Tuesday, April 12, 2011

प्रेमभंग




         प्रेमभंग 

मला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं पण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.
चंद्राला चांदणी प्रिय होती ऊनाला सावली प्रिय होती पोरका झालेल्या राजाला फ़क्त राणीची कमी होती.
तुझ्या प्रत्येक आठवणीने होते माझी रोजची पहाट आणि ओलावतात भावनांनी डोळ्यांचे काठ.
काय म्हणू मी दोस्तीला गुपीत सारे ठेविले,गोड गोड माझ्याशी बोलून मला मनातून दूर ठेवलेस.
तुला पाहिलं की खूप खूप बरं वाटतं क्षणभर जरी दूर गेलीस तरी काळीज तुटून पडतं.
तुझ्या घरासामोरचं झाड आता माझ्यासारखं सुकलंय माझं तुझ्यातील अस्तित्व म्हणून आता माझ्या घराकडे झुकलंय.
वाटलं होतं सावरशील मला वादळात कोलमडताना माहित नव्ह्तं तूही सोबत सोडशील अंधारात चालताना.......
वाटले नव्ह्ते स्वप्नातसुध्दा जुळतील तुझेनि माझे ॠणानुबंध निभवू शकू आपण हे रेशमी प्रेमाचे बंध.
तुझ्या पायाची धुळ व्हावं,तुझ्या जीवनात वात होऊन जळत रहावं,दुःखात तुझ्या सहभागी व्हावं एवढंच जीवनातीचं ध्येय.
१०पोर्णिमेच्या चांदण्याला कुठे स्वतःवा प्रकाश चंद्राला अपुरे पडते आज मोकळे आकाश.
११मी तुझे नाव वाळूवर लिहिले ते वाहून गेले.मी तुझे नाव हवेवर लिहिले ते उडून गेले.मी तुझे नाव हृदयावर कोरले मला हारअँटॅक आला !
१२पहाटेची स्वप्न खरी होतात असं म्हणतात आता स्वप्नच पडत नहीत ती पण मला छळतात.
१३सा-यांसाठी झिजताना मी फ़क्त तुझीच उरणार आहे झिजून जरी गेले तरी मी तुझ्या आठवणीत विरघळणार आहे.
१४तुझी आठवण आली की मी हसत राहीन या जन्मी मी तुझा झालो नाही तरी पुढ्च्या जन्मी नक्कीच होईन.
१५तुमच्या सा-यांच्या सहवासात खूप बहरुन जायला होतं,पण क्षणीक त्याच्या आठवणीत खूप विरुन जायाला होतं.
१६माझ्या प्राणनीय रसिक पाखरा दिलास मला तू प्रेमाचा आसरा कसं काबू करु मी माझ्या मनाला आठवण येते तुझी प्रत्येक क्षणाला.
१७गेल्या वर्षी भरलेलं तळं ह्या वर्षी कोरडं पडलं म्हणे त्याला एका झ-याने अर्ध्यातच सोडलं होतं.
१८तूच माझी रुपमती सर्व मैत्रीणींत तूच सौदर्यवती म्हणीन केली मी तुझ्यावर प्रिती कधी बनशील तू माझी सौभाग्यवती ?
१९विठोबाच्या नगरी आहे चंद्रभागेचा घाट,तिथेच मी पाहीन तिन्ही सांजे तुझी वाट.
२०तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.
२१तुझी प्रीत माझ्यासाठी जीवनाचा अनमोल ठेवा आहे.कधी विरहाचा चटका तर कधी मिलनाचा गारवा आहे.
२२आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं असतं ते मिळत नसतं हव ते मिळालं तरी खूप कमी असतं चांदण्यांनी भरुनसुध्दा आपलं आभाळ रिकामं असतं.
२३माझ्या नशिबात तू असून माझं नशिब हुकलं असेल माझं प्रेम तुला समजवताना माझं काहीतरी चुकलं असेल.
२४एकतर्फ़ी प्रेमात भरपूर काही शिकलो ! तुझ्यावर प्रेम केले इथेच थोडा चुकलो !
२५पूर्णत्वाच्या शोधाला काहीच अर्थ नसतो या इथल्या चंद्रातसुध्दा एखादा डाग असतो.
२६तुला विसरायचे म्हणजे माझ्या मनाला समजवायचे पण डोळ्यांतून ओघळणा-या अश्रूंना कसे थांबवायचे.
२७पावसाळा अजून लांब असला तरी चातकाला कुठे त्याचे भान असते. तुटले एखाद्याचे मन तरीही बोलणा-याला कुठे भान असते.
२८प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं !
२९तुझी वाट पाहताना रात्र अर्धी सरलेली अर्ध्या रात्री माझी ओंजळ नक्षत्रांनी भरलेली.
३०सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील.
३१निराशाच करायचीए होती तर आशा का दाखविकीस ? माझ्या वेड्या मनाला प्रेमाची भाषा का शिकवलीस ?
३२मुसळधार पावसाला मी जरासुद्धा घाबरत नाही पण तुझा एक आश्रू मात्र दुरुनही पाहवत नाही.
३३चंद्रापुढे तुझा चेहरा मला नेहमी मोहक भसतो.तू जवळ नसताना मात्र तो चंद्र्ही किती दाहक वाटतो.
३४प्रेम हे कोणाबरोबरही होतं प्रेमासाठी प्रेत्येकजण रडत असतो.विचार करुन बोट दाखविलं पाहिजे प्रेम हे भाऊ बहीणीचंही असतं.
३५प्रेमात जरा रागाविल्याशिवाय प्रेमाला गोडी येणार नाही आणि रागावून जरा दूर गेल्याशिवाय त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.
३६मारली गाठ दोन मनांची आपण तोडण्यासाठी नाही प्रेम केले दोघांनी अर्ध्यावर सोडण्यासाठी नाही.
३७खूप प्रेम करतो तुझ्यावर नाही विसरणार तुला तुझ्यासाठीच जगणार प्रत्येक दिवसं तुझ्यासाठीच मरणार माझा प्रत्येक श्वास हा फ़क्त तुझेच नाव घेत असणार मरण आले तरी ओठांवर फ़्क्त तुझेच नाव असणार.
३८प्रेमसुद्धा जीवनासारखं असतं प्रत्येक वळण सोप नसतं प्रत्येक वळणावर आनंदही नसतो पण जगणं आपलं सोडायचं नसतं
३९आयुष्यात एकदाच तुझ्यावर प्रेम केले पण नशिबानं साथ दिली नाही.वाटा जरी संपल्या तरी दिशा बाकी आहेत.प्रेम संपलं तरी आठवणी ताज्या आहेत.
४०वा-याशिवाय हालताना झाडाला मोठे कष्ट आहेत तुझ्याशिवाय जगताना जीवन माझे व्यर्थ आहे.
४१आठवण तुझी येताच उर कसा भरुन येतो कितीही आवरायचं म्हटलं तरी अश्रूंचा पूर भरुन येतो.
४२दुःखात आनंद शोधताना चूक विसरु नकोस दुस-याशी स्पर्धा करताना स्वतःला विसरु नकोस आयुष्यात सुखी होण्यासाठी दुस-यला दुःख देऊ नकोस.
४३खरं तर तेलाबरोबर वातीने ही कळायला हवं होतं उशिरा का होईना पण तुला माझं प्रेम कळायला हवं होतं.
४४पाऊस आधी तुझ्या गावात येऊन मग माझ्या गावात येणार होता पण का कोणास ठाऊक तो मध्येच फ़ाट्यावर वळला होता.
४५माझ्या हातात हात घेऊन शिकवलंस मला जगायचं कसं ? पण दुस-याच हात हातात घेण्यापूर्वी विसरलीस शिकवायला मरायचं कसं ?
४६असाच श्वास तोकडा पुन्हा पुन्हा धरायचा असाच जन्म फ़ाटका पुन्हा पुन्हा शिवायचा..
४७तुझ्या प्रत्येक शब्दाची आठवण माझ्या चांगलीच स्मरणात आहे शक्यता तुला विसरण्याची फ़क्त माझ्या मरणात आहे.
४८खरं सांगू मला तुला दुखवायचं नव्हतं मी तुझ्यावर प्रेम करतो एवढंच फ़क्त सांगायचं होतं जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिच आज परक्यासारखी वागते पण तरी ही मी ही सहन करतो कारण स्वप्नात ती माझ्याशी प्रेमाने वागते.
४९तुझ्याशिवाय जगणे म्हणजे श्वासाशिवाय जगणं अन तुझ्याशिवाय मरण म्हणजे चितेवाचून जळणं.
५०प्रेम केलंस माझ्याशी संसार केलास दुस-याशी का आलीस माझ्या ह्रदयाशी आयुष्याभर प्रेम केले असते ना तुझ्याशी.


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive