डॉ. जोसेफ मर्फी
मानसोपचार तज्ज्ञ अंतर्मन कधीच झोपत नाही, ते विश्रांतीही घेत नाही. झोपण्यापूवीर् त्यास एखादी जबाबदारी सोपवली तर, तुम्ही उठण्यापूर्वी त्यानं ती पार पाडलेली असते. ते तुमच्या समस्यांवर उत्तर शोधून ठेवतं. याच अंतर्मनात आजारातून बरं करण्याचीही अपार शक्ती असते. झोपण्यापूवीर् केलेल्या प्रार्थनेचा चांगला परिणाम होऊन अनेक आजार पूर्ण बरे होऊ शकतात... ............ तुमचं मन ही तुमची मौलिक संपत्ती आहे. ते नेहमीच तुमच्या सोबत असतं. मनं दोन असतात. एक बाह्यमन, दुसरं अंतर्मन. एक समंजसपणा दाखवितं, दुसरं असंमजसपणा. तुम्ही नेहमी बाह्यमनानं विचार करता. सातत्यानं केलेले विचार अंतर्मनात जाऊन खोलवर रूजतात. मग त्याप्रमाणं तुमच्या प्रवृत्तीत बदल होत जातो. तुमचं अंतर्मन, तुमच्या भावनांवर नियंत्रण करीत जातं. हे अंतर्मन सृजनशील असतं. तुम्ही चांगला विचार केला तर चांगले परिणाम तुम्हाला दिसू लागतात. वाईट विचार केल्यावर वाईटच सर्वत्र भासू लागते. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. अंतर्मन जी एखादी कल्पना स्वीकारते, तीच अमलात आणते. अंतर्मनाचा हा नियम आहे. त्यास चांगलं आणि वाईट सर्वच सारखं असतं. त्यामुळे या नियमाचा नकारात्मक वापर केला तर तुमचं जीवन अपयश, नैराश्य, दु:ख यानंच भरून जाईल. तुम्हास चांगला, विधायक विचार करण्याची सवय असेल तर तुमचं आरोग्य चांगल राहील, यश हाती येईल, भरभराट होईल. मात्र, प्रत्यक्षात बाह्यमन व अंतर्मन अशी दोन मन नाहीत. केवळ एकाच मनाची ती दोन रूपं आहेत. तुमचं बाह्यमन हे केवळ कारण जाणतं. प्रत्येक गोष्टीचा विचार करून तिचा स्वीकार करते. तुम्ही पुस्तकाची निवड करता. घर पसंत करता, जीवन साथीदाराची निवड करता, हे सर्व कार्य बाह्यमनाच्या साह्यानं आपण करतो. सर्व निर्णय आपण बाह्यमनाच्या मदतीनं घेत असतो. परंतु, हृदयाची धडधड, श्वासोच्छवास, अन्नपचन, रक्ताभिसरण अशी शरीरातील अनेक महत्त्वाची कायेर् तुमच्या मजीर्वर अवलंबून नसतात. त्यासाठी तुमच्या मनानं निर्णय घ्यायची गरज नसते. ही सर्व कायेर् अंतर्मनाने होतात. तुमच्या अंतर्मनावर जे बिंबवलं जातं, किंवा तुमचं बाह्यमन ज्याच्यावर विश्वास ठेवतंं, त्या सर्वांचा स्वीकार अंतर्मन करतं. ते कसलंही वाद घालत नाही. तुमचं अंतर्मन हे जमिनीचे मशागत केलेल्या वाफ्यासारखं असतं. त्याच्यात जे बियाणं पेरलं जातं, मग ते चांगलं असो की वाईट, त्याचा स्वीकार करतं. तुमचे विचार बियाणासारखेच असतात. नकारात्मक, विध्वंसक विचार तुमच्या अंतर्मनात नकारात्मक कार्य करीत असतात. ते बाह्यअनुभवांच्या जोडीनं लगेच किंवा योग्य वेळी प्रतिक्रियांच्या रूपानं बाहेर पडत असतात. उदाहरणार्थ तुमच्या बाह्यमनानं, ठरवलं की, एखादी गोष्ट खरी आहे, प्रत्यक्षात ती खोटी असेल, तरीही तुमचं अंतर्मन ती गोष्ट खरीच असल्याचं समजेल आणि त्या दृष्टीनं कार्य करीत राहील. मानसोपचारतज्ज्ञ आणि इतर अनेकांनी यासंबंधी प्रयोग केले आहेत. त्यांनी काढलेल्या निष्कर्षांतून हीच एक बाब स्पष्ट झाली आहे. अंतर्मन कधीही निवड करण्याच्या किंवा तुलना करण्याच्या फंदात पडत नाही. बाह्यमनानं केलेली सूचना, मग ती खोटी असली तरी, अंतर्मन त्याचा स्वीकार करतं. संमोहन विद्येद्वारेही हे प्रयोग करण्यात आले आहेत. एखाद्यास संमोहित करून त्यास सांगण्यात आलं की, तू नेपोलियन बोनापार्ट आहे, किंवा मांजर आहे, किंवा कुत्रा आहे. तर संमोहित व्यक्तीच्या अंतर्मनावर ते लगेच बिंबतं, ही व्यक्ती मग तीस सांगितल्याप्रमाणं वागायला लागते. अशा व्यक्तीचं संमोहित झालेलं बाह्यमन, त्यास मिळणारे आदेश अंतर्मनाकडे पाठविते आणि अंतर्मन कसलाही विचार न करता, त्या सूचना, आदेश खरे मानून तशी कृती करायला लागतं. बाह्यमनास वस्तुनिष्ठ मन, असंही म्हटलं जातं. कारण ते वास्तवाचं भान राखून, निर्णय घेतं. त्यासाठी शरीरातील पाच ज्ञानेदियांचं साह्य घेण्यात येतं. त्यांच्या साह्यानं बाह्यमन भोवतालच्या परिस्थितीचं निरीक्षण करतं व नंतर निर्णय घेतं. परंतु, जेव्हा बाह्यमन काही कारणास्तव निर्णय घेण्याचं थांबवतं, त्यावेळी अंतर्मन सक्रिय होतं व स्वत: निर्णय घेऊ लागतं. झोपताना किंवा ग्लानी आली असेल, अशावेळी अंतर्मन काम करू लागतं. त्यासाठी त्याला ज्ञानेदियांची गरज भासत नाही. इतरत्र घडणारी घटनाही ते बघू शकतं किंवा ऐकू शकतं. ते तुमच्या शरीरातून बाहेर पडून, दूरवर जाऊन माहितीही गोळा करून आणतं. अंतर्मन झोपत नाही किंवा विश्रांतीही घेत नाही. त्यामुळे तुम्ही झोपण्यापूवीर् त्यास एखादी जबाबदारी सोपवली तर, तुम्ही उठण्यापूवीर् त्यानं ती पार पाडलेली असते. ते तुमच्या समस्यांवर उत्तर शोधून ठेवतं. याच अंतर्मनात आजारातून बरं करण्याचीही अद्भुत आणि अपार शक्ती असते. झोपण्यापूवीर् केलेल्या प्रार्थनेचा चांगला परिणाम होऊन अनेक आजार बरे होऊ शकतात, असं सिद्ध झालं आहे. प्राचीन काळी मंदिरातील अनेक धर्मगुरू आजारी माणसाला औषध देऊन त्यास लगेच झोपायला सांगत. झोपेत देव येऊन तुम्हास बरं करील, असं ते त्याला सांगत. तसं सांगण्यामागचं खरं कारण अंतर्मनाची अपार ताकद हेच होतं! अनुवाद : जॉन कोलासो
No comments:
Post a Comment