Sunday, October 17, 2010

तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||

तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |
तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||

तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश
माझ हवेत आकाश, तुझ्या कवेत आकाश
तुझ्या पावलांचे ठसे, गडे क्षितिजा पल्याड
तुझी बहरलेली बाग, माझ सुकलेल झाड
तुझी बहरलेली बाग, तुझी चर्चा जागोजाग
तुझा श्रावण जोरात, माझ्या मनात आग
सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी
मला खुनवितो वेडा, तुझ्या गावाचा किनारा
हाती लागेना किनारा, माझी चिखलात नाव
तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव ||१||

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive