Tuesday, November 9, 2010

सम्राट ओबामांचा विजय असो!

सम्राट ओबामांचा विजय असो!

पांडवांना न्याय मिळावा म्हणून भगवान श्रीकृष्ण कौरवांच्या दरबारात दाखल होतात. अर्थात दुयोर्धन कृष्णशिष्टाईला दाद देत नाही, पांडवांना सुईच्या टोकावर राहील इतकीही जमीन देणार नाही असे सांगत आम्ही युद्धाला तयार आहोत असेही जाहीर करतो.

दरबारात कृष्ण एकटा आहे हे बघून त्याला ताब्यात घेण्याचाा विचार दुयोर्धन आणि त्याचे सल्लागार करतात. नाहीतर त्याला जेवायला बोलावून विष द्यावे असेही सुचवले जाते, कारण पांडवांना हरवण्यात कृष्ण हाच मोठा अडथळा आहे हे कौरवांना कळलेले असते.

पण कृष्ण हा अधिक चतुर असतो. तो भर दरबारातच कौरवांना इशारा देतो की माझ्च्या रक्षणसाठी असलेल्या सैन्याने राजवाड्याभोवती वेढा घातला आहे. माझ्या अंगाला हात लावायचाा विचार कराल तर इथेच तुमचा नाश मी घडवून आणीन. एकप्रकारे महासत्तेचा सावधपणा आणि ताकदीचा अीभमान यातून दिसतो.

जगात सर्वशक्तीमान असणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत दौरा आटोपून आजच परतले आहेत ते हाच सावधपणा बळगून आहेत. याचा अर्थ त्यांना भारतापासून धोका आहे असे नव्हे तर जगभर दहशतवादाने थैमान घातले असताना कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते हे ओबामा जाणतात आणि अमेरिकाही जाणते. त्यामुळे ओबामांना संरक्षणाचा पूर्ण वेढा आहे. सर्वसामान्य भारतीयांना हे अती वाटेल, पण कोणताही सम्राट असाच वागणार.

शिवाजी महाराजांना दोन हजार सैनिकांचे कायम कवच असे. महाराजांना सोडून ते कधीच जात नसत. महाराजांचे लढाईसाठी सैन्य वेगळे होते. महाराजा सतत सावध असत. त्यामुळे ते कधीही संकटात सापडले नाहीत.याउलट संभाजी महाराज गाफील राहीले, औरंगझेबाच्या सैनिकांनी त्यांना पकडून नेले आणि औरंगझेबाने अत्यंत क्रुरपणे त्यांना मारले. महाराष्ट्राचा इतिहास या घटनेमुळे बदलला. मराठेशाही यामुळे मुळापासून उखडली जाण्याची शक्यता निर्माण झाली.

अर्थात भारतीय सवोर्च्च नेतृत्वही अशीच काळजी घेत असते. इंदिरा गांधींनी थोडी गफलत दाखवली आणि त्यांना शीख सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घातल्या. अतिरेक्यांनी ताबा घेतलेल्या अमृतसरच्या सुवर्णमंदिरात सैन्य घुसवून त्यांनी देशावरील फार मोठे अरिष्ट टाळले. तेव्हाच त्यांना सल्ला देण्यात आला होता की, त्यांच्या संरक्षणासाठी असलेले शीख रक्षका काढा. तसे करणे म्हणजे शीख समाजावर अविश्वास दाखवणे होईल असे सांगत त्यांनी तसे करणे नाकारले आणि त्याची फार मोठी किंमत देशाला मोजावी लागली.

देश जितका प्रबळ तितके त्याचे नेतृत्व स्वत:च्या संरक्षणाबाबत अधिक सजग असावेच लागते. काही वेळा त्याचा अतिरेक होतो आहे असेही दिसते. याचे कारण रक्षकांना नक्की कळत नसते की आपल्या नेत्याच्या जवळ कोणाला आणि किती येऊ द्यायचे. याचा अर्थ मुख्यमंत्री अशाोक चव्हाण आणि ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ

यांच्याकडे अमीरिकेच्या अधिकाऱ्यांनी ओळखपत्राची मागणी करणे हे सारासारविवेग्क नसल्याचे लक्षण आहे.

ओबामा हे सम्राट आहेत आणि त्यांचा एकंदर लवाजमा, रुबाब हे शाही इतमामामला साजेशे असणे अपेक्षितच आहे. त्यांनी भारताशी मैत्रीचे संबंध जुळवण्यात अमेरिकेचे हित साधणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे यात भारताचे भाले होणे न होणे हा दुय्यम मामला आहे. आमच्या बरोबर या, नाहीतर परमेश्वर तुमचे रक्षण करो (आमच्यापासून) असा सम्राटाचा गभिर्त इशारा असतो. काही वेळा सम्राट थेट आक्रमण करतो, किंवा आथिर्क निर्बंध लादतो अथवा स्थानिकांना हाताशी धरून उठाव घडवून आणतो. गेल्या अर्धदशकांत अमेरिकेने असे उपदव्याप केल्याची उदाहरणे आहेत. चिलीमध्ये वाहतूकदारांचा संप घडवून आणून आपल्या विरोधी सत्ताधारी सरकारला अमेरिकेने हकलवले. प्रमुखाची हत्या घडवून आणली.

अमेरिकेन माणसालाही आपण सर्वशक्तीमान देेशाचे नागरिक आहोत याचा अभिमान असतो आणि तो कोणत्याही देशात असला तरी त्याच्या वागण्यात आपण अमेरिकन आहोत याचा ताठा असतो.

अशा या अमेरकेचा सम्राट भारतात येऊन गेला. सम्राटाच्या थाटात त्याने भारताला काही भेटी दिल्या. भारतानेही, सम्राट नाराज होऊ नये म्हणून त्याचे काही म्हणणे मान्य केले. चॅनल्समुळे आपण हे सारे अनुभवले.

सम्राटाचा जयजयकाय करत असताना, आपण सम्राट होण्याची स्वप्ने बघत अस तरच या जयजयकाराला अर्थ आहे!


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive