Sunday, March 20, 2011

पुरणपोळी होळी स्पेश्यल :)



पुरणपोळी होळी स्पेश्यल :)

लेखिका मीली हिने पुरणपोळी ची पा़कृ दिली आहे

घरोघरी सगळ्यांची आवडती पुरणपोळी Smile

सावधान!! डाएट सांभाळणारी मंडळी कृपया गुळ किती, साखर किती, तुप किती असे म्हणू नये, सणावारा ला गोडाने सुरुवात करा, कॅलॅरीज मोजण्याने नव्हे Wink

साहित्यः
३ कप चणाडाळ
३ कप चिरलेला गुळ
२ टेस्पून साखर
१/२ जायफळ पूड करून
१ टीस्पून वेलचीपूड
अडीच कप मैदा+१/२ कप गव्हाचे पीठ
चिमूटभर मीठ
६ टेस्पून तेल
तांदळाची पीठी पोळ्या लाटण्यासाठी

पा़कृ:

चणाडाळ स्वच्छ धुवून बोटाचेपे शिजवणे.

शिजलेल्या डाळीतून पाणी गाळून घेणे.
.

ह्याला कट म्हण्तात.

.

एका पातेल्यात डाळ चांगली घोटून घेणे.

.

गुळ आणी साखर त्यात घालून एकत्र करणे .

.

पुरण आधी पातळ होईल सतत ढवळत राहीले के ते घट्ट होईल.

.

पुरण चांगले शिजले हे झारा/मोठा चमचा मधोमध उभा राहीला की समजते.

.

त्यात वेलची-जायफळपूड घालून नीट एकत्र करून पुरणयंत्रातुन वाटून घ्यावे.

.

हे झाले पुरण तयार.

.

मैदा+ गव्हाचे पीठ+मीठ+तेल घालून सैलसर भिजवावी. तेल-पाण्याने चांगले मळून घेणे.
२ तास कणीक भिजवल्यावर चांगली बत्त्याने कुटून घ्यावी व परत मळून घ्यावी.

.

मैद्यची पारी करून त्यात पुरण भरून , पारीचे तोंड नीट बंद करुन घेणे.

.

तांदळाची पीठी लावूना हलक्या हाताने पोळी लाटणे.

.

तवा मंद गॅसवर ठेवून पोळी घालावी .

.

सारखे उलटू नये, एकीकडून नीट भाजली / शेकली की दुसरीकडून भाजावी/ शेकावी.
गरमा-गरम साजुक तुपाबरोबर किंवा दूधाबरोबर खायला द्यावी.

.

कटाच्या आमटीबरोबर पण खाऊ शकता.

.


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive