वन BHKसाठी सचिननं काढलं कर्ज
कर्ज काढून घर घेणं, ही आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांसाठी, सामान्यजनांसाठी किरकोळ बाब आहे. पण सचिन सामान्य नाही... आपल्या सगळ्यांसाठीच तो असामान्य आहे. तो भारतीय क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर भरणा-या सचिनकडे पैशाची ददात आहे, अशी कल्पनाही आपण करू शकत नाही. म्हणूनच, अर्जुनसाठी घर घेताना त्याच्या बाबांनी कर्ज काढल्याची बातमी आश्चर्यकारक आहे.
बांद्र्याच्या पेरी क्रॉस रोडवर सचिनचा टुमदार बंगला उभा राहिलाय आणि लवकरच तो तिथे सहकुटुंब शिफ्ट होतोय. ८,९९८ चौरस फुटाच्या या बंगल्यासाठी सचिननं ३९ कोटी रुपये खर्च केलाय. असं असताना, सचिनची पत्नी अंजली पनवेल उपनिबंधकांच्या कार्यालयात दिसली आणि तेव्हाच नवी मुंबईतल्या या नव्या घराचं ‘ गोड गुपित ’ उघड झालं. अर्थात, त्याबद्दल अंजलीनं किंवा तेंडुलकर कुटुंबातल्या कुणीच काही खुलासा केलेला नाही, पण सूत्रांनी मात्र आवश्यक तेवढी माहिती व्यवस्थित पुरवली आहे.
अर्जुन तेंडुलकरला आपल्या बाबांसारखंच क्रिकेटमध्ये करिअर करायचंय. पण इतक्यात प्रसिद्धीच्या झोतात येण्याची त्याची इच्छा नाही. म्हणूनच तो कर्नाळ्याच्या स्पोर्टस् अॅकॅडमीमध्ये प्रॅक्टिसला जाणार आहे आणि ही अॅकॅडमी पनवेलपासून अगदीच जवळ आहे. विकेंडला बांद्र्यापासून कर्नाळ्याचा प्रवास करण्याऐवजी पनवेलहून तिथे जाणं अर्जुनसाठी सोपं आहे. हा विचार करूनच, थालिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेड बांधत असलेल्या बिल्डिंगमध्ये सचिननं ४६७ स्वेअर फुटाचा एक फ्लॅट Flat बुक केलाय. हा फ्लॅट अंजलीच्या नावावर असल्याचं थालिया इन्व्हेस्टमेंटचे Thalia Investment नितीन पटेल यांनी सांगितलं.
या घराची किंमत २४.८८ लाख सांगण्यात येतेय. परंतु नवी मुंबईत ३० टक्के ब्लॅक द्यावे लागत असल्यानं या घराची किंमत ३० लाखाच्या आसपास असेल, असा अंदाज आहे. ही रक्कम भरण्यासाठी सचिननं कर्ज Loan घेतल्याचंही अधिकृत सूत्रांकडून समजतं. सचिननं Sachin आपली लाडकी फेरारी Ferrari नुकतीच विकली Sold. त्यापाठोपाठ, २५ लाखांच्या घरासाठी या ‘ मास्टर ’ माणसानं कर्ज घेतल्याचंही समोर येतंय. ३९ कोटींचा बंगला बांधल्यानं सचिनला खरंच ‘ कडकी ’ लागलेय की ही त्याची वेगळीच ‘ खेळी ’ आहे, याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
No comments:
Post a Comment