देणे वंशवेलीचे
डॉ. श्री बालाजी तांबे
स्त्री व पुरुष यांच्या बीजसंबंधातून अपत्याची निर्मिती होत असल्याने मूळ बीजात असलेला दोष अपत्यात येणे शक्य असते. म्हणून माता-पित्यात कुठल्याही प्रकारचा दोष असेल तर मूल होण्यापूर्वी रोगावर इलाज करणे, पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी करून व्यवस्थित औषधोपचार करून शक्य होईल तेवढे निरोगित्व मिळवून गर्भधारणा होऊ देणे, हा आनुवंशिक रोग टाळण्यासाठी उपयोगी पडणारा उपचार आहे. श्रीमद्भगवद्गीतेत सहाव्या अध्यायातील ४१ व्या श्लोकात म्हटले आहे,
प्राप्य पुण्यकृतां लोकान् उषित्वा शाश्वतीः समाः ।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ।।
बऱ्याच वेळा मध्ये अनेक पिढ्या गेल्यावर पुन्हा एखाद्या पिढीत आनुवंशिक रोग आलेले दिसतात. तसेच पूर्वीच्या पिढीत असलेला श्वसनाचा रोग, त्वचाविकार आनुवंशिक पद्धतीने पुढच्या पिढीत सुद्धा येऊ शकतो. कारण या दोन्ही त्रासांमागचे कारण सारखेच असते. एखाद्या रुग्णाला तपासताना त्याच्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये जर तशाच प्रकारचा रोग आढळला तर त्यावर वेगळ्या पद्धतीने इलाज करावा लागतो. तसेच कुठलाही त्रास होत नसला तरी त्याच घरातील लहान मुलांना सावध करून अमुक एका विशिष्ट रोगाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्याची औषधे देता येतात. रोग झाल्यावर इलाज करणे अवघड असते. त्याऐवजी प्रतिकारशक्ती वाढवून रोग टाळता येतो का हे पाहणे त्यामानाने सोपे असते.
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ।।
एखादा मनुष्य सन्मार्गाकडे वाटचाल करत असताना किंवा आपण जीवनाचे सार्थक करावे, चांगले वागावे असे वाटल्यामळे आपली जीवनपद्धती बदलून जगण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र या प्रयत्नात तो जर पूर्णत्वाला पोचू शकला नाही, म्हणजेच असे कर्म करत असताना मध्येच आयुष्य संपले तर त्याने केलेली सर्व मेहनत फुकट जाते का, असा मार्मिक प्रश्न अर्जुनाने विचारला. त्याचे उत्तर देताना श्रीकृष्णांनी वरील श्लोकात आश्वासन दिलेले आहे. चांगले किंवा वाईट असे जे जे कर्म मनुष्य करतो, त्यातील कोठल्याही कर्माचे फळ हे मिळतेच. शरीर नश्वर आहे, पण जीव, आत्मा कधीच मरत नाही. आत्मा ही एक संकल्पना, एक प्रोग्राम असून त्यावर झालेले संस्कार शरीर नष्ट झाले तरी तसेच राहतात आणि पुन्हा शरीर धारण केल्यानंतर पूर्वजन्मीचे संस्कार स्वतःचा प्रभाव दाखवितात, काही मर्यादेत पूर्वकर्माची फळे मिळतात. म्हणून चांगले काम करणाऱ्याला ज्या ठिकाणी सर्व सुखसोयी असतील, पूर्वजन्मात केलेली साधना वा चांगले काम पुढे नेता येईल अशा उत्तम घरात जन्म मिळतो व त्या अनुषंगाने आरोग्य, बुद्धी वगैरे मिळते.
हे सर्व सांगण्याचे कारण असे, की पूर्वी केलेली कर्मे, मग ती ह्या आयुष्यातील असोत वा पूर्वायुष्यातील असोत, फळे देतातच. काही फळे ताबडतोब मिळतात, तर काही कालांतराने मिळतात, एवढाच काय तो फरक. एखादे बी जमिनीत लावल्यावर लगेच उगवते, काही बी काही दिवसांनी उगवते, तर काही बी उगवायला काही महिनेही लागू शकतात. तेव्हा कर्माची फळे ह्या जन्मी नाही, तरी पुढल्या जन्मी मिळतातच. ह्याचाच अर्थ असा, की मनुष्य जन्मतःच पूर्वकर्मामुळे किंवा माता-पित्यांच्या कर्मामुळे, प्रकृतीमुळे काही फलप्राप्ती ह्या जन्मात मिळवतो, ह्यामुळेच जन्मतःच काही रोगसुद्धा येऊ शकतात. जो मनुष्य फलाशा सोडून किंवा निष्काम कर्म करतो व कर्माच्या फळाची अपेक्षा न धरता कर्म करण्यातच आनंद मानतो, कर्तव्य म्हणून वा निसर्गाची मागणी म्हणून शास्त्रविहित कर्म करतो, त्याला कर्मे बाधत नाहीत. अन्यथा पूर्वी केलेल्या सर्व कर्माची फळे मिळतात हे नक्की.
एखाद्या व्यक्तीचे आईवडील, आजोबा, आजी, पणजोबा वगैरेंच्या शरीररचना, आचार-विचार, मानसिकता ह्यांच्यामुळे जीवाला काही अडचणीना सामोरे जावे लागले, तर ह्याला आनुवंशिक रोग असे म्हणतात. आई-वडिलांपैकी कुणाला किंवा आईच्या आईवडिलांना, वडिलांच्या आईवडिलांना असलेला रोग मुलात आला तर त्याला आपण "आनुवंशिक रोग' असे म्हणतो. मुख्य म्हणजे रोग होण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती व्यवस्थित नसणे हे महत्त्वाचे कारण असते. गर्भधारणा होतेवेळी माता-पित्याची वीर्यशक्ती हे अपत्याची प्रतिकारशक्ती कमी असण्याचे मुख्य कारण असते. चुकीच्या वेळी, चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे, चुकीच्या पद्धतीने गर्भधारणा झाली तर येणाऱ्या अपत्याची प्रतिकारशक्ती कमी राहते. अशा अपत्याला पूर्वीच्या पिढीत असलेल्या शारीरिक, मानसिक दोषांना तोंड द्यावे लागते.
बऱ्याच वेळा मध्ये अनेक पिढ्या गेल्यावर पुन्हा एखाद्या पिढीत आनुवंशिक रोग आलेले दिसतात. तसेच पूर्वीच्या पिढीत असलेला श्वसनाचा रोग, त्वचाविकार आनुवंशिक पद्धतीने पुढच्या पिढीत सुद्धा येऊ शकतो. कारण या दोन्ही त्रासांमागचे कारण सारखेच असते. एखाद्या रुग्णाला तपासताना त्याच्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये जर तशाच प्रकारचा रोग आढळला तर त्यावर वेगळ्या पद्धतीने इलाज करावा लागतो. तसेच कुठलाही त्रास होत नसला तरी त्याच घरातील लहान मुलांना सावध करून अमुक एका विशिष्ट रोगाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्याची औषधे देता येतात. रोग झाल्यावर इलाज करणे अवघड असते. त्याऐवजी प्रतिकारशक्ती वाढवून रोग टाळता येतो का हे पाहणे त्यामानाने सोपे असते.
आनुवंशिक रोगामध्ये पांढऱ्या कोडाचाही समावेश करता येतो. या रोगाची भीती वाटण्यासारखे काही नसते व या रोगाचा बाऊ करण्याची गरज नसते. परंतु हा रोग रुग्णाला त्रास देतो, त्यापेक्षा अधिक पाहणाऱ्यांना त्रास देतो असे वाटते. कारण पांढरे कोड झालेल्या व्यक्तीस सामाजिक उपेक्षेला तोंड द्यावे लागते. इतकेच नव्हे, तर एखाद्या घरात पांढऱ्या कोडाची व्यक्ती असली तर त्या घरात लग्नसंबंध ठेवण्यास अनेक लोक तयार होत नाहीत. खरे तर या रोगामध्ये खूप घाबरून जाण्यासारखे काही नसते. हा रोग झालेला असतानाही सर्व जीवन सुरळीत चालू शकते.
खरे पाहता कोडापेक्षा अधिक भयावह, मृत्यूला कारण ठरणारे, रुग्णाला अतिशय त्रास देणारे इतर आनुवंशिक रोगही असू शकतात. आनुवंशिक रोगात मूत्रविकार किंवा वीर्यासंबंधीचे विकार अधिक काळजी करायला लावणारे असतात, कारण नवीन जन्माला येणाऱ्या अपत्यावर यांचा सरळ परीणाम होऊ शकतो.
एखाद्या घरात मानसिक रोग असला, तर समाजापासून त्या घराचेही अंतर वाढत जाते. खरे पाहताना एखाद्या कुटुंबात एखादी व्यक्ती मानसिक रुग्ण असली तर त्या कुटुंबातील सगळ्यांपासून किंवा पुढे येणाऱ्या पिढीपासून दूर राहण्याचे काही कारण नसते, मानसिक रोग पुढच्या पिढीत येईलच असे निश्चित सांगता येत नाही.
प्रत्येक घराण्याची एक कुलपरंपरा असते, कुळधर्म व कुळाचार सोडू नयेत असे म्हणतात. कारण घरातला अशा प्रकारचा आचार-विचार सांभाळण्याने पुढच्या येणाऱ्या पिढीला आनुवंशिक रोगापासून दूर ठेवता येऊ शकते, मागच्या पिढीकडून वंशात आलेल्या त्रासांवर वा रोगांवर इलाज करताना केवळ शारीरिक इलाज न करता त्याबरोबर मानसिक परिवर्तन होईल वा मनःशक्तीचा व इतर शक्तीचा उपयोग होईल हे पाहणे आवश्यक असते. एकूण गुणसूत्रांमध्ये असलेली संकल्पना वा प्रोग्रॅम ही पुढच्या पिढीत जाते व त्यातून आनुवंशिक रोगांची उत्पत्ती होते असे म्हणायला हरकत नाही. त्याचप्रमाणे स्त्री व पुरुष यांच्या बीजसंबंधातून अपत्याची निर्मिती होत असल्याने मूळ बीजात असलेला दोष अपत्यात येणे शक्य असते. म्हणून माता-पित्यात कुठल्याही प्रकारचा दोष असेल तर मूल होण्यापूर्वी रोगावर इलाज करणे, पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी करून व्यवस्थित औषधोपचार करून शक्य होईल तेवढे निरोगित्व मिळवून गर्भधारणा होऊ देणे हा आनुवंशिक रोग टाळण्यासाठी उपयोगी पडणारा उपचार आहे.
येथे वाचा - संतानयोग डॉ. श्री बालाजी तांबे How to get Pregnant? Santan Yog - Balaji Tambe
येथे वाचा - संतानयोग डॉ. श्री बालाजी तांबे How to get Pregnant? Santan Yog - Balaji Tambe
No comments:
Post a Comment