Friday, November 26, 2010

मराठी चारोळी जुगलबंदी





तुझेही पाय मातिचेच असतिल

याची जाणिव आधिच होती

म्हणुनच तुला वाहिलेली प्रत्येक ओंजळ

सुंदर फुलांची पण कागदिच होती !

 

तुझे काय ते तुला माहित

प्रेम माझे खरे होते

तुला ओळखता नाही आले

मी तर सर्वस्व तुला वाहिले होते

 

 मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,

पण तरी ते तुलाच शोधत होतं,

तुला खरच ओळखता नाही आलं,

ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.

 

कळलच नाही कधी मला

तुझ ते आतल्या आत जळण

जवळ असून ही लक्ष्यातच आल नाही

तुझ एकटीचच तरफडण

 

जवळ असून ही लक्ष्यातच आल नाही

कारण तुझी कळी कधी खुललीच नाही

मिट्लेल्या ओठामागची

निःशब्द भाषा कळलीच नाही

 

ओठ जरी माझे मिटलेले

डोळे मात्र उघडे होते

तू ओठातून फूटणार्या शब्दाची वाट पहिली

पण डोळ्यानी ते कधीच वेक्त केले होते....

 

डोळ्यांनी व्यक्त केलेस

ते डोळ्यानिच ऎकले

पापण्या मिटता मिटता

आसवांनीच टिपले

 

आसवांची फुलेच दिलीस मला तु

मौन राखिले तरी

का डोळ्यात तुज्या सदा प्रश्नभाव

राजसा प्रीत माजी हि खरी

 

खरी जरी असेल प्रित तुझी...

का केली नाही तु व्यक्त...

सदा वात बघण्यात तुझी...

आटले माझ्या देहाचे रक्त... 

 

अव्यक्ताला व्यक्त होण्याची

वाट मीही पाहिली

तू या वाटेवर वळण्या आधिच

मग ही वाट का संपली

 

मी तर तेथेच होते वाट बघत....

तुझिच नजर ना वळली....

प्रित मझ्या मनाची सदा...

तुलाच ति का कळली???

 

वाट होती अजून शिल्लक

प्रवासच संपला

ज्याचा त्याचा वाटा जितका

त्याचा त्याला मिळाला.

 

ना काही हसत शिकलो

ना काही रडत शिकलो

चालायचे तर मी

पडुन पडूनच शिकलो

 

कधी तरी आठवणींचा पट खुलतो ,

तुझा माझ्या प्रेमाचा मग डाव रंगतो

विसर मनाला कितीदा मी सांगतो

ते ही हट्टी सारे सोडून त्यामागेच धावतो

 

माझ्या मनाच माझ्या मेंदुशी

छत्तीसचा आकडा आहे

माझं मन तसं सरळ आहे

या मेंदुचाच रस्ता वाकडा आहे.

 

प्रतेक गावाबाहेर

छोटा महारवाडा आहे

चवथीच्या पुस्तकात मात्र

समानतेचा धडा आहे.

 

इथे वेडं असण्याचे

खुप फायदे आहेत

शहाण्यासाठी जगण्याचे

काटेकोर कायदे आहेत.

 

संध्याकाळच्या रंगीत आकाशात

जेव्हा दिशा भरकटून जातात

पंख फ़ुटलेली स्मृतीपाखरं

घरट्याकडे परतू लागतात

 

ओठांवर ओठ टेकवताना

भान दुनियेचं ठेवायचं नसतं

तूच तर सांगत असतेस ना, तेव्हा

डोळ्यांनीच डोळ्यांशी बोलायचं असतं

 

आयुष्यातल्या अशा प्रत्येक संध्याकाळी

वेदनांच्या सावल्या तीव्र लांबू लागतात

तुझ्याच मिठीत येऊन मी मनमुराद रडतो

गाल गोरे तुझेसुद्धा ओले होऊ पाहतात

 

आयुष्याच्या अल्बममध्ये

आठवणींचे फ़ोटो असतात

आणखी एक कॉपी काढायला

निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

 

चारचौघांमध्ये आठवणी वाटणं

ही भावनांची गुंतवणूक असते

मयूरपंखी रेशीमगाठी क्षणार्धात जुळून येतात

त्यातच त्यांची सव्याज परतफ़ेड मिळते

 

रात पुनवेची तारे आटून गेले,

प्याले नजरेचे ओठ चाटून गेले.

लाजता तू पुन्हा तशी गुलाबी,

रंग नभी पंचमी दाटून गेले.

 

एकटी स्वप्न माज़ी,

मी स्वप्नातही एकटा.

एकट्यांची ही गर्दी,

या गर्दीत मी एक एकटा...

 

भरल्या होत्या इथे हजार मैफ़ीली

सुर माझा कधी वाजलाच नाही

मी खेळलो कीत्येकदा रंग स्वरांचा

पण रंग माझा कुणासही लागलाच नाही...

 

लिहून दाखवले तरी कलले नाही,

बोलून दाखवले तरी कलले नाही,

तू त्याच्या सोबत निघून गेलीस तेव्हा कलले,

ते तुज्या पर्यंत कधी पोहचलेच नाही... 

 

घरात काळोख शिरेल म्हणुन

मी सगळी दारं लावून बसलो

आणि स्वत:च्या खुळेपनावर

अंधारात बसून हसलो

 

सुंदर लाटेवर भाळून

सूर्य तिच्याकडे आकर्षला

दिवसाची खुप आश्वासन

देऊन रात्री मात्र फितूर झाला

 

चंद्राबरोबर चांदनी एकच असते

पण तीचं नक्की सांगता येत नाही

त्याला रोज बदलताही येइल पण

तीला ते जमणार नाही

 

गावातले सगळे रस्ते

रात्री गावाबाहेर पडतात

मला घरीच परतायचं असतं

पण ते मला रानात नेउन सोडतात

 

रात्रीची जागी राहून

मी त्या चांदनिला बघत होती

ती सुद्धा माझ्याप्रमाणे

एकटीच हसत होती........

 

नाही म्हणाले नसले तरी

हो सुद्धा बोलले नाहीतो

विचारून थांबला तरी

मला काही सुचले नाही ....



Click here for Guru Thakur and his Marathi Kavita Gani lyrics

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive