Saturday, July 27, 2013

Divya Deshmukh FIDE Master at 7 years



सात वर्षीय दिव्या फिडे मास्टर




DI.jpg 
वय वर्षे सात म्हणजे मनसोक्त खेळण्याचे , आनंदात बागडण्याचे वय . मात्र , नागपूरच्या दिव्या देशमुखला या वयात विविध विक्रमच स्वत : च्या नावावर नोंदवण्याची जणू सवय जडली आहे . वर्षभरापूर्वी सर्वात कमी वयाची राष्ट्रीय चॅम्पियन , आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सात वर्षांखालील गटाचे विजेतेपद आणि आता जगातील सर्वात कमी वयाच्या ' वुमन फिडे मास्टर ' चा बहुमान मिळवत दिव्याने आणखी एक विक्रम स्वत : च्या नावावर नोंदवला आहे .

वर्ल्ड चेस फेडरेशनने ( फिडे ) नुकतेच फिडे मास्टर्सचे रेटींग जाहीर केले . या रेटींगमध्ये गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये केलेल्या कामगिरीचा विचार करण्यात येतो . भवन्स विद्या मंदिर सिव्हिल लाइन्स शाळेची विद्यार्थिनी असलेल्या दिव्याने त्यानंतर एका पाठोपाठ एक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले .

इराणमधील मझारदनच्या सारी येथे काही महिन्यांपूर्वी आठ वर्षांखालील मुलींच्या एशियन युथ चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक पटकावत नेत्रदीपक कामगिरी केली होती . काही दिवसांपूर्वी रॅपिड प्रकारात उत्कृष्ट खेळ करत आंतरराष्ट्रीय पातळीवर दुसरे सुवर्णपदक पटकावले . कमी वयात वुमन फिडे मास्टरचा बहुमान पटकावणारी दिव्या ही जगातील पहिली खेळाडू ठरली आहे .

विशेष म्हणजे फिडे मास्टरचा बहुमान मिळवणारी दिव्या ही विदर्भातील पहिलीच महिला बुद्धिबळपटू ठरली आहे . व्हीएतनामची व्हीआँग क्वेन अॅन आणि अमिरेकेची नी मॅगी या दोन बुद्धिबळपटूंनी हा मान पटकावला आहे . मात्र , दिव्या त्यांच्यापेक्षा लहान आहे . डॉ . जितेंद्र आणि डॉ . नम्रता देशमुख यांची कन्या असलेली दिव्या आनंद चेस अकादमीमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक राहुल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेते .



No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive