Saturday, October 30, 2010
Inside Tihar Jail
जगातले यच्चयावत संसार सुखाचे होण्यासाठी
जगातले यच्चयावत संसार सुखाचे होण्यासाठी
मुली जेव्हा नुकतंच लग्न होऊन सासरी जातात तेव्हा पहिले काही दिवस त्यांची पार गंमत उडालेली असते. काही म्हणजे काही कळत नाही. नवं घर, नवी माणसं आणि लग्नापूर्वी आपला वाटणारा आणि लग्नानंतर अचानक सासरच्या गोटात सामील झालेला नवरा अशा वेगवेगळ्या लेव्हल्सवर तिचा सामना सुरू असतो. गाडं पहिल्यांदा अडतं ते स्वयंपाक करण्यावरून. लग्नाआधी आईने ३ महिन्यांचा क्रॅशकोर्स करून घेतलेला असतो. पण लग्नापूर्वीच्या महिन्याभरात लग्नाच्या तयारीमुळे सगळ्यावर छान बोळा फिरवला जातो. त्यात आजकालच्या मुलींना मी नोकरी करत असूनही घर उत्तम सांभाळते हे दाखवून द्यायची भारीच हौस असते. आणि इथेच लोचा होतो. भरीसभर म्हणून काही नवरे पावलो पावली बायकोची तुलना त्यांच्या आईशी करतात. सगळ्याच बाबतीत. तर अशी एक घटना आपण बघू.
घटना १ - सामान्य दॄष्टीकोन
वेळ - मंमं करायची
पार्श्वभूमी - तुम्ही मर मर मरून कमी करपलेल्या पोळ्या आणि करायला सोप्पी म्हणून बटाट्याची भाजी केली आहे. नवरा पहिला घास तोंडात टाकतो.
नवरा - अगं ही कसली भाजी केली आहेस? मी ऑफिसमधून उशिरा आल्याची इतकी भयानक शिक्षा?
बायको - का रे? काय झालं? बटाट्याची आहे ही.
नवरा - ते कळलं गं, पण ही अशी? अशी बटाट्याची भाजी मी मागच्या ३० वर्षात खाल्ली नव्हती.
बायको - मीठ जास्त पडलं का?
नवरा - नाही... मीठ बरोबर आहे, भाजीत बटाटे कमी पडलेत.
बायको - अरे काय झालं नीट सांगशील का?
नवरा - खाऊन बघितलीस तू मला वाढण्याआधी?
बायको - हो...
नवरा - मग कळलं नाही तुला? साधी बटाट्याची भाजी करता येऊ नये म्हणजे कमाल आहे.
बायको - अरे पण...
नवरा - आणि मला खाकरे आवडतात हे बरोबर आहे, पण ते चहाशी. जेवायला नव्हे.
बायको - असं रे काय करतोस? मी पण नुकतीच सुरुवात केली आहे ना?
नवरा - पण साध्या पोळ्या येऊ नयेत म्हणजे कमाल झाली. एकदा माझ्या आईच्या हातचं खाऊन बघ म्हणजे कळेल फरक खाकरे आणि पोळ्यांमधला.
(बायको मुसमुसायला लागते)
नवरा - आता रडू नकोस. एव्हढं काही झालं नाहिये...
बायको - मग तू किती ओरडतोस माझ्यावर...
नवरा - ओरडू नाही तर काय करू...
(नवर्याचं आई पुराण पुन्हा सुरू होतं.)
आता ह्या समर प्रसंगातून सुटका करून घेण्यासाठी उत्तम स्वयंपाक शिकणे अथवा स्वयंपाकाला बाई ठेवणे हे दोनच उपाय आहेत. पण तोपर्यंत किल्ला लढवण्यासाठी निर्लज्जपणाच तुमच्या मदतीला धाऊन येईल.
----------------------------------------------------------------------------------------
घटना १ - निर्लज्ज दॄष्टीकोन

बायको - का उगाच आरडा-ओरडा करतोयस?
नवरा - अगं भाजीत मीठ किती जास्त आहे? वाढण्याआधी चव घेऊन नाही बघितलीस का?
बायको - बघितली, मीठ जास्त वाटलं म्हणून पुन्हा थोडे बटाटे घातले तर भाजी अळणी झाली. म्हणून चवीपुरतं मीठ टाकलं तर तू म्हणतोस भाजी खारट झालेय.
नवरा - खरंच झालेय अगं. साधी भाजी करता येऊ नये तुला म्हणजे कमाल आहे.
बायको - कमाल काय त्यात? मी काय खाणावळ चालवते?
नवरा - तसं नव्हे. पण... जाऊ दे... तू एकदा आईच्या हातचं जेऊनच बघ म्हणजे तुला कळेल.
बायको - आई सारखी भाजी हवी होती तर लग्न कशाला केलंस, दत्तक जायचंस कुणाला तरी. आणि २०-२५ वर्षांनी मी सुद्धा टकाटक स्वयंपाक करेन.
नवरा - म्हणजे तोवर मी असंच जेवायचं?
बायको - नाही रे...
नवरा - मग?
बायको - एक आईडिया आहे... आपण सासूबाईंना बोलावून घेऊ... त्यांच्या हाताला खरंच चव आहे...
नवरा - ते आहेच गं. पण...
बायको - आणि तशीही त्यांना आवड आहेच तुला रोज वेगवेगळं काही तरी करून खायला घालायची.
नवरा - हे कुणी सांगितलं तुला?
बायको - अरे परवा तुला तिसर्यांदा डब्यात बटाट्याची भाजी दिली तेव्हा तूच नाही का म्हणालास?
नवरा - अगं ते वेगळंबायको - काही वेगळं नाही... ठरलं तर, आपण आता जरा मोठं घर घेऊ आणि सगळे एकत्रच रहायला लागू, प्रश्नच मिटला...
नवरा - (प्रकट) नको... इतकं काही वाईट झालं नाहिये. (स्वगत - अजून मोठं घर म्हणजे अजून मोठा हफ्ता, म्हणजे खर्चावर अजून लगाम. काय च्यायला वैताग आहे.)
बायको - नाही तर अजून एक आईडिया... आपण बाई ठेऊ स्वयंपाकाला... माझ्या ओळखीत आहेत एक मावशी... दोन्ही वेळच्या जेवणाचे फक्त ५,००० घेतात
नवरा - (प्रकट) इतकी काही गरज नाहिये गं, जमेल तुलाही हळू हळू... (बापरे, फक्त स्वयंपाक करायचे ५,०००? त्यापेक्षा मी शिकतो, मला दे ते ५,०००)
बायको - पण त्याला वेळ लागेल रे...
नवरा - वेळ सगळ्यालाच लागतो अगं. जाऊ दे, ये जेवायला...
घटना १ समाप्त
अशा साध्या साध्या घटनांतून आपल्याला निर्लज्जपणाचं महत्त्व संसारात पावलोपावली पटू लागेल.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
निर्लज्जपणा जर सगळ्यात जास्त कुठे उपयोगी पडत असले तर तो संसारात. A perfect marriage is based on perfect mutual misunderstanding असं कुणी एक थोर तत्त्ववेत्ता सांगून गेला ते खरंच आहे. पण ह्या पलिकडे जाऊन आपल्या नवर्याच्या मर्कटलिलांकडे दुर्लक्ष करण्यासाठी निर्लज्जपणाच उपयोगी पडतो. "किती वेळा सांगितलं तरी हा काही सुधारत नाही" ही जगातल्या समस्त बायकांची तक्रार आहे. आणि त्यावर कुणालाही अजूनही सोल्यूशन शोधणं शक्य झालेलं नाही. त्यामुळे त्या फंदात पडूच नये.
नवर्यांचं सुधारणं हे सिनेमात नितंब उडवत नाचणार्या (शब्दप्रयोग कणेकरांकडून साभार) बार बाला कम आयटम गर्लला एके दिवशी होणार्या "अरे, आपण अभिनयाशी संबंधीत क्षेत्रात काम करतो" ह्या साक्षात्कारासारखं असतं. ते फारसं मनावर घेऊ नये. एखाद्या सिनेमात ५-६ मिनिटं मेक-अप शिवाय दर्शन देऊन आणि अंगभर खादीची साडी गुंडाळून गंभीर आवाजात संवाद म्हटल्यावर त्या जशा पुन्हा नितंब उडवायला मोकळ्या होतात तसंच नवर्यांचंही आहे. अचानक एके दिवशी ह्यांना 'अरे, संसाराचा गाडा दोन चाकांवर चालतो आणि आपल्या चाकाची गती दुसर्या चाकाच्या मानाने जरा कमी आहे" हा साक्षात्कार होतो. आणि त्यावर उपायही सुरू होतो. पण तो रुमाल जागेवर ठेवणे, सोसायटीच्या वॉचमनला दळण आणायला पाठवणे इत्यादि पुरता मर्यादित असतो. ह्या दोघांमधलं अजून एक साम्य म्हणजे ह्या बार बाला / आयटम गर्ल जशा त्या ५ मिनिटांच्या भुमीकेची आठवण पुढल्या प्रत्येक मुलाखतीत काढतात तसेच नवरेही एखाद्यावेळी जागेवर ठेवलेला रुमाल, ऑफिस बॉयला पाठवून भरलेलं बिल, इत्यादी कामांची आठवण प्रत्येक भांडणात काढतात. त्यामुळे नवर्यांच्या सुधारित आवॄतीला फारसं मनावर घेऊ नये. नवरा आणि तेरड्यातलं साम्य ओळखावं.
मुळात लग्न झालं तरी नवर्यांच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. घर तेच, मित्र तेच, कट्टा तोच. "त्यामुळे लग्नानंतर तू बदललास" म्हणजे नक्की काय झालं हेच नवर्यांना कळत नाही. उलट "मी होतो तसाच आहे, मग आता कसला त्रास होतोय" हे त्यांना कळत नाही. ह्यावर उपाय म्हणून नवरे-स्पेसिफिक निर्लज्जपण अंगी बाणवायला हवा. हा नवरे-स्पेसिफिक निर्लज्जपण अंगी बाणवून संसार सुखाचा कसा करावा हे कळण्यासाठी नवर्यांचे काही गुण आणि खास सल्ले इथे देत आहे.
संसार सुखाचा करण्यासाठी बायकांना काही सल्ले:
१. "कल्पवॄक्ष कन्येसाठी" ह्या पि. सावळाराम ह्यांच्या गाण्यातला कल्पवॄक्ष म्हणजे नवरा नव्हे हे कॄपया ध्यान्यात घ्यावे.
२. नवर्यांना कामाचा कंटाळा येतो. कुठल्याही.
३. रविवार सकाळी उशिरा उठणे आणि दुपारी लोळत पडणे हे नवर्यांच्या सुखाच्या परमावधीचे क्षण असतात. त्यात बाधा आणू नये.
४. साड्यांच्या दुकानात अख्खं दुकान खाली काढायला लाऊन "नाही आवडलं काही" ह्या शब्दात दुकानदारांची बोळवण करून बाहेर पडण्याची नवर्यांना मनापासून लाज वाटते. त्यामुळे नवर्यांना किमान साड्यांच्या खरेदीला नेऊ नये.
५. नवर्यांचा खर्चाला आक्षेप नसतो, तो खर्च होण्यासाठी रविवार संध्याकाळ खर्ची घालण्याला असतो हे कॄपया समजून घ्यावे.
६. ब्रँडेड दुकानांत बार्गेन करता येत नाही ह्याचा नवर्यांना अजिबात त्रास होत नाही.
७. नवर्यांना सासरी जाणं हे एक मोठ्ठ संकट वाटतं.
८. आई पेक्षा चांगला स्वयंपाक जगात कुणालाही येत नाही. आईचा ३०-३५ वर्षांचा अनुभव आणि बायकोचे नवर्यावर चालणारे प्रयोग ह्यांची तुलना होऊ शकतच नाही.
९. आईशी तुलना करायची असेल तर आधी किमान आईने जसं लाडाऊन ठेवलंय ते कंटिन्यू करण्यापासून सुरुवात करावी.
१०. लग्न झालं तरी नवरे सुंदर मुलींकडे बघायचं सोडत नाहीत. मी मुलांकडे बघितलं तर चालेल का हा प्रश्न गैरलागू आहे.
ह्या काही गोष्टी बायकांनी लक्षात ठेवल्या तर जगातले यच्चयावत नवरे आणि पर्यायाने जगातले यच्चयावत संसार सुखाचे होतील.
आणि संसार सुखाचा करण्यासाठी आता नवर्यांना एकमेव सल्ला:
"आपल्या देवाने दोन कान दिलेत हे कधिही विसरू नका.

Subscribe to:
Posts (Atom)
Popular Posts
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King Shiwaji weapons
-
1 Land, Politics And Trade In South Asia: 2 Leadership In 21st Century: 3 Truth Is Multi Dimensional-CD Sri Sri Ravishankar Art 4 What ...
-
Click here for More articles Rashichakrakar Sharad Upadhye - Bhakti Sagar आखाडा का बखेडा? : शरद उपाध्ये - Rashichakra Sharad Upadhy...
-
Kokanatala Malvani Garana Garhana marathi garhane कोकणात देवाला गार्हाणं घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठव...
-
आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...
-
स्त्रीला गरोदर कसे करावे ? पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...
-
Marathi Bold Actress Amruta Khanvilkar When Amruta Khanvilkar was the losing fina...
-
CLICK HERE TO VIEW THIS INFORMATION
-
सुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...
Total Pageviews
Categories
- Mehandi Designs (1)
- rail chakra (18)
- rel chakra (17)
- relchakra (18)
Blog Archive
-
▼
2010
(1234)
-
▼
October
(221)
- Breast Cancer Awareness Month
- Inside Tihar Jail
- जगातले यच्चयावत संसार सुखाचे होण्यासाठी
- बंड्याची शाळा (धडा पहिला - प्रगती पुस्तक)
- निर्लज्जपणे - निर्लज्ज दॄष्टीकोन
- British car aims for 1,000mph record
- 'Licence raj has been replaced by land mafia raj'
- A new pattern of corruption is emerging (NEW)
- 50 Year Old Camera's Spectacular Images
- India's costliest car is here for just Rs 16 crore!
- 15 Incredible Libraries Around the World...!!!
- परफेक्ट मॅच निवडताना प्रत्येक मुलीच्या काही ना काह...
- सह्याद्रीचा दुर्गभांडार
- Benefits Of Playing Chess
- Shanghai declares 1-family, 1-home limit
- Know the ABC of Yoga...!!!!!
- Know the ABC of Yoga...!!!!!
- Bollywood Golden Years
- Lord Shiva................
- Stylish Ladies FASHIOAN Accessories
- >!!< >!!< Designer Lehanga Cholis >!!< >!!<
- Kurtis / Short Top For Girls ......Girls Check it Out
- !! Religions In India !! (Jai Hind )
- महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ......मस्तच !!!!
- iPhone Case which Reduces Cell Phone's Radiation b...
- Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great...
- Marathi Actress Amruta Khanvilkar
- Matchstick Armada
- A Tale of Giving
- Dombivlikars discover the true joys of shopping fo...
- Watch out! Your milk may make you impotent
- Kojagiri Lakshmi Puja, time to invoke the Goddess!
- कोजागिरी पौर्णिमा साजरी
- SMS-based service: the prices of different brands ...
- मराठी भाषेची ताकद .. !!!
- Detect spying software in your computer
- Use SimplePiano to learn to Play Piano for Free
- SIM Cards to replace USB Modem Dongles
- Make International Free Calls Online
- How to Get Top Rankings at Search Engines?
- Using VLC Media Player to Listen to Internet Radio
- How to choose E-mail Clients?
- Enabling Multiple Time Zones on Your Desktop | Com...
- Next-Gen Wireless Technology
- Is Cloud Computing Paving way for Low Cost Computing?
- WiTricity to Combat Energy Crisis
- Call Center interview questions
- This holiday season, go on a tour of Bollywood
- वेळीच 'नाही' म्हणायला शिका! ( Nice Article ) Learn...
- !! Bridal Jewelry !!
- Job Opportunity for Freshers : 50 Data Entry opera...
- Wedding on the cards? Rush to the printer to get t...
- Gold's glittering, despite the Sensex surge
- Video - Shalimar Garden
- Extreme Soccer Ball Juggling
- You can save Income tax as Parent or Child
- One of Wonder on earth : Ranakpur Jain Temples
- Indian Railway rolls out first AC Double-Decker Train
- CHILD NAME.........................Hillarioussssss...
- British media urges Wayne Rooney to learn from Sac...
- Alcoholism is like an illness, it can be treated
- Raj Thackeray - Maharashtra Navnirman Sena MNS Raj...
- Marathi Mulgi Vidya Malvade Actress Bollywood
- Hottest 3G phones in India Apple iPhone 3GS, Nokia...
- Get fit and stay fit with lean, mean apps - Androi...
- Go 4D for next-gen movie-viewing
- Paris Auto Exhibition
- The Greatest Entertainer in the World
- Video - Gesture of Love - Cute Feelings
- Video - Funniest Cat Video You Will Ever See
- Video - Parachuting into a Football Stadium
- Easy money offers teens licence to drink - Lack of...
- Never retiree: Why the wealthy will never retire
- डोकं गरम ठेवा... थंड डोक्याचे राहाल तर चिरडले जाल!...
- lakh lakh chanderi (shejari) - full original song
- Video - Are you proud to be a Maharashtrian - Me S...
- Kombadi Palali - Jatra Song Video
- तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||
- Very clever with words!
- Rachael Leigh
- Giant Wrestling woman Lindsay Hayward
- Nice Babies Wallpaper
- Never before seen: Video - How baby borns...
- CWG : Boys didn't have all the fun
- महिषासुराचे वारस बंगालमध्ये - वाचण्यासाठी येथे क्ल...
- 'Scantily-clad' Carla Bruni not welcomed by Pope, ...
- इंडियन नेव्हीत भरती : Join Indian Navy
- Students await study material for All-India Bar exam
- LIC Scholarship for Students to pursu higher studies
- Two babies stolen by burqa-clad women
- Most Expensive Supercars Car Lovers Don't Miss
- Most Expensive Supercars : Car Lovers Don't Miss
- पुणेरी नजरेने पुणेरी वाहतूक
- Colors of Marathi Jokes with Funny Images
- Are pure term covers the best insurance?
- Director's son held for cheating company
- Product Reviews - New Gadgets
- दुर्गदुर्गेश्वर रायगड
- We have learnt to take pride in our popular cultur...
- Ragda Pattice ( Mumbai Roadside Recipes )
-
▼
October
(221)