Friday, November 19, 2010

रायगड... गड बहुत चखोट



रायगड... गड बहुत चखोट

रायगड हा एक विलक्षण दुर्ग आहे.गडपती शिवाजीमहाराजांनी ज्या गडाला आपली राजधानी बनवून राज्याभिषेक केला,तो गड विलक्षण असणारच.चंद्रराव मोरयानी या गडाचा आसरा घेतला असतानाच शिवाजी महाराजांनी त्याला वेढा घातला होता.शिवाजी महाराजांनी स्वतः हा गड न्याहाळला.

Raigad_fort_towers.jpg
एका बखरीत लिहिले आहे.
'
राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट,चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे,दीड गाव उंच,पर्जन्यकाळी कडीयावर गावात उगवत नाही आणि धोंडा तासीव एकाच आहे.दौलताबाद हि पृथ्वीवर चखोट गड खरा;पण तो उंचीने थोटका.दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट जाले आणि बोलिले,तख्तास जागा हाच गड करावा.'

शिवप्रभूंचा स्थपती हिरोजी इंदुलकर याने रायगडाचे बांधकाम केले.वापी-कूप-तडाग,प्रासाद,उद्याने,राजपथ

,स्तंभ,गजशाला,नरेंद्रसदन,बारा महाल अशा अनेक इमारती हिरोजीनी रायगडावर उभ्या केल्या.रायगडाला तीन बाजूनी उभे,उत्ताल कडे आहेत.एका बाजूने वर येण्यासाठी वाट केली आहे.त्या वाटेवरही जागोजागी दगडात कोरून पायरया काढल्या आहेत.महादरवाजा हा बालेकील्ल्याखाली सुमारे एक तृतीयांश अंतरावर आहे.शिवाजी महाराजांच्या बांधणीचे हे वैशिष्ट्य आहे.
महादरवाजाखाली दीड-दोनशे फुट अवघड चढ आहे.शत्रू दरवाजापर्यंत येईपर्यंत दमावा,अशी योजना केली आहे.या बाजूला गडाला मोठी तटबंदी आहे,मूळ तटबंदीच्या बाहेर एक वेगळीच तटबंदी बांधून गड फार मजबूत केला आहे.हि तटबंदी पार 'टकमक' टोकापर्यंत पसरत गेली आहे.त्यात एक चोरदरवाजा आहे आणि एक महादरवाजा आहे.महादरवाजा बेचक्यात आहे.दोन प्रचंड बुरुज त्याचे रक्षण करतात.अशा बांधणीला जीभी म्हणतात.

या बांधनिबद्दल रायगडाला इसवी सन १६७३ साली भेट देणारा टोमास निक्ल्सने लिहिले आहे.
'
वाटेत पायरया खोदल्या आहेत.दरवाजाजवळ पायरया पक्क्या खडकात खोदल्या आहेत.जेथे टेकडीस नैसर्गिक अभेद्यता नाही,तेथे २४ फुट उंचीचा तट बांधला आहे.चाळीस फुटांवर दुसरी तटबंदी बांधून किल्ला इतका अभेद्य बनवला आहे कि,अन्नाचा पुरेसा पुरवठा असल्यास अल्प शिबंदीच्या सहाय्याने तो सर्व जगाविरुद्ध लढू शकेल..!'

कड्याच्या टोकावर बांधलेली महादरवाजाची तटबंदी रायगडाला अभेद्य बनवते.शिवाजीराजांनी दुर्गबांधणीची कला आत्मसात केली होती.तटबंदीसाठी निवडलेली जागा अत्यंत उत्तम आहे.काही किलोमीटर्स लांबीची राजगडाची तटबंदी हे त्याचे,तर फक्त दीड-दोनशे मीटर्स लांब रायगडाची तटबंदी हे त्याचे वैशिष्टआहे.


===

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive