Saturday, November 20, 2010

मुंबईच्या म्युझियम मध्ये ..........

लेखाजोखा मुंबईचा
 
भायखळ्याला असलेल्या भाऊ दाजी लाड म्युझियम मध्ये यापूर्वी कधी गेला नसाल, तर या वीकेण्डला इथे जायला हरकत नाही. या म्युझियमचं नुकतंच इण्टिरिअरही करण्यात आलंय. मुंबई शहराचा संपूर्ण इतिहास इथे चित्ररूपात पाहायला मिळतो. त्याच अनुषंगाने काढलेली पेंटिंग्सही इथे आहेत. शिवाय, इथे दोन मिनी थिएटर्सही उभारण्यात आली आहेत. या थिएटरमध्ये रोज वेगवेगळ्या विषयांवर स्लाइड शोज दाखवले जातात. मुंबईत सापडलेल्या पुरातन वस्तू, पेंटिंग्ज, साड्या, जुने दागिने इथे पाहायला मिळतील. बुधवार व्यतिरिक्त इतर दिवशी हे म्युझियम खुलं असतं.

एण्ट्री फी : १० रुपये.

वेळ : स. १०.३० ते संध्या. ५.३०.

कसं जाल : राणीच्या बागेजवळ, भायखळा (प).
  
 
 बेस्टचा' दुमिर्ळ खजिना लंडन ट्रान्सपोर्ट म्युझिमयच्या धतीर्वर बेस्टच्या ट्रान्सपोर्ट म्युझियम बेस्टच्या आणिक आगारात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या सार्वजनिक परिवहन सेवेची साक्ष असलेल्या या म्युझियममध्ये जुन्या काळातल्या ट्रामची मॉडेल्स तर आहेतच पण खरीखुरी लाकडी ट्रामदेखील आहे. ट्रामची तिकीटं, ट्रामच्या लाकडी खुर्च्या, ट्रामचे ट्रॅक असा हा दुमिर्ळ खजिना इथे पाहायला मिळतो. १९६४मध्ये मुंबईतल्या ट्रामने केलेल्या शेवटच्या प्रवासाचे फोटो, पूवीर्च्या काळातील ड्रायव्हर कण्डक्टरचे युनिफॉर्म आहेत. १९७४मधलं तिकीट व्हॅलिडेटिंग मशिन पाहून तरुण पिढी नक्कीच थक्क होईल. दादर डेपोचे बांधकाम करताना जमिनीत सापडलेली एक अजस्त्र घंटा ठेवण्यात आली आहे. वीज पुरवठा विभागातील ब्रिटीशकालीन यंत्रणा, वीजेची पूवीर्ची मीटर अशा एकूण ११०० वस्तू यामध्ये पाहायला मिळतात. या म्युझिमयमध्ये असलेल्या ब्रिटीशकालीन घड्याळ्यासाठी वाट्टेल तेवढी किंमत मोजण्याची काही संग्राहकांनी तयारी दर्शवली होती. पण हा ठेवा बेस्टने नवीन पिढीसाठी जपून ठेवला आहे. तत्कालीन महाव्यवस्थापक मनमोहन सिंग यांच्या प्रेरणेने पांडुरंग परांजपे यांनी हे म्युझियम उभारलं होतं.

वेळ : सोमवार ते शुक्रवार सका. ९.३० ते ४.३०, एण्ट्री फी नाही.

कसं जाल?

दादर(पश्चिमेकडून) प्रतिक्षानगर डेपोसाठी १७२ व १६९ किंवा आणिक डेपोसाठी ८८ क्रमांकाची बस, एव्हराडनगरहून १०-१५ मिनिटांच्या अंतरावर चालत गेल्यास आणिक आगारला पोहोचता येईल. 
  
 
 
ओळख भारतीय इतिहासाची
म्युझियम ही केवळ लहान मुलांसाठी असतात असा जर तुमचा ग्रह असेल तर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज म्युझिअम मध्ये एकदा जरूर जा! मुंबईत येणारे टुरिस्ट फोर्टमधील हे म्युझियम पाहायला आवर्जून येतात. गेल्या वषीर् सुरू करण्यात आलेली 'कृष्णा' गॅलरी आणि कपडे तयार करण्याचे विविध तंत्र दाखवणारी यावषीर् एप्रिलमध्ये सुरू करण्यात आलेली गॅलरी ही इथली नवीन आकर्षणं. पण जुन्या गॅलरीही खास आहेत. भारतीय उपखंडातील पुरातन कला, कौशल्य, वास्तुशैली यांची ओळख करून घेण्याचा हा उत्तम मार्ग आहे. तळमजल्यावर एका कोपऱ्यात असलेले नॅचरल हिस्ट्री सेक्शनही पाहण्यासारखे. भारतीय पशु-पक्ष्यांची नानाविध रुपे येथे जपून ठेवण्यात आली आहेत. आता तर प्रत्येक वस्तूशेजारी असलेली माहिती ऐकण्याची सुविधाही नवीन टेक्नॉलॉजीमुळे उपलब्ध झाली आहे. इअरफोन लावला की बास.

थोडं निरखून पाहिलंत तर वस्तूंसोबतच म्युझियमच्या बिल्डिंगचं वैशिष्ट्यही तुमच्या लक्षात येईल. म्युझियमचा तळमजला हा जैन वास्तुशैलीत तर पहिल्या मजल्यावरील कमानी या मराठी वास्तुशैलीत बांधण्यात आल्या आहेत. म्युझियमचा परिसरही हिरवाईने बहरलेला आहे.

म्युझियमची वेळ : सका. १० ते संध्या. ६

एण्ट्री फी : लहानांसाठी-पाच रुपये, मोठ्यांसाठी - दहा रुपये

 
 
सफर झुकझुक गाडीची
अशिया खंडातली रेल्वे सुरू झाली ती बोरिबंदरपासून. आज रेल्वे भारताचा अविभाज्य घटक बनली आहे. या सफारीचा इतिहास अनुभवण्यासाठी सेण्ट्रल रेल्वे म्युझियम ला आवर्जून बघायला हवं. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेली छत्रपती शिवाजी टमिर्नसची महाकाय इमारत. ही संपूर्ण इमारत, तिची माहिती इथे यावेळी दिली जाते. शिवाय जुनी इंजिन्स तर इथे पाहायला मिळतीलच. पण रेल्वेचा सगळा प्रवास इथे वेगवेगळ्या माध्यमांमधून साकारण्यात आला आहे. शिवाय इथे माहिती देण्यासाठी रेल्वेचे इन्स्पेक्टरही असतात. आपापल्या ग्रुपने या म्युझियमला भेट देता येईल. जास्तीत जास्त १५ ते २० लोकांच्या एका ग्रुपला एकावेळी इथे भेट देता येते. फक्त त्याआधी या संबंधीचं एक पत्र जनसंपर्क अधिकाऱ्यांना सीएसटीला असलेल्या त्यांच्या ऑफिसमध्ये द्यावं लागतं. जेणेकरून त्या ग्रुपला अटेण्ड करण्यासाठी लागणारं मनुष्यबळ रेल्वेला अॅरेंज करता येतं, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी श्रीनिवास मुदगेरीकर देतात. हे म्युझियम मोफत पाहाता येतं. वीकेण्डला ही ट्रीप अॅरेंज करणं कधीही सोयीस्कर.

कसं जाल : सीएसटी स्टेशन, जनसंपर्क कार्यालय.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive