Thursday, October 28, 2010

परफेक्ट मॅच निवडताना प्रत्येक मुलीच्या काही ना काही अपेक्षा असतात


परफेक्ट मॅच निवडताना प्रत्येक मुलीच्या काही ना काही अपेक्षा असतात. कुणाला
हॅण्डसम हंक हवा असतो, तर कुणी ओबिडिय  ण्ट हसबंडच्या शोधात असतात.

..................

परफेक्ट पार्टनर शोधताना मुलींच्या मनात अनेक अपेक्षा असतात. कुणाला 'तो' टॉल,
हॅण्डसम आणि डार्क हवा असतो, तर कुणी हॅण्डसम हंकच्या शोधात असतात. रूपाने तो
कसा असावा, याच्या अपेक्षा प्रत्येकीच्या वेगळ्या असल्या तरी गुणांच्या बाबतीत
मात्र अनेकींची पसंत मिळतीजळती असते.

आदर करणारा : समोरच्या व्यक्तीबद्दल आदर बाळगणारा, आपल्याशी बोलताना सामाजिक
संकेतांचं भान राखणारा 'तो' प्रत्येकीला हवा असतो. आपल्याशी बोलताना त्याचं
लक्ष आपण काय बोलतो याकडे, आपल्या चेहऱ्याकडे असायला हवं; आपल्या फिगरकडे नको
ही साधी अपेक्षा मुली करत असतात.

विनम्रता : त्याच्याकडे मोठा फ्लॅट, कार वगैरे वगैरे आहे का, यापेक्षाही
त्याच्याकडे विनयशीलता आहे ना, हे अधिक महत्त्वाचं ठरतं. समोरच्या व्यक्तीच्या
मताची कदर करणं, तिच्याशी बोलताना आपलं बोलणं विनयशील असेल, याची काळजी तो
घेतोय ना हेसुद्धा मुली पाहतात.

व्यवहारचातुर्य : योग्य वेळी योग्य ते बोलणारा पुरुष स्त्रियांना हमखास आवडतो.
'मी या ड्रेसमध्ये जाड तर दिसत नाही ना?' किंवा 'ती माझ्यापेक्षा अधिक सुंदर
दिसतेय का?' या तिने विचारलेल्या प्रश्नावर त्याचं उत्तर 'तुझ्याएवढं सुंदर आज
कुणीच दिसत नाहीए' असं बोलणाऱ्या पुरुषावर ती मनोमन भाळलीच समजा.

सौजन्य : स्त्रीपुरुष समानतेचा आजचा जमाना असला तरी आजही स्त्रियांना
त्यांच्याशी सौजन्याने वागणाराच पुरुष आवडतो, हे विसरू नका.

संवेदनशील : पुरुषांना सहसा आपल्या भावनांचं प्रदर्शन मांडायला आवडत नाही. पण,
तुम्ही इतरांच्या भावनांची दखल नक्कीच घेऊ शकता. वेळप्रसंगी आपणही इमोशनल
असल्याचं दाखवून देणं तुमच्या नक्कीच उपयोगी पडू शकतं.

आधार : तिच्या वाईट काळात पळ न काढता तुम्ही तिला आधार देणारे असाल, तर बात बन
जाएगी बॉस! मुलीवर येणाऱ्या दु:खद प्रसंगातून तिला मानसिक आधार देत त्यातून
बाहेर काढण्याची कामगिरी तुम्ही करू शकता, याची प्रचिती तिला आली तर ती हमखास
तुम्हाला 'हो' म्हणणारच.

सुरक्षा : प्रत्येक स्त्रीला सोन्याचांदीचा हव्यास असतोच असं काही नाही. पण,
प्लेस्टेशन, क्लब/पबमध्ये वरचेवर जाऊन बीअरवर खर्च करणारे पुरुष तिला फारसे
आवडत नाहीत, हे लक्षात ठेवा. मुली व्यवहारी असतात. जो पुरुष आपल्या पगाराचा
बराचसा भाग दारु, जुगारावर, मित्रांवर उडवत असेल त्याच्याबरोबर पुढचं आयुष्य
घालवण्याची त्यांची अजिबात तयारी नसते. पुढच्या आयुष्यासाठी 'सिक्युरिटी'
म्हणून तो बचत करणारा हवाच.

सेन्स ऑफ ह्युमर : आपलं आयुष्य सीरिअस बनवणारी व्यक्ती त्यांना आयुष्यात नको
असते. आयुष्य आनंददायक आणि हसरं बनवणाऱ्या व्यक्तींच्या त्या प्रेमात पडतात, हे
लक्षात ठेवा.

तिचं ऐकणं : जो पुरुष आपलं म्हणणं ऐकून घेतो, असा पुरुष स्त्रियांना आवडतो.
प्रत्येक वेळेला सल्ला किंवा सूचनांची आवश्यकता नसते, तर जो फक्त
सहानुभूतीपर्णतेने आपलं म्हणणं ऐकून घेतो तो पुरुष तिच्या मनात नक्कीच जागा
मिळवू शकतो.

हुशारी : रूप आणि सौंदर्य यांचा मेळ घालता येणार नाही, असं म्हटलं तरी त्याच्या
हुशारीकडे दुर्लक्ष करून अजिबातच चालणार नाही. तुमच्याकडे मेंदू नावाची चीज
नसेल तर तुम्ही रिजेक्ट होऊ शकता. म्हणूनच आपला मेंदू योग्य त्या वेळी वापरायला
शिका.

निर्णयक्षमता : योग्य ते निर्णय घेण्याचं तुमचं कसब तुमचा प्लस पॉइण्ट ठरू
शकतो.

विश्वासू : तिने तुमच्याबरोबर शेअर केलेल्या तिच्या पर्सनल, प्रोफेशनल गोष्टी
तुमच्याकडेच ठेवा. इतरांकडे त्याबद्दल बभ्रा केलात, तर तुमच्यावरचा तिचा
विश्वास उडून गेलाच म्हणून समजा.

प्रामाणिकपणा : तुमच्या वागण्याबोलण्यातून तुमचा प्रामाणिकपणा दिसू दे. खायचे
दात आणि दाखवायचे दात वेगळे असतील, तर तुमचा पत्ता कट झालाच.


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive