Thursday, June 23, 2011

भाषा ज्यानी शोधली,




1:05pm Jun 23
भाषा ज्यानी शोधली,
त्याला मला बघायचंय
कुंपणं घालून ठेवलीत ज्याने
शोधून त्याला काढायचय..

माझं मन म्हणजे काय
कुठलं गायरान वाटलं का त्याला?
ओढली एक रेषा, एक सीमा
आतच राहीन वाटलं का त्याला??
तीला आता पुसून टाकायचंय..
आणि शोधून त्याला काढायचंय..

माझं मन आहे ते मन!
व्याख्या त्याची कोणी केलिये??
बांधून ठेवता येत नाही त्याला
मग ही सीमा कुठून आलीये??
उचलून आता तिला फेकायचंय..
आणि शोधून त्याला काढायचंय..

त्याला वाटतं का केला आहे
उपकार त्याच्या शब्दांनी?
स्वरूप दिलं भावनेला मूर्त
सजवलं तिला विविध अंगांनी??
अमूर्त्य, अमर्त्य परत तिला करायचंय..
आणि शोधून त्याला काढायचंय...

माझं मन, माझ्या भावना,
आहेत सागर, आहेत आकाश
शब्दांत कशा नेमक्या गावणार्?
त्या ब्र्म्हांड, त्याच अवकाश..
त्यांना परत मुक्त करायचंय
आणि त्याला शोधून काढायचंय...

त्याला सांगायचंय मला की,

काम तर तु चांगलं केलंस
पण पायातच चूक आहे.
जे शब्दांच जग उभारलंस,
त्याला भावनेची भूक आहे.

इमले बांधून मोठ मोठे
हे विसरू नकोस मुळिच
भावना मुक्तच असावी,
त्यातच सगळ्यांचं सुख आहे..
त्यातच सगळ्यांचं सुख आहे..

संहिता.


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive