Friday, March 8, 2013

पाकिस्तानच्या पंतप्रधानांसाठी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे

भारताच्या एक दिवसाच्या खासगी दौऱ्यावर येणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांसाठी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . मात्र , त्या वेळी कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार नाही , असे स्पष्ट करण्यात आले आहे .

' पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ त्यांच्या कुटुंबीयांसह शनिवारी अजमेर येथील दर्ग्याला भेट देणार आहेत . त्या दिवशी खुर्शीद यांनी रामबाग पॅलेस या स्थानिक हॉटेलमध्ये अश्रफ यांच्यासाठी भोजन समारंभ आयोजित केले आहे . भोजनानंतर अश्रफ अजमेरला रवाना होणार आहेत . अजमेर येथील प्रार्थना आणि संबंधित कार्यक्रमांनंतर अश्रफ सायंकाळी पुन्हा जयपूरला येतील आणि तिथून विशेष विमानाने इस्लामाबादला रवाना होतील . या संपूर्ण दौऱ्यात अश्रफ राजधानी दिल्लीत येणार नसून , त्यांच्यासोबत कोणत्याही मुद्द्यावर चर्चा होणार नाही ,' अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली . पाकिस्तानकडून भारतीय जवानांच्या शिरच्छेदानंतर ही भेट घडत आहे . त्या पार्श्वभूमीवर , ' भारताने राजधानीत चर्चेचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला होता का ,' असे विचारण्यात आले . त्यावर , ' त्यांनी हा दौरा खासगी असल्याचे स्पष्ट केल्याने त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या गरजांची पूर्तता करण्यात आली आहे . पाकिस्तान हा महत्त्वाचा देश असून , सामान्य राजनैतिक प्रोटोकॉलनुसार आवश्यक त्या बाबी पुरविल्या जात आहेत ,' असे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive