Thursday, October 14, 2010

दसरा' साजरा करण्यामागील शास्त्र व इतिहास




दसरा' साजरा करण्यामागील शास्त्र व इतिहास

अ. कृषीविषयक लोकोत्सव : `दसरा' हा प्रारंभी एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळयात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वहातात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथादेखील या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्‍त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला. (सनातनचे प्रकाशन `सण, धार्मिक उत्सव व व्रते')

आ. विजयादशमी :
रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्‍वजीत यज्ञ केला. सर्व संपत्तीचे दान केले. नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्स तिथे आला. त्याला १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या असतात. रघु कुबेरावर आक्रमणाला सिद्ध होतो. कुबेर आपटा व शमी वृक्षांवर सुवर्णाचा वर्षाव करतो. कौत्स फक्‍त १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतो. बाकीचे सुवर्ण प्रजाजन नेतात. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित)

इ. श्रीराम व हनुमान तत्त्वे आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा दसरा :
दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात श्रीरामतत्त्वाच्या तारक, तर हनुमानतत्त्वाच्या मारक लहरींचे एकत्रिकीकरण झालेले असते. दसरा या तिथीला जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो. या क्षात्रभावातूनच जिवावर क्षात्रवृत्तीचा संस्कार होत असतो. या क्षात्रभावातून आपल्याला ईश्‍वरी राज्याची स्थापना करावयाची आहे. दसर्‍याला श्रीराम व हनुमान यांचे स्मरण केल्याने जिवात दास्यभक्‍ती निर्माण होऊन श्रीरामाचे तारक, म्हणजेच आशीर्वादरूपी तत्त्व मिळण्यास मदत होते. दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात लाल (शक्‍तीरूपी) व तांबूस (दास्यभावातून निर्माण झालेल्या आशीर्वादरूपी लहरी) रंगांच्या स्प्रिंगसारख्या लहरी कार्यरत अवस्थेत असतात. या लहरींमुळे जिवाची आत्मशक्‍ती जागृत होण्यास मदत होऊन जिवाच्या मारक भावाबरोबरच नेतृत्वगुणामध्येही वाढ होते. यामुळे जिवात क्षात्रभावाचे संवर्धन होते. जिवाने आपल्यामध्ये क्षात्रगुणाचे संवर्धन केल्यानेच तो सहज दुर्जनरूपी शक्‍तींचा संहार करू शकतो. - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.५.२००५, दुपारी २.४०)

 

२. दसर्‍याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने का देतात ?

(शमीची व आपट्याची पाने आणि क्षात्रधर्म)
अ. शमीची पाने : दसर्‍याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायूमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. ही तम-रजात्मक असल्याने तिच्यातून प्रक्षेपित होणारे तेजकण हे वातावरणात आगीची निर्मिती करतात. या सूक्ष्म ज्वाळांनी जिवाचा क्षात्रभाव जागृत होण्यास मदत होते. क्षात्रभाव हा आत्मशक्‍तीच्या बळावर जिवाला संस्कारात्मक अशा क्षात्रवृत्तीकडे नेतो. वनवासाला जातांना प्रभू श्रीरामचंद्रांनी शमीच्या झाडाच्या ढोलीत शस्त्रे ठेवली होती. शमीच्या खोडातून व पानांतून उत्पन्न होणार्‍या तेजतत्त्वरूपी धगीमुळे शस्त्रांतील सुप्‍त मारक शक्‍ती अखंड कार्यरत अवस्थेला राहू शकते. या वेळी प्रभू श्रीरामचंद्रांनी जरी शस्त्रे उतरवली, तरी त्यांनी या शस्त्रांच्या माध्यमातून मारक शक्‍ती दुर्जनांवर सोडून शमीपत्रांच्या साहाय्याने संपूर्ण ब्रह्मांडात मारक तत्त्वाचे कार्य केले. दसर्‍याच्या दिवशी श्रीरामाचे तारक, तर हनुमानाचे मारक तत्त्व कार्यरत असल्याने शमीपत्र हे ते ते तत्त्व आकृष्ट करून घेऊन ते वायूमंडलात प्रक्षेपित करण्याचे महत्त्वाचे कार्य करते.

आ. आपट्याची पाने : ही आप व तेज या कणांशी निगडित असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्त्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्यांच्या पानांचे आदान-प्रदान होते, त्या वेळी हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून जिवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जिवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते ते आवश्यक तत्त्व जिवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणांच्या साहाय्याने झिरपले जाते. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसर्‍याच्या दिवशी वायूमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानांतून तेजतत्त्व एकमेकांना प्रदान करून ईश्‍वरी राज्य स्थापनेला लागणारा क्षात्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा. -

आपट्याच्या पानांचे महत्त्व
दसर्‍याच्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना देण्याची प्रथा आहे. आपट्याच्या पानांचे महत्त्व येथे देत आहोत.
अ. सर्व जिवांत प्रेमभाव निर्माण व्हावा, यासाठी या दिवशी सर्व जीव एकमेकांना आपट्याची पाने वाटतात. आपट्याच्या पानात ईश्‍वरी तत्त्व आकर्षून घेण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात शिवतत्त्वही जास्त प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे त्या दिवशी जिवाला आपोआप शिवाचीही शक्‍ती मिळते. - श्री गणेश (श्री. भरत मिरजे

आ. आपट्याच्या पानात श्रीरामतत्त्व १० टक्के प्रमाणात असते. आपट्याचे पान हे जिवात तेजतत्त्वाच्या साहाय्याने क्षात्रभावाचे संवर्धन करते. –
प.पू. डॉक्टर : `शमी तम-रजात्मक असल्याने तिच्यातून प्रक्षेपित होणारे तेजकण हे वातावरणात आगीची निर्मिती करतात.' तम-रजात्मक शमीतून तेजकण कसे प्रक्षेपित होतील
एक विद्वान : शमीतून प्रक्षेपित होणार्‍या तम-रजात्मक लहरी या तेजतत्त्वाच्या साहाय्याने वातावरणात प्रकट कार्य करतात. यामुळे प्रथम शमीपत्रातील रजोकणांच्या घर्षणातून उत्पन्न झालेली ऊर्जा तेजाची निर्मिती करते व हेच तेज अग्नीच्या रूपाने तमोकणांच्या साहाय्याने वातावरणातील काळया कणांचे विघटन करते, म्हणजेच शमीपत्र हे   तमोकणांच्या साहाय्याने काळया कणांचा लय करते.

३. दसर्‍याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्यामागील शास्त्र काय ?


दसर्‍याच्या दिवशी वायुमंडलातील तेजरूपी क्षात्रलहरींना पूरक अशा प्रतीकाचे, म्हणजेच शस्त्रांचे पूजन करणे हितावह असणे

प.पू. डॉक्टर : दसर्‍याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्यामागील शास्त्र काय ?
एक विद्वान : दसरा हा सण जिवांत क्षात्रभावाचे संवर्धन करतो. शस्त्रांची पूजा ही जिवांत प्रत्यक्ष क्षात्रतेज कार्यरत करण्याचे प्रतीकात्मक रूप आहे. कोणत्याही देवतेच्या हातात असणारे शस्त्र हे दुर्जनांचा विनाशकाल दर्शवून साधकांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असते. या दिवशी शस्त्रांची पूजा करून देवतांच्या मारक शक्‍तीला आवाहन करून स्वत:त वायुमंडलात वेगाने तळपत असणार्‍या शस्त्राच्या धारेप्रमाणे क्षात्रतेजाची निर्मिती करून घ्यावयाची असते. दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात असणार्‍या श्रीराम व हनुमान या तत्त्वांच्या लहरींच्या आधिक्यामुळे त्या त्या तत्त्वांचे शस्त्ररूपी प्रतीकात क्षात्रतेजाच्या आधारे संवर्धन होऊन त्यातून शस्त्राच्या अग्रभागातून वेगाने कारंजाप्रमाणे वायुमंडलात प्रक्षेपण होते. क्षात्रतेजाच्या प्रक्षेपणामुळे जिवांत क्षात्रभाव निर्माण होऊन प्रत्यक्ष मायेतील कर्म करण्यास गती प्राप्‍त होऊन येणार्‍या प्रत्येक अडथळयांवर सूर्यनाडीच्या आधारे मात करणे शक्य होते; म्हणून दसर्‍याच्या दिवशी वायुमंडलातील तेजरूपी क्षात्रलहरींना पूरक अशा प्रतीकाचे, म्हणजेच शस्त्रांचे पूजन करणे हितावह ठरते. - (सौ. अंजली गाडगीळ

 

४. दसर्‍याला देवीचे पूजन करणे

अ. सरस्वती पूजन करणे : 
दसर्‍याला सरस्वतीतत्त्वाच्या क्रियात्मक पूजनाने जिवाच्या व्यक्‍त भावाचे अव्यक्‍त भावात रूपांतर होऊन त्याची स्थिरतेत प्रवेश होण्यास मदत होते.

आ. दसर्‍याच्या दिवशी अपराजिता देवीची मूर्ती भूमीवर अष्टदल काढून त्यावर का ठेवतात ?
भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवणे, हे अपराजिता या शक्‍तीतत्त्वाची आठही दिशांवर विजय प्राप्‍त करण्याची क्षमता दर्शवण्याचे प्रतीक असणे : अपराजिता हे दुर्गादेवीचे मारक रूप पृथ्वीतत्त्वाच्या आधारे भूगर्भातून प्रकट होऊन पृथ्वीवरील जिवांसाठी कार्य करते. अष्टदलाच्या सिंहासनावर आरूढ झालेले हे त्रिशूलधारी रूप शिवाच्या संयोगाने दिक्पाल व ग्रहदेवता यांच्या साहाय्याने आसुरी शक्‍तींचा नाश करते. अष्टदलावर आरूढ झालेल्या अपराजिता या शक्‍तीतत्त्वाची भक्‍ताच्या प्रार्थनेनुसार ज्या वेळी पृथ्वीच्या भूगर्भबिंदूतून उत्पत्ती होते, त्या वेळी तिच्या स्वागतासाठी अष्टपाल देवतांचेही आगमन होते. अष्टदलाचे अग्रबिंदू हे अष्टपाल देवतांचे प्रतिनिधित्व करतात. अपराजितेच्या उत्पत्तीतून प्रक्षेपित होणार्‍या मारक लहरी या अष्टपालांच्या माध्यमातून अष्टदिशांना तांबूस रंगाच्या प्रकाशलहरींच्या माध्यमातून प्रक्षेपित केल्या जाऊन त्या कोनात संपुटित झालेल्या रज-तमात्मक शक्‍तीचा नाश करतात व पृथ्वीवरील जिवांना निर्विघ्नपणे जीवन जगता येण्यासाठी वायूमंडलाची शुद्धी करतात.

अष्टदल, अष्टदलाचे अग्रबिंदू हे अष्टपाल देवतांचे प्रतीक

इ. शमीपत्र हे तेजाचे उत्तम संवर्धक असल्याने शमीच्या झाडाजवळ श्री दुर्गादेवीच्या अपराजिता या रूपाची पूजा केली जाणे :
शमीच्या झाडाजवळ श्री दुर्गादेवीच्या अपराजिता या रूपाची पूजा केली जाते; कारण शमीपत्र हे तेजाचे उत्तम संवर्धक असल्याने अपराजिता या रूपाची कारंज्याप्रमाणे प्रकट झालेली शक्‍ती दीर्घकाळ साठवून ठेवण्याचे कार्य शमीपत्र करते. हे शमीपत्र घरात ठेवल्यामुळे या लहरींचा फायदा वर्षभर मिळवणे जिवांना शक्य होते. -

 


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive