We have an urgent opening for the position of Verification Executive / Verification Associate in our company, for more details kindly go through below details: Company Name: CRP Technologies India Pvt Ltd www.crp.co.in We are India's leading Risk Management organization. Established in 2001. For a rewarding, challenging and long term career; check out the great opportunities that await you at CRP Technologies!!!!!! Current Openings: Designation: Verification Executive / Verification Associate (in operation department) Location: Andheri (East) No. Of position: 15 Permanent position: Job Timings: Day Shift - No Rotations Salary would be discussed during interview timings. Walk In Interview between 10 am to 4 pm from Monday – Friday & Saturday: 10:00 am – 2:00 pm. Contact: Rajeshwari / Sonal Department: Human Resource Venue Details: CRP Technologies [India] Pvt. Ltd. 39, Nand Ghanshyam Industrial Estate, Off. Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai - 400093. Contact Number: 40277218 |
Saturday, June 2, 2012
Urgent opening for the position of Verification Executive / Verification Associate in CRP Technologies India Pvt Ltd
Thursday, May 31, 2012
रेल चक्र - हीरो आणि हिरा ! Railway - Hero and diamond
रेल चक्र - हीरो आणि हिरा !
शाळेत
असताना माझा
एक पाशा
नावाचा मित्र
होता. अतिशय
देखणा होता.
शाळेतल्या
मुलींच्या
नजरा
त्याच्याकडेच
वळत. मी व पाशा
दोघं एका
बेंचवर बसत
असू.
माझ्याकडे
एकाही मुलीची
नजर वळत नसे.
मी मनातून
नाराज होई आणि
पाशाचा हेवा
करी. पुढे
आम्ही
कॉलेजात गेलो.
पाशाही
माझ्याबरोबर
होता.
कॉलेजमध्ये
मुली पाशाशी
बोलत
त्याच्या
पुढेपुढे करत.
पण
त्याचबरोबर
माझ्याशीही
चर्चा करत असत.
याचं कारण
म्हणजे मी
कॉलेजमध्ये
स्कॉलर होतो.
अनेक
वक्तृत्व
स्पधेर्तून
बक्षिसं
मिळवत होतो.
प्राध्यापकांचा
मी लाडका
विद्याथीर्
होतो.
कॉलेजमध्ये
गेल्यावर
माझ्यात
आमूूलाग्र
बदल झाला होता
आणि मी तो
प्रयत्नाने व
अभ्यासाने
घडवला होता.
पाशाकडे
सुंदर
व्यक्तिमत्त्व
आहे
,
त्यामुळे
मुली
त्याच्याकडे
पाहतात
त्याच्याशी
बोलण्यासाठी
धडपडतात.
आपल्याकडे
त्याच्यासारखं
व्यक्तिमत्व
नसलं तरी
बुध्दी आहे.
आपण अभ्यासात
पुढे यायला
हवं
,
स्पधेर्तून
बक्षिसं
मिळवायला
हवीत
,
आपलं
व्यक्तिमत्व
बहुश्रुत
करायला हवं
असा माझा
निर्धार होता.
त्यात मला यश
मिळालंही.
पाशाच्या
बरोबरीतच
मुली
माझ्याशीही
बोलू लागल्या.
शाळेतला
न्यूनगंड व
पाशाबद्दल
वाटणारा हेवा
मी या अथक
प्रयत्नानं
दूर लोटला
होता.
एके दिवशी मी पाशाला विचारलं , ' पाशा तुझं ध्येय काय आहे ?' ' माझं ध्येय रेल्वेत इंजिन ड्रायव्हर व्हायचं आहे. ' त्याचं उत्तर ऐकून माझा ' आ ' वासला. मी म्हणालो ' काय ?' ' एवढं तोंड फाटेपर्यंत काय म्हणायला काय झालं. ' तो म्हणाला. ' अरे मला वाटलं की तू सिनेनट होशील. नाटकात कामं करशील किंवा छोट्या पडद्यावर कलावंत होशील. ' मी म्हणालो. ' शी आय हेट दॅड फिल्ड. ' तो म्हणाला. ' अरे , पण तुझी पर्सनॅलिटी. ' माझ्या शब्दातलं आश्चर्य लपत नव्हतं. ' आय वॉण्ट टू बिकम ड्रायव्हर इन रेल्वे! ' त्याचं उत्तर ऐकून एव्हाना मी गार पडलो होतो. आणि पाशानं रेल्वेच्या जाहिरातीत अर्ज टाकायला सुरुवात केली होती. पाशाचं असिस्टण्ट ड्रायव्हर म्हणून निवडही झाली. सगळं कॉलेज हळहळलं... खरं म्हणजे त्यानं सिनेनट व्हायला हवं होतं तर झाला काय , तर ड्रायव्हर. दात आहेत तिथे चणे नाहीत , आणि चणे आहेत तिथे दात नाहीत. हेच... खरं... पाशानं कसबसं एक वर्ष असिस्टण्ट ड्रायव्हर म्हणून काम केलं व तो मेडिकल एक्झामिनेशनमध्ये नापास झाला , कारण तो रंगांधळा ठरला. ड्रायव्हर काय किंवा गार्ड काय त्यांची नजर चांगली पाहिजे व सिग्नलचे रंग ओळखता आले पाहिजेत. पंचेचाळीस वर्षांपर्यंत यांना तीन वर्षांत एक अशी मेडिकल असते व पंचेचाळीस वर्षांनंतर दरवषीर् असते. ती मेडिकल पास होणं आवश्यक असतं. पाशा मेडिकलमध्ये नापास झाल्यानं त्याला नॉन मेडिकल जागेत समावून घ्यावं लागलं. त्याला कुठे घ्यायचं कोणत्या खात्यात टाकायचं , याचा शोध सुरू झाला. पाशा साहेबाला जाऊन भेटला. साहेब पाशाच्या पर्सनॅलिटीवर खुश झाला. त्यांनी त्याची कंट्रोल ऑफिसमध्ये पॉवर कंट्रोलरचा असिस्टण्ट म्हणून नियुक्ती केली. पाशाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले. इंजिनवर काम करताना त्याला निळा ड्रेस घालावा लागत असे. हात व चेहरा काम करताना काळे होत असत. कंट्रोल ऑफिस एअर कण्डिशन्ड होतं. पाशा ऑफिसमध्ये एकदम अप टू डेट यायचा. त्याची पर्सनॅलिटी व त्याचा पेहराव पाहून संपूर्ण कंट्रोल ऑफिस त्याला ' हीरो ' म्हणत असे. कॉलेजमध्ये पाशाला त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे हीरो म्हणत तर मला मिळणाऱ्या बक्षिसांमुळे मला हीरो म्हणत असत. पण आथिर्क अडचणींमुळे माझ्या हिऱ्याचा कोळसा झाला आणि मला नोकरी धरावी लागली. मीसुध्दा रेल्वेत लागलो. पाशानं मात्र नोकरीतही ' हीरो ' हे नाव टिकवलं परंतु ' हिरा ' हे कॉलेजमधलं नाव मला नोकरीत काही टिकवता आलं नाही. पाशानं मोटरमनचा सांगितलेला किस्सा तुम्हाला सांगतो. ड्रायव्हरमध्ये दोन प्रकार आहेत. एक ड्रायव्हर व दुसरा मोटरमन. मेल एक्स्प्रेस , पॅसेंजर मालगाड्या चालवणाऱ्याला ड्रायव्हर म्हणतात व लोकल गाड्या चालवणाऱ्या मोटरमन म्हणतात. परंतु प्रवासी या दोघांनाही ड्रायव्हर म्हणूनच संबोधतात. कोणत्याही स्टेशनवर सुरू झालेली लोकल थांबली की मास्तर म्हणत मोटरमन फडके आहे वाटतं. ' हात दाखवा व बस थांबवा '. या धतीर्वर ' हात दाखवा व लोकल थांबवा ' या नुसार कृती करणाऱ्या लोकांसाठी फडके लोकल थांबवत व त्यासाठी खचीर् पडलेला वेळ वेगात जाऊन भरून काढत असत. लोकल सुरू झाल्यानंतरही पॅसेंजरने हात दाखवल्यावर फडके लोकल थांबवतात ही गोष्ट साहेबांच्या कानापर्यंत गेली. साहेबांनी फडकेंना असं न करण्याची तंबी दिली होती. एकदा ठाणे स्टेशनहून फडकेची लोकल निघाली. समोरून एक म्हातारा माणूस गाडी थांबण्यासाठी हात करत होता. फडकेने त्यांच्या सवयीनुसार लोकल थांबवली. तो वृद्ध माणूस म्हणाला , ' ड्रायव्हरसाब पुढं रुळ तुटलया , गाडी फुडं घेऊ नका. ' फडकेंनी गाडी थांबवली व ते अर्धा फर्लांग रुळातून चालत गेले. एका ठिकाणी रुळ तुटला होता. बापरे! खरंच लोकल पुढं गेली असती तर पडलीच असती. आपल्याला लोकल थांबवण्याबद्दल साहेबांनी गेल्याच आठवड्यात दम दिला होता याची त्यांना आठवण झाली आणि फडकेनी वेळेवर लोकल थांबवून अपघात टाळल्याचं ऐकून साहेबांनी त्यांचं कौतुक केलं व त्यांना बक्षीसही दिलं. - व्यंकटेश बोर्गीकर | ||||||||||||||||
रेल चक्र - कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ! Load on shoulder
रेल चक्र - कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !
तो
दिवाळीचा
आदला दिवस
होता. अंबरनाथ
लोकलच्या
पुढे डेक्कन
एक्सप्रेस
गेली आणि
थोड्यावेळात
अंबरनाथ
मुंबई लोकल
निघाली. लोकल
उतारूंनी
गच्च भरलेली
होती. दोन
डब्याच्या
कपलिंकवरही
लोक बसले होते.
काहीजण
लोकलच्या
टपावरही होते.
लोकलच्या
पुढे डेक्कन
एक्सप्रेस
धावत होती.
लोकल
कुर्ल्याहून
निघाली.
डेक्कन
एक्सप्रेस
पुढे
काढल्यामुळे
लोकल दहा
मिनिटे उशीरा
धावत होती.
त्यामुळे ही
दहा मिनिटं
भरून
काढण्यासाठी
मोटरमनला
लोकल वेगाने
चालवणं भाग
होतं. तसं तो
चालवतही होता.
परंतु त्याला
लोकल पुढे
काही अंतरावर
धुराळा दिसला.
त्याने
लोकलचा वेग
कमी केला.
धुराळ्यामुळे
पुढे काय
झालंय ते
त्याला दिसत
नव्हतं. परंतु
त्यांच्या
मनात विचार
आला एवढा
धुराळा
रेल्वे
लाइनीत उडतोय.
म्हणजे
एक्सप्रेसला
अपघात झाला
असावा.
तेवढ्यात
त्याला
डेक्कन
एक्सप्रेसचा
एक डबा
बाजूच्या
रुळावर
कलंडलेला
दिसला. आता
आपली लोकल
डेक्कन
एक्सप्रेसवर
जाऊन आदळणार.
ब्रेक लावून
काही उपयोग
होणार नाही
आणि उलट आपला
जीव जाणार असा
विचार त्या
मोटरमनच्या
मनात येऊन
गेला. कारण
गेल्यावषीर्
असंच घडलं
होतं.
मालगाडीच्या
मागे लोकल
होती. पुढे
असलेल्या
मालगाडीचे
दोन डबे
रुळावरून
घसरले होते.
मोटरमनच्या
लक्षात आलं की
आपण कितीही
प्रयत्न केला
तरी लोकल
मालगाडीवर
आदळणार व आपला
मृत्यू होणार.
अपघात तर आपण
वाचवू शकत
नाही. निदान
आपला जीव तरी
वाचवू शकतो
असा विचार
करून त्याने
कॅबमधून
बाहेर उडी
मारली होती.
मोटरमन वाचला
पण लोकल
मालगाडीवर
आदळली आणि
प्रवाशांना
जखमा झाल्या
होत्या.
हा प्रसंग त्या अंबरनाथ लोकलच्या मोटरमन , जयंत निमसूडकरला आठवला. क्षणभर त्याला वाटलं , आपणही कॅबबाहेर उडी टाकावी व आपला प्राण वाचवावा , परंतु दुसऱ्याच क्षणी त्याच्या मनात विचार आला... कॅबबाहेर उडी नाही टाकायची. प्राण गेला तरी चालेल परंतु अपघात वाचवायचा अटोकाट प्रयत्न करायचा आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यात त्याला यश मिळालंही. डेक्कन एक्सप्रेसच्या पडलेल्या डब्याच्या चार फुटाच्या अंतरावर त्याला लोकल थांबवण्यात यश आलं. लोकलमधून सगळे उतारू उतरले व त्यांनी मोटरमनकडे धाव घेतली. ते दृष्य पाहून मोटरमनला म्हणाले , ' काही म्हणा तुम्ही स्वत:चा जीव धोक्यात घालून हा अपघात होण्यापासून वाचवलात आणि आम्हाला वाचवलंत. नाहीतर उद्याची दिवाळी ही काळी दिवाळी झाली असती. तुम्हाला किती धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. ' रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्या मोटरमनला रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन त्याचं कौतुक केलं. तेव्हा निमसुडकर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना म्हणाला , ' आपण मला रोख रक्कम व प्रशस्ती पत्रक देऊन कौतुक केलं. याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. परंतु आम्हा मोटरमनच्या काही अडचणी आहेत , त्याचा विचार व्हावा अशी आपणास विनंती करतो. ' सिग्नल हा नेहमी रुळाच्या डाव्या बाजूलाच असायला हवा. पण अजूनही काही ठिकाणी असलेले सिग्नल हे रुळाच्या उजव्या बाजूला आहेत. त्यामुळे मोटरमन गोंधळतो व सिग्नल दिला नसतानाही गाडी पास करतो. म्हणजे सिग्नलच्या पुढे जातो. असे प्रकार वारंवार घडूनदेखील सगळे सिग्नल रुळाच्या डाव्या बाजूलाच बसवण्याचे प्रयत्न होत नाहीत. मेल एक्सप्रेस पॅसेंजर गाड्या चालवणाऱ्या ड्रायव्हरला एक असिस्टण्ट असतो. तो ड्रायव्हरला सिग्नलची स्थिती स्पष्ट करून सांगतो. ते अशी असते , आऊटर सिग्नल - राइट , होम सिग्नल - राइट , स्टार्टर राइट , अॅडव्हान्स स्टार्टर - राइट. त्यामुळे ड्रायव्हर आपलं संपूर्ण लक्ष गाडी चालवण्यावर केंदीत करू शकतो. शिवाय व्हॅक्युम कमी झालं , चेन ओढली इत्यादी घटना घडल्या तर असिस्टण्ट त्या गोष्टी ठीक करू शकतो. परंतु मोटरमनला असिस्टण्ट नसल्यामुळे ड्रायव्हिंग करणं व सिग्नलकडे लक्ष देणं , या व्यतिरिक्त चेन ओढली तर त्याकडे बघणं इत्यादी कामं एकट्यानेच पार पाडावी लागतात. त्याचं थोड जरी लक्ष विचलित झालं तर अपघात होण्याचा संभव असतो. एका मेल एक्सप्रेस गाडीतल्या उतारूंपेक्षा एका लोकल गाडीतल्या उतारूंची संख्या तिप्पट चौपट असते. असं असतानाही रेल्वे प्रशासन मोटरमनला असिस्टण्ट देण्याच्या विरोधात आहे. तेव्हा मोटरमनला असिस्टण्ट देण्यासंबंधी विचार व्हावा. ड्युटी संपल्यानंतर मोटरमन रनिंग रूममध्ये विश्राम करतो तेव्हा त्या रनिंग रूमची व्यवस्था नीट नेटकी असायला हवी. मध्य रेल्वेतल्या उपनगरीय गाड्यांवर काम करणाऱ्या बहुतांशी मोटरमनची तक्रार आहे की काही ठिकाणी सिग्नलच्या जागा योग्य नाहीत. मोटरमन गाडी चालवताना सिग्नल त्याच्या दृष्टीक्षेपात असला पाहिजे आणि तो मोटरमनकॅबच्या डाव्या बाजूला असला पाहिजे. परंतु बऱ्याच ठिकाणी सिग्नल उजव्या बाजूला आहेत. त्यामुळे तो सिग्नल लाल अवस्थेमध्ये असतानादेखील ओलांडून जातो. त्याबद्दल त्याला शिक्षाही होते. मोटरमनला शिक्षा देण्यामध्ये रेल्वे सरकारची तत्परता दिसून येते. परंतु विधायक कारवाईच्या बाबतीत दिरंगाई होत राहते आणि मोटरमन शिक्षा भोगत राहतात. - व्यंकटेश बोर्गीकर | ||||||||||||||||
रेल चक्र - जित्याची खोड ... Railway bad habit
रेल चक्र - जित्याची खोड ...
मनुष्य
स्वभावाला
असलेल्या
विविध
पैलूंचा
अनुभव मला
पदोपदी येत
होता. एकदा मी
मोडनिंब
स्टेशनवर काम
करत होतो.
सकाळी आठ ते
रात्री
आठ
,
अशी बारा
तासांची
ड्युटी
असायची.
रात्रीचे आठ
वाजले होते.
माझी ड्युटी
संपली होती
आणि मला
सोडवायला
मास्तर आला. मी
त्याला चार्ज
देऊ लागलो
तेवढ्यात तो
म्हणाला
,
'
प्रथम मी
वेटिंग रूमचा
चार्ज घेऊन
येतो.
'
' म्हणजे ?' न कळल्यामुळे मी प्रश्न केला. ' वाघाचे पंजे. ' एवढं बोलून तो वेटिंग रूममध्ये गेला. सात-आठ बायका , दहा-बारा पुरुष आणि काही पोरं वेटिंग रूममध्ये होती. त्यापैकी एका बाईजवळ जाऊन तो म्हणाला , ' मागच्या बाजारला तुम्ही मामा करून टाकलात. ' ' या खेपेला मामी करून टाकते. काळजी करू नका. ' ती उत्तरली. ' नक्की. ' ' अगदी नक्की. ' मग तो स्टेशनात येऊन म्हणाला , ' बाकी सगळं ठीक आहे ना. त्या चाव्या द्या आणि जा तुम्ही मास्तर. ' मी चाव्या दिल्या व विचारलं , ' वेटिंग रूमचा चार्ज , ही काय भानगड आहे रे. ' उजव्या नाकपुडीवर तर्जनी ठेवत तो म्हणाला , ' अरे , मला याचा नाद आहे. मी नेहमी नव्या स्त्रीच्या शोधात असतो. गेल्या बाजारला तिनं मला शब्द दिला होता. पण तिनं तो पाळला नव्हता आणि माझा मामा केला होता. म्हणून आज तिला त्याची जाणीव करून दिली. ' ' अरे पण तू विवाहित आहेस. तुझ्या दोन मुली लग्नाच्या आहेत आणि तरी... तुला... ?' ' मास्तर , ही सवय फार वाईट. लग्नापूवीर्पासूनच लागली आहे मला. लग्नानंतर सुटेल असं वाटलं होतं. पण कसलं काय ? जाऊ द्या मास्तरसाहेब , तुम्हाला काही कळायचं नाही आणि आमचं रामायण काही संपायचं नाही. या तुम्ही. ' असं म्हणून त्याने मला निरोप दिला. ती स्त्री खिडकीतून त्याच्याकडे पाहत होती. पुढच्या आठवड्यात जेव्हा तो सुट्टी द्यायला आला तेव्हा त्याच्या कपाळावर पट्टी बांधलेली होती. ' हे आता काय झालं. ' मी विचारलं. ' एका बाईनं डोकं फोडलं. ' त्याचं शांत उत्तर. ' का ?' ' आमची हुंगेगिरी नडली. ' ' म्हणजे. ' ' ड्युटीवरच माझं एका तरुणीशी चांगलंच सूत जमलं. मला वाटलं ती माझ्या कह्यात आली असेल. मग मी तिला ऑफिसमध्ये बोलावलं. ती आली. मी दाराकडे जाण्याचं निमित्त केलं आणि ऑफिसचं दार लावलं. ' हे काय वं मास्तर दार का बंद केलंया. ' ' तुझ्यासाठी. ' ' माझ्यासाठी. ते कशा पायी. ' ' या पायी ' म्हणून त्यानं तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. ती तरुणी चांगलीच आडदांड होती. तिने त्याला जोरात ढकललं. तो बेसावध होता कारण ती प्रतिकार करणार नाही याची त्याला खात्री वाटली पण त्यामुळे त्याचा तोल गेला. त्याचं कपाळ लोखंडी खुचीर्च्या पायावर आदळलं आणि कपाळाला खोक पडली. त्यातून रक्त भळभळ वाहू लागलं. ती कडाडली , ' तू माझ्या बाच्या वयाचा हायेस आणि माझ्याशी लगट करतोया. नीच. हलकट. मुडदा पडो तुजा. ' तो उठण्याआधीच तिने त्याच्या पेकाटात लाथ घातली आणि दार उघडून बाहेर पडली. तो कळवळत मनातल्यामनात म्हणाला , ' छे , ही तर मिळाली नाहीच. वर हिचा मारच मिळाला. ' ड्युटी संपल्यावर तो घरी गेला. डोक्याची पट्टी पाहून बायकोने विचारलं , ' काय झालं ?' ' तोल गेल्यामुळे पडलो. खुचीर्चा पाय लागला. ' ' अस्सं. म्हणजे मदिराक्षीबरोबर आता मदिराही घ्यायला सुरुवात केली म्हणायची तुम्ही. ' ' नाही. आई शप्पथ. पाहिजे तर तोंडाचा वास घे. ' तिने जवळ जाऊन त्याच्या तोंडाचा वास घेतला. ' आता लक्षात आलं. ' बायको चाणाक्ष होती. ' काय. ' ' तुम्हाला ही जखम मदिराक्षीमुळेच झाली आहे. तुमच्या हुंगेगिरीचा हा प्रताप आहे. मी काही आज पाहत नाही तुम्हाला , लग्न झाल्यापासून पाहतेय. आता डॉक्टरकडे जाऊन टिटॅनसचं इंजेक्शन घेऊन या. ' समजूतदार बायकोच्या सहमतीने त्यानं तात्पुरती का होईना जखमेची कहाणी संपवून टाकली होती. - व्यंकटेश बोर्गीकर | ||||||||||||||||
रेल चक्र - नागाने काढला फणा! Railway snakes hood
रेल चक्र - नागाने काढला फणा!
पार्सल
क्लार्क व
गुड्सक्लार्क
यांची ड्युटी
बुकिंग
क्लार्क
पेक्षा थोडी
निराळी असते.
कारण इथे
यांचा संबंध
व्यापाऱ्याशी
किंवा
दलालाशी येतो.
लगेज बुकिंग
असलं तरच
प्रवाशांशी
संबंध येतो.
पार्सल व
गुड्स
बुकिंगमध्ये
व्यापारी व
दलालाशी
संबंध
असल्यामुळे
राजीखुशीने
व्यवहार होतो.
त्यामुळे
तळतळाट हा
प्रकार इथे
नसतो. चालत
आलेली
पद्धत
,
प्रथा
,
व मागच्या
पानावरून
पुढे सुरू या
तऱ्हेने इथे
काम
चालतं.
पार्सल आणि लगेज ऑफिसमध्येही काही चमत्कारिक गोष्टी घडतात. लोकांची पार्सल ऑफिसमध्येच पडून राहतात. घेऊन जायला कुणीच येत नाही. अशी पडून राहिलेली पार्सल ठराविक मुदती नंतर उघडली जातात व त्यातील वस्तुंची यादी केली जाते. ती पार्सल एलपीओमध्ये म्हणजे लॉस्ट प्रापटीर् ऑफिसमध्ये पाठवली जातात. अशीच एक पेटी मुख्य पार्सल बाबू व पोलिसांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. त्या पेटीमध्ये बक्षीसाचे शिल्ड , कप , सटिर्फिकेटस् , बक्षीस मिळालेली पुस्तकं इत्यादी वस्तु होत्या. त्या पेटीवर दीपा शेखर एवढंच नाव लिहिलेलं होतं. यावरून मुख्य पार्सलबाबू जोशींने एवढा अंदाज केला की ही बॅग दीपा शेखरची आहे. पुस्तकं चाळून तिचा तिचा पत्ता मिळवला. सेंट मेरी कॉन्हेण्ट स्कूल , नैनीताल. मुख्य पार्सल बाबूने वैयक्तिक पत्रव्यवहार त्या शाळेशी केला. शाळेकडून उतर आलं की ती आता अमेरिकेत आहे. तिचा अमेरिकेचा पत्ताही शाळेने दिला. अमेरिकेच्या पत्त्यावर पत्रव्यवहार करण्यात आला. दीपाचे वडील अमेरिकेवरून आले. ती बॅग व त्यातली बक्षीसं पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ते पार्सल बाबू जोशींना म्हणाले , ' मास्तर तुम्ही खरंच ग्रेट आहात. वैयक्तिक पत्रव्यवहार करून तुम्ही आम्हाला शोधलंत , बोला तुम्हाला काय देऊ ? ' मला काही नको. ' बाबू म्हणाले. ' असं कसं चालेल ? अहो माझ्या मुलीची अशी पेटी जर हरवली गेली असती तर मी त्याचा शोध घेतला नसता का ?' ' यू आर रिअली ग्रेट! खरं म्हणजे मी या पेटीचा क्लेम दक्षिण रेल्वेवर लावलाय व त्यांनी पंचाहत्तर हजार मंजुरी केले आहेत. ' दीपाचे वडील म्हणाले. ' आता तुम्हाला बॅग मिळाली आहे तसं त्यांना कळवून टाका. आम्हीही कळवतो. ' बाबू उत्तरले. बॅग घेतल्यानंतर ते म्हणाले , ' खरं म्हणजे या बॅगेची किंमत पैशात होऊ शकत नाही. तरीपण तुम्ही फूल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी घ्यायला हवं. ' ' अहो तुमची मुलगी ती माझीच मुलगी. मुलीचं काम केल्याबद्दल बाप कधी त्याचे पैसे घेतो का ?' असं ड्युटीवरचे जोशी म्हणाले. जाण्यापूर्वी ते पार्सल बाबूंना म्हणाले , ' तुमच्या माणुसकीपूर्ण कर्तव्य तत्परतेमुळेच ही बॅग मला मिळाली. हे मी कधीच विसरू शकणार नाही. ' ज्या वेळी ट्रक वाहतुकीने नीटसं बाळसं धरलं नव्हतं तेव्हाची गोष्ट. तेव्हा सगळी मालवाहतूक रेल्वेनेच व्हायची. एकदा पंधरा फूट लांबीचा एकशे पन्नास किलो वजनाचा कासव रेल्वेने आला. त्या कासवाला ब्रेकमधून उतरवणं काही रेल्वेच्या हमालांना जमेना. पार्सल बाबूंनी हाफकीन इन्स्टिट्यूटला फोन केला. त्यांची माणसं बोलावून घेतली मग ते कासवाला घेऊन गेले. याच दरम्यान हाफकीन इस्टिट्यूटसाठी नाग-सापांची पार्सलसुध्दा यायची. एकदा नागाच्या पार्सलमधून एक नाग बाहेर आला व वेटोळे घालून पार्सलच्या खोक्या शेजारी बसला. एका लगेज पोर्टरनं पाहिलं व तो मास्तरकडे ओरडत आला. ' साहेब पार्सलमधून नाग बाहेर आला आहे आणि चांगलाच मोठा आहे. ' मास्तर पोर्टरबरोबर पार्सल ऑफिसच्या दाराशी आले. नाग पार्सल खोक्याच्या शेजारीच बसला होता. मास्तरांनी हाफकीन इन्स्टिट्यूटला फोन केला ते लोक आले व त्यांनी नागाला पकडलं व पार्सलमध्ये टाकून पार्सलचं खोकं पॅक बंद केलं. - व्यंकटेश बोर्गीकर | ||||||||||||||||
रेल चक्र - कार्यतत्परता आणि रेल्वे Work-efficiency and railway
रेल चक्र - कार्यतत्परता आणि रेल्वे
स्वर्गीय
सी. डी
देशमुखांना
आयसीएसच्या
तोंडी
परीक्षेला एक
प्रश्न
विचारला
होता
,
'waht?' is the difference between the schoolmaster and a startion
master?'...'schoolmasters train the mind and stationmasters mind the train.'
असं त्यांनी
उत्तर दिलं
होतं.
ही गोष्ट स्टेशनमास्तरांच्या ट्रेनिंग कोर्सच्या दरम्यान आम्हाला आमच्या शिक्षकांनी सांगितली होती. ट्रेनिंग संपल्यानंतर आम्ही स्टेशन मास्तरचं काम करू लागलो , तेव्हा आमच्या लक्षात आलं की अरेच्चा! खरंच , हे वाक्य किती सत्य आहे. आपण गाड्यांचाच विचार करतोय. आता ही गाडी नंतर ती... एकामागोमाग एक त्याचाच विचार. घाटकोपर ते मुंबई अशा लोकलच्या फेऱ्या व्हायच्या. साधारणपणे 1973-77 सालची गोष्ट असावी. घाटकोपर -मुंबई लोकलच्या मुंबई बाजूच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातून पाच-सहा मैत्रिणी कामासाठी मुंबईला रोज जात. एके दिवशी मुंबईला उतरल्यावर एका मुलीच्या लक्षात आलं की तिच्या हातातलं सोन्याचं ब्रेसलेट गायब आहे. ती धावत स्टेशनात आली व घाटकोपर वरून आलेली लोकल उभी आहे का , ते पाहू लागली. परंतु ती लोकल परत निघून गेली होती. ती मुंबईच्या स्टेशन मास्तरकडे जाऊन म्हणाली , ' मास्तरसाहेब माझं ब्रेसलेट घाटकोपरहून आलेल्या लोकलमध्ये स्त्रियांच्या प्रथम श्ाेणीच्या डब्यात पडलं असावं असं वाटतंय. ' स्टेशन मास्तरांनी त्या लोकलचा ठावठिकाणा घेतला. ती लोकल दादरहून निघाली होती. कुर्ल्याला के व्ही विचारे सहाय्यक स्टेशन मास्तर ड्युटीवर होते. त्यांना मुंबईच्या स्टेशनमास्तरांनी ब्रेसलेटबद्दल सांगितलं. विचारेंनी जीआरपी ला (त्नश्ा 1 द्गह्मठ्ठद्वद्गठ्ठह्ल क्रड्डद्बद्य 2 ड्ड 4 क्कश्ाद्यद्बष्द्ग) बोलावलं व त्यांना ही माहिती दिली. दोन पोर्टर , दोन हमाल व जीआरपी सह विचारे लोकलच्या प्रथम श्ाेणीच्या डब्यात गेले. ते सोन्याचे ब्रेसलेट स्क्रूसह बाकड्याच्या खाली मिळालं. विचारेंनी मुंबईला ब्रेसलेट मिळाल्याचं कळवलं. ती मुलगी मुंबईच्या स्टेशनमास्तरचं पत्र घेऊन कुर्ल्याला आली. त्या पत्रावर तिची सही घेऊन विचाऱ्यांनी ते ब्रेसलेट तिच्या ताब्यात दिलं. ती मुलगी म्हणाली , ' अंकल आप का यह एहसान मैं जिंदगीभर नही भुलूँगी. ' ' एहसान वगैरे कुछ नही बेबी , मैने अपना फर्ज निभाया है. आपके तकदीर से ब्रेसलेट आपको मिल गया है. ' विचारे म्हणाले. ' यु आर सिंपली ग्रेट अंकल! ' ती मुलगी म्हणाली. तिने ही घटना परदेशात राहणाऱ्या आपल्या वडीलांना कळवली. तिच्या वडिलांनी , मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे श्री. डी.आर.एम बन्सल यांना के व्ही विचारेंच्या कर्तव्य तत्परतेबद्दल प्रामाणिकपणाबद्दल बरंच काही लिहून व पत्राच्या शेवटी लिहिलं , असे स्टेशनमास्तर भारतीय रेल्वेवर आहेत ही खरोखरच मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या प्रकारानंतर मुलीला भेटण्यासाठी ते भारतात आले. तेव्हा आवर्जून विचारेंना भेटत असत. तेव्हा विचारेंनी त्यांना वरील स्वगीर्य सी डी देशमुखांचा किस्सा सांगितला होता. त्यावर त्या मुलीचे वडील म्हणाले होते , ह्यष्द्धश्ाश्ाद्य द्वड्डह्यह्लद्गह्म ह्लह्मड्डद्बठ्ठह्य ह्लद्धद्ग द्वद्बठ्ठस्त्र 2 द्धद्गह्मद्ग ड्डह्य ह्यह्लड्डह्लद्बश्ाठ्ठ द्वड्डह्यह्लद्गह्म ठ्ठश्ाह्ल श्ाठ्ठद्य 4 द्वद्बठ्ठस्त्रह्य ह्लद्धद्ग ह्लह्मड्डद्बठ्ठ ड्ढह्वह्ल , ड्डद्यह्यश्ा द्वद्बठ्ठस्त्रह्य ह्लद्धद्ग ह्यड्डद्घद्गह्ल 4 ड्डठ्ठस्त्र 2 द्गद्यद्घड्डह्मद्ग श्ाद्घ ह्लद्धद्ग श्चड्डह्यह्यद्गठ्ठद्दद्गह्मह्य. | ||||||||||||||||
रेल चक्र - कंट्रोलर - Controller of railway
रेल चक्र - कंट्रोलर

निरनिराळ्या
खात्यातील
कर्मचाऱ्यांच्या
खातेनिहाय
युनियन असतात.
त्या
युनियनमार्फत
ते आपले
प्रश्न धसाला
लावायचे.
परंतु
कंट्रोलरची
संख्याच
मुळात कमी
असल्यामुळे
त्यांची
निहाय अशी
प्रभावी
युनियन
नव्हती.
त्यामुळे
त्यांच्या
कुठल्याही
मताबाबत
किंवा
अन्यायाबाबत
वैयक्तिक
स्तरावरच्या
प्रयत्नाला
फळ मिळत नसे तर
ते
दुर्लक्षिलं
जाई. ही त्रुटी
लक्षात यायला
1999
साल
उजाडावं
लागलं. मंुबई
विभागातले
नियंत्रक
अनिल भरडा
यांच्या अथक
प्रयत्नामुळे
ही संघटना
अस्तित्वात
आली. नाही
म्हणायला
विभागीय
स्तरावर ही
यंत्रणा काम
करत असे परंतु
तिला अखिल
भारतीय
स्वरूप
देण्याचं
श्रेय अनिल
भरडाकडे
जातं.
अखिल भारतीय गाडी नियंत्रक संघटना रजिस्ट्रेशन नंबर 371, स्थापन झाली. याचा फायदा असा झाला की नियंत्रकाचा आवाज वाढला. त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाऊ लागली. झांशी विभागातील एका नियंत्रकाला नोकरीवरून काढण्याचं पत्रक किंवा चार्जशीट देण्यात आलं होतं. या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे व बाजू प्रभावीपणे मांडल्यामुळे त्या नियंत्रकाला रेल्वे प्रशासनाला कामावर घ्यावंच लागलं. या घटनेमुळे या संघटनेचं महत्त्व वाढलं. तसं इतर नियंत्रक जे या संघटनेच्या नावाने नाक मुरडत होते तेही या संघटनेचे सदस्य झाले. इतकंच नाही तर कार्यकारणी मंडळात काम करण्याची इच्छा व्यक्त करू लागले. आम्ही ज्या वेळी कंट्रोल ऑफिसमध्ये नियंत्रक म्हणून काम करत होतो. तेव्हा निव्वळ अशी कंट्रोलरची अखिल भारतीय संघटना अस्तित्वात नव्हती. मी कंट्रोल ऑफिसमध्ये कंट्रोलर म्हणून काम करत होतो तेव्हा आम्हाला हेडसेट वापरावे लागत. त्यामुळे हातात फोन धरून बोलण्याचा त्रास वाचायचा. हेडसेटमुळे काम सोपं व्हायचं. बोर्डवर काम करताना कंट्रोलरला एकाच वेळी अनेक कामं करावी लागतात. हेडसेट असल्याने हाताने गाड्यांचं चाटिर्ंग करायचं , तोंडाने स्टेशनांशी बोलायचं , मेंदूने गाड्यांच्या पुढील वाटचालीबद्दल प्लॅनिंग करायचं. त्याशिवाय रेल्वे कर्मचारी अधूनमधून मागतील ती स्टेशन्स द्यायची आणि साहेबांनी गाड्यांसंबंधी विचारलेल्या प्रश्नांची त्वरित उत्तरं द्यायची. अशी विविध स्तरीय कामाची लढाई चालू असायची. कंट्रोलरची नोकरी ही साहेबांचे सान्निध्य व जवळीक साधणारी नोकरी आहे. त्यामुळे आमच्या वेळी जो तो साहेबाशी वैयक्तिकरीत्या संबंध वाढवायचा व स्वत:चा फायदा करून घ्यायचा. ज्यांना साहेबांची मेहेरनजर आपल्यावर वळवून घेता येत नसे , ते म्हणत आम्ही काही साहेबांचे चमचे नाहीत. चमच्याचं राजकारण आम्ही करत नाही व जाणतही नाही. दाक्षं आंबट आहेत या न्यायाने ते वागायचे. थोडक्यात म्हणजे चमचेवाले कंट्रोलर व बिनचमचेवाले कंट्रोलर , असा संघर्ष कंट्रोल ऑफिसमध्ये सदैव चाललेला असे. परंतु आता हे चित्र बदललं आहे. अलीकडच्या नियंत्रकामध्ये संघर्षाऐवजी सहकार्याची , मैत्रीची भावना दृढ होत आहे. ही खरोखरच अत्यंत स्वागतार्ह अशी गोष्ट आहे... - व्यंकटेश बोर्गीकर |
रेल चक्र - अस्वलाला घाबरला लाल बावटा ! Red railway signal fears Bear
रेल चक्र - अस्वलाला घाबरला लाल बावटा !
इंग्रजाचं
राज्य गेलं
परंतु
गार्डाचे
पगार व इतर
भत्ते जसे
होते तसेच
सुरू राहिले.
काही काही
तरुणांचं
ध्येय असं
होतं
की
,
रेल्वेत
नोकरी करायची
तर ती
गार्डाचीच!
गार्डाला सगळे भत्ते मिळून भरपूर पगार मिळत असला तरी एखाद दुसरा गार्ड वरकमाईसाठी धडपडत असे. त्यासाठी अधिकाराचा हवा तसा वापर करत असे. एका स्टेशनवर चार मोटारसायकल ब्रेक व्हॅनमध्ये म्हणजे माल डब्यामध्ये भरायच्या होत्या. पार्सल क्लार्क नव्यानेच नोकरीला लागला होता. तो गार्ड साहेबाकडे पुस्तक घेऊन गेला व म्हणाला , ' चार मोटारसायकली भरायच्या आहेत. ' ' ही पावती घ्या व सही करा. ' तो पार्सल क्लार्क म्हणाला गार्डानं पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. तो नुसतीच पावती देत होता. गार्ड म्हणाला , ' जागा नाही ' ' मग तसं लिहा. ' गार्डने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं व गाडी सुरू करण्यासाठी शिट्टी वाजवली. तेवढ्यात त्या मोटार सायकलीचा मालक धावत आला व म्हणाला , ' राम राम गार्डसाहेब. ' ' राम राम. ' ' हे घ्या साहेब तुमची आवडती ब्रँड. ' म्हणून त्या व्यापाऱ्यानं सिगरेटच पाकीट पुढे केलं , त्याखाली नोट ठेवली होती. गार्डनं पार्सल क्लार्ककडे पाहिलं , ' ही चावी घ्या आणि लवकर भरा. ' लगेज व्हॅन पोर्टरने उघडलं. पार्सल क्लार्कनं पाहिलं की लगेज व्हॅनमध्ये भरपूर जागा होती. प्रथम गार्ड जागा नाही म्हणाला होता मग हे असं कसं ? तो नव्यानेच कामाला लागलेला पार्सल क्लार्क विचार करत पार्सल ऑफिसकडे गेला. एकदा एका गार्डला वाटलं की आपण ही वर कमाई करावी. कारण त्यानं काहीकाही गार्डकडून ऐकलं होतं की अमक्या ट्रीपमध्येे एवढं मिळाले. तर काही गार्ड म्हणायचे आम्ही त्या भानगडीतच पडत नाही. परंतु कधी नव्हे ते या गार्डला वाटलं की स्वखुशीनं जर काही मिळत असेल तर घ्यायला काय हरकत आहे. एका छोट्या स्टेशनवर मेल थांबली. एक दरवेशी गार्डकडे आला व म्हणाला , ' साहेब हे अस्वल तुमच्या पिंजऱ्यात घाला. याचे पैसे व माझ्या तिकिटाचे पैसे तुम्हाला देतो. सिग्नल नसल्यामुळे गाडी थांबली , म्हणून तुम्हाला मी विनंती करतोय ,' असं म्हणत , त्याने शंभराची नोट गार्डसाहेबासमोर धरली. गार्डनं ' ठीक आहे ' म्हणून शंभराची नोट घेतली. त्या दरवेशाला अस्वलाला डॉगबॉक्समध्ये टाकायला सांगितलं. त्यानं अस्वलाला पिंजऱ्यात टाकलं व तो पुढील डब्यात जाऊन बसला. थोड्या वेळानं गाडीला सिग्नल मिळाला तसं ड्रायव्हरनं शिट्टी वाजवली. गार्ड प्लॅटफार्मवर उभा होता त्यानं शिट्टी वाजवली. बावटा घेण्यासाठी ब्रेकमध्ये चढू लागला आणि आश्चर्य भीतीयुक्त स्वरात उद्गारला. ' अरे बापरे! ' कारण ते अस्वल पिंजऱ्यातून बाहेर आलं होतं आणि दारात बसलं होतं. गार्डला अस्वलाला ओलांडून ब्रेक मध्ये जाणं अवघड होतं. कारण त्याला अस्वलाची भीतीही वाटत होती. ब्रेकमध्ये जाता येत नसल्यामुळे बावटा घेता येत नव्हता व बावटा दाखवल्याशिवाय गाडी निघणार नव्हती. गार्ड लाल बावटाही दाखवत नाही व हिरवा बावटा ही दाखवत नाही , हे पाहून ड्रायव्हरनं आपल्या असिस्टण्टला चौकशी करायला पाठवलं. दहा मिनिटं झाली तरी गाडी का निघत नाही म्हणून स्टेशन मास्तर ड्रायव्हरकडे गेले. ड्रायव्हरने गार्ड बावटा दाखवत नसल्याचं सांगितलं. ' काय झालं! ' ' काय झालं ' म्हणून बरेच उतारूही खाली उतरले व स्टेशन मास्तरला विचारू लागले , ' मास्तर गाडी का जात नाही ?' ' तेच विचारायला गार्डकडं चाललोय. ' स्टेशन मास्तर व ड्रायव्हरच्या असिस्टण्टबरोबर उतारूही गार्डच्या डब्याकडं निघाले. ते दारात बसलेलं अस्वल गार्डला ब्रेकमध्ये येऊ देत नव्हतं. दोन्ही बावटे , लाल व हिरवा ब्रेकमध्ये होते. स्टेशन मास्तर आले व त्यांनी गार्डला विचारलं , ' काय झालं गार्डसाहेब बावटा का दाखवत नाही ?' गार्डनं सगळी हकीकत स्टेशन मास्तरला सांगितली. स्टेशन मास्तरांनी गार्डकडे पाहिलं. त्यांची नजर म्हणत होती... एक ट्रीपमध्ये पैसे मिळाले नाहीत तर काय आकाश कोसळणार होतं का ?... त्यानजरेत गार्ड पुरता ओशाळला व म्हणाला , ' मास्तरसाहेब पोर्टरला पाठवा व त्या दरवेशाला बोलवा. पुढच्या एका डब्यात तो दरवेशी बसला होता. पोर्टर दरवेशाला हुडकायला निघाला. पोर्टर प्रत्येक डब्यात जाऊन ओरडू लागला , ' दरवेशी ओ दरवेशी... ' तो दरवेशी कोणत्या डब्यात बसलाय याचा पत्ता लागेना. सगळे डबे त्या पोर्टरनं दरवेशी ओ दरवेशी असं ओरडत पालथे घातले. एका उतारून पोर्टरला विचारलं , ' दरवेशी म्हणजे काय ?' ' अस्वलाचा खेळ करणाऱ्याला दरवेशी म्हणतात. ' ' अस्सं होय , त्याला तुम्ही हुडकताय ?' ' होय. ' ' तो या बाकड्याखाली झोपलाय. अस्वल गार्डच्या डब्यात पिंजऱ्यात घातल्याचं त्यानं मला सांगितलं होतं व झोपण्यापूवीर् म्हणाला होता कर्जत आलं की मला उठवा. ' ' अस्सं कोणत्या बाकड्या खाली झोपलाय ?' पोर्टरने त्या दरवेशाला उठवलं आणि गार्डच्या डब्याकडे आणलं. त्याने अस्वलाला पिंजऱ्यात घालू का म्हणून विचारलं. दरवेशानं अस्वलाला खाली उतरवलं. अर्धा तास गाडी वाजली. गार्डने दरवेशाला शंभर रुपये परत केले व हात जोडले मग स्टेशन मास्तरला विनंती केली अस्वलामुळे गाडी वाजली असं कंट्रोलरला सांगून नका. दुसरं काहीही कारण सांगा व काय कारण सांगितलं ते मला पुढच्या स्टेशनला कळवा म्हणजे मी माझ्या पुस्तकातही तेच कारण लिहीन. माझं चुकलं मला वाचवा. स्टेशन मास्तरने कंट्रोलरला कारण दिलं , दोन पॅसेंजरमध्ये काही कारणामुळे भांडण झालं. त्यापैकी एक उतारू खाली पडला. वारंवार साखळी ओढली गेली आणि गाडी अर्धा तास थांबली. - व्यंकटेश बोर्गीकर | ||||||||||||||||
रेल चक्र - धरमपुरी बाबा का हुकूम Railway order from Dharmpuri baba snakebite
रेल चक्र - धरमपुरी बाबा का हुकूम
परिचलन विभागात काम करणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे स्टेशन मास्तर. या स्टेशन मास्तरांना रेल्वेकडून युनिफॉर्म मिळतो. त्या युनिफॉर्मचा आकार व स्टेशन मास्तरांच्या शरीराचा आकार यांचं सख्य कधीच जमायचं नाही. त्यामुळे सगळ्यांनी तक्रारी केल्या. युनिफॉर्म देण्याअगोदर माप घ्यायला एक शिंपी यायचा. परंतु माप घेतलं तरी युनिफॉर्मच्या मापात माफक फरक पडायचा. त्यामुळे मिळालेले युनिफॉर्म शिंप्याकडून अंगाला येतील असे शिवून घ्यावे लागत असत. पूवीर् दक्षिण रेल्वेचे स्टेशन मास्तर पॅण्ट घालण्याऐवजी धोतर गुंडाळत , वरून कोट घालत व टाय बांधत. खरं म्हणजे या त्यांच्या मजेशीर पोषाखाकडे पाहून हसूच येई.
छोट्या छोट्या स्टेशनवरच्या स्टेशन मास्तरांना ड्युटीनंतर वेळ घालवायचा कसा , हा प्रश्न पडत असे. गावं स्टेशनपासून दूर असायची. स्टेशनवरच्या रेल्वे क्वार्टर्समध्ये यांची राहण्याची सोय असायची. नवविवाहित जोडपी एकत्र राहायची. तेही क्वचितच कारण बायको कुरकुरायची , की इथे वेळ अजिबात जात नाही. इतर मास्तरांसारखं शहरात घर करा. मुलांच्या शिक्षणासाठी शहरात घर केलेले मास्तर दिसायचेही.
पण काही बायका हेका न सोडता शहरात घर करण्याचं टुमणं लावायच्या व आठवड्याच्या सुट्टीला येत जा , असं सांगायच्या.
त्यामुळे बहुतांश लहान स्टेशनवरच्या स्टेशन मास्तरांना मुलं होण्यापूवीर्च वेगळं घर किंवा मुलं झाल्यानंतरही वेगळं घर करावं लागे. या मास्तरांना मॅरिड बॅचलर म्हणत असत आणि या लहान स्टेशनवरच्या स्टेशन मास्तरांना टू टाइम्स पीपल म्हणत असत. म्हणजेच दोन लाइनची माणसं कारण , काम करत असलेल्या स्टेशनात एक मेनलाइन व एक लूपलाइन असायची. तर इथे ते त्याही अर्थाने लागू होत असे.
गाणगापूर स्टेशन हे दत्ताचं प्रसिद्ध ठिकाण आहे. रात्री दीडच्या सुमारास एक बैल गाडी स्टेशन समोर येऊन थांबली. घोंगड्यात लपेटलेल्या एका माणसाला चौघांनी उचलून स्टेशनसमोर निजवलं व म्हणाले , ' मास्तरसाहेब याला साप चावलाय '.
मी लगेच म्हणालो , ' त्याला इथे का आणलाय डॉक्टरकडे घेऊन जा. '
' अहो मास्तर साप चावला की लोक इथेच येतात फोनवरून मंत्र सांगतात. '
' काय ?' माझ्या टाळक्यात काहीच शिरेना. तेवढ्यात स्टेशनातला एक वयस्कर हमाल माझ्याकडे आला व म्हणाला , ' मास्तरसाहेब तुम्ही नवीन कामाला लागलात त्यामुळे तुम्हाला माहीत नाही. कंट्रोलरला सांगा ' स्नेकबाइट केस ' आहे म्हणून. ते सगळी कामं बाजूला ठेवून ताबडतोब या माणसाची माहिती घेऊन मंत्राची व्यवस्था करतील. '
मी कंट्रोलरला माणसाला साप चावल्याचं सांगितलं. कंट्रोलरला हवी असलेली त्या माणसाची माहिती दिली. कंट्रोलरने सगळं काम थांबवलं व पाच मिनिटांच्या आतच त्यांनी रिंग दिली व सांगितलं , ' त्या साप चावलेल्या या माणसाला उठवून बसवा त्याच्या कानात एकसारखं म्हणा - ' धरमपुरी बाबा के हुकूमसे साप नही काटा उठ जाओ आणि त्याला झोपू देऊ नका. '
हे मी त्या खेडूतांना सांगायचा अवकाश , ते त्या माणसाच्या कानाशी म्हणत राहिले. थोडा वेळ गेल्यावर त्या माणसाने डोळे उघडले. त्याला लिंबाचा पाला खायला दिला. त्या खेडूतांनी येताना सोबत लिंबाचा पाला आणला होता. त्याने लिंबाचा पाला खाल्ला व दोन-चारदा चावून थुंकला. तसं तो वयस्कर हमाल म्हणाला , ' त्याने पाला थुंकला बा मग त्याचं विष उतरलं. '
त्यानंतर मला स्नेकबाइट प्रकरण समजलं. यानंतर बरीच साप चावल्याची प्रकरणं ड्युटीवर घडली. तेव्हा वैद्य डॉक्टरांच्या कमतरतेमुळे साप चावला की जवळच्या रेल्वे स्टेशनात जायचं असं जणू ठरूनच गेलं होतं. रेल्वे नुसती प्रवाशांचीच काळजी घेते असं नाही , तर माणुसकीच्या बांधिलकीची बूज राखते अन् रेल्वेने प्रवास न करणाऱ्या लोकांचीही विना मूल्य सेवा करते.
- व्यंकटेश बोर्गीकर

रेल चक्र - त्या ऐतिहासिक दिनी... Railway - On Historical day
रेल चक्र - त्या ऐतिहासिक दिनी...
16 एप्रिल 1853 ला मुंबईत सुरू झालेल्या भारतीय रेल्वेला 149 वर्षं पूर्ण होत आहेत. या वाटचालीत एकपदरी मार्गाचं द्विपदरीकरण व द्विपदरी मार्गाचं चौपदरीकरण आणि चौपदरी मार्गावर पाचवी लाइन टाकण्याचं काम चालू आहे. अशा या भारतीय रेल्वे मार्गावर रोज 12,000 पेक्षा जास्त गाड्या चालतात. 1.3 कोटीपेक्षा जास्त लोकांची व 13 लाख टनापेक्षा जास्त मालाची ने-आण होते.
तर दीडशे वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रेल्वे मंत्रालयाने मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम करण्यात आले होते. यातला एक महत्त्वाचा सोहळा म्हणजे 16 एप्रिल 1853 च्या त्या ऐतिहासिक दिवशी ज्या प्रकारच्या वाफेच्या इंजिनाने 14 डब्यांची गाडी बोरिबंदरहून ठाण्यापर्यंत गेली. त्याच प्रकारचं वाफेचं इंजिन लावून , तशाच प्रकारचे जुने दुमिर्ळ डबे जोडून नेमक्या त्याच वेळी म्हणजे दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी गाडी सोडण्याचं ठरवण्यात आलं. त्याप्रमाणे दुपारी अडीच वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमाला तत्कालीन राज्यपाल डॉ. पी.सी. अलेक्झांडर , रेल्वेमंत्री नितीशकुमार , मुख्यमंत्री विलासराव देशमुख , प्रमोद महाजन , वेदप्रकाश गोयल , राम नाईक , दिग्विजय सिंग ओ. राजगोपाल , जयवंतीबेन मेहता व मंुबईचे महापौर महादेव देवळे उपस्थित होते.
रेल्वेला तिच्या गुणदोषांसह स्वीकारून आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनवलेल्या मुंबईकरांनी त्या दिवशी मध्य रेल्वेची ठाण्यापर्यंतची सगळी स्टेशन्स व्यापून टाकली आणि रेल्वेवरील आपलं निस्सिम प्रेम व्यक्त केलं होतं.
दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रम मुंबई स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 7 व 8 वर आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने खास तिकिटाचं प्रकाशन प्रमोद महाजन यांनी केलं. या प्रसंगी तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर , मनोहर जोशी , राम नाईक , जयवंतीबेन मेहता , छगन भुजबळ इत्यादींची भाषणं झाली झाली. रेल्वेमंत्री नितीश कुमार म्हणाले , की जुने ऐतिहासिक डबे आणि अत्याधुनिक जर्मन डबे यांचा संगम साधलेली गाडी धावत असल्याने आजचा दिवस , 16 एप्रिल 2002 महत्त्वाचा आहे. राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर आपल्या भाषणात म्हणाले , आपल्याला या कार्यक्रमाला राजभवनाहून बग्गीने आणण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार होता , मात्र दीडशे वर्षांपूवीर् सुरू झालेल्या रेल्वेच्या प्रारंभाला तात्कालीन गव्हर्नर फॉकलंड हे कबूल करूनही आले नव्हते. तेव्हाही त्यांच्यासाठी बग्गीच ठेवली होती. मला इतिहासाची पुनरावृत्ती करायची नव्हती म्हणून बग्गीतून येण्यास नकार दिला.
ठीक 3.35 वाजता दीडशे वर्षांचा इतिहास जागवणारी ही गाडी छत्रपती शिवाजी टमिर्नसमधून निघाली , तेव्हा उपस्थितांचा निरोप घेता घेता तिची गतीही काहीशी मंदावत होती. त्यानंतर सुरू झाला अलोट जनसागराचा उत्साह. छत्रपती शिवाजी टमिर्नस टमिर्नस सोडल्यानंतर मस्जिदबंदर , सॅण्डर्हस्ट रोड , भायखळा आदी स्टेशन्सच्या दुतर्फा असंख्य मंुबईकर या गाडीकडे कौतुकाने पाहत होते. या प्रवासाची आठवण म्हणून रेल्वेमंत्री नितीशकुमार यांनी सर्व सन्माननीय नेत्यांना वाफेवर चालणाऱ्या इंजिनाची एक देखणी प्रतिकृती भेट म्हणून दिली.
दीडशे वर्षांपूवीर्च्या भारतीय रेल्वेच्या पहिल्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी तात्कालीन कंपनी सरकारने साष्टी बेटावरील आणि ठाण्यातील सरकारी कचेऱ्या बंद ठेवल्या होत्या. योगायोग असा की 16 एप्रिल 2002 रोजी केंद सरकारच्या खाजगीकरणाच्या व कामगारविषयक धोरणाचा निषेध करण्यासाठी सार्वजनिक उद्योगातील कामगार संघटनानी बंद पाळला होता. ती संधी साधून असंख्य कामगार , कर्मचारीही या सोहळ्यात सहभागी झाले होते.
जसं एकेक स्टेशन मागे पडू लागलं तशी उत्साही जनतेची गदीर् एवढी वाढली , की रेल्वेचे इतर मार्ग गदीर्ने व्यापून गेले. अनेक उत्साही लोकांनी रुळावरच ठाण मांडल्याने एरवी आपल्या कर्णकर्कश भोंग्याने लोकांना मार्गापासून दूर पिटाळणाऱ्या उपनगरी गाड्याही मंदावल्या. दादर स्टेशनवर तर मध्य रेल्वेचे सहाही प्लॅटफॉर्म गदीर्ने ओसंडून वाहत होते. माटुंगा आणि शीवमध्ये असणाऱ्या वल्लभ संगीत विद्यालयाचे विद्याथीर् , रेल्वे वसाहतीमधल्या महिला आणि मुलं , धारावी झोपडपट्टीतील हजारो लोक होते. कुर्ला स्टेशनजवळ कसाईवाड्याला जोडणारा पूल , कुर्ला स्टेशन , घाटकोपर , विक्रोळी , कांजुरमार्ग , भांडूप , मुलुंड या साऱ्या ठिकाणी गदीर्चा महापूर लोटला होता. ठाणे स्टेशनमध्ये तर उत्साही मंडळींनी प्लॅटफॉर्मवरील छतही व्यापून टाकलं होतं. तेव्हा रेल्वे सुरक्षादल व पोलिस यांची धावपळ उडाली होती. प्लॅटफॉर्म नंबर आठच्या मागील बाजूस असणाऱ्या तलावात आनंद भारती समाज संस्थेतफेर् पारंपरिक कोळी वेषात काही कोळी बांधव व भगिनी होडीत उभे राहून या रेल्वेच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते.
साडेचार वाजण्याच्या सुमारास दुरून कुठेतरी गाडीच्या शिट्टीचा व इंजिनाचा आवाज आला. साधारणपणे कोपरी उड्डाणपुलाच्या इथून हवेत काळ्या धुराचे लोट येताना दिसले आणि ती ऐतिहासिक गाडी आता काही क्षणातच ठाणे स्टेशनवर येणार याची खात्री झाली. बरोबर 4.45 वाजता गाडी धाडधाड आवाज करत ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर सात वर आली. तसं उपस्थितांच्या टाळ्या , शिट्ट्या , आनंदाच्या व उत्साहाच्या आरोळ्या याने सारा परिसर दणाणून गेला.
5.40 वाजता सुरू झालेल्या या गाडीच्या परतीच्या प्रवासात जुनं दुमिर्ळ वाफेचं इंजिन व डबे काढून घेण्यात आले आणि जर्मनीहून आयात केलेल्या आधुनिक डब्यासह डिझेल इंजिनने ही गाडी बरोबर 6.30 वाजता छत्रपती शिवाजी टमिर्नसमध्ये आली आणि हा सोहळा पूर्ण झाला.

Subscribe to:
Posts (Atom)
Popular Posts
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King Shiwaji weapons
-
1 Land, Politics And Trade In South Asia: 2 Leadership In 21st Century: 3 Truth Is Multi Dimensional-CD Sri Sri Ravishankar Art 4 What ...
-
Click here for More articles Rashichakrakar Sharad Upadhye - Bhakti Sagar आखाडा का बखेडा? : शरद उपाध्ये - Rashichakra Sharad Upadhy...
-
Kokanatala Malvani Garana Garhana marathi garhane कोकणात देवाला गार्हाणं घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठव...
-
आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...
-
स्त्रीला गरोदर कसे करावे ? पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...
-
Marathi Bold Actress Amruta Khanvilkar When Amruta Khanvilkar was the losing fina...
-
CLICK HERE TO VIEW THIS INFORMATION
-
सुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...
Total Pageviews
Categories
- Mehandi Designs (1)
- rail chakra (18)
- rel chakra (17)
- relchakra (18)