Sunday, September 12, 2010

सौंदर्यपूर्ण, विश्‍वासार्ह सजावटीसाठी...

सौंदर्यपूर्ण, विश्वासार्ह सजावटीसाठी...



घराची सजावट म्हटलं की मुख्यत्वे सोफा, फर्निचर आणि बेडरूम या तीन गोष्टी चटकन डोळ्यांसमोर उभ्या राहतात. या सर्वच गोष्टी एकाच ठिकाणी मिळणे फार अवघड असते. सध्या मोठ्या-मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये अशा सुविधा उपलब्ध आहेत; मात्र त्यामध्ये विश्वासास पात्र आहेत की नाही याची शंका वाटते, परंतु हाच विश्वास आपल्याला पुण्यातील "कम्फर्ट' फर्निचरमध्ये अनुभवायला मिळतो. विश्वासाबरोबरच कम्फर्टच्या आणखीही अनोख्या सेवांबद्दल आणि गणपती उत्सवासाठी लॉंच होणाऱ्या विशेष योजनेबद्दल "कम्फर्ट'चे सचिन पाटील महेश देशपांडे यांच्याशी साधलेला संवाद...

 

कम्फर्ट वाटचाल कशी सुरू झाली?

* सुमारे 12 वर्षांपूर्वी आम्ही औरंगाबादमध्ये कम्फर्ट फर्निचरची सुरवात केली. त्यानंतर व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने पुण्यनगरीत औंध परिसरात तीन वर्षांपूर्वी पहिले "कम्फर्ट'चे दालन सुरू केले त्यानंतर ग्राहकांचा विचार करून शहराच्या मध्यवर्ती भागात कर्वे रस्त्यावर सर्व सोयी-सुविधा असणारे प्रशस्त दालन घेऊन आम्ही पुणेकरांच्या सेवेत रुजू झालो.

कर्वे रस्त्यावरील कम्फर्ट फर्निचरचे दालन सुरू करून नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या तीन वर्षांच्या अल्प कालावधीत आम्ही अनेक ग्राहकांना आपलेसे केले आहे.

 

नवे घर खरेदी करताना घराची सजावट

कशा प्रकारे "कम्फर्ट' असावी?

* नवे घर घेताना सजावट करण्याच्या हेतूने एखादा ग्राहक आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही त्याच्या घरी "फ्री साइट व्हिजिट' देतो. घरात उपलब्ध असणाऱ्या जागेचे मोजमाप घेऊन आम्ही थ्री-टू, थ्री-वन-वन त्यांच्या आवडीनुसार आम्ही ग्राहकांना सोफे घेण्याचा सल्ला देतो. घराची सजावट करताना ती अतिशय आरामदायी आणि आकर्षक असावी.

 

कम्फर्टच्या सेवेचे वेगळेपण काय?

* "कम्फर्ट'मध्ये फॅब्रिक्सच्या जवळपास विविध अशा 100 प्रकारच्या "वाइड रेंज' आहेत. ग्राहक आमच्याकडे आला आणि त्यांना मोठा सोफा आवडला; पण तो त्यांच्या उपलब्ध जागेत मावत नसेल तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्या जागेत बसेल एवढ्या आकाराचा सोफा त्यांना "सजेस्ट' करतो. अशी सेवा देणारी फर्निचर दालने पुण्यात फारच कमी आहेत आणि हेच आमचे वेगळेपण आहे. त्याचबरोबर आमच्या येथील सर्व फर्निचर मलेशियन असल्यामुळे "डिसमेंटल' होऊ शकते. काही वर्षांनंतर घर बदलायचे असेल तर फर्निचरदेखील डिसमेंटल करता येते, ही आमची खासीयत आहे. फर्निचर "वॉटर रेझिस्टंट' आणि "टर्माइट' आहेत.

 

बेडरूम सोफा यांची कॉस्ट रेंज काय आहे ?

* बेडरूम सेट प्लायवूड आणून करून घ्यायचं आत्ताच्या धावपळीच्या काळात फारसं शक् होत नाही. कॉस्टवाईज रेडिमेडपेक्षा बेडरूम घरी बनवून घेणे कधीही महागाचे पडते. आपल्या येथे 55 हजारांपासून 1 लाखापर्यंतच सुंदर बेडरूमसेट आहेत. त्यामध्ये डबल बेड विथ स्टोअरेज, दोन साइड टेबल, फोर डोअर वॉर्डरूम असा पूर्ण एक मास्टर बेडरूम पॅकेज उपलब्ध आहे. त्यासाठीसुद्धा आपल्याकडे वेगवेगळे सात ते आठ सेट लागले आहेत. आपल्या येथील सोफ्यांमध्ये मुख्य फायदा म्हणजे मार्केटमध्ये सोफ्याला फक्त एकच वर्षाची वॉरंटी दिली जाते; पण आम्ही तीन वर्षांची वॉरंटी देतो, कारण आमच्या सोफ्यावर तेवढा विश्वास आहे. सोफ्याची फ्रेम आणि फोम या दोन गोष्टी मुख्य असतात. याच दोन गोष्टींसाठी तीन वर्षांची वॉरंटी दिली जाते. सोफ्यामध्ये 28 हजारांपासून 1 लाख 80 हजारांपर्यंतची वेगवेगळी मॉडेल्स आपल्या येथे उपलब्ध आहेत. यामध्ये 1 लाखाच्या पुढील सर्व सोफा प्युअर टिकवूडचे आहेत. अशा प्रकारचा एक सोफा तयार करायला 15 दिवस लागतात. ते पूर्ण हॅंडक्राफ्टेड असतात. ज्या सिझनमध्ये लाकूड तोडून उत्तम होते तेव्हा हे सोफे तयार केले जातात. हे सर्व सोफे 9 सिटर आहेत. यामध्ये आपण फॅब्रिक् आणि पॉलिश ग्राहकांच्या आवडीनुसार बनवून देण्याची सुविधा आमच्याकडे आहे. प्रत्येक तीन महिन्यांनंतर आम्ही 4-5 नवीन मॉडेल्स दालनात उपलब्ध करून देतो. 1 लाख 65 हजारांमध्ये असणाऱ्या विशेष स्किममध्ये मास्टर बेडरूम सेट, एक चिल्ड्रन बेडरूम सेट, एक सोफा, चेअर डायनिंग टेबल आणि टीव्ही सेट आपण ग्राहकांना देतो. या होम पॅकेजला आत्तापर्यंत ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.

 

गणेश उत्सवासाठी कोणती विशेष योजना आहे ?

* 28 ऑगस्टपासून आम्ही गणेश उत्सवासाठी विशेष योजना आणत आहोत. पुण्यनगरीत गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कम्फर्टमध्ये 40 हजार किमतीच्यावर खरेदी करणाऱ्या ग्राहकाला 5 इंचांची चांदीची गणेशमूर्ती भेट देणार आहोत. 28 ऑगस्ट ते 21 सप्टेंबर हा कम्फर्टचा विशेष गणेश फेस्टिवल असणार आहे. या योजनेमागील उद्देश फक्त पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखणे, हा आहे.

या चांदीच्या मूर्तीसोबत दुसरी छोट्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली, तर त्या दुसऱ्या मूर्तीचे विसर्जन करता येईल.

 

विक्रीपश्चात सेवेबाबत काय ?

* विक्रीपश्चात सेवा देण्यासंदर्भात कुठलीहा कसूर वर आम्ही ठेवत नाही; कारण त्यातूनच ग्राहक जोडला जातो. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारच्या फायद्याचा विचार करत नाही. कारागिरांचे चार्जेस आणि काही बदलायला लागणारे चार्जेस फक्त आम्ही लावतो. विक्रीपश्चात सेवा दिल्यामुळेच आम्ही बाजारात आज अग्रस्थानी आहोत.

सध्या फर्निचरचा नवीन ट्रेंड काय आहे ?

* कॉर्नर सोफा हा सध्याचा लेटेस्ट ट्रेंड म्हणता येईल. यामध्ये थ्री सीटर आणि एक लॅंजर असतो. हा सोफा हवा तसा फिरवता येतो. याचा फायदा म्हणजे तीन व्यक्तींना बसता येते आणि एक व्यक्ती आरामात झोपू शकते. मास्टर बेडरूम सेटमध्ये ड्यूको, वूड फिनिश आणि सेमी लेदर आहेत. येणारा फर्निचरचा ट्रेंड मिसमॅचचा असेल.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive