'' गुंतवणूकदारांचे डोळे अजूनही कसे उघडत नाहीत ?'' हे पत्र (म. टा. 12 नोव्हेंबर) वाचले. ' कल्पवृक्ष ' माकेर्टिंग Kalpavriksha Marketing कंपनी स्थापन झाली , त्या वेळी कोणत्याही बँका किंवा मोठमोठ्या औद्योगिक कंपन्यांमधून गुंतवलेले पैसे कमीत कमी 5 ते 6 वर्षांपेक्षा कमी मुदतीत दुप्पट होत नसताना , ' कल्पवृक्ष ' माकेर्टिंग कंपनीत मात्र तीन वर्षांत दुप्पट होतात , या आमिषाला भाळून गुंतवणूकदारांनी ' कल्पवृक्ष ' मध्ये गुंतवणूक केली. यापूवीर्च्या ' पिअरलेस '(pearles), ' संचयिनी '(sanchayini), सी. यू. माकेर्टिंग '(C U Marketing), ' शेरेगर योजना ' (Shregar Scheme) तसेच ' प्लँटेशन योजनां ' (Plantation Scheme)चे पुढे काय झाले , याचा इतिहास डोळ्यांपुढे असतानाही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. याला कारण माणसाला असलेली ' इझी मनी '(easy Money) ची हाव. या हावेपुढे माणसाची विचारशक्ती हार खाते आणि डोळे झाकले जातात. परिणामी , फसगत झाल्यावर शेवटी रडण्याशिवाय काही उरत नाही.
आता तक्रारी , निदर्शने करून किती जणांचे किती पैसे परत मिळणार ? सरकार काय स्वत:च्या खिशातून नुकसानभरपाई देणार ? मुळात सरकारला लोकांच्या हिताची काळजी असतीच , तर अशा कंपन्या स्थापण्यासच बंदी केली असती. जगात सर्वत्र दोन प्रकारची माणसेच जास्त दिसतात. एक दुसऱ्यांना ' मूर्ख बनविणारी ' आणि दुसरी ' मूर्ख बनणारी '. आता हे फसवणुकीचे धंदे कायमचे बंद करण्यासाठी , लोकांनी सरकारवर दबाव आणून असल्या कंपन्यांच्या स्थापनेलाच बंदी करणारा कायदा व्हावा म्हणून निदर्शने करायला हवीत. त्याशिवाय सरकारचेही डोळे उघडणार नाहीत.

No comments:
Post a Comment