Coffee-table book of Chhatrapati Shivaji Maharaj letters launched
The State Archives department discovered the letters and got them scanned and transcribed to put together this 74-page book.
Originally written in ‘Modi’ script, the letters have turned brown with time. MSA got them scanned and transcribed into non-cursive Devnagari used in modern Marathi.
The letters offer a glimpse into the various facets of Shivaji’s personality and reassert his qualities as an able leader and a human being.
=============
संभाजी महाराज-एक उपेक्षित लढवय्या
इतिहासाचे अभ्यासक मिलिंद कारेकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर लिहलेला हा लेख.
त्या दिवशी असाच बोलता बोलता शिवाजी महाराजांचा विषय निघाला आणि कुणीतरी म्हणाले कि , ' शिवाजीने जितके केले , ते सगळे संभाजीने फुकट घालवले. ' आज हि भरपूर जणांना इतकीच माहिती आहे की , संभाजी महाराज म्हणजे विलासी आणि गाण्या बजावण्यात मश्गुल राहणारे होते. आणि त्यांना जेव्हा औरंगजेबाने पकडले तेव्हा त्यांचा अमानुष छळ केला.
पण कुणी हा विचार करतो का की , ज्या शिवाजी महाराजांना औरंगजेबाने पकडल्यावर फक्त कैद करून ठेवले , तिकडे संभाजी महाराजांचे इतके हाल करायचे कारण काय ? असे काय घडले होते , की औरंगजेब इतका दुखावला होता ? महाराजांनी औरंगजेबाची सुरत दोन वेळा लुटली , ( ह्या गोष्टीमुळे औरंगजेबाने केला नसेल इतका राग आजही काही गुजराती माणसे महाराजांचा करतात. त्याच्या मामाची म्हणजे शाहिस्तेखानाची बोटे कापली. पण त्याचा बदला म्हणून देखील औरंगजेब महाराजांचे बोट वाकडे करू शकला नाही , मग नेमके संभाजी महाराजांनी असे काय केले होते की , त्यांच्याबद्दल औरंगजेबाच्या मनात इतका राग होता ?
काही गोष्टी आपण विसरतो त्या म्हणजे महाराजांचे बालपण हे जिजाऊंच्या देखरेखी खाली गेले तर संभाजी महाराजांची आई , सईबाई ह्या संभाजीच्या लहानपणीच वारल्या होत्या. जिजाऊ होत्या तो काळ संभाजी महाराजांच्या आयुष्यातला चांगला कालावधी आहे. पण तरी शिवाजी महाराजांना जेव्हढा जिजाऊंचा सहवास लाभला तेव्हढा संभाजीमहाराजांना लाभला नाही. शिवाय वेळ प्रसंगी आई जेवढी कठोर होवू शकते तेवढी आजी होत नाही , हे उदाहरण आपण आपल्या घरात देखील बघू शकतो.
शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते तर संभाजी महाराज हे युवराज होते , त्यामुळे त्यांच्या वृत्तीत फरक हा असणारच. दिसायला ते राजबिंडे होते. उंची ६ फुट ३ इंच होती. धाडसी आणि हजरजबाबी होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यात देखील बरेच शत्रू निर्माण झाले होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचा एक किस्सा म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग सोबत तह केला तेव्हा , तहाची पूर्तता होत नाही तोवर मिर्झाराज्यांनी शंभूबाळाला वज्रगडावर ओलीस ठेवले होते. तहाची पूर्तता झाल्यावर जेव्हा शंभूराजे परत निघाले तेव्हा दिलेलखानाने त्यांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि विचारले कि , ' इतका मोठा हत्ती तुम्ही दक्खनला कसा काय घेवून जाणार ?' तेव्हा शंभूराजे म्हणाले की , ' हत्ती तर आम्ही कसा ही घेऊन जाऊ , पण आमच्या आबासाहेबांनी जे किल्ले दिले आहेत ते परत कसे नेता येतील ह्याचा आम्ही विचार करतो आहोत .' दिलेलखान तर सोडा पण हे असले फटके संभाजी महाराजांनी वेळोवेळी औरंजेबाला सुद्धा लगावलेले आहेत.
औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ह्याने जेव्हा औरंगजेबा विरुद्ध बंड केले तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता. आणि त्या दरम्यान त्यांनी अकबराची बहिण झीनत हिला एक पत्र लिहिले होते , जे औरंगजेबाच्या माणसांच्या हाती लागले आणि ते भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवले गेले होते. ते पत्र असे होते , ' तुमचे बंधू शहजादे अकबर यांनी हिंदुस्तान सोडण्यापूर्वी आम्हाला तुमच्या बद्दल सांगितलं . तुम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं . त्याचा जबाब त्यांनी तुम्हाला परत पाठवला नव्हता . तो निरोप त्यांनी जाताना आमच्याकडे देवून ठेवला आहे तो असा : बादशहा सलामत हे नुसते मुसलमानांचे बादशहा नाहीत . हिंदुस्तान रयत वेगवेगळ्या धर्माची आहे . त्या साऱ्यांचेच हजरत बादशहा आहेत . जी गोष्ट मनात ठेवून ते या दक्खनच्या पठारावर आले ती आता साध्य झाली आहे . त्यात समाधान मानून त्यांनी आता हिंदुस्तानांत परत कूच करावं . एकदा त्यांच्या तावडीतून आम्ही आणि आमचे तीर्थरूप सुखरूप सुटून आलो आहोत . पण बादशहा अशीच आपली जिद्द चालवणार असतील तर आमच्या पकडीतून मात्र ते सुटून परत हिंदुस्तानात जाणार नाहीत . त्यांची तशीच इच्छा असेल तर त्यांनी आपल्या कबरीसाठी या दक्खनमध्ये लवकरच जागा शोधलेली बरी .’ [संदर्भ:शहेनशहा , ना.स.इनामदार]
युवराज असून देखील दुर्दैवाने त्यांना योग्य तो मानमरातब मिळाला नाही. घरातील बेबनावांमुळे शिवाजी महाराजांनी त्यांना स्वतःसोबत कर्नाटकच्या मोहिमेवर न घेता , श्रीरंगपुरला सुभेदार म्हणून धाडले. श्रीरंगपुर संभाजी महाराजांची सासुरवाडी होती. कर्नाटकच्या मोहिमेवरून परतत असताना महाराजांच्या स्वागतासाठी संभाजी महाराज श्रीरंगपुरच्या वेशीवर उभे होते पण शिवाजी महाराज पन्हाळा , सातारा , महाबळेश्वर मार्गे रायगडावर परतले. सगळ्या प्रजे समोर संभाजी महाराजांचा केव्हढा मोठा अपमान झाला असेल ? मानसिंगाच्या पाठीमागे उभं केल्यावर ज्या राजाला अपमानित वाटलं आणि भर दरबारात महाराजांचा आवाज चढला. बापाचा स्वाभिमान जवळून पाहिलेल्या त्यांच्या मुलाने असा अपमान झाल्यावर बंड केले नसते तरच नवल.
मराठेशाहीचे दुर्दैव हे कि संभाजी महाराज (वय वर्ष ३२) , विश्वासराव पेशवा (वय वर्ष १६) माधवराव पेशवा (वय वर्ष २७) हे मराठ्यांचे पराक्रमी राजकुमार फारच अल्पायुषी होते. वयाच्या ३२व्या वर्षी औरंगजेबा समोर गुडघे न टेकता मातृभूमीसाठी मरणाला बहाद्दुरीने मिठी मारणार्या राजा बद्दल जेव्हा सकाळच्या ८:२०ची लोकल पकडण्याची काळजी करणारा आम आदमी , '' शिवाजीने जितके केले , ते सगळे...... '' बोलून अक्कल पाजळतो तेव्हा चीड येते.
=================
माझा आदर्श शिवाजी महाराज
शिवाजीमहाराजांचे नेतृत्वगुण आणि राजा म्हणून समस्त जनतेची काळजी घेण्याची त्यांची वृत्ती हे आपल्या सर्वांसाठीच आदर्श आहेत. हिंमत न हारता परिस्थितीवर मात करून विजयश्री खेचून आणण्याच्या त्यांच्या गुणांमुळेच ते माझे आदर्श आहेत.
- मधुर भांडारकर
===================
इतिहाससंशोधन विश्वसनीय कसे होणार?
इतिहास हा मानवी मनावर प्रभाव गाजवणारा फार महत्त्वाचा घटक असतो. इतिहास हा कसा सांगितला गेला आहे, यावर समाजाचे त्याबाबतचे आकलन अवलंबून असले तरी सामान्य माणसांवर प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासापेक्षा वदंतांचा अधिक प्रभाव असतो. इतिहास हा जेत्यांचा वा समाजवर्चस्ववादी घटकांच्या वा वर्चस्ववादी होवू पाहणाऱ्यांच्या मानसिक तुष्टीकरणासाठी लिहिला जात असल्याने तो तटस्थ व निरपेक्ष असतोच असे नाही. दुसरे असे की, इतिहासकार हासुद्धा एक मनुष्यच असल्याने त्याच्या लेखनावर त्याच्या समजुती, पूर्वग्रह आणि त्यानुरुप असलेल्या त्याच्या व्यक्तिगत आकलनाचा प्रभाव पडत असतो. अनेकदा एकाच पुराव्याचे आकलन/विश्लेषण इतिहासकारपरत्वे बदलत असते. या नियमाला अपवाद नसतात असे नाही. परंतु मग त्यांनाही त्यांच्या नव्या संशोधनामुळे सामाजिक पूर्वग्रहांना, रुढ समजुतींना धक्का बसत असल्याने लोकांच्या रोषाला तांेड द्यावे लागते आणि त्यातून जी वादळे निर्माण होतात त्यामुळे पूर्वग्रहविरहित, संपूर्ण ज्ञान-चिकित्सात्मक इतिहाससंशोधनास खीळ बसते.
खरे तर सातत्याने इतिहास संशोधने यासाठीच व्हायला हवीत की कोणावरही अकारण अन्याय होऊ नये, तसेच कोणाचे अकारण उदात्तीकरण झाले असेल तर तेही लोकांसमोर यावे. पण मूळ इतिहास हा वर्चस्ववादी भूमिकेतून लिहिला गेला असल्याने, कोणाचे उदात्तीकरण करायचे, कोणाला बदनाम करून ठेवायचे आणि कोणाला गडप करून टाकायचे ही एकाअर्थाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणत त्याप्रमाणे 'इतिहासविघातक प्रवृत्ती' होती आणि आजही ती शेष असावी हे एक महाराष्ट्राचे दुदैर्र्व आहे.
शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आणला जात असताना, ज्येष्ठ-श्रेष्ठ आणि रात्रंदिवस राबून अनमोल कार्य केलेले संशोधकही दुदैर्र्वाने या इतिहासविघातक दृष्टीपासून मुक्त राहिले नाहीत. खरेतर आज इतिहास अधिकाधिक नि:पक्षपाती होत जाण्याची गरज आहे. परंतु अशा उज्ज्वल इतिहासात आपल्याही जातीघटकाचे वर्चस्व कोणत्या ना कोणत्या रूपात असले पाहिजे, या भावनेतून प्रत्यक्षाप्रत्यक्षरित्या संत रामदास आणि दादोजी कांेडदेवांबाबतचे समज गतशतकापासून जोपासले जात आहेत. दादोजी हे बालपणीचे गुरु तर रामदास हे मोठेपणीचे गुरु अशी ही मांडणी आहे. ते खरे असते आणि निविर्वाद पुराव्यांनी सिद्ध झाले असते तर ते मान्य करायलाही कोणाचीही हरकत नव्हती. पूवीर् न. र. फाटकांनी रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे सत्य खणखणीतपणे मांडले होते. पण अजूनही अनेक इतिहासकार वारंवार तिय्यम दर्जाच्या बनावट साधनांचा आधार घेत वारंवार शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करत असतात. ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहंदळे यांनी 'शिवाजी : हिज लाइफ अॅण्ड पिरियड' या नव्या चरित्रात्मक ग्रंथाच्या निमित्ताने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत (१७ डिसेंबर २०११), शिवाजी महाराजांचे कोणीच गुरु नव्हते असे म्हटले आहे. ते म्हणतात, 'शिवकालाविषयी जे अस्सल पुरावे आहेत त्यात कोठेही दादोजी कांेडदेव हे शिवरायांचे गुरु होते असे म्हटलेले नाही. तसा उल्लेखही कोठे सापडत नाही, हे मी ३० वर्षांपूवीर्च लिहून ठेवले आहे. परंतु त्याचबरोबर माझे असेही म्हणणे आहे की, दादोजी हे चांगले गृहस्थ असल्याची आणि त्यांच्या न्यायदानाविषयी शिफारस करणारी शिवाजी महाराजांची स्वत:ची चार पत्रे उपलब्ध आहेत. म्हणजे तो माणूस नालायक तर नव्हता? शिवाजीराजे किंवा शहाजीराजे यांनी जी कामगिरी सोपवली ती सुविहितपणे पार पाडली होती. मग इतिहासात होऊन गेलेल्या त्या व्यक्तीसाठी एवढा गहजब का?'
इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे मात्र जवळपास तीच इतिहासाची साधने वापरत दादोजी कांेडदेव हे शिवाजी महाराजांचे शिक्षक होते, दादोजींबद्दल शिवाजी महाराजांना पराकोटीचा आदर होता व दादोजींच्या निधनानंतर त्यांना खूप शोक झाला, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.
दादोजी हे आजीवन आदिलशहाचे कांेडाणा व दौंड प्रांताचे सुभेदार होते. या सुभेदारीच्या प्रदेशातच शहाजी महाराजांची पुणे व ३६ गावांची जहागिरी होती. दादोजी जे वतन/जमीनींच्या वादांबाबत निवाडे करत ते आदिलशहाचा सुभेदार या नात्याने, त्याच्या सुभेदारीच्या क्षेत्रात. तेही मलिक अंबरने घालून दिलेल्या महसुल पद्धतीनुसार. मलिक अंबरची ही महसुलाची पद्धत जवळपास देशभर स्वीकारली गेली होती. त्यामुळे ते प्रदेश आपल्या स्वामित्वाखाली आणल्यानंतर त्यासंबधीचे दादोजींचे निवाडे पुढेही शिवाजी महाराजांनी कायम ठेवले, एवढेच त्या चार पत्रांवरून सिद्ध होते. पण यातून त्यांनी शिवाजी महाराज वा शहाजीराजांचे सेवक या नात्याने ते निवाडे केले होते हे कोठे सिद्ध होते?
दादोजी हे आदिलशहाचे मृत्युपावेतो सुभेदार होते. महसुलाच्या हिशोबात काही गफलत झाल्याने आदिलशहाने घोरपडे सरदारांना कांेडाण्यावर चालून जायला सांगितले होते व दादोजींची हार झाल्यानंतर खरे तर देहान्त शासनच व्हायचे, परंतु ब्रह्माहत्या हे महत्पापात गणले गेले असल्याने हातावर निभावले. या संदर्भातील पुरावे दुर्लक्षिण्याचे कारण काय? ते असत्य असतील तर त्याबाबत संशोधनपर चर्चा करून त्यांचा निकाल का लावला जात नाही? 'मग इतिहासात होऊन गेलेल्या या व्यक्तीचा पुतळा उखडून फेकण्याचे कारण काय?' असा प्रश्न गजानन मेहंदळे यांनी विचारला आहे. तो समजा रास्त मानला, तर मग दादोजी व शिवाजी महाराज वा शहाजी महाराज यांचा नेमका संबंध काय, हेही अस्सल पुराव्यांनिशी सिद्ध करायला हवे. दादोजींनी आपल्या हयातीत कांेडाणा शिवाजी महाराजांना का मिळू दिला नाही यावरचेही संशोधन मांडायला हवे. दादोजींबाबत ज्यांना आदर आहे त्यांच्यासाठी त्यांचा स्वतंत्र पुतळा नक्कीच असू शकतो, परंतु ज्या इतिहासाशी त्यांचा संबंध आदिलशहाचा सुभेदार या नात्याने आहे तो बाजूला ठेवून त्यांना शिवेतिहासातील महत्त्वाची व्यक्ती कसे म्हटले जाऊ शकते?
१६३० साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. इतका की लोक मृत जनावरे आणि शेवटी तर मृत माणसांचेही मांस खाऊन जगायचा प्रयत्न करत होते. गावेच्या गावे ओस पडली होती. या दुष्काळाला थोरला दुष्काळ म्हणतात. या दुष्काळाचे हृदयदावक वर्णन व्हॅन ट्विस्ट या डच व्यापाऱ्याने लिहून ठेवले आहे. तुकाराम महाराजांनीही आपल्या अनेक अभंगांत या प्रलयंकारी दुष्काळाची वर्णने केलेली आहेत. दादोजींनी दुष्काळ ओसरल्यानंतर गावे पुन्हा वसवण्याची कामगिरी सुरू केली, ती त्या प्रांताचा सुभेदार या नात्याने. ती त्यांची जबाबदारीच होती. त्यात त्यांची कार्यक्षमता मान्य करायलाच हवी, पण शहाजीराजे आदिलशाहीत गेले ते १६३६ मध्येे हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे शहाजीराजांच्या आज्ञेने त्यांनी गावे वसवली हा दावा निराधार ठरतो. घटनाक्रमात अशी अदलाबदल करून काय साध्य केले जातेे? याला इतिहास संशोधन म्हणायचे का, असा प्रश्न प्रत्येक इतिहासकाराने स्वत:लाच विचारला पाहिजे.
इतिहासकाराच्या सदसद्विवेकबुद्धीवर सर्वसामान्यांचा पराकोटीचा विश्वास असतो. सारी साधने त्यांना सर्वांना अभ्यासने शक्य नसते. इतिहासकाराने इतिहासाचे केलेले मूल्यांकन त्यांच्या दृष्टिकोनात, ज्ञानात नवी भर टाकत असते. त्यातून समाजऐक्याची भावना निर्माण होत असते. आधीचज जातीय अस्मिता टोकदारच नव्हेत तर काटेरी होत आहेत, हे आपण अनुभवत असताना किमान जातीसापेक्ष अहंगंड सुखावण्यासाठी काही विधाने संबंधित पुरावे चचेर्तही न घेता केली गेली तर तो इतिहास, कितीही शिस्त असली तरी, अविश्वसनीय होणार नाही का? इतिहाससंशोधन वर्चस्ववादी मानसिकतेतून झाले तर आपण आपले भवितव्य कसे घडवणार?
=============================
सुसंस्कृत राजाचे दर्शन
- बाबासाहेब पुरंदरे
महाराजांचं मन केवळ राजकारणावरच केंदित नव्हतं. इतरही अनेक विषयांत ते लक्ष घालीत होते. त्यांना स्वत:ला संस्कृत आणि फासीर् या भाषा येत होत्या , असे म्हणण्यास ठाम पुरावा नाही. पण त्यांना या भाषांचं महत्त्व नक्कीच वाटत होतं. फासीर् , इंग्रजी , फिरंगी इत्यादी परकीय भाषांची राजकारणाकरिता जाणती माणसं जवळ ठेवणं. गरजेचंच होतं. त्याप्रमाणे मुल्ला हैदर उर्फ काझी हैदर , सोनो विश्वनाथ डबीर , रघुनाथपंत कोरडे , त्र्यंबकपंत डबीर इत्यादी फार्सी जाणकार महाराजांच्या पदरी होते. त्यातील बहुतेक सर्वांनीच राजकीय कामगिऱ्या उत्तमरितीने पार पाडलेल्या आहेत. या सर्व वकीलांचा परराज्यांशी सतत संबंध येत होता. पण कोणी लाच खाल्ली आहे वा स्वराज्यदोह केलाय असं उदाहरण नाही. फक्त एकच मनुष्य जरा वेगळा निघाला. तो म्हणजे वरील मुल्ला हैदर. हा फारसनवीस वकील अत्यंत बुद्धिमान आणि महा कारस्थानी व चतुर होता. पण तो पुढे औरंगजेबास जाऊन मिळाला.
संस्कृत भाषेवर जसे महाराजांचे प्रेम दिसून येेते तसेच आपल्या बोली मराठीवरही दिसून येते. शाहीर , पौराणिक कथानके आणि तात्त्विक शास्त्रीय गंथलेखन करणारे पंडित कवी महाराजांच्या आदरास पात्र होते. कवींद परमानंद , जयराम पिंड्ये , धुंडीराज व्यास , रघुनाथपंत अमात्य , बाळकृष्ण ज्योतिषी संगमेश्वरकर , केशव पंडित पुरोहित , संकर्षण सकळकळे , कवीराज भूषण , गागाभट्ट आदीकरून अनेक भाषाप्रभू महाराजांच्या वलयांत होते. त्यात प्रत्यक्ष युवराज संभाजीराजे यांचीही गणना होती. युवराज शंभूराजे उत्तम संस्कृततज्ज्ञ लेखक होते. वरील यादीतील प्रत्येकाने एक वा अनेक गंथ लिहीले आहेत. युवराजांनीही दोन संस्कृत पुस्तके लिहीली आहेत. संभाजीराजांना शिक्षण देण्यासाठी उमाजी पंडित या नावाचा शिक्षक नियुक्त करण्यात आलेला होता. संभाजीराजे यांनी संस्कृतमध्ये लिहिलेले एक प्रदीर्घ दानपत्र सापडले आहे. हे दानपत्र म्हणजे शंभूराजांचे थोडक्यात आत्मचरित्रच आहे. जयपूरच्या रामसिंह कछुवाहला त्यांनी लिहिलेली संस्कृत पत्रे उपलब्ध आहेत. स्वत: शिवाजी महाराजांनी लिहिलेली म्हणजेच चिटणीसांनी लिहून घेतलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. त्यातूनही महाराजांचे भाषाप्रभुत्त्व आणि तर्कशुद्ध विचारसरणी दिसून येते. लोकसाहित्याकडेही त्यांचे प्रेमाने लक्ष होते. अज्ञानदास शाहीरांनी अफझलखान वधावरचा लिहिलेला पोवाडा आज उपलब्ध आहे. या अज्ञानदासाला महाराजांनी गौरवपूर्वक एक शेर सोन्याचा तोडा आणि एक जातीवंत घोडा बक्षीस दिल्याची नोंद आहे.
महाराजांची मुदा संस्कृतमध्ये आहे. त्यांनी जिंकलेल्या आणि नव्याने बांधलेल्या अनेक किल्ल्यांना संस्कृत नावे दिली. उदाहरणार्थ प्रतापगिरी उर्फ प्रतापगड , चाकण उर्फ संग्रामदुर्ग , सिंधुदुर्ग , सुवर्णदुर्ग , शिवापट्टण आणि अशी अनेक. पदनामकोश म्हणजेच राज्यव्यवहारकोश. आपल्या भाषेचे आणि आपल्या राष्ट्रीय संस्कृतीचे महत्त्व महाराजांनी पुरेपूर ओळखले होते. संज्ञा बदलल्या की संवेदनाही बदलतात हे त्यांनी अचूक ओळखले होते. सागरध्यक्ष , राजमंडळ , अष्टप्रधान , शस्त्रागार इत्यादी राज्यव्यवहारात येणाऱ्या निरनिराळ्या अधिकाऱ्यांची , वस्तंूची आणि वास्तूची नावे संस्कृतप्रचुर ठेवलेली राज्यव्यवहार कोशात आढळतात. त्यांचे शिलालेखही संस्कृतमध्ये आहेत. रायगडावर विवेकसभा नावाची एक वास्तू होती. जाणकार शास्त्रज्ञांचा परामर्श घेण्यासाठी आणि चर्चा चिकित्सा करण्यासाठी ही विवेकासभा होती.
स्वराज्यात सर्वच धर्मांचा आणि कलाकारांचा आदर ठेवला जात होता. महाराजांचे सर्वात महत्त्वाचे धर्मकार्य म्हणजे स्वराज्याला बाधक ठरणाऱ्या भाबड्या रूढी त्यांनी बाजूला सारल्या. उदाहरणार्थ समुदपर्यटन. स्वराज्यकाळात आमची व्यापारी गलबते मस्कतपर्यंत जात होती. पश्चिम समुदावर मराठी आरमाराचा दरारा आणि वर्चस्व होते.
या सर्व उपलब्ध पुराव्यातून एकच गोष्ट निदर्शनास येते की , स्वराज्यातील प्रजा सुखी आणि निर्धास्त असली पाहिजे. येथे कोणावरही अन्याय होता कामा नये. गुणीजनांचा सन्मान राखला पाहिजे. स्वराज्य सुसंस्कृत असले पाहिजे. राज्यकर्ता सुसंस्कृत असला की , हे आपोआपच घडत जाते. या बाबतीत परदेशी समकालीन इतिहासकारांनी आणि प्रवाशांनी लिहून ठेवलेल्या हकीकती वाचनीय आहेत.
==================
शिवरायांचे कैसे पत्र लिहिणे...
येसिपास चोरी न करावी इमाने इतबारे साहेबकाम करावे..., तुम्हाला आम्ही काही वाईट वर्तणूक करू तरी आम्हास महादेवाची आण असे व आईसाहेबांची आण असे..., तरी श्रीचा इनाम पाा मजकुरी आहे. तागाईत सालगुदस्ता भोगवटा चालत आला असेल त्याप्रमाणे दुमाला करणे... ही पत्रातील मराठी भाषा सुमारे ३५० वर्षांपूर्वीच्या मऱ्हाटी प्रदेशातली आणि तिच्यावर मोहोर थेट छत्रपती शिवाजी महाराजांची. शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा दस्तावेज असलेल्या अशा सुमारे ६० पत्रांचा ठेवा पुस्तकरूपाने खुला झाला असून त्यायोगे शिवरायांच्या व्यक्तित्त्वातील विविध पैलू अधोरेखित होण्यासोबत त्या काळातील एकंदर सामाजिक व्यवहारांवर देखील अधिक प्रकाश पडण्यास मदत होणार आहे.
छत्रपती शिवरायांनी कारणपरत्वे अनेकांना पत्रे धाडली; अनेकांची पत्रे त्यांना आली. ही पत्रे म्हणजे शिवकालीन इतिहासाच्या अत्यंत महत्त्वाच्या संदर्भखुणा आहेत. या संदर्भखुणांची अस्सलता पारखूनच 'शिवछत्रपतींची पत्रे' हे पुस्तक सिद्ध झाले आहे. शिवरायांनी लिहिलेल्या, सांगितलेल्या, तसेच त्यांना आलेल्या पत्रांचा या पुस्तकात समावेश आहे. त्याखेरीज शहाजीराजे, जिजाबाई, शिवरायांचे थोरले बंधू संभाजी व पुत्र संभाजीराजे, राजारामराजे यांचीही पत्रे या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहेत. खंडोबाची पाली येथे शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत झालेला निवाडाही (महजर) पुस्तकात आहे.
मूळ मोडी लिपीतील पत्रांची छायाचित्रे व सोबत त्या मजकुराचे ओळवार देवनागरीत लिप्यंतर अशी या पुस्तकाची रचना आहे. सोबत या पत्रांचा सारांशही आहे. इतिहास अभ्यासक डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी संपादित केलेले हे पुस्तक ठाण्याच्या 'परममित्र प्रकाशन'ने प्रकाशित केले आहे.
===================
धुळ्यातील वि. का. राजवाडे संशोधन मंडळाला आज गरज आहे ती सक्षम नेतृत्वाची आणि भक्कम आथिर्क मदतीची. या अपेक्षा कधी पूर्ण होतील?
.......
धुळे शहराचेच नव्हे तर खानदेशचे सांस्कृतिक वैभव अशी ओळख असलेले राजवाडे संशोधन मंडळ, सध्या तेथील संशोधन कार्यापेक्षा अंतर्गत धुसफुसीमुळे अधिक चचेर्त आले आहे. मंडळाच्या संग्रही हजारो दुर्मिळ बाड आणि कागदपत्रे आहेत. त्यावर आधारित संशोधनपर निष्कर्ष प्रसिद्ध करणे, त्या अनुषंगाने यथायोग्य चर्चा घडवून आणणे एवढी किमान अपेक्षा इतिहास संशोधन मंडळाकडून असते. सध्या मात्र इतिहासापेक्षा वर्तमानाशी मंडळाचे नाते दृढ झालेले दिसते. मंडळाचे विद्यमान पदाधिकारी आणि ज्येष्ठ सदस्यांची घुसमट बंद खोलीऐवजी वर्तमानपत्रांतून व्यक्त झाली; आणि मंडळाच्या कामकाजाची दिशा आणि दशा ठळकपणे निदर्शनास आली.
राजवाडे संशोधन मंडळाचे ज्येष्ठ सदस्य डॉ. मु. ब. शहा यांनी एक पत्रक प्रसिद्धीस देऊन धुळेकरांना धक्का दिला. 'इतिहास आणि संशोधन दुय्यम समजणाऱ्या लोकांच्या हातात सध्या संस्थेचा कारभार असल्याने, इतिहासाचार्यांनी गोळा केलेल्या असंख्य बाडांवरची अद्याप धूळही झटकली गेलेली नाही', अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. 'संस्था ताब्यात राहण्याच्या खटपटीसाठी राजकारण आणि कोर्टबाजी करण्यापलीकडे दुसरे काम नसल्याने आजही वि. का. राजवाडे यांच्यापुढे एक पाऊलसुद्धा मंडळाने टाकलेले नाही. मंडळाची रया गेली असून तेथे काम करायला मजा वाटत नाही', अशी भावना जाहीरपणे त्यांनी व्यक्त केली. हिंदी भाषा अध्यापनाचे काम करणाऱ्या डॉ. शहा यांनी समग्र राजवाडे साहित्य संपादित करण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. शिवाय का. स. वाणी प्रगत मराठी अध्ययन संस्थेच्या सहकार्याने खानदेशचा इतिहास पाच खंडांमध्ये प्रकाशित करण्याचे भरीव काम त्यांच्या नावावर आहे. खुद्द डॉ. शहा यांनी मंडळावर टीकास्त्र सोडल्याने मंडळाच्या कामकाजाविषयी अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तथापि, संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष आनंद राजवाडे यांनी डॉ. शहा यांना कानपिचक्या देताना हातचे राखून ठेवले नाही. कित्येक वषेर् बिनविरोध होणाऱ्या कार्याध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करून डॉ. शहा यांनीच मंडळात प्रथम निवडणुकीचे राजकारण आणले. नंतर पराभूत झाल्यानंतर डॉ. शहा यांनी मंडळाविरुद्ध कोर्टात दावा दाखल केला. दुर्मिळ कागदपत्रांवरील धूळ झटकलेली नाही असा आरोप करणारे डॉ. शहा गेल्या कित्येक वर्षांत मंडळाकडे फिरकलेही नाहीत.
शहराला प्रतिष्ठाप्राप्त करून देणाऱ्या मोजक्या संस्थांमध्ये राजवाडे संशोधन मंडळाचा उल्लेख अग्रक्रमाने करण्यात येतो. शहराचे 'सांस्कृतिक तीर्थ स्थळ' असे संबोधणाऱ्या प्रत्येक धुळेकराच्या मनात राजवाडे संशोधन मंडळाविषयी अभिमान आहे. इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे मूळ धुळेकर नव्हते. पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळाशी राजवाड्यांचा घनिष्ट संबंध होता. किंबहुना मंडळाच्या स्थापनेतही त्यांचा प्रमुख सहभाग होता. तथापि, तत्कालिन पदाधिकाऱ्यांशी त्यांचे मतभेद झाले. त्यामुळे त्यांनी इ. स. १९१८मध्ये पुणे शहर सोडण्याचा निर्णय घेतला. धुळ्यातील इतिहासप्रेमी वकील तात्यासाहेब भट हे राजवाड्यांचे स्नेही होते. त्यांच्या आग्रहामुळे राजवाडे धुळ्यात वास्तव्यास आले. अखेरपर्यंत म्हणजे दि. ३१ डिसेंबर, १९२६पर्यंत त्यांचे वास्तव्य धुळ्यातच होते.
धुळ्यातील वास्तव्यात राजवाड्यांनी हजारो बखरी, मध्ययुगीन काव्ये, ज्योतिष, वैद्यकविषयक ग्रंथ, मंत्र-तंत्र, धार्मिक पोथ्या, पुराणे, चरित्रे, गद्य, कोश, दुर्मिळ पुस्तके, गणित, कामशास्त्र, भूगोल इत्यादी साहित्य-संपदा जमविली. याशिवाय राजवाड्यांनी महत्प्रयासाने गोळा केलेल्या महानुभवांच्या गुप्तलिपीतील पोथ्या, महिकावतीची बखर, राधामाधव विलास चंपू, १०९ कलमी बखर, आज्ञापत्र, योगचिंतामणी, रुक्मिणी-स्वयंवर, चिटणीस बखर, विलासमणी मंजिरी, गोविंदाख्यान, अंबरीश चरित्र इत्यादी हस्तलिखितांची ९० दप्तरे मंडळाच्या आज संग्रही आहेत. यापैकी बहुसंख्य कागद मोडी लिपीतील असून अन्य कागद फारसी आणि इंग्रजीतील आहेत. राजवाड्यांनी जमा केलेली २० हजार कागदपत्रे असून बहुसंख्य कागदपत्रे मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची काही दुर्मिळ पत्रे मंडळाच्या संग्रही आहेत.
राजवाड्यांच्या निधनानंतर ८३ वर्षांच्या कालखंडात राजवाडे संशोधन मंडळ, राजवाडे ग्रंथालय, राजवाडे वस्तुसंग्रहालय या संस्था अस्तित्वात आल्या. या तीनही संस्थांचे जनक असलेले कै. तात्यासाहेब भट यांना दूरदृष्टी असावी. संशोधन कार्यासाठी कायम स्वरूपी आर्थिक पाठबळ असावे यासाठी त्यांनी राजवाडे पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली आणि बँकेच्या पोटनियमात संशोधन मंडळाला दरवषीर् वाढते अर्थसहाय्य मिळण्याची तरतूद केली. काही हस्तलिखिते प्रकाशित करणे त्यामुळे शक्य झाले. या मदतीतूनच मंडळाने समग्र राजवाडे साहित्य खंडरूपाने प्रसिद्ध केले. तथापि गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत आलेल्या राजवाडे बँकेने संशोधन मंडळाचे अर्थसहाय्य थांबविले. हमखास मदतीचा स्त्रोत बंद झाला आहे. पर्यायाने मंडळाचे अनेक प्रकल्प बाजूला पडले. संशोधनाचे कामही रखडले.
मंडळाच्या अभिलेखागारात असलेली दुर्मिळ हस्तलिखिते तसेच आवृत्ती संपल्याने सध्या बाजारात उपलब्ध नसलेली बहुमोल ग्रंथसंपदा आधुनिक शास्त्रीय पद्धतीने जतन-संवर्धन करण्यासाठी निधी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे राजवाडे नामादी व्युत्पत्तिकोश, संस्कृत भाषेचा उलगडा, बिलासमंजरी, चर्चात्मक निबंध, आज्ञापत्र, अमृतानुभव मूळ हस्तलिखित, योगचिंतामणी, वेडिया नागेश, शिवछत्रपतींची १०९ कलमी बखर, नवरस रागमाला, इतिहाचार्य वि. का. राजवाडे समग्र साहित्य, मराठ्यांच्या इतिहासाची साधने, छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, ज्ञानेश्वर नीतिकथा, तात्या जोगांच्या चरित्राची साधने, गीताई धर्मसार, स्मृती शलाका, आदि अभ्यासकांच्या, संशोधकांच्या दृष्टीने अमूल्य असलेली प्रकाशने पुनर्मुदित करण्यासाठी मंडळाकडे निधीचा अभाव असल्याने ही संपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
प्रचंड गाजावाजा केलेला आदिवासी सांस्कृतिक कला दालनाचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. केंद शासनाने इतिहासाचार्य राजवाड्यांवर टपाल तिकीट काढले; मात्र देशातील अन्य संशोधन संस्था अथवा वस्तुसंग्रहालयांप्रमाणे आर्थिक मदत दिली नाही. एका अपग्रत भागातील उपेक्षित संशोधन मंडळाला संशोधक, इतिहासप्रेमी नागरिक, उद्योजक, सामाजिक संस्था यांच्या मदतीची गरज आहे. त्याचप्रमाणे मंडळाकडूनही संशोधकांच्या काही अपेक्षा आहेत. मंडळाची कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी असावी आणि मंडळाने रविवार कामकाजाचा दिवस ठेवून अन्य दिवशी सुट्टी घ्यावी. मंडळाच्या संग्रही असलेले दुर्मिळ कागदपत्रे इंटरनेटच्या माध्यमातून खुली करावीत. मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत. हे सारे बदल घडवून आणण्यासाठी आणि मंडळाला आधुनिक संसाधनांच्या सहाय्याने 'प्रोजेक्ट' करणारे योग्य नेतृत्व मंडळाला लाभले, तर इतिहासाचार्य राजवाड्यांच्या पुढे जाणारे नाही, परंतु किमान त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारे संशोधक निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. असे झाले तरच भविष्यात मंडळाची प्रतिष्ठा निरंतर टिकून राहण्याची शक्यता आहे.
=====================
राष्ट्रपतींच्या हस्ते १४ ग्रंथांचे प्रकाशन
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या १० जून असलेल्या नियोजित भेटीत येथील इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळाच्या १४ ग्रंथांचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मंुदडा, सरचिटणीस प्रा. डॉ. सजेर्राव भामरे यांनी दिली. मंडळातफेर् वैशिष्ट्यपूर्ण स्मृतीचिन्ह राष्ट्रपतींना देण्यात येणार आहे.
पद्मश्री डॉ. भंवरलाल जैन यांच्या सहकार्याने प्रकाशित होत असलेल्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने १ ते २२ खंडांचे संक्षिप्त स्वरुपातील डॉ. टी. व्ही. गुणे यांनी इंग्रजीत अनुवादित केलेले १ ते ५ खंड, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ संस्थेच्या आर्थिक सहकार्यातून प्रकाशित होणारे 'मराठ्यांच्या इतिहसाची साधने खंड ६ ते ११', उद्योगपती दलुभाऊ जैन यांचे सहकार्य लाभलेले 'शिवाजी महाराजांची राजनिती व राजवाडे चरित्र', अमेरिकेतील अशोक व नेहा काकडे फाऊंडेशच्या सहयोगाने प्रकाशित होत असलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे' इत्यादी १४ ग्रंथांचे प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते एकाच वेळी होणार आहे. त्यामुळे एकाचवेळी सर्व ग्रंथ उपस्थितांना दिसतील, अशी खास ट्रॉली तयार करण्यात येत आहे, अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. प्रत्यक्ष राष्ट्रपती मंडळास भेट देणार नसल्या, तरी त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वास्तूची रंगरंगोटी करण्यात येत आहे. हरिजन सेवक, राजेंद छात्रालय, महानगरपालिका आणि राजवाडे मंडळ या संस्थांचा एकत्रित कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणार आहे. तथापी मुख्यमंत्री आणि राज्यपाल मंडळास भेट देणार असल्याने अंतर्गत सजावट देखील करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
=======================
छत्रपतींच्या दुर्मीळ पत्रांचे आज प्रकाशन
छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्य्राहून निघताना संभाजी राजांना कृष्णाजी विश्वास यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्यांनी संभाजी राजांना रायगडावर सुखरूप पोहोचवल्याबद्दल राजांनी बक्षिस दिल्याची सनद, मल्हारजी निगडे यांनी हिरोजी इंदुलकर यांना विकलेली पाटीलकी मूळ हक्कदाराला परत देण्याबाबत राजांनी काढलेला आदेश, आरामारास मदत पोहोचवण्याच्या कामात हयगय केल्याबद्दल प्रभावळीच्या सुभेदारास कडक ताकीद देणारे राजांनी पाठवलेले पत्र....महाराजांची अशी २८ दुर्मीळ पत्रे 'छत्रपती शिवाजी महाराजांची दुमिर्ळ पत्रे' या नावाने आज प्रकाशित होत आहेत.
पुराभिलेख संचालनालयाने संपादित केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन आज, गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सकाळी १० वाजता सह्यादी अतिथीगृहात होणार आहे. पुराभिलेख संचालनालयाच्या मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथील कार्यालयात असलेल्या ऐतिहासिक दस्तावेजातून निवड केलेली ही पत्रे सन १६४६ ते १६७९ या कालावधीतील आहेत. मोडी भाषेतील पत्रे आणि त्याचे मराठी लिप्यंतर, तसेच पत्रांना मराठी आणि इंग्रजी भाषेतील सारांश असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
पेशवा दप्तर, ढेरगे संग्रह, पंत अमात्य बावडा दप्तर, सरदार पाटणकर दप्तर यामधील छत्रपतींची पत्रे या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहेत. धडाडी, समयसूचकता, खंबीरपणा, मुत्सदीपणा या महाराजांच्या गुणांचे दर्शन घडविणारी महाराजांची ही पत्रे अतिशय दुमीर्ळ आहेत. सुरुवातीला त्याच्या मर्यादित प्रती काढण्यात येणार आहेत. त्यानंतर वाचकांच्या मागणीनुसार आणखी प्रती प्रकाशित केल्या जातील, असे पुराभिलेख संचालनालयाच्या संचालिका सुप्रभा अग्रवाल यांनी सांगितले.
=============
शिवकाळावर ई बुक व्हावे!
माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून छत्रपती शिवराय आणि महाराष्ट्राचा देदीप्यमान इतिहास जिवंत करावा, जेणेकरून इतिहास संशोधनास प्रेरणा मिळून संशोधकवृत्ती वाढीस लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. शिवरायांच्या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेविषयी आजही उत्सुकतेने वाचले जाते. हा इतिहास वेबसाइट, ई-बुक व अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या वापराद्वारे ऑनलाइनवर उपलब्ध केल्यास जगभरच्या संशोधक, विद्यार्थ्यांना तो उपयुक्त ठरेल असेही त्यांनी नमूद केले.
राज्याच्या पुराभिलेख संचालनालयाने संपादित केलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराजांची दुमिर्ळ पत्रे' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते गुरूवारी मुंबईत झाले. त्यावेळी ते बोलत होते. इ. स. १६४६ ते १६७९ या कालावधीत मोडी लिपीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या २८ मूळ पत्रांचे मराठी लिप्यंतर व मराठी, इंग्रजीतील सारांशाचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
शिवाजी महाराजांच्या दुमिर्ळ पत्रांचे लिप्यंतर करण्यात आल्यामुळे इतिहास संशोधकानाच नव्हे तर सर्वसामान्यांनादेखील या अभिलेखाचा अर्थ सहजपणे कळून येण्यास मदत होईल. महाराजांची पत्रे ही प्रेरणा देणारी असून, त्यांच्या राज्यकारभाराची पद्धत तसेच वेळोवेळी दिलेली आज्ञापत्रे यांचे पत्ररूप वाचन अभ्यासपूर्ण राहील, असे चव्हाण यांनी नमूद केले. जुन्या अभिलेखांचे मायक्रोफिल्मिंगद्वारे जतन करण्याचे काम संचालनालय करीत असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे यांनी सांगितले.
१५ कोटी अभिलेख
पुराभिलेख संचालनालय १९० वर्षापासून अभिलेख जतन करण्याचे काम करीत असून, सुमारे १५ कोटी अभिलेख याठिकाणी आहेत. त्यात पाच कोटी अभिलेख हे मोडीलिपीतील असून, आशिया खंडातील ही सर्वात मोठी पुराभिलेख संस्था असल्याची माहिती संचालनालयाच्या संचालक सुप्रभा अग्रवाल यांनी दिली. याप्रसंगी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
===============
मराठीची वेब भरारी
इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगात मराठीही ग्लोबल होऊ लागली आहे. यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे तो वेबसाइट्सचा. राज्य सरकारने नुकतील मराठी वेबसाइट्सची वेगवेगळ्या प्रकारात स्पर्धा घेतली. यातील विजेत्या वेबसाइट्सला 'मराठी दिनानिमित्त' मानाचा मुजरा...
कम्प्युटर आणि इन्फोमेर्शन टेक्नॉलॉजीच्या युगात मराठी माणसं मोठ्या प्रमाणावर काम करत असून मराठी संस्कृती, वृत्त आणि राजकीय माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वेबसाइट हे एक उत्तम माध्यम ठरत आहे. राज्य मराठी विकास संस्था महाराष्ट्राची व्यवहारभाषा, प्रशासकिय भाषा आणि ज्ञानभाषा या तिन्ही स्तरांवर मराठी भाषेचा सर्वांगीण वापर वाढविण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न करत असते. या संस्थेने सीडॅकच्या सहकार्याने मराठी वेबसाइटच्या स्पधेर्चे आयोजन केले होते. यातील खाजगी वेबसाइट गटातील विजेत्या वेबसाइट आणि त्यांच्या निर्मात्यांची थोडी ओळख...
संस्कृतीचा मागोवा
http://marathidesha.com
दामोदर मगदूम यांची संकल्पना आणि निमिर्ती असलेली ही वेबसाइट खाजगी गटात पहिल्या क्रमांकावर आली आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रधर्माची शिकवण, महाराष्ट्राचा खरा इतिहास आणि संस्कृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी हाच या वेबसाईटचा उद्देश आहे. छत्रपती शहाजी महाराजांपासून ते राजषीर् शाहू महाराजांपर्यंत महाराष्ट्राची दैदिप्यमान ऐतिहासिक परंपरा नेमक्या आणि प्रभावी शब्दात इथे मांडण्यात आली आहे. महाराष्ट्राला लाभलेले संत, मराठेशाहीतील पराक्रमी वीरांचे चरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, गड किल्यांचे ऐतिहासिक महत्व आणि सचित्र वर्णन तसेच शिवकालीन आयुधांची सविस्तर माहितीसुद्धा या वेबसाइटावर देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक माहितीबरोबरच सांस्कृतिक परंपरा, धामिर्क स्थळे आणि पर्यटन स्थळांची सवोर्पयोगी माहितीही या वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. सोपी वाक्यरचना, आकर्षक डिझाईन्स, पाचशेहून अधिक रंगीत छायाचित्रांचा समावेश तसेच सहाशेहून अधिक पृष्ठं हे या वेबसाइटाचे वैशिष्ट्यं आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०११ रोजी सुरु झालेल्या या वेबसाईटला आजपर्यंत अंदाजे १५ लाखाहूनही अधिक वाचकांनी भेट दिली आहे.
औंधवर प्रकाशझोत
http://aundh.info
आनंद मोहन साळुंखे यांची संकल्पना आणि निमिर्ती असणाऱ्या या वेबसाइटला तृतीय क्रमांक मिळाला. ही वेबसाइट म्हणजे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या औंध संस्थानच्या गतवैभवावर टाकलेला एक प्रकाशझोत आहे. श्रीमंत बाळासाहेबांचा सूर्यनमस्कारांचा प्रचार व प्रसार, उद्योगशिलतेला दिलेले प्राधान्य, खुल्या तुरुंगाचा यशस्वी प्रयोग, तसेच त्यांच्या 'चित्रकलेतून' व कलोपासनेतून निर्माण झालेले भवानी 'चित्र-वस्तूसंग्रहालय अशा ऐतिहासिक' आणि अभ्यासपूर्ण माहितीची आकर्षक मांडणी या वेबसाइटावर करण्यात आली आहे. औंधमधील यमाई देवीचे प्राचीन मंदिर, महाराष्ट्रातील सर्वात उंच दगडी दीपमाळ तसेच आजही दिमाखात साजरे होणारे होणारे संगीत महोत्सव, यात्रा, बैल बाजार याबद्दलची माहितीसुद्धा या वेबसाइटावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचप्रमाणे औंधचे एक पर्यटनस्थळ म्हणून वाढते महत्व लक्षात घेऊन पर्यटन दृष्टीकोनातून आवश्यक तपशील वाचकांसाठी देण्यात आला आहे. मुंबईतील सर जे. जे. कला महाविद्यालायातून घेतलेल्या कलेच्या उच्चशिक्षणाला ऐतिहासिक ज्ञानाची जोड देत अनेक अडचणीवर मात करत तीन वर्षांच्या अथक परिश्रमातून श्री. साळुंखे यांनी या वेबसाइटाची निमिर्ती केली आहे. दृक-श्राव्य माध्यम, काव्यात्मक लेखनशैली तसेच आधुनिक तंत्रांचा योग्य वापर हे या वेबसाइटाचे वैशिष्ट्यं नक्कीच कौतुकास्पद आहे. आजवर या वेबसाइटाला १८ हजारहून अधिक वाचकांनी भेट दिली आहे.
वाचकहो तुमच्यासाठी
http://ramganeshgadkari.com
संगणक प्रकाशनतर्फे विकसित करण्यात आलेल्या या वेबसाइटनं दुसरं स्थान पटकावलं. विश्वनाथ खांदारे यांनी या संकेतस्थळाचे डिझाइन केलं आहे. संगणक प्रकाशन ही संस्था, फक्त मराठी भाषेतील संगणक विषयक पुस्तके प्रकाशित करण्याचा उद्देश ठेवून 'ना नफा ना तोटा' तत्त्वापर स्थापन झाली आहे. मराठीतील अजरामर साहित्य इंटरनेटवर फ्री उपलब्ध करून देण्याच्या विस्तारीत उद्देशानेच या वेबसाइटाची संकल्पना साकारली आहे. मराठी साहित्यमालिकेतील एक महत्वाचा हिरा राम गणेश गडकरी. गडकऱ्यांसारख्या प्रभावी साहित्यिकाची अनेक पुस्तके आणि साहित्य आज सर्वसामान्यांना सहजतेने उपलब्ध होत नाही. रसिक वाचकांची हीच अडचण सोडवण्यासाठी आणि जगभरातील मराठी वाचकांना, विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना हे साहित्य मोफत उपलब्ध व्हावे या सदहेतूने या वेबसाइटाची निमिर्ती करण्यात आली आहे. गडकरी मास्तरांची 'एकच प्याला', 'पुण्यप्रभाव' अशी नाटकं, 'वाग्वैजयंती' हा काव्यसंग्रह, 'संपूर्ण बाळकराम' हे विनोदी लेखन तसेच अन्य काही साहित्य आणि लेख असे वैविध्यपूर्ण साहित्य या वेबसाइटावर उपलब्ध आहे. साहित्याबरोबरच एक छायाचित्र गॅलरीही आहे. त्यात गडकरी मास्तरांच्या नाटकांतील रंगभूमीवरील दृश्यांची अनेक दुमिर्ळ छायाचित्रं तसंच बालगंधर्व, गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, दामुअण्णा मालवणकर, दिनकर कामण्णा, मा. दिनानाथ, मास्टर कृष्णराव, केशवराव दाते आदी दिग्गजांची छायाचित्रेही रसिकांना पहायला मिळतात. रा.ग.गडकरी यांचं हस्ताक्षर आणि सही देखील त्यामध्ये आहे. शिवाय त्यांच्या साहित्यावर लिहिले गेलेले इतर मराठी लेख, विशेषांक आणि अन्य संदर्भांची सूचीही इथे उपलब्ध आहे. या वेबसाइटचे एक महत्वाचे वैशिष्ट्यं म्हणजे या वेबसाइटवर कोणत्याही जाहिराती नाहीत, आणि पुढेही असणार नाहीत. या वेबसाइटाला जगभरातून सुमारे ५ लाख मराठी वाचकांनी भेटी दिल्या आहेत. त्यात रशिया, अमेरिका, इजिप्त, जपान, सौदी अरेबिया, नायजेरिया वगैरे ४० देशांतील मराठी जनांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment