Monday, February 20, 2012

Question and answers on marital relationship

वैवाहिक आयुष्यातील अपयशाने निराश होऊ नका. भविष्याचा विचार करून योग्य व्यक्तीत जगण्याचा आधार शोधा. विवाहित व्यक्तीत शोधलेला आधार मात्र धोकादायक ठरू शकतो. 

मी घटस्फोटीत असून एका विवाहित तरुणाबरोबर माझी मैत्री आहे. तो मला आवडतो आहे. त्याची बायको त्याला चांगलं वागवत नाही. त्याने त्याच्या बायको-मुलाला सोडू नये, पण आमचीही मैत्री चालूच राहावी असे आम्हाला दोघांनाही वाटते. आम्ही नेहमी भेटत नाही, फक्त रोज अर्धा तास फोनवर बोलतो. मला आयुष्यात दोनदा नातेसंबंधात अपयश आलंय, त्यामुळे माझा कुणावर विश्वास नाही. माझे लग्न त्याच्याबरोबर व्हावे अशी माझी इच्छा नाही. परंतु आमच्या नात्याला सामाजिक व कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे आमच्या नात्याच्या भवितव्याबद्दल खूप संभ्रम आहे.

- श्रीमती प्रिया, डोंबिवली 

उत्तर - नातेसंबंधात दोनदा अपयश आल्यामुळे दु:ख होणे स्वाभाविक आहे. तसेच त्यामुळे कुणावर विश्वास ठेवायला मन धजावत नाही, हे साहजिकच आहे. अशा परिस्थितीत तुमच्या विवाहित मित्राबरोबरच्या भावनिक आधारावर तुम्ही जगता आहात. तो आधार तुटू नये अशी तुमची प्रामाणिक इच्छा आहे. असे वाटणे हे पूर्णत: चुकीचे आहे, असे मी म्हणू शकत नाही, परंतु तुमच्या परिस्थितीचा व वयाचा विचार करता तुम्ही अत्यंत चुकीच्या ठिकाणी स्वत:साठी आधार शोधता आहात. आपण समाज व कायद्याचा विचार थोडा वेळ बाजूला ठेवून तुमच्या भविष्याचा विचार केला, तर तुमच्या या विवाहित मित्राबरोबरच्या संबंधांना काहीही भविष्य नाही. उलट त्यामुळे तुम्ही एका कुटुंबात समस्या निर्माण करता आहात. त्याचबरोबर स्वत:च्या आयुष्याशी धोकादायक जुगार खेळत आहात. कृपया अतिशय चांगल्या प्रकारे व सभ्यपणे या मैत्रीचा शेवट कसा करता येईल याबाबत प्रयत्न करा. दोनदा अपयश आले, याचा अर्थ पुन्हा नव्याने जोडीदार शोधायचाच नाही व स्वत:चा संसार करायचाच नाही असा निराशाजनक विचार मनातून ताबडतोब कायमचा हद्दपार करा. तुमच्या नोकरी व्यवसायात प्रयत्नपूर्वक प्रगती करा. स्वत:च्या आवडी-निवडी व छंद चांगल्या प्रकारे जोपासण्याचा प्रयत्न करा. तुम्हालाही तुमच्या मजीर्प्रमाणे चांगला जोडीदार मिळू शकतो, याबद्दल सकारात्मक विचार करा. आयुष्यात कायम दु:ख व मनस्तापच मिळाल्यामुळे भविष्यातील आनंद व सुखाकडे चुकीचा निर्णय घेऊन पाठ फिरवू नका. 

माझे वय ४५ वषेर् असून २ मुले आहेत, जी कॉलेजमध्ये जातात. आम्ही सगळे जॉइंट फॅमिलीत राहतो. एकत्र कुटुंबात मी सगळ्यांचंच व्यवस्थित करते. घरातील इतर सदस्यांबद्दल माझी काही तक्रार नाही, पण नवरा मला घरात काहीच किंमत देत नाही. माझी कदर करत नाही. मला कधी फिरायलासुद्धा नेत नाही. मी काही मागितलं तर तो मलाच दोष देत, मी फक्त स्वत:चा विचार करते असं बोलतो. मला माहेरीसुद्धा जाऊ देत नाही. मी कायम घरातच राहावं असं त्यांना वाटतं. या सगळ्याचा मला खूप त्रास होतो व खूप कंटाळा आला आहे. या सगळ्या परिस्थितीतून मी कसा मार्ग काढू? 

- श्रीमती मंगला, पुणे 

उत्तर - मंगलाताई तुमच्या समस्येने तुम्ही समाजातील अनेक महिलांची व्यथा मांडली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही एकट्याच नाहीत तर अनेक महिला आहेत. आजही आपल्याकडे गृहिणीच्या घरातील कामाला किंमत व महत्त्व अजिबात दिले जात नाही, त्यामुळे घरात इतरांची कामे करणे हेच गृहिणीचे मुख्य काम मानले जाते. घरातील कामाच्या व्यापात स्वत:च्या आवडी-निवडी, हौस-मौज याचा विचारसुद्धा घरातील पुरुषमंडळी करत नाहीत. दुदैर्वाने २०१२ मध्येही ही परिस्थिती अनेक घरात आहे. या परिस्थितीत तुम्ही नवऱ्याशी कोणत्याही प्रकारे उघड संघर्षाची भूमिका घेऊन प्रश्न सुटणार नाही. उलट परिस्थिती आणखी चिघळेल. याचा अर्थ तुम्ही सहनच करत जावे किंवा स्वत:चा मार्ग शोधूच शकत नाही, असा निष्कर्ष मात्र कृपया काढू नका. झटपट उपाय जरी नसला तरीसुद्धा भविष्यकाळाचे व्यवस्थित नियोजन केल्यास निश्चितच बदल होणार आहे. तुमची मुले मोठी झालेली आहेत. त्यांना व घरातील इतर सदस्यांना घरातील कामाच्या जबाबदाऱ्या गोडीगुलाबीने पण आग्रहपूर्वक वाटून द्या. तसेच या वयात नवीन नोकरी वगैरे मिळणे जरी अवघड असले, तरीसुद्धा केवळ पैसे मिळवण्यासाठी नव्हे तर स्वत:साठी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचा उद्योग/व्यवसाय सुरू करण्याबाबत विचार करा. छोट्या प्रमाणात का होईना, पण काहीतरी काम स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न करा. अगदी किरकोळ स्वरूपात शिलाई काम करणे किंवा घरच्या घरी साड्या किंवा इतर वस्तू विकणे ह्यांनी सुरुवात करा. केवळ पैसे मिळण्यासाठी आपल्याला कामाची सुरुवात करायची नाही तर या निमित्ताने इतर महिलांसोबत तुमचा वावर वाढेल, विचारांची देवाणघेवाण होईल तसेच तुमच्या कर्तृत्वाला वाव पण मिळेल. त्यामुळे तुमची स्वत:ची अशी ओळख निर्माण होईल. शेवटी खऱ्या स्वातंत्र्याचा मार्ग हा आथिर्क स्वातंत्र्याच्या माध्यमातून लवकर मिळेल व बारीक-सारीक गरजांसाठी तुम्हाला हात पसरावा लागणार नाही. 

हे सर्व करताना घरातील वातावरण बिघडणार नाही ह्याची काळजी घ्या. स्वत:कडे दुर्लक्ष करू नका. व्यवस्थित नीटनेटक्या राहा. पतीबरोबरचे संबंध अधिक प्रेमळ व स्नेहपूर्ण होतील याबाबत प्रयत्न करा. प्रेमाने पतीशी संवाद साधा. मोकळेपणाने बोला. तुमच्या प्रेमात खरंच खूप ताकद आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे पतीलाच नव्हे तर सर्वांनाच जिंकून घ्याल. 

माझ्या लग्नाला १० वषेर् झालेली असून दोन मुले आहेत. बऱ्याच दिवसांपूवीर् माझ्या मिस्टरांचे एका मुलीशी अफेअर होते (आमच्या लग्नानंतरसुद्धा). आता मात्र त्यांनी ते संबंध पूर्णपणे थांबवलेले आहेत. माझे मिस्टर खूप चांगले आहेत. ती मुलगी आमच्या समोरच राहते. ती सारखी आमच्याकडे पाहते असे मला वाटते. त्यामुळे आम्हा नवरा-बायकोत वाद होतात. मला आमचा संसार पूवीर्सारखा प्रेमाचा हवा आहे. मी काय करू? 

- श्रीमती ज्योती, दादर-मुंबई 

उत्तर - ज्योती तुम्हीच सांगितले आहे की तुमचे मिस्टर खूप चांगले आहेत, तसेच आता त्यांचे त्या मुलीशी अजिबात संबंध नाहीत. ती मुलगी तुमच्या समोरच राहते हा योगायोग आहे. मला असे वाटते की तुम्ही मनात कोणताही संशय धरू नये आणि तुमच्या संसाराच्या भवितव्याबाबत विनाकारण काळजी करू नये. कोणत्याही नात्याबद्दल मालकी, स्वामित्व असण्याची गरज केव्हा भासते, जेव्हा स्वत:बद्दलचा आत्मविश्वास कमी होतो. आत्मविश्वास कमी झाल्यामुळे मनात अकारण भीती निर्माण होते आणि भविष्यकाळाबद्दल काळजी व चिंता वाढीला लागते. जर स्वत:बद्दल व पतीवरच्या प्रेमाबद्दल आत्मविश्वास ठेवला तर अधिक चांगल्या प्रकारे नवऱ्यावर प्रेम करू शकाल. त्यामुळे नवऱ्याकडून पण चांगला प्रतिसाद मिळेल आणि नातं अधिक घट्ट होईल. तेव्हा कृपया त्या मुलीबद्दल विचार करणे बंद करा. मुलांच्या चांगल्या वाढीसाठी व कल्याणासाठी चांगले प्रयत्न करा. त्यात नवऱ्यालाही सहभागी करून घ्या. मग संसार निश्चितच प्रेमाचा व सुखाचा होईल.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive