बालआरोग्य - उपचार तापाच्या झटक्यांवरचे!
( डॉ. वैशाली पवार )
*****************************************
लहान मुलांना तापामध्ये येणारे झटके कुटुंबातल्या सर्वांचीच झोप उडवून टाकतात. अशा झटक्यांची कारणे आणि त्यावरील उपचार यांविषयी...
लहान मुलांमध्ये झटके येणे म्हणजेच आकडी येणे, हा आजार बऱ्याच मुलांमध्ये ऐकायला व पाहायला मिळतो. शिवाय झटका ( कन्व्हल्जन) हा विविध प्रकारामध्ये येऊ शकतो. झटके येण्याची विविध कारणे आहेत. "ताप असताना आलेला झटका आणि बाकीची काही मेंदूची किंवा इतर कारणे नसताना आलेला झटका म्हणजेच तापाचा झटका.' हा झटका साधारणपणे नऊ महिने ते पाच वर्षांपर्यंतच येतो. हा झटका १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहत नाही. शिवाय झटक्यानंतर कोणत्याही अवयवाचा पक्षघात किंवा मेंदू खराब (Damage) होत नाही. थोडक्यात मूल अगदी पहिल्यासारखे सर्वसाधारण असते. झटक्यांचे प्रकार ः १) तापातील साधा झटका जो झटका वरील सर्व गोष्टींची पूर्तता करतो, तो म्हणजेच ९ महिने ते ५ वर्षांपर्यंत या कालावधीत येतो व १० मिनिटांपेक्षा कमी त्यालाच तापातील साधा झटका म्हणून संबोधले जाते. २) गुंतागुंतीचा तापातील झटका - जो झटका ९ महिन्याच्या अगोदर किंवा ५ वर्षांनंतर येतो व १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालतो, झटक्यानंतर काही मेंदूशी संबंधित आजार राहत असल्यास किंवा झटक्यात पूर्ण शरीर आंतरित समाविष्टन करता एखादाच अवयव आंतरित समाविष्टकरत असल्यास त्यालाच गुंतागुंतीचा तापातील झटका म्हणून ओळखले जाते. झटका येण्याची कारणे ः १) अनुवांशिक २) कुटुंब इतिहास बहीण-भावंडांमध्ये तापाच्या झटक्याचा त्रास झाला असेल तर १०% शक्यता ही लहान बाळामध्ये असू शकते. आई-वडिलांना तापाच्या झटक्याचा त्रास झाला असेल तर ५०% शक्यता ही त्यांच्या बाळांमध्ये असू शकते. भविष्यात ताप न येता झटके आले किंवा अंशतः गुंतागुंतीचा झटका किंवा झटक्यामुळे शरीराचे एखादे अवयव अधू झाले असतील किंवा मतिमंदपणा आला असेल तर किंवा घरातल्या कोणाला झटक्याचा फिटस् आजार असल्यास शक्यता वाढते. चाचण्या - १) खरं तर प्रथम तापाच्या झटक्याच्या वेळेसच दुसरे काही कारण नाही ना, हे पडताळण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागतात. तापाचे कारण शोधण्याकरिता जंतुसंसर्ग नसल्याची खात्री करून घेण्यासाठीची CBC ही चाचणी करावी लागते. ३) मणक्याचे पाणी तपासण्याची आवश्यकता नसते. संबंधित वरील दर्शविल्याप्रमाणे काही गंभीर स्वरूपाची कारणे असतील, तर चाचणी करावी लागते किंवा मेंदूमध्ये संसर्गजन्य जंतूंचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्या वेळेस मणक्यातील पाणी तपासावे लागते. EEG (इइजी- म्हणजे मेंदूच्या आलेखाची आवश्यकता नसते. उपचार - १) प्रमुख उपचार म्हणजे ताप आटोक्यात आणणे. ताप आल्याबरोबर बाळाचे अंग थंड पाण्याने (फ्रीजमधील पाणी नव्हे) पुसून काढावे. २) तापाचे औषध बाळाला पाजावे व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जेव्हा झटका येतो तेव्हा कांदा, जुनी चप्पल नाकाजवळ हुंगवणे हा प्रकार करू नये. ताबडतोब बाळाला लहान मुलांच्या डॉक्टरांकडे घेऊन जावे. झटके टाळण्याकरिता देण्यात येणारी उपचारपद्धती - १) इन्टर्मिटन्ट प्रोफायलॅक्सिस ः ज्या वेळेस बाळाला ताप येतो, त्या वेळेस ही उपचारपद्धती अवलंबितात. डायजेपाम (Diazepam) व लोरॅजेपाम (Lorezepam) ही दोन औषधे आहेत. ही औषधे ताप आल्यापासून पहिले तीन दिवस देतात. या उपचारपद्धतीमुळे झटका येण्याची संभाव्यता ८०% ने कमी होते. दुसरे optional औषधे म्हणजे फेनोबारबीटोन व सोडियम वेलप्रोएट २) कन्टिन्युअस प्रोफायलॅक्सिस ः जी मुले intermittent prophylaxis करिता साथ देत नाहीत व ज्यांच्यामध्ये risk factors असात, अशांमध्ये अवलंबिले जाते. वापरण्यात येणारे औषध ः फेनोबाटनीलेन. हे औषध वयाच्या पाच वर्षांपर्यंत किंवा एक वर्ष झटका न येण्याच्या कालावधीमध्ये द्यावे लागते. - डॉ. वैशाली पवार बालरोगतज्ज्ञ, पुणे
No comments:
Post a Comment