पक्क्या : तू धरती पे चाहे जहा भी रहेगी तुझे तेरी खुशबू हे पेहचान लुंगा.. चिंगी : आई शप्पथ , मला आधीपासूनच शंका होती कि तू तर साल्या कुत्राच आहेस... ---------------- मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला. इंग्रजीचे सर ओरडले. " व्हाय आर यू लेट ?" इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला , " सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला. " सर पुन्हा ओरडले , " टॉक इन इंग्लिश! "... हजरजबाबी मन्याने म्हटले ," सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. ह...ी मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट! " ---------------- काल मला १० जणांनी खूप मारला.. संता : मग तू काय केलास ? बंता : मी म्हटलं , साल्यानो दम असेल तर एक एक जण या.. संता : मग ? बंता : मग काय , साल्यांनी एकेकाने येऊन परत मारलं..... ---------------- गण्या : अरे मित्रा " अरेंज मॅरेज " म्हणजे काय ? बंड्या : सोप्प आहे रे , समज... तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते .. गण्या : ठीक आहे ...आणी " लव मॅरेज " म्हणजे काय ? ... बंड्या : लव मॅरेज " म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो " फूस फूस ... चाव ना मला ..चाव .. " ---------------- इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट हिंदी मा म्हणते शुभ रात्री मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर ... आणि आपली मराठमोळी आई म्हणते , अरे आग लाव त्या मोबाईलला आणि झोप आता.. ---------------- पक्क्याच बायकोबरोबर भांडण चाललं होते.... बायको (वैतागून) : तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय...... पक्क्या : अच्छा , आता मला कळले की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते... ---------------- मुलगा : बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ? बाप : स्वतः उठुन घे... ? मुलगा : प्लीज द्या ना बाबा.. बाप : आता थोबाडित मारीन तुझ्या! मुलगा : थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा. ---------------- बहिण : मुलगा कसा आहे ? भाऊ : मुलगा चांगला आहे , engineer आहे , दिसायला फिल्मचा हिरो वाटतो... बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो ? भाऊ : " पा ". ---------------- मल्लिकाकडे एक नवीन नोकर कामाला लागतो , त्याला सकाळी मल्लिका किचन मध्ये दिसते , ती मिक्सर चालवत असते , नोकर : काय म्याडम काय बनवता आहात ? मल्लिका : काही नाही रे कपडे धुते आहे. ---------------- नवरा : तू मला आत्ता कुत्रा म्हणालीस ? बायको लक्षच देत नाही , नवरा पुन्हा विचारतो. ... काहीच उत्तर नाही. तो पुन्हा विचारतो. बायको : नाही म्हणाले पण आता भुंकणे थांबवा जरा!! ---------------- बाप : या वेळी नापास झालास तर यापुढे मला ' बाबा ' म्हणून हाक मारू नकोस चंद्या. सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपला चंद्या नापास झाला , बाप : काय लागला निकाल ? चंद्या : माफ कर रे रम्या , तुला बाबा म्हणून हाक मारण माझ्या नशिबात नाहीये बहुतेक... ---------------- आजोबा : पिंट्या लप , तुला शोधत तुझी टीचर आली आहे. पिंट्या : आजोबा तुम्हिच लपा. आजोबा : का रे.. ??? पिंट्या : अहो आजोबा , तुम्ही मेलात म्हणुन आठ दिवस सूटी घेतली आहे मी.... ---------------- संता : अरे यार बंते , हा sent message काय प्रकार आहे ? बंता : काढलीस ना लाज , एवढं पण माहीत नाही.. sent message म्हणजे perfume वाला message... |
No comments:
Post a Comment