Tuesday, October 5, 2010

लठ्ठपणा आणि वंध्यत्व

लठ्ठपणा आणि वंध्यत्व

( डॉ. किरण रुकडीकर )

लठ्ठपणामुळे येणाऱ्या वंध्यत्वाचे नेमके कारण संशोधकांना सापडलेले नसले तरी वंध्यत्वाच्या सर्वात महत्त्वाच्या कारणांमध्ये अतिरिक्त असंतुलित वजन आणि खूप कमी वजन ही दोन महत्त्वाची कारणे आढळून येतात. स्त्रियांतील वंध्यत्व आणि लठ्ठपणा यांच्या परस्पर संबंधांविषयी... ...... "डॉक्टर, मला आई व्हायचंय. ही समस्या घेऊन स्त्रिया पूर्वी फक्त स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जात होत्या, परंतु आज ही समस्या घेऊन बऱ्याच स्त्रिया माझ्यासारख्या स्थुलता विशेषतज्ज्ञाकडे येऊ लागल्या आहेत. एक सुशिक्षित, सुविद्य आणि भविष्यात घडू शकणाऱ्या गोष्टींबद्दल सतर्क असलेली तरीही घाबरलेली एक मुलगी माझ्या क्लिनिकमध्ये आली. तिचं नाव अंजली वय २५ ती अविवाहित होती, परंतु तिचा विवाह ठरलेला होता. तिची समस्या होती तिचे वजन. तिच्या वजनाची अथवा बेडौल शरीराची तिच्या होणाऱ्या पतीकडून कोणतीही तक्रार नव्हती, परंतु अंजलीला मात्र एक वेगळीच भीती समोर दिसत होती आणि त्या भीतीपोटीच लग्न ठरल्याठरल्या तिने माझ्या क्लिनिकमध्ये धाव घेतली. अंजलीची मोठी बहीणसुद्धा अंजलीसारखीच जाड होती. तिच्या लग्नाला पाच वर्षं पूर्ण झालेली होती, परंतु अजून अपत्यप्राप्ती नव्हती. बरेच प्रयत्न करूनही तिचे वाढलेले वजन तिच्या पदरी निराशाच. अंजलीची जडणघडण अगदी बहिणीप्रमाणेच. दोघींचे वजनही समप्रमाणातच. दोघींनाही अनियमित मासिक पाळीचा त्रास होता. आता लग्नाच्या उंबरठ्यावर उभे राहिल्यानंतर अंजलीला तीच भीती भेडसावत होती. आपल्या या वजनामुळे आपल्या बहिणीप्रमाणे आपल्यालासुद्धा असाच त्रास भोगावा लागणार का? अपत्यप्राप्ती होऊ शकल्याने तिच्या बहिणीला होणारा मानसिक त्रास तिचे दु- अंजलीने अगदी जवळून पाहिले होते. आता हे सर्व आपल्या नशिबीसुद्धा वाढून ठेवलेले नसेल ना? या भीतीने अंजली अतिशय घाबरली होती. तिच्या मनात बऱ्याच शंका होत्या. या सर्व तिने माझ्यासमोर मांडल्या. "वंध्यत्व, अनियमित मासिक पाळी यांचा लठ्ठपणाशी काय संबंध आहे? मला माझ्या बहिणीप्रमाणेच मातृत्वासाठी वाट पाहावी लागेल का?' असे अनेक प्रश् ती मला विचारू लागली. तिच्यासारख्या अनेक स्त्रियांची समस्या ही असू शकेल. अशा मुली स्त्रियांसाठी त्यांना "लठ्ठपणा वंध्यत्व, अनियमित मासिक पाळी' यांच्यातील संबंधांची माहिती आपण पाहू. वंध्यत्वाची कारणे तशी बरीच आहेत. थोडक्यात, गर्भाशयाचे आजार, आकुंचन पावलेली गर्भनलिका, गर्भाशयात जन्मत- असणारे दोष ही काही कारणे आहेत, पण बऱ्याच स्त्रियांमध्ये तपासणीनंतर असे काही आजार अथवा दोष नसल्याचे आढळून येते. मग असंतुलित वजन हे एकच कारण घेऊन बरेचसे स्त्रीरोगतज्ज्ञ माझ्याकडे अशा पेशंटना पाठवतात. लठ्ठपणामुळे येणारे वंध्यत्व याचे नेमके कारण संशोधकांना जरी सापडलेले नसले तरीही वंध्यत्वाच्या सर्वात महत्त्वाच्या कारणांमध्ये लठ्ठपणा (अतिरिक्त असंतुलित वजन) आणि रोडपणा (खूप कमी वजन) ही दोन महत्त्वाची कारणे आढळून येतात. सर्वच लठ्ठ स्त्रियांना वंध्यत्व येतेच असे नाही, तसेच सर्व वंध्यत्वग्रस्त स्त्रिया लठ्ठ असतातच असेही नाही. वजन असंतुलित असल्याने प्रजननशक्तीवर काय परिणाम होतात, ते आपण पाहू. वंध्यत्व असलेल्या स्त्रियांमध्ये "पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, हा जास्त प्रमाणात आढळतो. अर्थात स्त्रियांच्या अंडकोषांमध्ये अधिक प्रमाणात छोट्या छोट्या द्रव्याच्या पिशव्या तयार होतात. या सिंड्रोममध्ये लठ्ठपणा, अनियमित पाळी, बीजनिर्मिती होणे, बिजनिर्मिती व्यवस्थित होणे या समस्या उद्भवतात. तसेच यामध्ये इन्सुलिन ऍन्ड्रोजेन (पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात असणारी हॉर्मोन्स) यांचा अधिक मारा होत असतो. लठ्ठपणामध्ये बीजनिर्मिती होणे ही समस्या मेंदूमधील हायपोथॅलॅमस ग्रंथीतील गोनॅडोट्रॉपिन रिलिझिंग हॉर्मोन आणि पिट्युटरी ग्रंथीतील ल्युटिनायझिंग हॉर्मोन फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हे व्यवस्थित तयार झाल्यामुळे उद्भवते. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम नसलेल्या स्त्रियांमध्ये इन्सुलिनच्या अतिरेकामुळे इन्सुलिनप्रतिरोध तयार होतो त्यामुळे अंडकोषातील स्टिरॉइड्सचे प्रमाण वाढते. लठ्ठपणामुळे निर्माण होणारे "वंध्यत्व' ही समस्या फक्त स्त्रियांपुरतीच मर्यादित नसून याचे दुष्परिणाम पुरुषांमध्येही आढळून येतात. चरबीचा शरीरातील साठा ठराविक ठिकाणी अतिप्रमाणात आढळून येतो. त्यावरून लठ्ठपणा Obesity चे दोन प्रकार असतात. . सेन्ट्रल ओबेसिटी (ऍपल शेप्ड ओबेसिटी) - या प्रकारात पोटाचा घेर अधिक असतो आणि चरबीचा साठा पोटाभोवती अथवा कंबरेच्यावर झालेला असतो. या प्रकाराचा लठ्ठपणा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात असतो. . पीअर शेप्ड ओबेसिटी - या प्रकारात कंबरेचा घेर जास्त असतो आणि चरबीचा साठा कंबरेच्या खाली म्हणजेच नितंबाभोवती झालेला असतो. या प्रकारात लठ्ठपणा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात असतो. ज्या पुरुषांमध्ये नितंबाभोवती अतिरिक्त चरबीचा साठा आढळून येतो त्या पुरुषांमध्ये अर्थातच "जननेंद्रियांची अपुरी वाढ' ही समस्या आढळून येते. ज्या पुरुषांचे वजन आपल्या आदर्श वजनापेक्षा ६० टक्के जास्त असते त्या पुरुषांमध्ये पुरुषत्वाचे हार्मोन्स कमी झालेली असतात स्त्रियांचे हार्मोन्स वाढलेले असतात. अशा पुरुषांमध्ये स्त्रियांप्रमाणे स्तनांची वाढदेखील आढळून येते, परंतु पुरुषांमधील इतर गुणधर्म म्हणजेच आवाज, शरीरावरील केस, शारीरिक हालचाली, लैंगिक सफलता (लिबिडो पोटन्सी) आणि शुक्राणुनिर्मिती या घटकांत फारसा फरक जाणवत नाही, परंतु हेच वचन जर आदर्श वजनापेक्षा १०० टक्के अधिक झाले असेल, तर मात्र टेस्टोस्टिरॉन या पुरुषी हॉर्मोन्सचे प्रमाण कमी होऊन त्याचे इतर गंभीर परिणाम जाणवू लागतात. ""लठ्ठपणा' आणि "अनियमित मासिक पाळी' या दोन्हीचा अत्यंत जवळचा संबंध आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक अशा आहेत. यासंबंधी अभ्यासकांनी संशोधनाद्वारे काही मुद्दे मांडलेले आहेत. प्रामुख्याने पोटाचा घेर जास्त असणे, सेन्ट्रल ओबेसिटी, या समस्येने ग्रस्त असलेल्या लठ्ठ स्त्रियांना या अनियमित मासिक पाळीचा जास्त प्रादुर्भाव होतो. या स्त्रियांमध्ये पुरुषांचे हार्मोन्स तयार होण्याचे प्रमाण वाढलेले असते आणि त्याचबरोबरच सेक् हॉर्मोन बिल्डिंग ग्लोब्युलीनचे प्रमाण कमी झालेले असते. शरीरात इतरत्र असलेल्या पुरुषांच्या हार्मोन्सचे स्त्रियांच्या हार्मोन्समध्ये रूपांतर होण्याचे प्रमाणही वाढलेले असते. यामुळे हार्मोन्सचे असंतुलन वाढते. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) असलेल्या स्त्रियांमध्ये मासिक पाणी अनियंत्रित असणे. या कालावधीत रक्तस्त्राव कमी होणे स्त्रीबीज तयार होणे ही लक्षणे आढळतात. या विकाराच्या शिकार केवळ लठ्ठ स्त्रिया नसून सडपातळ स्त्रियांनाही याचा प्रादुर्भाव होतो. "पीसीओएस' असलेल्या सडपातळ स्त्रियांमध्येसुद्धा स्त्रीबीज तयार होण्यास इन्सुलियन प्रतिरोध इन्सुलिनचा अतिरेक किंवा या दोन्ही गोष्टी कारणीभूत ठरतात. "पीसीओएस' असलेल्या लठ्ठ स्त्रियांचे वजन अर्थातच अतिरिक्त चरबी कमी झाले असता निश्चितच मासिक पाळी नियमित होऊन, स्त्रीबीजनिर्मिती होऊ लागते. वंध्यत्वाने त्रासलेल्या लठ्ठ स्त्रियांना वजन (चरबी) कमी झाल्याने "मातृत्व लाभलेले आहे. त्यामुळे मातृत्वासाठी आसुसलेल्या लठ्ठ स्त्रियांना वजन (चरबी) कमी करणे सडपातळ स्त्रियांना वजन (चरबी) समतोल राखणे हा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञ देतात याचा अवलंब केल्याने बऱ्याच स्त्रियांना गर्भधारणा झालेली आहे. - डॉ. किरण रुकडीकर स्थूलताविशेषज्ज्ञ, कोल्हापूर.     

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive