आज अनेकांच्या रोजच्या
जगण्याचा भाग झालेल्या फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर येत्या २० तारखेला
मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच फेसबूकने पत्रकारांना ईमेल
ऐवजी प्रत्यक्ष पोस्टाची पत्रे पाठवत याबातचे संकेत दिलेत. पण हे बदल काय
असतील हे जाणून घेण्यासाठी गुरुवारची वाट पाहावी लागेल.
पत्रकारांना पाठवलेल्या पत्रात फेसबूक म्हणते की, 'आमची एक लहान टीम एका मोठ्या कल्पनेवर काम करीत आहे. आमच्या बरोबर कॉफीला पिण्यासाठी या आणि आमच्या नवीन प्रोडक्टबद्दल जाणून घ्या.' फेसबूकच्या या पत्रामुळे या प्रेसकॉन्फरन्सबद्दल टेक्नोवर्ल्डमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
'होम', 'न्यूज फीड' आणि 'ग्राफ सर्च'ची घोषणा झाली होती त्याप्रमाणे अत्ताही फेसबूकने आपल्या प्रोडक्टची माहिती गोपनीय ठेवली असली तरी या प्रोडक्टबद्दल एक हिण्ट दिली आहे. या हिण्टच्या आधारे फेसबूक काय बदल करणार आहे याबद्दलच्या तर्क वितर्क बांधण्यास सुरुवात झाली आहे. फेसबूक आपल्या आमंत्रण पत्रिकेवर अनेकदा आपल्या प्रोडक्टची हिण्ट देते. 'होम' फिचरच्या वेळेस पाठवण्यात आलेल्या आमंत्रणावर 'या, अॅण्ड्रॉइडवर आमचे होम पहा' अशी हिण्ट देण्यात आली होती.
फेसबूकने दिलेल्या हिण्टनूसार फेसबूकवर न्यूज रिडरसारखे नवीन फीचर देण्यात येणार असल्याचे समजते. फेसबूकने पोस्टाने पाठवलेली छापील पत्रे आणि या पत्रांच्या उजव्या कोप-यात चहाचा किंवा कॉफीचा कप ठेवल्यावर कागदावर पडलेला वर्तूळाकार डागाची डिझाइन दिसत आहे. ही डिझाइन म्हणजे अनेकदा पेपर वाचताना चहा पित असताना अनेकजण चहाचा कप पेपरवरच ठेवतात आणि त्यामुळे जो डाग तयार होतो त्याचा डागाकडे हे पत्र लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे.
ही शक्यता नाकारल्यास न्यूज रिडरऐवजी फेसबूक ट्रेडिंग आर्टिकल्सचे ट्विटरशी साधर्म्य साधणारे नवीन फीचरही देऊ शकते. या आठवड्यापासूनच फेसबूकने हॅशटॅग ऑप्शन फेसबूकमध्येही आणला असल्याने ट्रेडिंग आर्टिकल्स लिस्टही फेसबूकवर झळकू शकते. हॅशटॅगमागील भूमीका स्पष्ट करताना लोकांना एकाद्या विषयावरील इतर लोकांची मते समजतील आणि त्यावर आपले मत मांडू शकतील या विचाराने आमचे हॅशटॅग हे पहिले पाऊल असल्याचे सांगितले होते. तसेच पुढील काही आठवड्यात किंवा महिन्यामध्ये फेसबुकवर ट्रेंडिंग हॅशटॅग आणि डीपर इनसाइटसही हॅशटॅगशी संबंधीत इतरही अनेक नवीन फिचर्स फेसबूक यूझर्सच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
फेसबूकच्या या रहस्यमय पत्रामुळे सध्या फेसबूकचे चहात्यामध्ये वेगवेगळ्या चर्चांना तोंड फूटले असून अनेक शक्यतांवर त्यांच्यात दुमत आहे. मात्र फेसबूकची २० तारखेची कॉन्फरन्सच या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे.

No comments:
Post a Comment