सचिनचे दातृत्व, फ्लॅट नोकरासाठी
सचिनचे दातृत्व, फ्लॅट नोकरासाठी
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
सचिन तेंडुलकरने काहीही केले की त्याची चर्चा अनेक दिवस सुरू राहते. त्याने बँकेचे कर्ज काढून पनवेल येथे घेतलेल्या घराचीही अशीच चर्चा रंगली. हा फ्लॅट सचिनने त्याचा मुलगा अर्जुनसाठी घेतल्याची म्हटले जात होते. परंतु प्रत्यक्षात सचिनने हा फ्लॅट दत्ता आणि तुषार भादे या आपल्या घरी काम करणा-या दोघा तरूणांसाठी घेतल्याची नवी माहिती समोर आली आहे.
सचिनचे दातृत्व जगाला माहितीच आहे. त्यात आणखी एका प्रसंगाची भर पडली आहे. सचिनचे सासरे आनंद मेहता यांचे लोणावळा येथे फार्म हाऊस आहे. अशोक भादे नावाचे गृहस्थ अनेक वर्षांपासून तेथे माळीकाम करतात. भादे यांची मुले सचिनकडे कामाला होती. त्यानंतर सचिननेच त्यांना मुंबईत चांगली नोकरी मिळवून दिली. पण लोणावळ्याहून मुंबईला येणे त्रासदायक होते. त्यांना होणारा हा त्रास कमी व्हावा म्हणून सचिनने अंजलीच्या नावे कर्ज काढून पनवेलमधील फ्लॅट त्यांच्यासाठी घेतला, अशी माहिती समोर आली आहे. अशोक भादे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
म्हणजे सचिनच्या नावावर आता आणखी एक पुण्य जमा झाले आहे आणि त्याची चर्चाही सचिनच्या दातृत्वाची पुढली बातमी येईपर्यंत अशीच सुरू राहिल यात शंका नाही.
Popular Posts
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King Shiwaji weapons
-
1 Land, Politics And Trade In South Asia: 2 Leadership In 21st Century: 3 Truth Is Multi Dimensional-CD Sri Sri Ravishankar Art 4 What ...
-
Click here for More articles Rashichakrakar Sharad Upadhye - Bhakti Sagar आखाडा का बखेडा? : शरद उपाध्ये - Rashichakra Sharad Upadhy...
-
Kokanatala Malvani Garana Garhana marathi garhane कोकणात देवाला गार्हाणं घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठव...
-
आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...
-
स्त्रीला गरोदर कसे करावे ? पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...
-
Marathi Bold Actress Amruta Khanvilkar When Amruta Khanvilkar was the losing fina...
-
CLICK HERE TO VIEW THIS INFORMATION
-
सुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...
No comments:
Post a Comment