हिँदू-मुस्लिम वाद हा मुस्लिम आक्रमणापासुन चालु
होता आणी तो आजही आहे,त्यात काहिनी समरुपता दाखवली तर काहिनी एकदम टोकाची
भुमिका घेतली आणी ती आजही आहे.इ स 1898 मध्ये नैनितालमधिल मोहम्मद सर्फराज
हुसेन यानी स्वामी विवेकानंदाना एक पञ लिहिले होते त्यात 1 प्रश्न विचारला
होता,"हिँदूत्व आणी इस्लाम यांच्या संघर्षाची समाप्ती कोणत्या पद्धतीने
करता येईल? 10 जुन 1898 रोजी स्वामीजीनी अल्मोडा येथुन या पञास उत्तर पाठवले
होते ते पुढिलप्रमाणे="सत्य हेच आहे कि धर्म आणी वैचारिकतेच्या संदर्भात
अद्वैतवाद हेच एकमेव अंतिम सत्य आहे.याच अद्वैताच्या भुमिकेतुन आपण सर्व
धर्म संप्रदाय यांच्याकडे प्रेमाच्या नजरेतुन बघु शकतो.आता या अद्वैताला
भलेही तुम्ही वेदांताचे तत्वज्ञान म्हणा किँवा इतर काहिही म्हणा परंतु
बर्याच प्रदिर्घ काळापासुन द्न्यानसंपन्न मनुष्य जातिचा हाच धर्म आहे असा
माझा विश्वास आहे.अरब जातिपेक्षा ही हिँदू धर्म पुरातन असल्याकारणाने या
अद्वैत सिद्धांताच्या शोधाचे श्रेय हिँदू धर्माकडेच जाते परंतु समस्या मानव
जातीकडे स्वत:च्या आत्मारुप द्रुष्टीने बघणार्या आणी समजावुन घेणार्या
अद्वैतवादाचा हिँदूकडुन कधी हवा तसा विकास झाला नाही म्हणुनच मी निश्चितपणे
म्हणु शकतो कि,वेदांतामधिल सिद्धांत कितीही सुंदर प्रभावी असले तरिही
जोपर्यँत इस्लाम धर्माच्या समतेशी जोडले जात नाहीत तोपर्यँत त्यांचा
सामान्य माणसाला काहिही उपयोग नाही.ज्या ठिकाणी वेद,कुराण,बायबल नाही त्या
विशिष्ठ ठिकाणापर्यँत आपल्याला मानवजातीला घेऊन जायचे आहे परंतु हे सर्व
कार्य वेद,कुराण व बायबल यांच्या मदतीनेच साकार होऊ शकते.त्यांचा समन्वय
अत्यंत आवश्यक आहे.एकता हाच एक धर्म असल्याकारणाने विभिन्न धर्म पंथाचा उदय
त्याच्या मुळातुनच झालेला आहे.हे शिक्षण सर्व मानवजातीला मिळायला हवे.असे
खरोखरच घडवता आले,तर जो तो आपापल्या परीने एकतेचा मार्ग धरल्याशिवाय राहणार
नाही.आपल्या देशाच्या द्रुष्टिकोणातुन पाहायचे झाले ,तर हिँदू आणी इस्लाम
धर्माचा समन्वय अर्थात वेदांताच्या एकत्वाचे सर्वोच्च तत्वद्न्यान आणी
इस्लाम धर्मामधील समता यांचा मिलाफ हि स्थितीच केवळ आशादायक चिञ दाखवु
शकते.या वाद-विवादापासुन खरं तर दूर राहुनच उद्याचा भारत अजेय,परिपुर्ण आणी
वैभवसंपन्न होइल असा माझा ठाम विश्वास आहे.वेदांताचा मेंदु आणी इस्लामी
धर्म यांचा समन्वय साधला तरच भविष्यातील भारत घडणार आहे.अखिल मानव जातीला
आणी विशेषत: आपल्या या अत्यंत गरिब देशाला मदत होण्याच्या द्रुष्टीनेच
ईश्वराने एक साधन म्हणुन माझा उपयोग करुन घ्यावा हीच प्रार्थना मी सतत
त्याच्याजवळ करत असतो....
-स्वामी विवेकानंद
-स्वामी विवेकानंद
No comments:
Post a Comment