Friday, November 19, 2010

*२५ हजार व्होल्टचा मृत्यू..सर्वाचेच डोळे उघडणारा!*






To: ALL MY DEAR FRIENDS 

 *२५ हजार व्होल्टचा मृत्यू..सर्वाचेच डोळे उघडणारा!*

मोबाईल फोन व डिजिटल कॅमेरा यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचाचा कुठे आणि कसा
वापर करू नये याविषयी दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे आपण सर्वच जण 'चलता है' अशा
बेफिकीर वृत्तीने दुर्लक्ष करतो. पण आदित्य सुरेश जोशी या पुण्यातील १९
वर्षांच्या मुलाचा अलीकडेच झालेला मृत्यू अशी बेफिकीरी कशी प्राणघातक ठरू शकते
याबद्दल आपणा सर्वाचाच डोळे उघडणारा आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्या वर्षांत शिकणारा आदित्य सप्टेंबरच्या
शेवटच्या आठवडय़ात त्याच्या कॉलेजच्या 'स्टडी टूर'साठी अमरावती येथे गेला
होता. २५सप्टेंबरच्या
सकाळी त्याचे सर्व सहाध्यायी व शिक्षक 'स्टडी टूर' संपवून मुंबईला परत
येण्यासाठी बडनेरा रेल्वे स्टेशनवर आले. गाडीची वाट पाहात थांबले असता अनेक
विद्यार्थ्यांनी आपापल्या मोबाईल फोनने किंवा डिजिटल कॅमेऱ्याने एकमेकाचे व
ग्रुप फोटो काढण्यास सुरुवात केली. सर्व ग्रुप कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये येत
नाहीत व फोटोसाठी 'अँगल'ही नीट मिळत नसल्याची अडचण त्यांच्यापैकी फोटो
काढणाऱ्या एका विद्यार्थ्यांने मांडली. एकाने सूचविले की, गाडीच्या डब्यावर
चढून त्या वरच्या 'अँगल'ने फोटो काढला तर फ्रेममध्ये सर्वजण व्यवस्थित सामावू
शकतील. मित्राने केलेल्या सूचनेप्रमाणे आदित्य चांगला फोटो काढता यावा यासाठी
डिजिटल कॅमेरा घेऊन समोरच्या मालगाडीच्या एका तेलाच्या टँकरवर चढला. त्याच्या
डोक्याच्या वर काही फुटांवर २५ हजार व्होल्टचा विद्युतप्रवाह वाहून नेणारी
रेल्वेची 'ओव्हरहेड वायर' होती. आदित्यने कॅमेऱ्याचा फ्लॅश मारताच 'ओव्हरहेड
वायर'मधील विजेचा प्रवाह त्याच्या कॅमेऱ्यात व त्यातून त्याच्या शरीरात
शिरला. वीजेच्या
एवढया उच्च दाबाच्या झटक्याने आदित्य क्षणार्धात अर्धवट जळलेल्या स्थितीत
तेलाच्या टँकरवरून खाली फेकला गेला. अचानक घडलेल्या या प्रकाराने आदित्यचे
सहाध्यायी व शिक्षक बिथरून गले. त्यावेळी आदित्यचे वडिल बँकॉकमध्ये होते. अनेकांना
तात्काळ मोबाईलवरून फोन व 'एसएमएस' केल्यानंतर आदित्यच्या वडिलांच्या पुण्यातील
मित्रांनी 'एअर अ‍ॅम्ब्युलन्स'ची व्यवस्था केली. आदित्यला मुंबईच्या केशवानी
इस्पितळात दाखल केले गेले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली पण २८ सप्टेंबर
रोजी आदित्यचा दुर्दैवी मृत्यू झाला.
*पेट्रोल पंपावर मोबाईल फोनचा वापर कर नका. मोबाईल चार्जिगला लावलला असताना
त्याच्यावर बोलू नका. उच्च दाबाच्या वीजेच्या तारा जेथून जात असतील अशा ठिकाणी
मोबाईल किंवा फ्लॅशलाईटचा वापर करू नका. विमान आकाशात असताना मोबाईल व
कॅमेऱ्याचे फ्लॅश वापरू नका. रात्री झोपताना अंथरुणाजवळ मोबाईल फोन चार्ज करत
ठेवू नका. अशा सूचना आपण सर्वजण वाचतो. पण बहुतांश प्रत्यक्षात त्याचे पालन
करीत नाहीत. यामुळे आपल्यापैकी कोणाच्याही नशिबी घातक क्षण केव्हाही येऊ शकतो
याची प्रकर्षांने जाणीव करून देणारी आदित्यच्या मृत्यूची ही घटना.
*हे का घडले? घटनेमागचे विज्ञान..
हायटेन्शन वायर्सच्या परिघामध्ये मोठय़ा प्रमाणावर अधिक तीव्रतेचे विद्युत- चुंबकीय
क्षेत्र असते. या क्षेत्रामुळे जवळच्या गोष्टींवरती मोठा विद्युतभार प्रवर्तित
होऊ शकतो, असे सांगून होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. हेमचंद्र
प्रधान म्हणाले की, धातूची व बोथट आकाराची वस्तू असेल तर मोठा विद्युतभार
जमिनीकडे वाहून नेला जाऊ शकतो. तो भार जमिनीपर्यंत पोहोचला की, विद्युत मंडळ
पूर्ण होते व विजेचा मोठा धक्का बसतो, ज्यात प्राणावर बेतू शकते. या
घटनेमध्येदेखील असेच झालेले असावे. त्या विद्यार्थ्यांने क्लिक केले त्यावेळेस
ते विद्युतमंडळ पूर्ण झाले. फ्लॅशचा या घटनेशी कोणताही संबंध नसावा. हा
विद्यार्थी आणि धातूची असलेली बोगी यामध्ये काही लाकडी वस्तू असती तर विद्युत
मंडळ पूर्ण होण्यात अडथळा निर्माण झाला असता आणि अनर्थ टळला असता, असेही
डॉ. प्रधान
म्हणाले.




No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive