Thursday, September 23, 2010

चित्तवृत्ति.

चित्तवृत्ति.

"माझ्या मैत्रीणीची मी तुम्हाला ओळख करून देते.ही शुभदा.शुभदा नवरे."
राधिका दम खात म्हणाली.
"आणि ह्यांची मी तुला येता येता ओळख सांगीतली आहे."
असं माझ्याकडे बघून शुभदाला सांगू लागली.

त्याचं असं झालं,
आज प्रो.देसाई भेटतील म्हणून तळ्यावर वाट पहात बसलो होतो.भाऊसाहेबांबरोबर काहीतरी नवीन विषय काढून चर्चा करावी अशी माझ्या मनात इच्छा आली होती.बर्याच वेळा नंतर लांबून राधिका-भाऊसाहेबांची मोठी मुलगी-आणि तिच्याबरोबर एक मुलगी,बहुतेक तिची मैत्रीण असावी,लगबगीने माझ्या दिशेने येताना मी पाहिलं.
ठीक आहे.प्रोफेसर नाहीत तर नाहीत, निदान त्यांच्या मुलीशी गप्पा मारण्यात वेळ जाईल अशी मी समजूत करून घेऊन त्यांची जवळ येण्याची वाट पहात होतो.त्यां जवळ आल्यावर मी राधिकेला म्हणालो,

"मला समजलं.तुम्ही दोघं येता असं पाहून,भाऊसाहेबांची आज बुट्टी आहे हे कळायला मला जास्त वेळ लागला नाही. पण ते राहूदे तुम्ही दोघं हातवारे करून कोणत्या विषयावर बोलत होता.मला सांगायला हरकत नसेल, तर मला ऐकायला आवडेल."

"मी शुभदाला म्हणाले,मला नेहमीच वाटतं की चित्त-वृत्ति सदाची परिवर्तनशील असते.आणि निमीषात बदलता येते.एक मात्र खरं की समयातला एखादा क्षण पुसून टाकता येत नाही किंवा बदलून टाकता येत नाही.मात्र पाठ वळवून त्याकडे पहाता येतं.
आम्ही चित्तवृत्तिबद्दल-इंग्रजीत ज्याला mood म्हणातात- त्याबद्दल बोलत होतो.
राधिका मला सांगू लागली.
"आणि हे सागण्याचं कारण असं की"

शुभदाच मला म्हणाली,
"
मला नेहमीच वाटतं की सूर्याच्या उन्हातून सूख आणि आनंद मिळतो असं जे म्हणतात,ते रीमझीम पावसात कधीच न्हाहालेले नसावेत.ढगाळ वातवरण काही नेहमीच उदासिनता आणीत नसतं.तसंच उन्हामुळे वातावरण सदैव उल्हासित असतं असंही नाही.बर्याच लोकाना पावसाळी वातावरण, उदास आणि निराशजनक वाटत असेल, पण कुणी थांबून त्यामधला आनंद घेतला तर,उदासिनते पेक्षा काळ्या ठीक्कर ढगाच्या तळात आणखी काही
छ्पलेलं असतं हे त्यांना दिसेल.आणि हे सर्व प्रत्येकाच्या चित्तवृत्तीवर अवलंबून असतं."
मला ह्या दोघींची भावावस्थाबद्दलची चर्चा ऐकून मजा वाटली.
माझ्या मनात आलं ते मी सांगावं असं मला वाटलं.
"
मी सांगू का?"

असा प्रश्न करून त्या दोघी होय म्हणाल्यावर मी म्हटलं,
"
त्यासाठी एखाद्याला नृत्यविशारद होऊन अंगात चपलता आणून पावसात नाचून त्या पावसाच्या अस्तित्वाचा आनंद उपभोगण्याची जरूरी भासत नसते.निसर्गाच्या निखाल़स आनंदातला ह्या लवलेशाचा रस घेण्यासाठी,योग्य वेळ साधून आणि जरी आकाश ढागाळ असलं तरी एखाद्याने प्रयत्न केल्यास,त्याच्या अंतरात त्याल रोशनी स्थापीत करता येते असं मला वाटतं."
"
तुमचं म्हणणं मला पटतं."
असं शुभदा मला म्हणाली.

"छ्परावर टप,टप,टप आवाज करणारे पावसाचे थेंब,जमीनीचा ताजा सुगंध,आणि आपल्या अंगावर पडणारीक हलकीशी पावसाची रीपरीप हे सर्व काही आपल्या आवडीचा एक लवलेश आहे असं समजावं, असं मला नेहमी वाटतं."
असं आपलं मत तिने दिलं.

राधिकाने आपला मुद्दा सांगताना म्हणाली,
"
मुडवगैरेवर माझा विश्वास नाही.
मी रोजच माझ्या मनात आठवणी जपून ठेवते. आणि माझ्या जीवनाचा ह्या आठवणी एक भाग म्हणून माझ्याजवळ चिरकाल असतात. काही दिवस, आणखी चांगले गेले असते, असं मनात आलं तरी मी जशी आज आहे तशी व्हायला रोजचा दिवस माझ्यात वाढ करीत असतो, असं मी समजत असते.

एखाद्या दिवशी सुरवात जरी चांगली झाली नाही,तरी तो दिवस वाढत असताना हळू हळू चांगला होत जातो आणि माझ्या जीवनात येणार्या लोकांकडे पाहून आणि होणार्या  गोष्टींचा स्वीकार करून जीवन जगावं असं वाटतं.त्यामुळे माझी चित्तवृत्ति कधी ही विचलीत होत नाही."
"
आयुष्यात असं चालायचंच.
"
चित्तवृत्ति ठीक असेल तरच मला काम करायला मजा येते, नाहीतर मला कामात स्वारस्य नाही."
असं म्हणणार्यापैकी मी नाही. असं माझा अनुभव सांगतो."

असं म्हणून चर्चेला जरा जोर यावा म्हणून मी पुढे त्या दोघीनांही सांगून टाकलं.
"
मी, प्रेम आणि दुःख, निरर्थकता आणि विकलता अनुभवली आहे.शिवाय परिश्रमाचा काळ उपभोगत असताना, माझ्या हितचिंतकानी मला सावरलं आहे.जीवन धोक्यात टाकण्या योग्य नाही.पण जर का तुमच्या मदतीला कुणी असेल,आणि घेतलेले धोके घेण्यालायक नव्हते असं असताना ते लोक जरका तुमच्या बाजूला असतील तर ठीक आहे.मात्र चित्तवृत्ति संभाळत राहिल्यास हे होणे शक्य नाही."

"मला वाटत असतं की मी कोण आहे आणि मला काय आवडतं ह्याने फरक पडत नाही.पण मी कुठे आहे ह्याने फरक पडतो.काही लोक संगीतकार होण्यासाठी परिश्रम घेतात कारण त्यांना संगीत आवडतं.काहींना कलेचा उत्कट शौक असतो,कारण त्यांना नृत्य करायला आवडतं.काहीना डॉक्टर, वकील,पहेलवान,शिक्षक किंवा त्यांच्या आवडीप्रमाणे जसे ते प्रेरीत होतात तसं काहीतरी व्हावसं त्याना वाटतं.पण असं मनासारखं झालं नाही म्हणून प्राप्त परिस्थितीत आपली भावावस्था संभाळून जगाचा व्यवहार करीत राहिलं पाहिजे."
शुभदाने आपला विचार सांगीतला.

मी म्हणालो,
"
प्रत्येकाच्या जीवनात काहीना काहीतरी संभाळून ठेवलं जात असतं.एखाद्याचं व्यक्तीत्व कसं असायला हवं हे सुद्धा त्याच्या जीवनात संभाळून ठेवलं जात असावं.
माझं कुठल्याही गोष्टीवर प्रेम असलं तरी,जोपर्यंत आजुबाजूला असे लोक असतात की जे माझ्या प्रेमात भागीदार होतात,किंवा त्या गोष्टीवरचं माझं उत्कट प्रेम पाहून ते स्वीकार करतात, तोपर्यंत त्या विशिष्ट गोष्टीपासून मला सूख मिळणं कठीण जातं.
मला नेहमीच वाटतं की,आपल्या अंगात आलेल्या जोषाचे इतर भागीदार असायला हवेत आणि त्यांनीही त्यात आनंद घ्यायला हवा,त्या जोषाने इतर प्रेरित व्ह्यायला हवेत,तो जोष असा निरखला जायला हवा की त्यामुळे हजारोंची अंतरं हलली पाहिजेत."
"
मी तुम्हाला थोडक्यात सारांशात सांगते"
राधिका म्हणाली,
"
कारणास्तवच मी माझ्या हृदयाला अनुसरून वागते.आणि त्या काराणामूळे,ज्याला खरा आनंद म्हणतात, तो मला मिळतो."

"पण चित्तवृत्तिबद्दल तुम्हाला अशी चर्चाच का करावी लागली?"
असा सरळ सरळ प्रश्न मी केला.
माझं हा प्रश्न पाहून दोघींही हंसल्या.
"मी स्पष्टीकरण केलं तर तुझी हरकत नाही ना?"
असं शुभदाला राधिकेने विचारलं.तिने मानेने रुकार दिल्यावर,
"मी सांगते"
असं म्हणून राधिका सांगू लागली.
"अलीकडे माझा नवरा,मुड घालवून बसलेला असतो.काही काम सांगीतलं तर,
"माझं मुड नाही"
असं म्हणून कामाची टाळाटाळ करतो.संसार करायचा झाल्यास एकट्यावर काम टाकून दुसर्याने आपल्या चित्तवृत्तिचे चोचले करून कसं चालेल?"
असं शुभदा आपल्या नवर्याच्या अलीकडच्या वागुणीकीची तक्रार वजा मनातली खंत माझ्याकडे बोलून दाखवीत होती.
मीच म्हणाले आपण हे सर्व काकांकडे बोलून बघूया.चार शब्द आपल्या अनुभवाचे ते सांगतील.म्हणून आम्ही, माझे बाबा तळ्यावर येणार नाहीत, ह्याची संधी साधून तुम्हाला भेटायला आलो.नाहीतर घरीच बसून चर्चा करीत राहिलो असतो.इकडे तर सध्याच्या सूंदर हवेत चालणं होईल आणि चर्चाही होईल.असा आमचा विचार झाला.

"ह्या चर्चेत प्रो.देसाई हवे होते."
असं मी म्हणालो.
दोघीनीही चेहरा गंभीर केला आणि म्हणाल्या,
"चला काळोख झाला आपण निघूया"

श्रीकृष्ण् सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive