Mojito (mo-HEE-to, मोहितो).
मोहितो कुठे आणि कोणि शोधले हा वादाचा मुद्दा आहे. हे एक क्युबन क़ॉकटेल आहे हे मत मी स्विकारून माझ्यापुरता वाद संपवला आहे
उन्हाळ्यात, रणरणत्या उन्हाच्या काहिलीवर हा रामबाण उपाय (उतारा म्हणू का ? )
साहित्य:
व्हाइट रम - 2 औस
लिंबाचे लहान तुकडे(फोडी) - 4-5
ब्राउन शुगर - एक चमचा (दुसरा पर्याय: पीठी साखर)
पुदीन्याची ताजी पाने - 8
लिंबाचा रस - 0.5 औस
शुगर सिरप - 0.5 औस
सोडा
बर्फ - बारीक तुकडे केलेले (क्रश्ड आइस)
ग्लास - कोलीन्स असल्यात उत्तम
कृती:
ग्लासमधे लिंबाचे तुकडे(फोडी), ब्राउन शुगर आणि पुदीना (5 पाने) टाकून ते चेचावे.
(चेचण्याच्या प्रक्रियेला मड्ल (Muddle) म्हणतात. चेचल्यामुले पुदीन्याचे फ्लेवर सुटुन एक आगळीच फ्रेश चव येते)
आता रम, शुगर सिरप, लिंबाचा रस त्यावर ओता. बर्फाने ग्लास भरून घ्या. कॉकटेल स्पूनने व्यवस्थित स्टर
(ह्या, 'ढवळा' हे कसेसेच वाटतेय म्हणून स्टरच ) करा. ग्लासच्या उरलेल्या जागेत सोडा टाकून ग्लास टॉप अप करा. उरलेली 3 पुदीन्याची पाने सजावटीकरीता ग्लासच्या कडेला लावा. मोहितो तयार.
No comments:
Post a Comment