भारतात २७ मे रोजी 'अॅपल'चा आयफोन फोर सादर होईल. भारती एअरटेल आणि एयरसेल या कंपन्या तो उपलब्ध करून देणार आहेत. भारतात बहुतके कंपन्यांनी थ्रीजी मोबाईल सेवा सुरू केली आहे.
देशात स्मार्ट फोनच्या विक्रीत वाढ होत असून, २०११ या वर्षात १.२ कोटी स्मार्ट फोनची विक्री होण्याची अपेक्षा आहे. देशातील मोबाईलधारकांची मार्चअखेर संख्या ८१.१५ कोटी असून, चीननंतर जगातील दुसरी मोठी बाजारपेठ आहे. 'एअरसेल आयफोन फोरचे १६ जीबीचे मॉडेल त्न३४,५०० आणि ३२ जीबी मॉडेल त्न४०,९०० उपलब्ध करून देणार आहे. यासाठी ग्राहकांना एकदम रक्कम भरावी लागणार आहे. मात्र, फोन घेण्यासाठी भरलेले पैसे पुन्हा मिळविण्याची संधी एअरसेल ग्राहकांना देणार आहे. फोनच्या एकूण रकम विविध मासिक प्लॅन्सच्या आधारे पुढील दोन वर्षांत क्रेडिट करणार आहे, असे एअरसेलने स्पष्ट केले.
' अॅपल'ने गेल्या वषीर् अमेरिकेत आयफोन फोर सादर केला. हा फोन १९९ डॉलरपासून उपलब्ध आहे. या फोनमध्ये व्हिडीयो चॅट, मोठा टच स्क्रीन आदी फीचर्स यात आहेत. जागतिक पातळीवर सर्व ठिकाणी यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भारतात २००८ मध्ये पहिल्यांदा आयफोन सादर करण्यात आला होता. त्यानंतर त्याची अपग्रेड व्हर्जन देखील सादर झाली. आयफोन फोरचा स्क्रीन ३.५ इंचाचा असून, यात दोन कॅमेरा आहेत. यातील एक कॅमेरा पाच मेगापिक्सेलचा असून, एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment