Friday, January 14, 2011

विवेक भोळेंचे अटकेपार इमल्यावर इमले!

Vivek Bhole


 

विवेक भोळेंचे अटकेपार इमल्यावर इमले!

"यश साध्य करण्यासाठी कुणी आदर्श असावे, अस काही नसतं, हवी असते फक्त जिद्द व घरातील कुटुंबीयांचा पाठिंबा. मग जग ही ठेणगं वाटावयास लागत', ही वाक्‍य कुणा तत्त्वज्ञाची नसून असोद्यात प्राथमिक, जळगावात माध्यमिक शिक्षण घेऊन विवेक भोळे यांनी स्पेन, चायना, दुबई शहरात आपली कार्यालये उघडून बांधकाम व्यवसायात भरारी घेत इमल्यावर इमले बांधले आहेत.
     सुप्रसिद्ध डिझायनर विवेक भोळे यांनी सांगितले, की असोदा गावी आमचं एकत्र कुटुंब. माझे आजोबा सोमा भोळे यांचा व्यवसाय शेती व टेलर काम. घरची परिस्थिती आमची बेताची, चार बिघे जमीन.  माझे प्राथमिक शिक्षण असोदा तर माध्यमिक शिक्षण जळगावात नूतन मराठा महाविद्यालयात झाले. 
   1989 बारावीत विशेष प्रावीण्य मिळवीत जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्‍टचा प्रवेश घेतला. मी व माझा भाऊ  सोबत दहिसर येथे दहा बाय दहाच्या खोलीत आमचे शिक्षण सुरू झाले. या खोलीने आम्हाला आजचे हे वैभव दिले आहे. 1995 मध्ये मी दहिसर येथे ज्या भाड्याच्या दहा-बाय दहा च्या खोलीत राहत होतो, तेथेच आपले छोटेखानी कार्यालय सुरू केले.
 मी डिझाइनर (आर्किटेक्‍ट) झाल्यावर एका एका मित्रासोबत काम घेतले. त्यात दोन हजार रुपये सुटले. मात्र, मित्राने दगाबाजी केली. त्याने एक हजार रुपये न देता फक्त 300 रुपये दिलेत. आम्ही हार न मानली नाही. मी व मिलिंद दादाने स्वतः काम घेण्यास सुरवात केली. सन 1996, 97, 98 पर्यंत मुंबईतील विविध उपनगरात कामे केलीत. यात नकाशा काढण्यापासून ते बांधकामापर्यंत. सन 1999 मध्ये महाराष्ट्र बाहेर पडलो. यात चेन्नई, कोचीन, राजकोट, जयपूर व इंदूर या शहरात तर सन 2000 मध्ये बांद्रा टर्मिनन्सचे काम केले. यात गुणवत्ताप्राप्त कामाचे कौतुकही झाले. त्यानंतर सुरू झाला परदेशांचा प्रवास यात सुरवातीला दुबईत कामे केलीत. या ठिकाणी छोटेखानी कार्यालय सुरू केले. त्यानंतर चायना देशातील गॉंगझाऊ शहरात व आता स्पेन देशात काम सुरू आहे. 
  विवेक भोळे यांनी सांगितले, की मी जी काही परदेशात कार्यालय उघडली आहेत त्याठिकाणी  महाराष्ट्रीय तरुणांना प्राधान्य देतो. आज माझ्या मुंबईच्या कार्यालयात 150 महाराष्ट्रीय तरुण काम करतात व परदेशातील कामांवरही.
  
डिझायनर विवेक भोळे यांनी सांगितले, की विदेशात गुणवत्ता हीच कामाची पावती असते. तेथील नागरिक फार बारकाईने प्रत्येक गोष्ट तपासतात. त्याच्या अपेक्षा देखील खूपच असतात. यात तडजोड किंवा चूक करण्याचा प्रयत्न केला तर त्या देशातील तुमचा परवाना गेलाच समजा. म्हणून येथे काम करताना डोळ्यात तेल घालूनच काम करावे लागते. 

दुबईच्या कामाला अवॉर्ड
नायजेरिया, तांजनिया, केनिया, दुबई, चायना, मलेशिया या देशांमध्ये कामे केली आहेत, काही ठिकाणी सुरू आहेत. तसेच आता स्पेन या देशात हॉटेल व स्कूलचे काम सुरू आहेत. दुबई शहरातील "शताऊ' या 26 मजली रहिवास असलेल्या बिल्डिंगला तेथील प्रशासनाने नुकतेच "बेस्ट रेसिडेन्शिअल बिल्डिंग' म्हणून गौरविले आहे.



No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive