खजूर व रताळी हलवा
४ जणांसाठी
साहित्य : खजूर १० नग (१०० ग्रॅमस्) उकडलेली रताळी २ मध्यम (१५० ग्रॅमस्) खवलेला नारळ १ कप (१२० ग्रॅमस्) काजू ( तुकडे केलेले) १५ नग साखर १/२ कप (१२० ग्रॅमस्) तूप ४ टेबलस्पून कृती : १) रताळी किसून घ्यावी, खजूराचे बारीक तुकडे करावे व काजू पाण्यात भिजवून ठेवावेत. २) एका भांडयात तूप गरम करून त्यात खवलेला नारळ आणि साखर घालावी आणि साखर वितळेपर्यत शिजवावे. ३) त्यात किसलेला बटाटा घालून त्याचा रंग बदलेपर्यत मंद आचेवर परतवून घ्यावा. ४) शेवटी त्यात खजूर आणि भिजवलेले काजू घालून ५ मिनिटं परतवून घ्यावे. ५) गरम गरम खायला द्यावा.
No comments:
Post a Comment