मुकेश अंबानीं यांच्या लाइफस्टाईलबाबत 56 किस्से!
देशातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आणि उद्योगपती मुकेश अंबानी. मुकेश अंबानींनी त्यांच्या व्यावसायिक प्रगतीमुळे देशाच नव्हेत तर आंतरराष्ट्रीय किर्ती मिळवली आहे. मुकेश अंबानीचा जन्म 19 एप्रिल 1957 झाला होता.
खास 56 किस्से. त्यातील बहुतेक किस्स्यांबाबत वाचक अनभिज्ञ आहेत. त्यात मुकेश अंबानींच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी लपल्या आहेत. अनुभवातूनच व्यक्तिला प्रगतीची दिशा सापडते, असे म्हटले जाते. मुकेश अंबानींच्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. उल्लेखनीय म्हणजे मुकेश अंबानी त्यांचा वाढदिवस कधीच साजरा करत नाहीत. उलट कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या मित्रांचा वाढदिवस ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात...
1- मुकेश अंबानी शाकाहारी असून त्यांना भारतीय व्यजंने आवडतात. दाळ-भात, पोळी-भाजी.
2- मुकेश अंबानी खवय्ये असून ताज कोलाबाची चाट त्यांना खूप प्रिय आहे. याशिवाय अंबानी आठवड्यात एकदा मैसूर कॅफेमध्ये डिनर करायला जातात. मैसूर कॅफे त्याचे फेव्हरेट प्लेस आहे.
3- मुकेश यांनी आपल्या प्रायव्हेट प्लेनमध्येही मैसूर कॅफेमधील मीनू कार्डची एक प्रत ठेवून घेतली आहे. अंबानी यांना स्वाती स्नॅक्समधील पदार्थही आवडतात.
4- भारतातील सगळ्यात श्रीमंत असूनही मुकेश अंबानी 'अॅंटीलिया'मध्ये आलेल्या पाहुण्यांना आपल्या हाताने वाढतात. एवढेच नाही तर 'अॅंटीलिया'मध्ये तयार होणारे जेवण हे पाहुण्याची पसंत विचारूनच तयार केले जाते.
5- मुकेश यांना चित्रपट पाहायला आवडतात. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला मुकेश अंबानी आठवड्यातून दोन-तीनदा पत्नी नीता यांच्यासोबत चित्रपट पाहत होते. आताही आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून मुकेश अंबानी 'अॅंटीलिया'मधील' मूव्ही हॉलमध्ये बसून नीता अंबानींसोबत चित्रपटाचा आनंद घेतात..
6- मुकेश अंबानींच्या घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांच्या आवडी-निवडी लक्षात घेतल्या जातात. अंबानीच्या बंगल्यात पाहुण्याची पसंतीचा स्वयंपाक केला जातो.
7- मुकेश अंबानींची पत्नी नीता अंबानी नियमित क्लासिकल डान्सचा सराव करतात. नीता अंबानींना डान्स करताना पाहण्याचा मोह मुकेश अंबानींनी आवरता येत नाही.
8- मुकेश अंबानींच्या बंगल्यातील प्रत्येक खोलीत आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत काढलेले छायाचित्र लावले आहे.
9- मुकेश अंबानी कधीच आपला वाढदिवस साजरा करत नाहीत. त्यांनी केवळ आपल्या 50 वा वाढदिवस जामनगरमधील प्रकल्पात आपल्या कर्मचार्यांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला होता.
10- मुकेश अंबानी आपल्या कामातून वेळ काढून त्याची पत्नी नीता अंबानींचा क्लासिकल डान्स मोठ्या आनंदाने पाहतात.
11- मुंकेश अंबानींना ऑफ्रिकेत आपल्या कुटुंबीयांसोबत जाण्यास आवडते.
12- मुकेश अंबानींना घरी 'मुक्कू' नावाने हाक मरतात. मुकेश यांना बहिण आणि मेव्हणे 'मुक्स' नावाने हाक मारतात.
13- मुकेश अंबानींचा संपुर्ण परिवार आध्यात्मिक गुरु पंडित रमेशभाई ओझांना मानतात. त्यांचा सल्ला घेतात. पूजा आणि अनुष्ठानसारखे कार्य ओझा यांच्या हस्ते केली जातात.
14- मुकेश अंबानी शिक्षण घेत असतानाच त्यांचे वडील धिरुभाईंकडून अनेक व्यावसायिक गोष्टी शिकून घेत होते.
15- मुकेश अंबानी प्रतिवर्षी तिरुपती बालाजीच्या मंदिरात जातात. त्यांची मुले आकाश आणि अनंत हे देखील धार्मिक विचारसरणीचे आहेत.
16- देवासमोर नतमस्तक झाल्याशिवाय मुकेश अंबानी घराबाहेर पडत नाहीत.
17- मुकेश अंबानी जरी स्वत:चा वाढदिवस साजरा करत नसले तरी आपली पत्नी, मुले आणि मित्रमंडळीचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. वाढदिवशी आपला परिवार आपल्यासोबत असतो, हेच सगळ्यात मोठे सेलिब्रेशन असल्याचे ते सांगतात.
18 - मुकेश अंबानींनी सोबत काम करणारे लोक सांगतात की, ते कर्मचार्यांवर रागवत नाही. कार्यालयात सगळ्यांची आदरपूर्वक विचारपूस करतात.
19- मुकेश अंबानी आपल्या वडिलांप्रमाणे कपडे परिधान करतात. पांढरा शर्ट आणि गडद रंगाची ट्राउझर.
20- मुकेश अंबानी यांना लग्झरी आणि फॅशन ब्रांडमधील कपड्यांबाबत फारसे जास्त कळत नाही. मुकेश नेहमी 'प्रॉग'चा शर्ट खरेदी करतात. सत्यपाल अथवा जोडिअकचरी टाय परिधान करतात.
21- नीता अंबानींचा क्लासिकल डान्स पाहून धिरूभाई अंबानी प्रभावित झाले होते. त्यानंतर त्यांनी नीतांना आपल्या ऑफिसमध्ये बोलावून आपल्या मुलगा मुकेशसाठी विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता.
22- मुकेश आणि नीता यांची पहिली भेट झाली तेव्हा मुकेश यांनी पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट परिधान केली होती.
23- एकदा लग्नाच्या आधी नीता आणि मुकेश कारमधून पीडर रोडवर जात असताना ट्रॅफिक जाम झाली होती. मुकेश यांनी कार सिग्नलवर थांबवली आणि फिल्मी अंदाजात नीतांना विचारले "क्या तुम मुझसे शादी करोगी?" तेव्हा नीता खूप लाजल्या होत्या.
24- मुकेश यांनी नीता यांच्यासाठी आपली मर्सिडीज सोडून मुंबईतील बसेसमध्ये नीतांसोबत प्रवास केला होता.
25- मुकेश यांना खासकरून ब्रिटेन मधीर कार्स पसंत आहेत. ते नेहमी मर्सडीज, बेंटले आणि मेबॅकसारख्या कार चालवतात. मुकेश यांच्याकडे जगभरातील एका पेक्षा एक शानदार कार्स आहेत. त्यात 2 रॉल्स रॉयस, 1 मेबॅच 62, लॅम्बॉर्गिनी, क्यू 7, मर्सिडीज एस क्लास आणि मर्सिडीज एसएल 500 सारख्या अनेक महागड्या कार्सचा समावेश आहे.
26- मुकेश यांना हिंदी गीते ऐकायला आवडतात. प्रत्येक रविवारी ते हिंदी गाणे ऐकतात. इंटरनेटवर चॅट करणेही मुकेश यांना आवडते.
27- जेव्हा ते घरी असतात आणि त्यांच्या मुलांचे मित्र आले तर त्यांच्याशी हात मिळवतात. त्यांचा विचारपूस करतात.
28- मुकेश यांना चालताना बोलायला आवडते. ते आपल्या सहकार्यासोबत चालताना बोलतात.
29- मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (आरआयएल) अध्यक्ष आहेत. त्याच्या व्यावसायिक प्रगतीसोबत त्यांची लाइफस्टाइलही बदलत गेली. मुकेश यांच्या बंगल्यात प्रत्येक लग्झरी सुविधा आहेत. जगातील सगळ्यात महागडे घर 'अॅंटीलिया'मध्ये 168 कार्स उभ्या करण्यासाठी पार्किंग बनवण्यात आली आहे.
30- मुकेश अंबानी यांनी जगातील सगळ्यात महागडे घर 'एंटीलिया' उभारले आहे. 27 मजली बंगल्यात हेल्थ क्लब पासून सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल आणि फाइव्ह स्टार हॉटेल सारख्या सुविधा आहेत. 'अॅंटीलिया'मध्ये 600 कर्मचार्यांचा स्टाफ आहे.
31- मुकेश अंबानींकडे तीन खासगी विमाने आहेत. त्यात 330 कोटींचे एअरबस 319 कॉपरेरेट जेट, 401 कोटी रुपयांचे बोइंग बिजनेस जेट-2 आणि 99 कोटी रुपयांचे मिनी जेट फॉल्कन 900 ईएक्सचा समावेश आहे.
32- मुकेश यांना बोइंग बिजनेस जेट-2 याच्यातून प्रवास करायला आवडते. जेटमध्ये त्यांनी आपल्या आवडीच्या सुविधा तयार करून घेतल्या आहेत.
33- मुकेश नेहमी आपल्या प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास करताना त्यांची पत्नी नीता सोबत असते. मुकेश यांचे जेट हे हवेत उडणारे हॉटेलच भासते. या विमानात एक आलिशान बोर्ड रूम, एग्झिक्यूटिव्ह ऑफिस आणि खासगी बेडरूम आहे.
34- मुकेश यांनी लहानपणीच त्यांच्या वडिलांना सांगितले होते की, त्यांना मोठे झाल्यानंतर एक यशस्वी व्यावसायिक व्हायचे आहे.
35- मुकेश विद्यार्थीदशेतच आपल्या वडीलांकडून व्यावसायिक धडे घेत होते.
36- मुकेश शाळत हॉकी, फुलबॉलसारखे खेळ खेळत होते. मुंबईतील लोकल आणि बसेसमधून मुकेश नेहमी फिरत असत. मुंबईतील बहुतेक स्थळे त्यांना माहित आहेत.
37- मुकेश अंबानी खाण्या-पिण्यावर रुपये खर्च करण्यात मागेपुढे पाहत नाहीत.
38- मुकेश अंबानींनी 'आयपीएल' मधील मुंबई इंडियन्स हा संघ खरेदी केला आहे. दुसरीकडे धीरूभाई अंबानी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजवंताना ते मदत करतात.
39- मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आहेत. मुकेश वर्किग डेमध्ये सकाळी पाच ते साडेपाच वाजता उठतात.
40 सकाळी उठल्यानंतर एक तास ते एक्सरसाइज करतात. त्यानंतर ते न्यूजपेपर चाळतात.
41- 'एंटीलिया'च्या 17व्या मजल्यावर असलेल्या स्विमिंग पूलवर मुकेश अंबानी अंघोळ करतात. त्यानंतर 19व्या मजल्यावर ब्रेक फॉस्ट करतात. त्यानंतर 14व्या मजल्यावरील आपल्या खोलीत ऑफिसला जाण्यासाठी तयार होतात. 21व्या मजल्यावर पर्सनल ऑफिसमधील कामाच्या फाईल्स घेतात.
41- 'अॅंटीलिया'च्या 17व्या मजल्यावर असलेल्या स्विमिंग पूलवर मुकेश अंबानी अंघोळ करतात. त्यानंतर 19व्या मजल्यावर ब्रेक फॉस्ट करतात. त्यानंतर 14व्या मजल्यावरील आपल्या खोलीत ऑफिसला जाण्यासाठी तयार होतात. 21व्या मजल्यावर पर्सनल ऑफिसमधील कामाच्या फाईल्स घेतात.
41- 'अॅंटीलिया'च्या 13 व्या मजल्यावरील मुलाच्या खोलीत जाऊन मुलांना 'सी ऑफ' करून 11 ते 11.30 वाजता ऑफिसला निघतात. ऑफिसला जाताना मुकेश स्वत: मर्सडीज चालवतात. तिसरा मजला हा कार पार्किंगसाठी ठेवण्यात आला आहे. मुकेश रात्री 10 ते 11 दरम्यान ऑफिसामधून घरी येतात.
42- डीनर करताना त्यांची पत्नी आणि मुलांसोबत खूप बोलतात. मुकेश घरी आल्यानंतरही अनेकदा रात्री 2 ते 2.30 वाजेपर्यंत ऑफिसचे काम करत असतात.
43- आनंद महिंद्रा, आनंद जैन हे मुकेश यांचे व्यावसायिक मित्र आहेत. आनंद जैन हे मुकेश यांचे क्लासमेट होते.
44- वर्षांतून एकदा मुकेश अंबानी आपल्या गावी जातात. तेथे ते 15-15 दिवस राहतात.
45- मुकेश आता आयआयटीला प्रवेश घेणार असल्याचे सांगून मित्रांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
46. मुकेश यांनी आयआयटीत प्रवेश घेतला होता. परंतु काही आठवड्यानंतर त्यांनी आयआयटीला रामराम करून युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (यूडीसीटी) मध्ये प्रवेश घेतला.
47. मुकेश अंबानी हे क्रिकेटचे शौकीन असल्याने ते सध्या मुंबई इंडियन्सचे मालक आहेत.
48. दोन भावांमधील वाद - धीरूभाई अंबानींचा 2002 मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर मुकेश आणि अनिल अंबानी या दोघा भावंडांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू झाला. या वादाला मातोश्री कोकिला बेनने मालमत्तेची वाटणी करून
पूर्ण विराम दिला.
49. रिलायन्स म्हणजे माझ्या वडिलांचा प्राण होता, असे मुकेश अंबानी सांगतात. मुकेश यांची लाइफस्टाइल त्यांच्या वडिलांप्रमाणे आहे.
50. अशी आशा होती की मुकेश हे टेक्सटाइल इंजिनिअरिंग होतील, पण करिअर निवडण्याची जबाबदारी वडिलांनी त्यांच्यावरच सोपवली होती.
51 मुकेश अंबानीचे यश म्हणजे ते जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे.
52. 2007 मध्ये युनायटेड स्टेट- इंडिया बिजनेस कौन्सिल लीडरशीप मुकेश
पुरस्कार मिळाला.
53 . एशिया सोयाइटी लीडरशीप पुरस्कार 2004 मध्ये वाश्गिंटन डीसीत गौरवण्यात आले.
54 मुकेश आपल्या मुलांना पॉकेटमनीमध्ये पाच रूपये द्यायचे . त्यांच्या मतानुसार मुलांना जादा पैसे देण्याऐवजी गरजे इतकेच दिले तर त्याचा वापर योग्य होतो.
55. मॅबॅच कार असलेले मुकेश हे एकमेव भारतीय आहेत.
56 गेल्या सहा वर्षांपासून भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश यांना बहुमान मिळत आहे.
तसेच ते आशियातील नव्या क्रमांकवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
No comments:
Post a Comment