Friday, November 19, 2010

काकांचा कट्टा



काकांचा कट्टा

रस्त्याने जाताना पुरुषाला मागे वळून बघायला लावणारी स्त्री हीच सुंदर असते का?
-श्रीराम पाध्ये, डोंबिवली

परवा तुम्ही रस्त्याने जाताना खड्डय़ात पडलात, त्याचं कारण आता समजलं.

सुंदर बायको नेहमी शेजाऱ्याला का?
-अमित पाटील

तुमच्या शेजाऱ्याचे मत तुम्हाला कळले तर.

स्वतच काम सांगून, काय करतोयस रे?असं रोज साहेब विचारतात, काका मला वाचवा..
- मनोहर कदम, सातारा

साहेबांची घरची कामं आधी करावीत, हे तुम्हाला अजून कसे कळत नाही. त्यामुळे त्याना घरी किती बोलणी खावी लागतात..

जर तुम्ही इंजिनिअर असता तर काय केले असते?
- हृषिकेश साळुंखे

मी कशाला काय केले असते? असिस्टंट इंजिनिअरला काम सांगितले असते.

नवरा जेव्हा  सौंदर्याची स्तुती करतो, तेव्हा त्याचा अर्थ काय असतो?
-मुकेश जाधव, सटाणा

सास-याचा प्रॉव्हिडंट फंड आला असणार.

सध्याच्या राजकारणातील घोडेबाजाराबद्दल तुमचे मत काय?
-मिलिंद म्हापसेकर, बोरिवली

माझी भूमिका नेहमी रचनात्मक असते. सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात घोडेबाजारामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

झोपेचे मोजमाप कशाने करतात?
-जी. एम. वळवी, नवापूर

कॅलेंडर त्याचसाठी तर छापतात!

राजकारणाविषयी तुमचे मत काय?
-जान्हवी भोईर

मी सध्या सत्ताधारी पक्षात असल्याने मला राजकारण आवडते.

२०२० पर्यंत जर खरंच इंधन संपले तर..
-मुकेश , पालघर

आम्ही सर्व गार पाण्याने आंघोळ करतो व कच्च्या भाज्या खातो,तुमचे बघा!

आम्हांला वाटेवर काटे मिळतात, तुम्हाला कविता कशा मिळतात?
-विजय महाम्बरे, वेंगुर्ले

सतत डोक्यात कुणाचा तरी काटा काढायचा विचार सोडून द्या!

काका तुमचे वय किती?
-भूषण वागड, वासिंद

माझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्याचे विसरलात वाटतं!




No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive