।। बाणकोट उर्फ हिमतगड ।।
शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या साक्षिदारांची आपण सध्या सफर करत आहोत. या जलदुर्गांनी शिवरायांना जशी साथ दिली, तसेच यातील अनेकांनी आग्रांच्या काळातला सुवर्णकाळ सुद्धा अनुभवला. अश्याच एका आडरानातल्या जलदुर्गावर आपण या आठवड्यात जाणार आहोत. तो आहे रत्नागिरी जिल्ह्यातला बाणकोट उर्फ हिमतगड!
प्लिनी या ग्रीक तज्ञानं इसवी सनाच्या पाहिल्या शतकात मंदगोर किवा मंदारगिरी या नावानं बाणकोटचा उल्लेख केला आहे. मात्र सलग असा इतिहास विजापूरकरांपासून मिळतो. १५४८ मध्ये हा किल्ला आदिलशाहाकडून पोर्तुगिजांकडे आला. त्यानंतर तो मराठ्यांकडे आला. आणि त्यावेळेसच यांच नाव ‘हिंमतगड' असे ठेवण्यात आलं. पण त्यानंतर या किल्याने अनेक नामुष्कीचे क्षण पाहिले. संभाजी महाराजा नंतर मराठी राज्याची दोन शकले झाली असताना, हा किल्ला आग्रेंकडे होता. तेव्हा छत्रपतींचे पेशवे व आंग्रे एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू लागले. यात दुर्देवं असं की पेशव्यांनी यात इंग्रजांची मदत घेतली आणि बाणकोट व सुवर्ण दुर्ग यावर हल्ला केला. कमोडोर जेम्स याने हा बाणकोट जिंकला आणि त्याला नाव दिलं ‘फोर्ट व्हिक्टोरीया'! इंग्रजाच्या या व्यापाराच्या दृष्टीने हे ठाणं उपायोगांच पडेल, असा त्याचा कयास होता. पण तसे काही झाले नाही. त्यामुळे हा सारा मुलुख त्यांनी पेशव्यांना परत केला.
आज बाणकोट आणि व्हिकोरिया व हिमतगड या नावापैकी फक्त बाणकोटच लोंकोच्या स्मृतीत आहे. किल्यावर जाण्यासाठी पायाथ्याच्या गावातून थेट किल्यावर जाणारा मातीचा उत्तम रस्ता आहे. अर्धा तासाची ही चढण दुतर्फी झाडीतून जातो. किल्याच्या बाहेर जांभ्या दगडातला खंदक खोदलेला आहे. सध्या मात्र यात पाणी नाही. पुढे गेल्यारवर आपल्या दिसंत ते किल्यांच प्रवेश व्दार. उत्तराभिमुख असलेल्या या महाव्दाराची चौकट आणि त्यावरची देखणी महिरपीची कमान लक्ष वेधून घेते. त्यातून सागरी पराक्रमाच्या साक्षिदारांची आत शिरलं की दोन्ही बाजुला पहारेकारयांच्या देवड्या आहेत. त्यातील उजव्या बाजुच्या देवडीत दहा हौद बांधलेले आहेत. इथून पुढे गेलं की डाव्या हाताला बांधीव जीना आहे. हा वरती नागरखान्यावर जातो. आणि इथेच उजव्या बाजुला एक भुयार आहे. समोर गेल्यावर पूर्व बाजुच्या तटात आणखी दोन जिने वरती जाण्यासाठी आहेत. साधारणात: किल्याच्या मध्यभागी जोत्यांच्या अवशेषांवर मारुतीची मूर्ती आहे. बाजुलाच पश्चिम दिशेला एक दरवाजा आहे. जो तटाबाहेरच्या बुरुजात निघतो. या बुरुजातच एक निकामी विहीर आहे. त्याचा पुष्कळसा भाग आता कोसळला आहे. त्याच्याच बाजुला एक हौद सुद्धा आहे. या बुरुजातून बाहेर पडायला छोटी दिडी आहे. त्यातून बाहेर पडलं की दक्षिणेकडच्या खंदकाचं दर्शन होतं. किल्याच्या तटबंदिबाहेर वयाव्य दिशेस थोडं खाली एक स्मशान भूमी आहे. किल्याशी संबंधित नाही.
पण इथे जवळ घडलेल्या घटनेशी या जागेचा संबंध आहे. सर चार्लस मॅलेट हा १७९१ साली पुण्याचा रेसिडेंट होता. त्याचा मुलगा आर्थर मॅलेट मुबंईहून महाळेश्वरला जायला निघाला. त्यावेळी मुबंईहून बाणकोटला यावं लागे आणि तेथून सावित्री नदिच्या कडेने महाबळेश्वरला जावं लागे. त्यांची पंचवीस वर्षाची पत्नी सोफीया आणि अवघ्या बत्तीस दिवसाची मुलगी एलेन हॅरिएट या दोघी जणी तेरा खलाशांसह या बाणकोटच्या खाडीत बुडून मरण पावल्या. त्यांच्या पार्थिवावर या स्मशानभूमित दफनविधी केला गेला. आधी येथे चांगला बाधींव चौथरा आणि माहिती देणारी संगमवरी शिळा होती. पण आता ती कोणीतरी फोडून टाकली आहे. नंतर हा आर्थर मॅलेट महाबळेश्वरी जाऊन, सावित्री नदिचं पात्र पाहत एका टोकावर जाऊन, बसे. कारण याच सावित्री नदित त्याची प्रिय पत्नी आणि मुलगी बुडुन गेल्या होत्या. आर्थर ज्या ठिकाणी महाबळेश्वरला बसत असे, तिथे आजही आर्थर सिट नावाचा पॉर्इंट आहे. म्हणजे उगामाला आर्थरचं स्मारक आणि मुखाशी त्याच्या पत्नीचं स्मारक ही या सावित्री नदिशी पुढे आहे. तुम्ही कधीही बाणकोट अथवा महाबळेश्वरला आर्थर सीट या पाँर्इंटला जाल, तेव्हा कहाणी जरूर आठवाल.
कसे जाल
मंडणगड तालुक्यात हा भाग येतो. मुबंई-गोवा हायवे वरून जाताना, दापोली वरून वळावे. बाणकोट किल्याशेजारीच नाना फडणीसांचं ‘ वेळास' हे जन्मगाव आहे. याच रस्त्यावर खडकांची वारयानं झालेली झीज पाहण्यासारखी आहे. समुद्र किनाराही पाहण्यासारखा आहे. दापोली येथून एक रस्ता बाणकोटला जातो.
No comments:
Post a Comment