Friday, February 11, 2011

अमीर खानचा नवीन चित्रपट 'dhobi ghat' यातला एक वाक्य




 

ज्या थाळी मध्ये खायचं... तिकडेच घाण करायची ही यांची जुनी सवय....
अमीर खानचा नवीन चित्रपट 'dhobi ghat' यातला एक वाक्य मी टिपलं आहे ज्यात किती अपमान कारक वाक्य मराठी माणसाबद्दल आणि मुंबई बद्दल बोलली आहेत....
हा चित्रपट कधी निघाला माहित नाहीं... पण २ दिवसा अगोदर इंटरनेट वर पहिला...
चित्रपटाच्या सुरवातीलाच एवढी अपमान कारक वाक्य ऐकून मी हैराण झालो.....

वाक्य अशी आहेत...
"this is the tribute to the people of Rajastan, U.P., Tamil Nadu, Andhra Pradesh and elsewhere. Who built the city in the hope that someday they will find a rightful pleasant. So to Bombay my muse, my whore, my beloved"

ह्या माणसानुसार राजस्तान, युपी, तमिळ नाडू, आंध्रप्रदेश आणि 'elsewhere' (महाराष्ट्रीय नाहीं) ह्यांनी मिळून मुंबई उभी केली. आणि ते असा विचार करतात की त्यांना मुंबईत कधी तरी समाधानाने जगायला मिळेल.
एवढा अपमानास्पद लिहायचं?? मराठी माणसाचा जराही हात भार नाहीं?? त्यांना जर समाधानाने जगायचे आहे तर आप आपल्या राज्यात राहायचं... त्या साठी मुंबई का निवडली...आणि एवढी वर्ष मराठी माणूस काय त्यांना कापत सुटला होता??

आणि दुसरा.... 'Bombay...my whore'
मुंबई वेश्या आहे...
इतके घाणेरडे शब्द वापरायचे... हे शब्द वापराचे आपल्या मुंबई बद्दल.... आणि कोणी काहीही बोलू नये....

नाहीतरी ह्या लोकांनी संपूर्ण भारत वर्षाची वाट लावायची घेतली आहे...
अफगाणिस्तान झालं...पाकिस्तान झालं...आता काश्मीर..

ह्या माणसाला...आणि ह्या सारखे बरेच...त्यात काहीं मराठी पण... त्यांना मराठी आणि मराठी माणसा बद्दल अनादराने बोलण्यात काय आनंद मिळतो...
किती सहज पणे आज जो उठतो तो मुंबई आणि मराठी विरुद्ध वाटेल ते बोलतो..

हा चित्रपट कोणत्याही मराठी माणसाने किंवा मनसे किंवा शिवसेनच्या कोणत्याही कार्यकर्त्याने पहिला नाहीं ??
का ह्या विरुद्ध आक्षेप नाहीं झाला??
कृपया हे थांबवण्यास मदत करा....होईल तितक्या लोकांना पाठवा...
कोणी ह्या चित्रपट बद्दल आक्षेप घेईल अश्या लोकांना पाठवा आणि त्यांना पाठींबा द्या....
मी ही करतो आहे...



No comments:

Post a Comment

sterra

https://www.effectivecpmnetwork.com/ch72yvye4s?key=4a0b887dafac489a2f6ab362663b40f9

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive