१. एक क्षणच फिरवून जातो
आठवणी वरून हळुवार हात
"पहाटेच्या" तुटणा-या स्वप्नातूनच
होते सकाळची नवी सुरुवात
२. पहाट होताच डोळ्यांवर,
सूर्य प्रकाश आला,
"स्पर्श" होताच त्याचा,
मला तुझा भास झाला.
३. मनाची चल बिचल वाढवून
गेला तिचा स्पर्श
"आठवणीत" आहे अजूनही
मला तिचा हर्ष
४. खूप काही बोलायचय तिच्याशी
पण जीभच रेटत नाही
आग लागून सुद्धा आमचा
फटाकाच पेटत नाही!
५. आम्ही वाट पहातोय
त्याच्या दहाव्या अवताराची
तर त्याला आहे प्रतीक्षा
अर्जुनाच्या जन्माची!
६. काही नाती तुटतात
त्यांचा आवाज होत नाही
पण, मन आतून किंचाळ्या
मारल्याशिवाय राहत नाही.
७. नकोत तुझ्या खोट्या प्रेमभावना
ती निरागस आठवण
माझ्या मोडलेल्या मनाला
तुझ मृगजलासमान सांत्वन.
८. मोडत असतो मी मनाला माझ्या
जोडताही असतो
जे नियतीने शिकविले मज
तेच त्यास शिकवत असतो.
९. प्रत्येकाचे इथं
ठरलेले भाव आहेत
सापडले ते चोर
बाकीचे साव आहेत
१०. प्रेमात पडलं तरी
इजा होत नाही
ह्रदय दिलं तरी
काम अडत नाही!
११. शहाणं बनण्यापेक्षा मला
वेडं व्हायला आवडेल
तुझ्या सारख्या (दिड ) शहाण्यावर
विश्वास ठेवायला आवडेल .....
No comments:
Post a Comment