Saturday, August 28, 2010

इतिहास म्हणजे बाजारचा भाजीपाला नव्हे!



 

इतिहास म्हणजे बाजारचा भाजीपाला नव्हे!
 
 
एक गाव आणि बारा भानगडी तसे सध्या आपल्या इतिहासाचे झाले आहे. ज्यास आम्ही किंवा आपण सारे प्रेरणादायी पुरुष म्हणून पुजतो किंवा एखाद्या प्रसंगापुढे नतमस्तक होतो तो पुरुष किंवा प्रसंग घडलाच नाही, इतिहासाच्या पानावरून अशा पुरुषांना आणि प्रसंगांना हटवा, अशा मागण्यांची उबळ महाराष्ट्रात अधूनमधून उठत असते. जातनिहाय जनगणना सुरू होण्यास वेळ आहे. मात्र इतिहास व समाजपुरुषांचे जातनिहाय वाटप महाराष्ट्रातील राजकीय पुढार्‍यांनी करून टाकले आहे व त्यानुसार युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांवर 'जात' म्हणून मराठा समाजाच्या काही संघटनांनी शिक्का मारला आहे
       ज्याने शिवरायांचे जबरदस्त असे वर्णन केले तो उत्तर प्रदेशचा कवी कुलभूषणही ब्राह्मणच होता व त्याने शिवरायांबद्दल जे लिहिले ते पुढे कुणालाही जमले नाही.
काशी की कला जाती
मथुरा की मस्जीद होती
अगर शिवाजी न होता
तो सुन्नत सबकी होती
कवी भूषण यांनी शिवरायांच्या शौर्यावर हे कवन लिहिले, पण भूषण हा ब्राह्मण होता म्हणून त्याच्या लिहिण्यावर, बोलण्यावर विश्‍वास कसा ठेवायचा? असे जातपंचायतीच्या नव्या इतिहास संशोधकांना वाटते काय? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र लोकप्रिय केले, घराघरांत नेले, सातासमुद्रापलीकडे नेले. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.
     जन्माने ब्राह्मण असलेल्या लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली .
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी तलवार गाजवली, शस्त्रे चालविली, बॉम्ब बनवले, क्रांतीच्या ज्वालेत स्वत:च्या आयुष्याचा होम केला ते बहुसंख्य ब्राह्मण किंवा दलित समाजातले वीर होते. 1857 च्या बंडाचा सेनानी तात्या टोपे, वीर नानासाहेब पेशवे, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, बॉम्बचे तंत्र हिंदुस्थानात आणणारे सेनापती बापट, देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर गेलेले एकाच घरातले तीन सख्खे चापेकर बंधू हेसुद्धा जातीने ब्राह्मण व कर्माने क्षत्रिय होते. हे सर्व क्रांतिकारक जातीने ब्राह्मण होते म्हणून इतिहासाच्या पानांवरून त्यांची नावे पुसायची व त्यांचे पुतळे कोणाला पाडायचे आहेत काय? झाशीची राणी ब्राह्मण म्हणून तिचे शौयर्र् काही लोकांना मान्य नाही. समर्थ रामदास यांना शिवरायांचे गुरू मानायला काही टोळभैरव तयार नाहीत. इतिहास म्हणजे बाजारचा भाजीपाला नसून जिद्द, रक्त व शौर्य यांच्या ठिणगीतून व बलिदानातून निर्माण झालेली ती जबरदस्त ज्वाला आहे. ती ज्वाला विझवता येणार नाही.
  
__._,_.___


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive