ते भिक्षा मागून घ्यायचे. कारण भिक्षा हि अनेक जणांकडे मागितली जाते. ती घेतल्यावर जवळपास कोणी गरजवंत सजीव असेल तर आधी त्यातील अन्न त्याला द्यायचे, त्यानंतर आपल्या पोटाला जेव्हढे हवे तेव्हढेच खायचे. बाकीचे कोणाला तरी आधीच देऊन टाकायचे. उद्या देणारा माझा भगवंत आहे तो पाहून घेईल. संचय करायचा नाही. ह्याला भिक्षा म्हणायची. भिक्षा पवित्र असते. संचय केला कि तीच भिक होते, लाचार होते, मनाला लाचार बनवते. मग मुक्ती कोठून मिळायची??? अपरिग्रह हा नेम पाळल्याने पूर्ण स्वाधीनता येते. किंबहुना स्वामित्व येते. आणि विश्वावर-भौतीकावर संपूर्ण स्वामित्व मिळविणे हे तर राज्योगाचे अंतिम लक्ष आहे. चंद्रसूर्याच्या जागा हि ह्याने ठरवायच्या इतके स्वामित्व अभिप्रेत आहे. थोडक्यात काय आपला हात कधीही उताणा असता कामा नये नेहमी उपडा असला पाहिजे.
 
ड-(१ यम) ब्रम्हचर्य --- लग्न न करणे व ब्राम्हचार्याचे काटेकोर पालन करणे, आपल्या शास्त्रात जे काही दिलेले असते ते प्राधान्यतः पुरुषानबद्दल लिहिलेले असते. पूर्वी स्त्रिया समाजात वावरत नसत. कारण त्यांना तो अधिकारही नव्हता. अधिकार ह्या शब्दाचा इथे अर्थ पात्रता असा घ्यायचा आहे. कारण निसर्ग निर्मित स्त्री पुरुष भेद जो आहे, त्यामुळे दोघांना वेगवेगळ्या प्रकारच्या निसर्गदत्त शक्ती लाभलेल्या आहेत. यांचा त्याच पद्धतीने अवलंब करून सहज यश मिळविणे हाच त्या मागचा उद्देश होता. त्यातून पुढे पुरुष प्रधान संस्कृती केव्हा कशी निर्माण झाली ते इतिहास जाणे. पण त्यामुळे त्याचे विकृत स्वरूप समाजात निर्माण झाले. आणि त्यातून विकृत सामाजिक कलह निर्माण झाले. काही बाबतीत तर काही विशिष्ट प्रकारच्या गृहस्थाश्रमी कर्मांचे पालनही स्त्रियांना निषिद्ध असायचे. त्यामागचा मूळ उद्देश लोप पावला. आणि एक प्रकारच सत्ताधीश पणा निर्माण झाला. माहितीलाच ज्ञान समजून त्यातून निर्माण झालेल्या अज्ञानाचे हे फळ आहे. अजूनही समाजात माहिती म्हणजेच ज्ञान हाच मोठ्ठा गैर समज आहे. त्यातून पूर्वीच्या गैरसमजात भर पडून अधिकाधिक सामाजिक कलह निर्माण होत आहेत. ------- असो ----- त्यामुळे हे सर्व विचार व विचारसरणी प्रधान्न्यपणे पुरुषांना लागू होते. किंबहुना हा योग पुरुषासाठीच आहे असेही वाटू शकते. ---- देह, बुद्धी, आणि मन ह्या तीन मिळून माणसाचे व्यक्तिमत्व प्रकट होते. त्यात श्रीमंतीची सुद्धा भर पडते. चेहरा व शरीर सुंदर दिसणे हे नशीब आणि महिनातीचे फळ आहे. त्यात भर म्हणून बुद्धीचे तेजही माणसाच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसते. त्यात अधिक --- स्वस्छ आणि पवित्र मनाचे प्रसन्नपण त्याच्या सुंदर दिसण्यात भर घालते. नशिबाने जर तो श्रीमंत घरात जन्माला असेल तर त्याचे हि तेज त्याच्या व्यक्तिमत्वाला नक्की आणखीन प्रभावी करते. ------- ह्या सर्वांवर कडी म्हणजे !!!ब्रम्हचर्य!!! ते जर कडकडीत असेल तर त्याचे तेज ह्या सर्वांहून विलक्षण दिसते. कडकडीत ब्राम्हचार्यामुळे माणसामध्ये जी शक्ती निर्माण होते, त्याला ओज शक्ती असे म्हणतात. (तेच ओज, तेजस्वी वलय रूपाने आपण देव संत ह्यांच्या मागे चित्रात दाखविण्याची प्रथा आहे. अर्थात ह्यात ओजा प्रमाणेच सात्विकता सुद्धा त्यात असते) (ह्या वलयांच्या बाबतीत निरनिराळे रंग असतात, असे ज्ञानी सांगतात.) ते अधिकारी (ते बघण्याची पात्रता असलेल्या) पुरुषाला दिसतात. त्यातील मला म्हाहीत आहेत तेव्हढे सांगतो. पांढरा - सत्व, स्वच्छ, सत्य, संतत्वाचा आहे, हीच पंढरी म्हणजे पांढरी. सुक्ष्मसाही कलंक नसलेले पांढरेपण. लाल - विषयासक्त माणसाच्या भोवती दिसते. काळा - पैशाचा हव्यास असलेल्या आत्यंतिक लोभी व्यक्तीभोवती दिसते. (हे रंग संतांना दिसतात असे म्हणतात) ब्राम्हतेज असलेला माणूस मात्र कोणालाही सहज आकर्षित करतो. ब्राम्हच्र्याचे तेज--- ओज लपत नाही. हा माणूस नेहमी प्रसन्नच असतो.असा माणूस सर्वार्थाने आकर्षित दिसतो. प्रधान्ण्यातः वैषयिक रित्या आकर्षक असतो. (आजच्या भाषेत सेक्सी). हे ओज म्हणजेच आजकाल ज्याला ओरा म्हणतात तो होय. कडकडीत ब्रम्हचर्य पालन हि सोपी गोष्ट नाही. पण ती ह्या योगाचा पाया आहे, आणि कळसही आहे. ते शक्य नसेल तर चुकुनही ह्या मार्गाचा विचारही करू नये. वेड सुद्धा लागू शकते. इतके ह्याचे महत्व आहे. कामाच्या पूर्ण निर्दालानाशिवाय कुंडलिनी जागृती शक्य नाही असे जाणकार सांगतात.
 
क-(१ यम) अस्तेय --- स्तेय म्हणजे चोरी. अ म्हणजे नाही. म्हणजे चोरी न करणे. स्वतः तर चोरी करायची नाहीच. पण चोराला चोरी करणार्याला कळत नकळत सुद्धा साथ न देणे. साधकाने तर चोरीचे विचारही मनात येवू न देणे अत्यावश्यक आहे. कारण कोणत्याही क्रियेची सुरुवात - प्रथम मनात इच्छा निर्माण होते --- त्यानुसार -- मानतील भाव मग --- मनातील विचार ---- त्यांना अनुसरणारे शब्द -- त्या पाठोपाठ मग कृती ---- ह्या क्रमाने घडत असते. म्हणून सर्व प्रकारच्या भौतिक इच्छा व अपेक्षांना मुळातच निर्माण होऊ न देणे आवश्यक असते. हा नियम वास्तविक सर्वच प्रकारच्या आचरणासाठी आहे. कारण भौतिकाच्या दास्यातून मुक्त होणे, --- नव्हे, नव्हे, त्याच्याही पुढे जावून ---- भौतीकाला आपला दास बनवणे हे ह्या योगाचे (राज्योगाचे) ध्येय आहे. त्यामुळे कोणत्याही मोहाचा लवलेशही राहता कामा नये. चोरी पासून अशा प्रकारे अंतर्बाह्य मुक्त होऊ शकणार्या व्यक्तीला संपत्ती/ऐश्वर्य प्राप्त होते. (हि एक प्रकारची सिद्धी आहे. अस्ठ सिद्धी पुढे दिल्या आहेत पण त्या व्यतिरिक्तही काही सिद्धी असतात त्यातील एक वाचा सिद्धी वर प्रामाणिक पानात दिली आहे) आणि ते सात्विक असते. संपत्ती सुद्धा आपण ज्या वृत्तीने आणि मार्गाने मिळवतो त्या प्रमाणे सात्विक संपत्ती, राजस संपत्ती, तामस संपत्ती असते, त्या त्या प्रमाणे त्या त्या वृत्तीचे भोग निर्माण होतात, आणि तसे ते भोगावे लागतात. म्हणजे सात्विक, राजस आणि तामस ज्या मार्गाने संपत्ती मिळविली असेल तसे भोग भोगावे लागतात. पण त्या संपत्तीत गुंतला तर पुन्हा योग बाजूला राहतो. म्हणूनच सिद्धीपासून दूर राहावे असे म्हणतात. आपल्या एखाद्या गोष्टीची चोरी झाली तर आपल्याला किती मानसिक वेदना होतात? ह्याची जाणीव प्रत्येकाला आहे. मग आपण जर दुसऱ्याचे काही त्याला न काळात घेतले तर त्याला होणाऱ्या वेदनांमुळे त्याचा होणारा तळतळाट आपल्याला तसेच भोग भोगायला लावतो. आपल्याला तर सर्वस्वी स्वतंत्र व्हायचे आहे. कोणाचाही शाप (शाप आणि वर ह्या विषयी पुढे केव्हातरी माहिती येईलच) घ्यायचा नाही. चोरी तर सोडाच पण एखाद्याची पडलेली (हरवलेली)गोष्ट सापडली तरी ती घेऊ नये ती हि चोरीच आहे. कारण ती गोष्ट त्याच्याच दुर्लक्षित पणा मुले त्याने गमावली असेल तरी त्याच्या मनाला ते जाणवल्यावर यातना होतच असतात. त्या आपल्याला भोवतात. त्यामुळे हे सर्व काटेकोरपणे पाळणे अत्यावश्यक आहे.
 
ब-(१ यम) सत्य --- प्रामाणिकपणा. कोणत्याही कठीण अवस्थेत सुद्धा, कधीही खोटे न बोलणे. खोटे न वागणे. इथे दुसऱ्याचं चांगल होण्यासाठी खोट बोललो हेही चालणार नाही. म्हणूनच मी म्हटले आहे कि संन्यासी वानप्रस्थाश्रमी माणसांसाठीच हे सर्व शक्य आहे. इतकेच काय गम्मत म्हणूनही खोटे न बोलणे, बोलण्या प्रमाणे आपले आचरण काटेकोरपणे पाळणे. अशा सत्य वाचनाने वाचा सिद्धी प्राप्त होते. म्हणजे आशा प्रकारे सत्यवचनी आणि आचरणी माणूस जे बोलेल ते खरे होते. पण त्याची कठोरता पाहता आपल्या लाखात येईल कि हे संसारीकाला कठीण किती आहे. नव्हे शक्यच नाही. म्हणूनच वानप्रस्थाश्रम आवश्यक ठरतो. बर सत्य बोलतांना ते दुसऱ्याला लागेल असे कठोर सुद्धा असताकामा नये. कारण दुसऱ्याचे मन दुखावणे म्हणजे परत हिंसा. ती हि घडता कामा नये. अशी टांगती तलवार असते डोक्यावर. बाकी बहुतेक जाण वानप्रस्थाश्रम स्वीकारतात. सतत साधना करत माणूस सिद्ध झाला कि मग तो समाजात (कदाचित) वावरू शकतो. कारण तो मनाने तेव्हढा तयार झालेला असतो. म्हणजे एव्हढे साधनेचे कष्ट सहन करून सुद्धा मृदू स्वभाव राहिलेलेच संत होतात, कि जे समाजातही सहजपणे वावरू शकतात. आजच्या सामाजिक परिस्थितीत जर अशी माणसे (बुवाबाजी न करणारी) खरोखरच निर्माण झाली तर त्यांच्या कडूनच समाजाचे खऱ्या अर्थाने कल्याण होत असते.
 
अ-(१ यम) अहिंसा --- काया, वाचा, व मनाने कुणालाही त्रास न देणे. काया- हिंसा म्हणजे ठार मारणे. ते तर दूरच. पण कोणालाही देहाने, देहाला, कोणत्याही प्रकारची बारीकशीही शारीरिक इजा होवू देणे. आपल्यामुळे दुसऱ्याला जराही दुक्ख होऊ न देणे. वाचा- आपल्या नुसत्या बोलण्यातून सुद्धा कोणालाही जराही दुखः होणार नाही याची काळजी घेणे. जराही कठोर शब्द न वापरणे. मन- इथे दुसर्याच्या मनाला वेदना होतील, त्रास होईल असे आपल्याकडून काहीही होताकामा नये. दुसऱ्याला त्रास होईल असे विचारहि आपल्या मनात येवू देता कामा नये. अहिंसे बरोबरच दया आणि क्षमा हे दोनाहे ओघानेच येतात. म्हणजेच सूड भावना (मत्सर) सुद्धा जराही नसणे. सूड भावना माणसाची मानसिक प्रगती होवू देत नाही, अंतिम स्वतःच स्वतःच्या नाशास कारणीभूत होते. विचार, इच्छा, हि शक्ती आहे. प्रत्येक शक्ती हे एक पूर्ण वर्तुळ आहे. ती जिथून सुरु होते, तिथेच परत येऊन आपला परिणाम दर्शवते. म्हणजे आपल्याला जेव्हा जेव्हा वाटते एखादा माणूस आपल्याशी मत्सराने वागत आहे त्या वेळी हे नक्की समजावे मत्सर मुळात आपल्या मनात आहे. तो हि खोल आहे. तोच समोरच्या माणसाकडून परावर्तीत होत आहे. मग प्रेमाचे हि तेच आहे आपण प्रेम केल्यास तेच आपल्याकडे परावर्तीत होणार, नव्हे होणारच आहे, हे विज्ञान आहे. म्हणून स्वतःचा उत्कर्ष करण्याचे सर्वात सोपे, सर्वस्वी आपल्या हातात असणारे, १००% यशस्वी साधन म्हणजे दुसऱ्याचे सतत चांगले चिंतने. मृदू स्वभाव निर्माण झाला कि मानला सात्विकता येते इतकेच काय योग्याच्या तर आवाजालाही मृदुता येते योग्याचा आवाज आपल्याला कधीही कठोर ऐकायला येणार नाही.
 
१ यम --- ह्या मद्ध्ये अ-अहिंसा, ब-सत्य, क-अस्तेय, ड-ब्रम्हचर्य, इ-अपरिग्रह, ह्या चारहि गोष्टी काटेकोरपणे पाळायच्या आहेत. प्रत्येक गोष्ट १००%च केली गेली पाहीजे. मधली टक्केवारी इथे (ह्या योगाला) मंजूर नाही. खरे तर प्रेम आणि भाक्तीलाही साधनेची अर्धवट टक्केवारी मान्य नाही. पण भावना ज्यावेळी पराकोटीला पोहोचते, तेव्हा ह्या सर्व गोष्टी अपोआप घडतच जातात. तिथेही अंतिम १००% च अपेक्षित असते. पण त्यासाठी मुद्दाम वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. किंबहुना मनाची आत्यंतिक तळमळ हे सर्व घडवून आणते. म्हणजे साधकाला १००% तयार करते. हे सर्व घडायला वेळ लागतो तो प्रत्येकाचा वेगळा असतो तो ह्याच मुळे हि अंतिम टक्केवारी गाठायला प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागतो. ह्या साधनेत मानाच्या इच्छा, देहाच्या इच्छा, बुद्धीच्या इच्छा, ह्यांच्या सर्व ओढताणीवर सतत मनाने लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे मनाला आत्यंतिक ताण आल्याने, थकवा येतो. सर्वसामान्य माणसाला ह्याची सवय नसते. त्यामुळे वारंवार निराशा होण्याची संभावना असते. मन खूपच खंबीर, कठोर, असावेच लागते. तरीही प्रेमशुन्न्य नसते. म्हणजे खरोखरच तारेवरची कसरत असते. ह्या सर्व साधनेच्या काटेकोर पणामुळे हि माणसे समाजात वावरायला नालायक (हा शब्द नालायक म्हणजे वाईट नाहीत पण योग्य नाहीत एव्हढाच घ्यायचा आहे) ठरतात. बरीचसी विक्षिप्तच वाटतात. आणि ते स्वाभाविकही आहे. म्हणूनच हि साधना करणारे सहसा समाजात वावरत नाहीत. वानप्रस्थाश्रम स्वीकारतात. आपल्याकडे ब्राम्हचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, आणि संन्यासाश्रम असे क्रम सांगितले आहेत. हि साधना करणारे ब्राम्हचार्याश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम ह्या तिघांचा एकाचवेळी अवलंब करतात.
 
ब ----- राजयोग प्रवेश ----- अष्टांग योग --- १-यम, २-नियम, ३-आसन, ४-प्राणायाम, ५-प्रत्याहार, ६-धारणा, ७-ध्यान, ८-समाधी हि ह्या योगाची ८ अंगे आहेत.
राजयोग म्हणजे समाधी असे जणु समीकरण आहे म्हटले तर वावगे होणार नाही. समाधी हे शेवटचे अंग गूढ प्रांतात प्रवेश करते. समाधी पर्यंतची अंगे समजून घेण्यासारखी आहेत. समजण्यासारखी आहेत. साधना मात्र रोज नियमाने आणि कठोरपणेच करायला लागते. लटकेपणा औंशताहा हि चालत नाही. ह्याची इतर कोणत्याही योगाशी सांगड घालता येत नाही. म्हणूनच ह्या प्रकारची योग साधना संन्याश्यासाठीच आहे. त्याची पहिली ५ अंगे संसारी माणूस आचारु शकतो ----- किंबहुना ----- ज्याची आज सामाजिक स्वास्थ्यासाठी आज नितांत गरज आहे. माणसाला महंत होण्यासाठीहि ह्याची गरज आहे. त्यादृष्टीने मात्र हा योग महत्वाचा आहे म्हणून सविस्तर देणार आहे. पुढील २ अंगे आजकाल आपल्याकडे आचरण्याचा प्रघात आला आहे आजच्या काळातील हा सामाजिक मानिया आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण पहिल्या पाच अंगांची कठोर वृत्तीने आचरण सिद्धीता न करता ६वे व ७वे अंग पुढील कोणतीही अंगे आचरणे हे निरुपयोगी अथवा / किंवा / किंबहुना धोकादायक सुद्धा बनू शकते. पण आजच्या (समाजात पूर्वीची बुवाबाजी आणि आता गुरुबाजी प्रमाणेच) ह्या अंगांचा प्रचारहि जरा अवास्तव पणे होतो आहे. ह्याचे अर्धाचारण हे सुद्धा धोकादायक आहे. म्हणूनच हि माहिती एक लाल कंदील म्हणूनच मानवी. मन आणि शरीर दोन्ही समर्थ बनवायचे आहेत म्हणजे मानाच्या शक्ती पेलणारे शरीर बनवायचे आहे. त्यात मोठ्ठा भाग सुक्ष्मत्ला आहे व्यायामाने शरीर सुधृढ बनवणे आणि इथे शरीर सुधृढ बनवणे ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ब्रम्हचर्य हा ह्याची सुरुवात मद्ध्य आणि शेवट आहे. त्याला पर्याय नाही. इथे पास किंवा नापास ०% नाहीतर १००% मध्ये काही नाही. म्हणूनच साधनेतील चिवटपणा टिकवणे कठीण असते. कोणत्याही साधनेत मद्ध्ये काही वर्ग आहेत. पण त्याचा व्यावहारिक उपयोग असतो इथे अर्धवट करून फायदा नाही. असो सामाजिक भान म्हणून आपण ह्याचा अभ्यास करूया. शुभम भवतु.
 
३ ज्ञानयोग ------- ज्ञानाची इच्छा होणे हेच ज्ञान्साम्पादानाचे सर्वात मोठे साधन आहे. जिज्ञासे शिवाय ज्ञान होणे शक्यच नाही. जिज्ञासे बरोबर शोधक वृत्ती, चिकाटी, अथक प्रयत्न, एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याची कुवत, बुद्धी, मन आणि शरीर सर्व एकवटून त्यात घुसायची तयारी. हे सर्व लागते. पैसा आणि लौकिका बद्दल संपूर्ण उदासीनता व निस्वार्थीपणा हा परमार्थाचा प्राण आहे कारण स्वार्थ नाही तोच मुळी परमार्थ. कागदी पुस्तकांचा प्रचार करून दासबोधाचा प्रचार कधीच होऊ शकणार नाही हे माझे मत कदाचित समर्थ असते तर त्यांनीही मानन्य केले असते नक्की, कारण अनुभव घेणे हेच दासबोधाचे सार आहे. परमार्थाचे सार आहे. त्याचा ध्यास लागो हीच सदिच्छा.
कर्मयोग ----- कर्मयोग हा संसारी माणसांसाठी सर्वात महत्वाचा म्हणून शेवटी लिहिणार आहे. इथे श्रद्धा, भावना, कर्तव्य कठोरता एकाच वेळी साधणे हि तारेवरची कसरत आहे. त्रिवेणी संगम आहे. आपल्या सर्वांचा सर्वात जवळचा आप्त, मित्र, ,सखा, असा हा योग आहे. असे माझे मत आहे. तसे भक्ती आणि प्रेम हे सुद्धा संसारी माणसांसाठी आहेत पण तिथे बऱ्याच वेळा माणसाला भावना विवश करतात आणि माणूस योगापासून दूर जातो. काम्योगाचे तसे नाही. प्रत्येक माणसाच्या अत्यंत गरजेचा असा हा योग आहे. तसे सखोल विचार केल्यास असे जाणवते कि सर्वच योग हे काही औंशी एकमेकात मिसळलेले आहेत. जसे इंद्रधनुष्याचे रंग. रेघा मारून वेगळे करता येत नाहीत. तरीही मन, बुद्धी, आणि शरीर, ह्यांच्या प्रधान्ण्यातेनुसार त्यांचे वर्गीकरण करण्याचा आत्तापर्यंत मी प्रयत्न केला आहे. ---------- आता उद्यापासून राजयोग सुरु करणार आहे.
 
१ ज्ञानयोग ----- योग म्हणजे ----- योगायोग, संधी, जोडणे, ध्यान, ग्रहांची युती आणि आजच्या युगात आपल्याकडे योगासने म्हणजेच योग असेही समजले जाते. क्रमशः जायचे तर प्रेमयोग, व भक्तियोग, ह्यावरील विवेचन झाले. क्रमाने विचार करायचा तर आता कर्मयोग, ज्ञानयोग, शेवटी राजयोग, असायला हवा. पण एकूणच ज्ञानयोगाची व्याप्ती व सामाजिक वास्तव विचारात घेवून मी ज्ञानायोगाबद्दल फक्त तोंड ओळख करून देत आहे.
आज पर्यंत आपण --- प्रेमयोग व भक्तियोग ----- हे दोन योग प्रकार पाहिले, प्रेम योग आणि भक्ती योग. ते दोन्हीही मनाची उत्क्रांती साधून --- मन उन्मन करून --- ईश्वराशी तादात्म्य कसे पावावे ते सांगणारे होते. ह्या साधनेत भावना आणि श्रद्धेला फार महत्व आहे. त्या उलट ज्ञानयोग हा पूर्ण पणे बुद्धी प्रधान योग आहे हा प्राधान्याने बुद्धिमान, तर्कनिष्ठ, वैचारिक, विवेकी, आत्मानात्म विवेक विचाराने जाणू शकणारी व्यक्तिमत्व. अशा लोकांनाच शक्क्य आहे. ह्याला बुद्धियोग सुद्धा म्हणतात. ह्या बाबतीत जाणता, जाणकार, जन्मावा लागतो. समजावणे आणि समजून घेणे दोन्ही कठीण. इथे सर्व बुद्धीचा मामला आहे. अर्थात ईश्वराशी तादात्म्य पावणे हे मनाला उन्मनी करूनच साधायचे आहे हे खरे. पण इथे त्याचे या योगाचे साधन बुद्धी, विचार, विवेक, हे आहे. त्यामुळे ह्या योगाच्या बाबतीत साधना करणे म्हणाल तर तसे काहीच नाही. सर्व काही समजुतीचा भाग आहे. ज्ञानी हा जन्मावा लागतो. भगवंत सुद्धा ज्ञानी हा मला मीच वाटतो असे म्हणतात.
वेद विद्या हे सर्व ह्याच्या अभ्यासात येते. तिची व्याप्ती आणि किचकट पणा दोन्हीही प्रचंड आहेत. त्यामुळे ह्या योगाच्या बाबतीत किती सांगावे तेव्हढे थोडेच आहे. सांगायला कठीणही आहे. समर्थ रामदासांचा दासबोध हा ज्ञानयोग प्रधान आहे. अर्थात त्यात सर्व योगांचा परामर्श घेतला गेलेला आहे. पण निव्वळ विचार आणि विवेकाने हि परमार्थ साधता येतो हे समर्थ ठामपणे सांगतात. ज्या (बुद्धिनिष्ठ)माणसाला डोळस पणे परमार्थ साधायचा आहे. त्याने दासबोध जरूर वाचवा. समजायला हि अतिशय कठीण, व अचारायला हि तितकाच कठीण, असा हा ग्रंथ आहे. थोडक्यात सांगता येण्यासारखा नाही. म्हणून दासबोध आणि तो हि श्री. के. वी. बेल्सारेंनी लिहिलेला वाचवा अशी मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करेन. जीन्वानातील प्रत्येक अंगांचा इथे परामर्श घेतला गेला आहे. व्यापक सूक्ष्म म्हणजे तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचेह तर अनुरानिया तोखडा तुका आकाश येवढा हेच ह्या गर्न्थाच्या ज्ञानालाही लागू होईल. अनुभवण्याचा ग्रंथ आहे.
 
 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive