सचिनच्या दुर्मिळ फोटोंचे फोटोग्राफर सुधाकर फडके... |
सचिनच्या फोटोंची गोष्ट
जेजे स्कूल ऑफ आर्टसमध्ये फोटोग्राफीचं शिक्षण घेत असताना सुधाकर फडके यांची सचिनच्या वडिलांशी, प्रा. रमेश तेंडुलकर यांच्याशी ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि मग महाविद्यालयीन शिक्षणासाठी तेंडुलकर सरांनी फडकेंना कीर्ती कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. ही गोष्ट १९७२ची. त्यानंतर, १९७४ मध्ये एक दिवस रमेश तेंडुलकर यांनी सुधाकर फडके यांना ठाण्याहून डोंबिवलीला, आपल्या सासुरवाडीला बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडून आपल्या मुलाचे फोटो काढून घेतले. हा मुलगा म्हणजेच, सचिन रमेश तेंडुलकर...
हे फोटो काढले तेव्हा सचिन चार किंवा सहा महिन्याचा असावा, असं सुधाकर फडके यांनी सांगितलं. ज्या मुलाचे मी फोटो काढतोय, तो भविष्यात 'विक्रमादित्य' होईल, याची कल्पनाही नव्हती, असं सांगताना फडके भारावून जातात. त्यावेळी त्यांनी सचिनचे १२ फोटो काढले होते आणि त्याच्या निगेटिव्हज् त्यांनी अजूनही जपून ठेवल्यात. हे फोटो सचिनला देण्याचा फडकेंनी प्रयत्न केला, पण ही भेट अजून होऊ शकलेली नाही. आज फडके ६७ वर्षांचे आहेत आणि आजही त्यांना तो दिवस लख्ख आठवतोय. हे फोटो सचिननं पाहावेत, असं त्यांना अगदी मनापासून वाटतंय. त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या परीनं, फोटो शेअर करून प्रयत्न करुया...
No comments:
Post a Comment