Tuesday, July 30, 2013

Saving Accounts Taxless earnings बचत खात्याचे करमुक्त उत्पन्न


ऐकण्यात असे येते की बँकेच्या बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाला दहा हजार रु.पर्यंत करमाफी आहे. हे खरे आहे का ? तसे असल्यास असे १० , ००० रु.पर्यंतचे व्याज इतर व्याज उत्पन्नात मिळवून नंतर त्याची वजावट आयकर कायद्याच्या कलम ' ८० सी ' खाली घ्यावी की हे व्याज इतर व्याज उत्पन्नाबरोबर न मोजता भविष्य निर्वाह निधीवरील व्याजासारखेच एकूण उत्पन्नात समाविष्ट न केलेल्या बाबींप्रमाणेच दाखवावे ? बचत खात्यावरील व्याजाबद्दल आयकरात सूट मिळत असल्यास ती आयकर कायद्यातील कोणत्या तरतुदीप्रमाणे ?

--- आयकर कायद्याच्या कलम ' ८० टीटीए ' खाली बचत खात्यांवरील दहा हजारांपर्यंतचे व्याज हे करमुक्त असते. उत्पन्न मोजताना बचत खात्यावरील व्याज हे इतर उत्पन्नात मोजावे व त्यानंतर कलम ' ८० टीटीए ' खाली दहा हजारांपर्यंतची सूट घ्यावी.

कल्याण (जिल्हा ठाणे) येथे मी मे २०१२ मध्ये फ्लॅट खरेदीसाठी नोंदणी (बुकिंग) केली व त्या फ्लॅटच्या खरेदीचा करार ( अॅग्रिमेन्ट) जुलै २०१२ मध्ये झाला. कल्याण-डों​बिवली महापालिका क्षेत्रात स्थानिक पालिका कर ( ' एलबीटी ') लागू झाला व तो मी १ टक्का दराने भरला आहे. करारनामा करतेवेळी मूल्यवर्धित कराबाबत ( ' व्हॅट ') नि​श्चिती नसल्यामुळे तो त्या वेळेस भरला गेला नाही. आता मला फ्लॅटचा ताबा ळिणार असून बिल्डर माझ्याकडे २ टक्के ' व्हॅट ' ची मागणी करीत आहे. तर हा ' व्हॅट ' एक टक्का दराने आहे की दोन टक्के ? माझा ' व्हॅट ' मी कर खात्याच्या कार्यालयात थेट भरू शकतो का ?

--- ' व्हॅट ' ची रक्कम ही आपणास बिल्डरला द्यावी लागेल. ती आपणास थेट भरता येणार नाही. आपणास एक टक्का दराने ' व्हॅट ' भरावा लागेल.

मी एक निवृत्त सरकारी अधिकारी व ज्येष्ठ नागरिक असून , आर्थिक वर्ष २०१३-१४ चे अपेक्षित उत्पन्न पुढीलप्रमाणेः पेन्शन- २ , ६० , ००० रु. , बँक ठेवींवरील व्याज - ७० , ००० रु. , म्युच्युअल फंड योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवरील लाभांश ( डिव्हिडंड) - , ५०० रु. असे एकूण ३ , ३७ , ५०० रुपये. आयकर कायद्याच्या कलम ' ८० सी ' अंतर्गत १० , ००० रु.ची गुंतवणूक नियोजली आहे. पूर्वी म्युच्युअल फंडाच्या समभागनिगडित बचत योजनेत (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम- ' ईएलएसएस ') गुंतवणूक केलेल्या व तीन वर्षांचा मुदतबंद कालावधी ( ' लॉकइन पीरियड ') पूर्ण केलेल्या योजनेचे २० , ००० रु.चे युनिट विकले तर हातात येणाऱ्या रकमेवर किती आयकर भरावा लागेल ? प्राप्त होणारी रक्कम आयकर विवरणपत्रात दाखविणे आवश्यक आहे ? असल्यास कोणत्या शीर्षकाखाली व त्याबाबतचे आयकर कायद्याचे कलम कोणते ? मला आयकर कसा , किती लागू होईल ?

--- आपण दिलेल्या माहितीअनुसार , म्युच्युअल फंडाकडून मिळालेला लाभांश हा करमुक्त आहे. तसेच आपण कलम ' ८० सी ' अंतर्गत दहा हजारांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आपले करपात्र उत्पन्न रु. ३ , २० , ००० एवढे होईल. ज्येष्ठ नागरिकांना अडीच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर भरावा लागत नाही. उरलेल्या रकमेवर म्हणजेच रु. ७० , ००० वर आपणास दहा टक्के दराने रु. , ००० व शैक्षणिक अधिभार रु. २१० असे एकूण ७ , २१० रु. आयकर म्हणून भरावे लागतील. ' ईएलएसएस ' चे परत घेतलेले पैसे आपण ' सिक्युरिटीज ट्रॅन्झॅक्शन टॅक्स ' (' एसटीटी ') भरून परत घेतले आहेत असे गृहीत धरल्यास सदर रक्कम दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याखाली करमाफ आहे.

Saturday, July 27, 2013

In mumbai lunch possible for Rs. 12


In mumbai lunch possible for Rs. 12

मुंबईत १२ रुपयांत जेवण शक्य!

raj babbar



तुम्हाला समजा १२ रुपये दिले आणि सांगितलं की, एवढ्या पैशांमध्ये भात, डाळ-सांबार आणि भाज्या असं जेवण करून दाखवा, तर आजच्या महागाईच्या काळात तुम्ही ते करू शकाल?... नाही ना!... पण, काँग्रेसचे प्रवक्ते राज बब्बर बहुधा हा चमत्कार करू शकतात. कारण, मुंबईत १२ रुपयांत व्यवस्थित जेवण करता येऊ शकतं, असं त्यांनी अगदी तो-यात सांगितलंय.

देशातील गरिबी घटल्याचा दवंडी पिटत काँग्रेस सरकार सध्या स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करतंय. परंतु, नियोजन आयोगानं गरिबीची व्याख्या करताना गरिबांची अक्षरशः थट्टा केली आहे. शहरांमध्ये जी व्यक्ती रोज ३३ रुपये खर्च करते, ती गरीब नसल्याचं अजब तर्कट त्यांनी मांडलंय. तर, ग्रामीण भागात २७.२० रुपये खर्च करणारी व्यक्तीही 'श्रीमंत' असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यावरून विरोधक काँग्रेस सरकारवर तुटून पडले आहेतच, पण जनताही चांगलीच खवळलेय. आजच्या महागाईचा विचार करता एवढ्या कमी पैशांत कुणाचंच भागणार नाही, मग देशातले सगळेच श्रीमंत म्हणायचे का?, असा सवाल जनसामान्य करत आहेत. परंतु, त्याचं उत्तर देताना काँग्रेस नेते आपलंच घोडं पुढे दामटवताना दिसताहेत. तसाच प्रकार राज बब्बर यांनी केलाय. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, मुंबईत आजही १२ रुपयांत व्यवस्थित जेवण मिळू शकतं.

देशात महागाई वाढली असली तरी गरिबी कमी झाली आहे. दर दिवशी २८ ते ३२ रुपये कमावणारी व्यक्ती दोन वेळचं पूर्ण जेवण जेवू शकते, असं मत बब्बर यांनी व्यक्त केलं. अर्थात, हे गणित कसं जमवायचं हा ज्याचा - त्याचा प्रश्न असल्याचं सांगून त्यांनी तपशिलात शिरणं सोयीस्करपणे टाळलं. आजही मुंबईसारख्या शहरामध्ये मला १२ रुपयांमध्ये संपूर्ण जेवण मिळतं. फक्त वडापाव नव्हे, तर भात, भाजी, डाळ - सांबार हे सगळं तेवढ्या रुपयांमध्ये येतं, असा दावा त्यांनी केला.

टोमॅटोच्या भावावरून गरिबीची व्याख्या करायला लागलो तर परिस्थिती कठीण होऊन बसेल. तुम्हाला शहरात टोमॅटो मिळत नसतील. मात्र गावातील गरीब लोक शेतातील टोमॅटो तोडून खाऊ शकतात. मग यात गरीब कोण आणि श्रीमंत कोण, हा प्रश्न आलाच कुठे?, असा सवाल बब्बर यांनी केला. महागाईचा प्रश्न गौण नाही, मात्र ज्याप्रमाणे महागाई वाढली आहे त्याप्रमाणे लोकांची खर्च करण्याची क्षमताही वाढली आहे. महागाईपेक्षा खर्च करण्याची क्षमता जास्त पटीने वाढल्याचं बब्बर यांनी नमूद केलं.

Effects on cashless mediclaim insurance

 Effects on cashless mediclaim insurance


देशातील सहा महानगरांत दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली मेडिक्लेममधील पीपीएन (प्रेफर्ड प्रोव्हायडर नेटवर्क) योजना आता लवकरच पुण्यातील हॉस्पिटल्समध्ये सुरू करण्यात येणार आहे. यामुळे येत्या काही दिवसांत विविध हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या ' कॅशलेस ' इन्शुरन्सच्या पद्धतीत बरेच बदल होणार आहेत.
चार सरकारी विमा कंपन्यांनी जुलै २०११पासून ही एकत्रितपणे ही योजना सुरू केली आहे. त्यानुसार या कंपन्यांकडून मेडिक्लेम पॉलिसी घेणाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या सोईसुविधांच्या दरांचे प्रमाणिकरण केले जाते. प्रत्येक हॉस्पिटलच्या प्रतिनिधींशी चर्चा करून या कंपन्या प्रत्येक उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाचे पॅकेज निश्चित करतात. याच दरामध्ये हॉस्पिटलनी उपचार करणे अपेक्षित असते.

' सध्या मेडिक्लेमच्या व्यवसायापैकी सत्तर टक्के व्यवसाय या चार कंपन्यांकडे आहे. साहजिकच या कंपन्यांचा शब्द अंतिम असतो. या पूर्वी सहा महानगरांमध्ये अशाच पद्धतीने काम सुरू करण्यात आले आहे. ही पद्धत मान्य न करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा बंद करण्यात येते. गेले दोन दिवस पुण्यातील विविध हॉस्पिटलबरोबर या कंपन्यांच्या वाटाघाटी सुरू आहेत ,' असे सूत्रांनी सांगितले.

या कंपन्यांनी दिलेले दर हे या पैकी अनेक हॉस्पिटल्सनी नाकारल्याचे सूत्रांनी नमूद केले. त्यांच्या माहितीनुसार , विमा कंपन्यांनी निश्चित केलेल्या दरातील पॅकेजमध्ये संबंधित शस्त्रक्रियेचा किंवा उपचाराचा खर्च भरून निघत नसल्याचे हॉस्पिटल्सचे म्हणणे आहे. विमा कंपन्यांनी निर्देशित केलेल्या किमतीत उपचार करायचे ठरविल्यास शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरना सध्या देण्यात येतो त्यापेक्षा खूपच कमी मोबदला द्यावा लागेल असे या हॉस्पिटल्सचे म्हणणे आहे. कंपन्यांच्या म्हणण्यानुसार या पद्धतीमुळे पेशंटचा फायदा होतो. योग्य दरात त्यांच्यावर उपचार होतात आणि आहे त्याच पॉलिसीमध्ये अधिक उपचार करून घेणे शक्य होते.

या साऱ्यांमुळे सध्या पुण्यातील हॉस्पिटल्समधील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. पेशंटच्या दृष्टीने कॅशलेस सुविधा बंद झाल्यास या हॉस्पिटल्समध्ये उपचार करून घेणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे विमा कंपन्या आणि हॉस्पिटलमध्ये कोणता करार होतो आणि त्याच्या अटी काय असणार याबाबत औत्सुक्य आहे.

सहा महानगरांमध्ये ' पीपीएन ' पद्धतीने काम सुरू करण्यात आले आहे. ही पद्धत मान्य न करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा बंद करण्यात येते. गेले दोन दिवस पुण्यातील विविध हॉस्पिटलबरोबर या कंपन्यांच्या वाटाघाटी सुरू आहेत.

Divya Deshmukh FIDE Master at 7 years



सात वर्षीय दिव्या फिडे मास्टर




DI.jpg 
वय वर्षे सात म्हणजे मनसोक्त खेळण्याचे , आनंदात बागडण्याचे वय . मात्र , नागपूरच्या दिव्या देशमुखला या वयात विविध विक्रमच स्वत : च्या नावावर नोंदवण्याची जणू सवय जडली आहे . वर्षभरापूर्वी सर्वात कमी वयाची राष्ट्रीय चॅम्पियन , आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सात वर्षांखालील गटाचे विजेतेपद आणि आता जगातील सर्वात कमी वयाच्या ' वुमन फिडे मास्टर ' चा बहुमान मिळवत दिव्याने आणखी एक विक्रम स्वत : च्या नावावर नोंदवला आहे .

वर्ल्ड चेस फेडरेशनने ( फिडे ) नुकतेच फिडे मास्टर्सचे रेटींग जाहीर केले . या रेटींगमध्ये गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये केलेल्या कामगिरीचा विचार करण्यात येतो . भवन्स विद्या मंदिर सिव्हिल लाइन्स शाळेची विद्यार्थिनी असलेल्या दिव्याने त्यानंतर एका पाठोपाठ एक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले .

इराणमधील मझारदनच्या सारी येथे काही महिन्यांपूर्वी आठ वर्षांखालील मुलींच्या एशियन युथ चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक पटकावत नेत्रदीपक कामगिरी केली होती . काही दिवसांपूर्वी रॅपिड प्रकारात उत्कृष्ट खेळ करत आंतरराष्ट्रीय पातळीवर दुसरे सुवर्णपदक पटकावले . कमी वयात वुमन फिडे मास्टरचा बहुमान पटकावणारी दिव्या ही जगातील पहिली खेळाडू ठरली आहे .

विशेष म्हणजे फिडे मास्टरचा बहुमान मिळवणारी दिव्या ही विदर्भातील पहिलीच महिला बुद्धिबळपटू ठरली आहे . व्हीएतनामची व्हीआँग क्वेन अॅन आणि अमिरेकेची नी मॅगी या दोन बुद्धिबळपटूंनी हा मान पटकावला आहे . मात्र , दिव्या त्यांच्यापेक्षा लहान आहे . डॉ . जितेंद्र आणि डॉ . नम्रता देशमुख यांची कन्या असलेली दिव्या आनंद चेस अकादमीमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक राहुल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेते .



Friday, July 26, 2013

Harper Collins FL title


ISBN13
name
AUTHOR1
currency
price
Order
PUBLISHER
BINDINGTYPE
CATEGORY
SUBJECT
9780007491650
BEST FIRST BOOK EVER
Scarry, Richard
INR
250

HARPER COLLINS INDIA
Paperback

CHILDREN BOOK
9789350293898
BIKRAM YOGA
Choudhury, Bikram
INR
599

HARPER COLLINS INDIA
Tradepaperback
Others
NON FICTION
9789350296899
TALES FROM A VENDING MACHINE
Salim Anees
INR
299

HARPER COLLINS INDIA
Paperback
Fiction
Modern Fiction
9789351160533
The F-Word
Kapur Mita
INR
299

HARPER COLLINS INDIA
Paperback
Non Fiction
COOKERY
9789350296554
ABANDON
Bandyopadhyay Sangeeta
INR
299

HARPERCOLLINS PERENNIAL
Paperback
Others
FICTION
9789350297018
NO CHILDS PLAY
Mukopadhyay Shrishendu
INR
250

HARPERCOLLINS PERENNIAL
Paperback
Others
FICTION
9789350296417
THE NEW BIHAR
Edited by Singh  N.K and Stern Nicholas
INR
799

HARPER COLLINS INDIA
Hardback
Others
CURRENT AFFAIRS
9789351160519
WELCOME TO YOUR NEW LIFE
Goldsworthy Anna
INR
350

HARPER COLLINS INDIA
Paperback
Non Fiction
MEMOIR
9789350291887
An Incurable Romantic
Devnath Lakshmi
INR
599

HARPER COLLINS INDIA
Paperback
Biography
MUSIC
9789351160175
Vibhinnata
MALHOTRA RAJIV
INR
299

HARPER COLLINS INDIA
Paperback
Non Fiction
Philosophy,Religion & Beliefs
9780007276219
THE DAYLIGHT WAR
BRETT PETER V
INR
599

HARPER COLLINS INDIA
Paperback



Thursday, July 25, 2013

PENGUIN NEW TITLE

ISBN13
name
AUTHOR1
currency
price
order
PUBLISHER
BINDINGTYPE
SUBJECT
9780874778335
THE MEDITATIVE MIND
Goleman, Daniel
INR
399

TARCHER PENGUIN
Paperback
MEDITATION
9780452286566
THE VILLAGE BRIDE OF BEVERLY HILLS
Daswani Kavita
INR
499

PENGUIN USA
Paperback
FICTION LITERARY
9781848872813
BARACK OBAMA: THE MAKING OF THE MAN
David Maraniss
INR
599

Atlantic Books
Paperback
BIOGRAPHY
9781908800336
First Daughter
LUSTBADER ERIC VAN
INR
499

Head of Zeus
Paperback
THRILLER
9781848872028
GREEN PHILOSOPHY
Scruton, Roger
INR
699

ATLANTIC BOOK
Paperback
PHILOSOPHY
9781848451193
Before I Wake : Soul Screamers Book 6
VINCENT RACHEL
INR
299

MIRA BOOKS
Paperback
FANTASY
9781409328742
ULTIMATE HARLEY-DAVIDSON
Wilson Hugo
INR
1199

PENGUIN DK
Hardback
Motor Cars: General Interest
9781401942960
SOLOMON SPEAKS ON RECONNECTING YOUR LIFE
Eric Pearl
INR
1250

HAY HOUSE
Hardback

9781401939786
FENG SHUI SIMPLY CHANGE YOUR LIFE FROM THE INSIDE OUT
Cheryl Grace
INR
799

HAY HOUSE
Paperback
FENG SHUI
9781401942663
Positive Vibes
Gordon Smith
INR
799

HAY HOUSE
Paperback
Mind, Body, Spirit
 

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive