Wednesday, September 29, 2010

Love @ First Sight म्हणतात अस काही.

Love @ First Sight म्हणतात अस काही.


नवजीवन सोसायटी मध्ये ४ थ्या माळ्यावर असलेल्या माझ्या घराच्या अगदी समोर तो राहायचा....प्रणय नाव त्याच ...५ वर्षांनी मोठा होता तो ज्या दिवसापासून राहायला आला त्यादिवसापासूनच मला तो आवडायला लागला ......Love @ First Sight म्हणतात अस काही. आणि त्यात भर म्हणजे त्याच आकर्षक व्यक्तिमत्व कोणाच्याही डोळ्यात भरेल अस होत.......नवीन व्यक्तिन्शी  बोलतानाही जुने मित्र असल्यासारखाच बोलायचं त्यामुळे कुणीही त्याच्याशी पटकन मैत्री करायचे.....त्यामुळेच प्रणय माझ्या मनात भरला पण त्याला सांगण्याची हिम्मत झाली नाही.येता जाता त्याच्याकडे नुसती चोरट्या नजरेने बघत रहायची.त्याच्या नजरेतून हि गोष्ट सुटली नाही.मग तोही माझ्याकडे बघायला लागला.दोघेही एकमेकांच्या प्रेमात अगदी नकळत पडलो.नवरात्र मध्ये गरबा खेळायला गेले तेव्हा तर तो फक्त माझ्याशीच खेळत होता मला थोड विचित्र वाटल पण मनात वेदनेची एक सुखद लहर उमटत होती.त्याचा सहवास हवाहवासा वाटत होता.हा गरबा कधी संपूच नये अस वाटत होत.



त्या दिवशी रात्री मैत्रिणीबरोबर घरी आले तोही आमच्या पाठोपाठ येत होता. नवीन असल्यामुळे आम्ही कोणी त्याच्याशी जास्त बोलत नव्हतो.मैत्रीण दुसर्या विंग मध्ये रहायची. त्यामुळे ती निघून गेली.मी आमच्या विंगच्या खाली आले. लिफ्ट च button प्रेस केल.हळूच त्याची पावलं माझ्या मागे आल्याचा भास  झाला.हृदयाचे ठोके वाढले होते हातातल्या काठ्यांशी चाळा करत मी उभे होते. लिफ्ट आली दार उघडल. घाबरत हळूच पाय आत ठेवला.तोही आत आला.येताना तो माझ्याकडेच बघतोय हे समोरच्या आरश्याने दाखवून दिल.त्याने ४ थ्या माळ्याच बटन प्रेस केल आणि पंखा चालू केला.दरदरून घाम फुटलेल्या माझ्या चेहऱ्याला थंडावा वाटला.लिफ्ट ने पहिला मजला क्रॉस केला तेव्हा अचानक त्याने स्टॉपच बटन दाबल. मला काही कळलच नाही पंख्याच्या आवाजाशिवाय दुसरा कोणताच आवाज माझ्या कानी पडत नव्हता. माझ्या कपाळावर सूक्ष्म आठ्या पडल्या तो मात्र  स्मित हास्य करत माझ्यासमोर आला. माझ्यासमोर एका गुढग्यावर बसला आणि खिशातली कैडबरी काढत म्हणाला Will u marry me...?? मला तर काहीसुचतच नव्हते इतक्या रात्री लिफ्ट मध्ये आम्ही दोघच आणि लिफ्ट थांबलेली.पहिल्यांदा त्याच्याशी बोलले अरे कोणी बघेल ना? परत त्याचा तोच प्रश्न Will u marry me ...??? मलाही ते खूप आवडल चटकन मी त्याच्या हातातली कैडबरी घेतली तेव्हा त्याच्या हातांचा झालेला स्पर्श अंगावर शहरे  उमटवून गेला तो हसला आणि उभा राहिला लिफ्ट चालू केली. ४ था माळा येईपर्यंत माझी नजर झुकलेली आणि त्याची नजर माझ्यावर स्थिरावली होती.मी घरात आले आईने जेवायला वाढले पण माझी भूक तर त्याच्या प्रोपोसनेच शमली होती.अगदी जग जिंकल्यासारख वाटत होत.जे हव ते मिळाल्याचा आनंद काय असतो आज त्याची प्रचीती आली. त्या रात्री खूप उशिरापर्यंत झोपच नाही आली. इतक्या दिवसापासून चाललेल्या चोरट्या नजरेचा खेळ अस काही करू शकेल याची कल्पना नव्हती. पहाटे अचानक केव्हातरी डोळा लागला कळलच नाही. सकाळी उठले तेव्हा हम आपके है कौन मधील  गाणं आठवलं.

 Chocolate lime juice
ice cream toffiya
कल जैसे अब मेरे शौक है कहा
गुडिया खिलौनी मेरी सहेलिया
अब मुझे लगती ही सारी पहेलिया
ये कौनसा मोड ही उम्र का..???


 खूप उत्साहात सर्व काम आटपत होते. आईच्या नजरेतून हि गोष्ट सुटली नाही तिने विचारलं काय झाल आज एवढ्या उत्साहाने काम करतेस? मी म्हटलं काम कराव तरी बोलणार आणि काम नाही केल तरी बोलणार मग ती गप्प बसली. माझ मलाच हसू आल. खरच बालपण केव्हा सरत आणि आपण तारुण्यात केव्हा पदार्पण करतो हे कळतंच नाही. कालपर्यंत आई वडिलांची सोनू आता अचानक त्याची प्रेयसी झाली होती. त्या दिवशी गरबा खेळायला जाताना खूप उत्साह होता.तोही आला होता पण आज त्याच्याशी खेळताना खूप भीती पण वाटत होती मैत्रिणीला कळेल,त्याचे मित्र चिडवतील असे अनेक  विचार मनात येत होते.एखाद्याशी मैत्री असली कि काही वाटत नाही पण तेच जर एखाद्याच्या प्रेमात पडलो तर इतरांसमोर त्याच्याशी बोलायला अवघडल्या सारख  वाटत .पण त्याच खेळण इतक छान होत कि मी स्वतःला थांबवू शकले नाही.परत रात्री लिफ्ट मध्ये दोघेजण. मला म्हणाला खूप छान खेळतेस गरबा. मी म्हणाले माझ्यापेक्षा तुझ खेळण मला खूप आवडल. एका मैत्रिणीला त्याच्याबद्दल सांगितले, ती कवयित्री होती मग काय बाईसाहेब सुरुच झाल्या माझ्यावर कविता करायला. खूप छान कविता केल्या तिने. त्यानेहि मला एक चारोळी पाठविली होती ती खूप आवडली मला,


तुझ्या मनातल्या रंगांना,बघून इंद्रधनुष्यही लाजेल,
त्या लाजण्याची एक,अप्रतिम छटा क्षितिजावर साजेल. 


Dear सोनू,

मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला तुझ्यापासुन काही लपवून ठेवायचं नाही त्यामुळेच मी हे letter तुला देत आहे.तुझ्या पूर्वी माझ्या आयुष्यात एक मुलगी आली होती स्वाती नाव होत तीच मी तिच्यावर खूप प्रेम करायचो अगदी जीवापाड पण एक दिवस अचानक मला कळलं कि ती माझ्यासोबत फक्त time pass करते. माझ्यासारखाच ती इतर दोन मुलांबरोबर फिरताना माझ्या मित्रांनी तिला पाहिलं होत. मी तिला जाब विचारला तर रडायचं नाटक करून माझ्याशी असलेले संबंध तिने तोडून टाकले.पण मी मात्र खूप hurt झालो.त्यांनतर ठरवलं कि प्रेमा बिमात नाही पडायचं पण मला तुझा स्वभाव खूप आवडला खर सांगतो आपण कधी बोलायचो नाही पण तुझ वागण बोलन या सर्व गोष्टी मी न्ह्याहाळायचो.तू माझ्याकडे चोरून बघायची हि गोष्ट पण माझ्या माझ्या लक्षात यायला वेळ लागला नाही. सोसायटीतल्या मित्राने पण तुझ्याविषयी सांगितलं गरबा खेळताना पण नजर तुझ्यावरच खिळलेली असायची...................
 


पत्र वाचून झाल्यावर मला त्याच्या x-girl friend विषयी मनात द्वेष निर्माण झाला पण ठरवलं त्याला या विषयी काही विचारून दुखवायचं नाही.पण त्याचा स्पष्टवक्तेपणा माझ्या मनात त्याच्याविषयी असलेल्या प्रेमात आणखी भर घालून गेला. दिवस खूप छान चालले होते. क्लासवरून येताना कधी कधी त्याला भेटायचे. मग हॉटेलात जाऊन गप्पा व्हायच्या मला बाहेर त्याच्यासोबत फिरायला खूप भीती वाटायची म्हणून नेहमी होटेलिंगच व्हायचं. एकदा त्याच्याबरोबर बाइक वरून खारघरला सिनेमा बघायला गेले होते. वाटत होत बाइकवर त्याच्या मागे घटट  मिठी मारून बसाव. पण माझ्या तत्वामध्ये ते बसत नव्हत. म्हणून मग फक्त खांद्यावरच हात ठेवला. या दोन महिन्याच्या भेटीगाठीत त्याने एकदाही मला स्पर्श केला नाही किंवा तसा प्रयत्नही केला नाही त्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजायचे. त्याच्याविषयी मनात आदर वाढत होता. तो फक्त माझाच राहावा असे वाटत होते.
 

25 अप्रील् माझा बर्थ डे  होता त्याने मला त्याच्याबरोबर मंदिरात चालण्याची विनंती केली. मंदिरात जाऊन अभिषेक करून आम्ही सर्विस रोडने चालत येत होतो. बाइक सर्विसिंगला असल्याने त्याने आणली नव्हती. सर्विस रोडला असलेल्या कठड्यावर बरेच कपल्स बसलेले असतात. तिथे आम्हीही बसलो. त्याने पेस्ट्रिस आणली होती तो खाऊन छोटासा बर्थडे सेलेब्रेट केला जो माझ्यासाठी आजपर्यंतचा सर्वात आनंदीमय होता. बाजूला काही कपल्स बसले होते त्यांचे अश्लील चाळे बघून दोघानाही ऑक्वर्ड फिल होत होत. त्याने मला विचारलं तुझ वय काय? मी काहीच बोलले नाही. मग तोच अंदाजाने म्हणाला १८ असेल नक्कीच!!  मी फक्त मान हलवली. मग त्याने एक वेगळीच इच्छा प्रकट केली मला म्हणाला, मला तुला १८ वेळा किस करायचं आहे as ur bday gift म्हणून. पहिले मी शॉक झाले पण मग त्याच हसणं पाहून वाटलं मस्करी करत असेल. मी नाही म्हटलं. त्याने माझा  हात  हातात घेतला एक छानस छोटस बाहूल माझ्या हातात ठेवत म्हणाला, हे तुझ गिफ्ट माझ्या प्रेमाची आठवण, कधी माझी आठवण आली कि याच्याकडे बघत जा. मला ते गिफ्ट खूप आवडल नेमक त्याच दिवशी बाबांना प्रमोशन  मिळालं त्यामुळे तेही मंदिरात जाऊन येत होते संध्याकाळची वेळ होती अचानक बाबांची बाइक समोर येऊन थांबली आईशपथ ...!!! एवढेच शब्द  माझ्या तोंडून बाहेर पडले. बाबांनी नजरेनेच मला मागे बसण्याची खूण केली. त्याचा चेहरा तर पांढरा  पडला होता. मी गुपचूप जाऊन बाबांच्या मागे बसली. त्या दिवशी बाबांनी एवढ मारलं कि मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही माझ्या बर्थडेच सर्वात मोठ गिफ्ट मला मिळालं होत.
रात्री रडत असताना बाबा बेडरूममध्ये आले, सोबत आई पण होती. डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, सोनू मला माफ कर पण मी जे काही केल ते तुझ्याच भल्यासाठी केलं बाळा. आजकाल प्रेम म्हणजे बाजार होऊन बसलाय कोणीही उठल सुटल म्हणत माझ हिच्यावर किंवा याच्यावर प्रेम आहे पण ते प्रेम नसत, असत तर फक्त आकर्षण!! तुम्ही मुल लहान आहात त्यामुळे तुम्हाला ते कळत नाही पण आम्ही यातून गेलो आहोत. त्यामुळेच आम्हाला तुमची काळजी वाटते. मी नुसतीच हुंदके देत उशीत तोंड खुपसून ऐकत होते अचानक बाबा रडायला लागले म्हणाले, सोनू आमचं दोघांचही खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि म्हणून आम्हाला वाटत कि तू काही वेडवाकड पाउल टाकू नये. आजपर्यंत आम्ही तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली ती तुझ्यावरच्या प्रेमाखातरच बाबांनी पहिल्यांदा रडताना बघून मी उठले आणि सरळ बाबांच्या कुशीत गेले आम्ही तिघेही खूप रडलो. बाबांनी डोक्यावर ओठ ठेवले आणि म्हणाले  चल फ्रेश हो केक कापायचा ना ..? त्या दिवशी कळल आईवडिलांच्या रागातही  प्रेमच असत. पप्पानी ड्रेस पीस आणला होता माझ्यासाठी.  मग रात्री केक कापला आणि झोपायला गेले. बाहेर गार वारा सुटला होता चंद्राचा प्रकाश खोलीभर विखुरला होता. एका बाजूला तो होता आणि एका बाजूला आईवडील. काही सुचत नव्हत काय कराव ते. मग ठरवलं त्याला भेटायचं नाही. पण २ दिवसातच त्याची खूप आठवण यायला लागली  इतकी की.... मी वेडी होऊन जाईल अस वाटायचं. घरात कोणी नसताना त्याला कॉल केला. त्याला त्या दिवशी घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि म्हटलं कि मला विसरून जा, मी माझ्या बंधनातून तुला मुक्त करते आणि त्याच काहीही ऐकून न घेता मी फोन ठेवला.




त्यानंतर त्याने माझ्या मैत्रिणीकडून माझ्याशी कॉंटॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न  केला. एकदा लिफ्ट मध्ये लेटर देण्याचा प्रयत्न केला पण मी नाही घेतलं. एक दिवस अचानक कळलं कि तो कोलकाताला गेला. मला खूप वाईट वाटलं आपल माणूस खूप दूर गेल्यासारखं वाटू लागलं. मी त्याला जितक दूर सारण्याचा प्रयत्न करत होते  तितकाच तो माझ्या जवळ येत होता. एक वर्ष पूर्ण मी त्याने दिलेल्या बाहुल्याकडे बघून काढलं .

नुकतीच बारावीची एक्साम झाली होती मी टेलिमार्केटिंग मध्ये जोब धरला. काही दिवसांनी त्याला कॉल केला तब्बल एक वर्षाने मी त्याच्याशी बोलत होते. खूप वेळ बोलले त्याच्याशी, त्याला खूप विनवण्या केल्या कि तू परत ये. त्याला सॉरी वगेरे म्हणाले खूप रडले त्याच्यासाठी. कारण अजून मी त्याला एक क्षणही विसरले नव्हते .तो कुठल्यातरी कोर्स साठी गेला होता. कोर्स संपताच परत आला. अचानक येऊन त्याने मला सर्प्राइज़ दिल. त्याला बघण्यासाठी भेटण्यासाठी जीव आसुसला होता. काही माणसांची किंमत ते जवळ असताना कधीच कळत नाही, पण दूर गेल्यानंतर कळत कि ते आपल्यासाठी काय आहेत ते. किती महत्व आहे आपल्या आयुष्यात त्याचं ते तेव्हाच कळत. त्याला भेटायला त्याच्या एका मित्राच्या रूमवर गेले. रड रड रडले त्याची माफी मागितली आणि नकळत त्याच्या कुशीत विसावले. त्याने खूप समजावले तेव्हा कुठे मी शांत झाले. माझ्या डोळ्यांतले अश्रू पुसत त्याने माझा चेहरा ओंजळीत धरला आणि त्याचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले. माझी प्रतिकार करण्याची हिम्मतच झाली नाही.वाटत होत हि मिठी कधी सुटूच नये. घरी आले आरश्यात स्वताला न्याहाळल. मला माझ्या नजरेला नजर भिडवण्याची लाज वाटत होती. माझी मूल्यतत्व मीच संपवली होती,





त्यानंतर फोनवर बर्याचदा बोलायचो, भेटताना खूप सावधता बाळगायचो. पण आता प्रणय खूप बदलला होता त्याच्या बोलण्यात अश्लीलता खूप होती. पण मी काही बोलायचे नाही काय करणार प्रेमात वेडी झाले होते ना त्याच्या . नेहमी भेटल्यावर हातात हात घेण, चालताना बोटांची गुंफण करण, ऑटोमध्ये बसल्यावर माझ्याकडे एकटक बघणं हे चालू असायचं. या गोष्टीना मी कंटाळले  होते मला ते पटायचं नाही एकदा मी त्याला स्पष्ट बोलले; "किस करणे, स्पर्श करणे हेच प्रेम असत का?  तस असेल तर मला नाही जमणार !!!." त्यालाही राग आला तोही निघून गेला.

त्याच्या बर्थडेला मी त्याला कॉल लावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने रिसीव नाही केला. सहा तास सतत मी कॉल करत होते शेवटी त्याने उचलला मी त्याला विश केलं आणि म्हटलं 'ट्विन्स' मध्ये भेटूया तो नाही म्हणाला, मी खूप विनवण्या केल्या आणि शेवटी म्हटलं कि मी तुझी तिथे वाट  बघते जरूर ये. मी त्याची तब्बल दीड तास वाट  बघितली पण तो नाही आला. तो विसरला होता मला....कायमचा. त्या नंतर  त्याला एक दोनदा कॉल केला होता त्याने माझ्याकडे सरळ सरळ शरीरसुखाची मागणी केली होती हे ऐकून तर मी अवाकच झाले. त्याची माझ्या मनात असलेली प्रतिमा एका क्षणात ढासळली. तोही नावाप्रमाणेच निघाला .त्यानंतर मी त्याला परत कधीच कॉल केला नाही.सोसायटीत दिसला तरी मान खाली घालून निघून जायचे .काही दिवसांनी मला एक वेगळीच बातमी कळली त्याच्याविषयी. तो ज्या ठिकाणी वाशीला राहायचा तिथे माझ्या एका मैत्रिणीचे नातेवाईक राहायचे तिच्याकडून जी काही बातमी कळली तिने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली.

तिथल्या एका मुलीवर त्याचे प्रेम होते २२ वर्षाची होती ती. तिला याच्याकडून गर्भधारणा झाली होती.प्रकरण घरच्यांना कळलं पण याच्या वडिलांचे आणि त्यांचे चांगले संबंध होते आणि समोरची माणसे चांगली होती. याच्या वडिलांचा विचार करून त्यांनी ते प्रकरण संपवलं. याच्या वडिलांची समाजात चांगली ओळख होती. एकदम सज्जन गृहस्थ होते. म्हणून प्रकरण निपटल. त्यामुळे त्यांनी ती जागा सोडून इकडे शिफ्ट झाले होते .

........म्हणजे याने जे सांगितलं ते सर्व खोट होत. गरब्याच्या खेळाप्रमाणे माझ्या मनाशीही खेळला होता. बरोबर म्हटलं होत मी..... खूप छान खेळतोस गरबा तू!!...खरच...... खूप छान खेळतोस. त्या दिवशी अजिबात रडले नाही कारण खूप मोठ्या संकटातून वाचले होते याचा आनंद वाटत होता त्याच्यासोबत घालवलेल्या "त्या " क्षणांची किळस वाटू लागली होती.त्याच्याकडे तर आता बघायची पण इच्छा नव्हती . आता मी गरबा खेळण बंद केल होतं. पण एक दिवस देवीला पाया पडायला गेले त्या दिवशी तो दिसला एका दुसर्या मुलीसोबत खेळताना ...काळजी वाटली मला ...त्याची नाही... तर त्या मुलीची.

मध्ये खूप आजारी पडले होते सतत ताप यायचा ....काविळच  निदान झाल. खूप काही करून बघितलं पण फरक पडत नव्हता. औषध,गोळ्या,मांत्रिक,तांत्रीक काही फायदा नाही झाला . कारण मी आतून पोखरले होते, औषधांना माझ शरीरच प्रतिसादच देत नव्हत. कावीळ पोटात झाली होती. दिवसेंदिवस प्रकृती खंगत चालली होती आई-बाबा खूप काळजी घ्यायचे. पण माझ मन अजूनही त्याच्या आठवणीत हुंदळत होत.....का अस केलस रे तू? का असं फसवलस? किती मनापासून प्रेम केल मी तुझ्यावर आणि तू ......एकच इच्छा आहे शेवटची कि परत अस कुणाला फसवु नकोस ..बस !!!! खूप प्रेम केल रे तुझ्यावर आणि करत राहीन मरेपर्यंत ...
तो तिच्या शेजारी उभा होता. त्याल वेड्याला माहीतच नव्हत कि त्याच्याच आठवणीत ती गेली. तिची आई गप्प झाली होती, बाबांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. प्रणयच्या वडिलांनी अम्बुलेंस  मागवली होती तिच्यासाठी नव्हे ..! तर  तिच्या आईसाठी. कारण सोनू गेली होती, खूप दूर गेली होती. कायमची जिथून ती कधीच परत येणार नव्हती आणि त्याच शॉकने तिची आई गप्प झाली होती. तिच्या डाव्या हातात त्याने दिलेला बाहुला होता तो त्याच्या नजरेतून सुटला नाही.  त्याला पाहताच तोसुद्धा ढासळला.




वेदना हि फुलांच्या काट्यानसारखी असते
एक नाजुकशी कळ मनात उमटते
प्रणयाच्या वेळी जशी प्रेयसी
हात सोडून निसटते....

जाणकार वाचकांनी नोंद घ्यावी की ही कथा माझी नसून ती येथे लेखकाच्या परवानगीने पोस्ट करत आहे.
ह्या कथेचे सर्व श्रेय कथेच्या मुळ लेखकाला.  कथेचे मूळ लेखक सचिन हळदणकर.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive