Sunday, October 30, 2011

एव्हड्या टोकाचा अहं असल्यावर 'को-ऑपरेटीव्ह ' हा शब्द फक्त नावालाच उरणार.

बँकेत लाख पैसे आहेत तुमच्या ;पण ऐन वेळी मदतीला माणूसच लागतो.नुसती बँकेची पुस्तक पाहून समस्या सुटत नाहीत. अलीकडे सगळी काम पैशाने होतात---- हा भ्रम वाढत चालला आहे.त्यामुळे एकमेकांवर विसंबून मार्ग काढण्याची सहकरुणा हरवत चालली आहे. घाटात गाडी बंद पडल्यावर एखादा फाटका ट्रक ड्रायव्हरच मदतीला येईल.त्या क्षणी खिशातल्या नोटा काहींही करू शकत नाहीत. सहकारी सो.मध्ये कित्येक अपघात एकमेकांत मोकळा संवाद असेल तर कमी होऊ शकतील.सर्वांचा संवाद असेल तर संभाव्य घातपात टळू तर शकतीलच ,शिवाय एकमेकांची केव्हढी सोबत होईल!!! सोसायट्यांची नाव नुसती 'आनंद ','समाधान' शांती ,सुगंध असण्यापेक्षा नात्यातून ते नाव फुलायला हव.

प्रत्येकाच्या मालकीचे ब्लॉक असले तरी त्या मालकीला मर्यादा आहेत.हि मालकी जागेवरची असली तरी दुसऱ्याच्या अस्तित्वावरची नाही ,हे
उच्च विद्या विभूषितांनाही कळत नाही. भयानक कर्कश आवाजात टेप लावणे .....कुणाचीही परवानगी न घेता स्वताच्या घरात वाटेल तो बदल करणे..... 'हि' भिंत तोडली ,'ती'तिथे उभारली ..... हा ओटा फोडला तिथे बांधला ...... या सुधारणा स्वताच्या घरात करताना पूर्ण इमारतीला बसणारा हादरा सर्वांना सोसावा लागणार हे या लोकांच्या जाणीवे-पलीकडे असते.

राहायचं एका ठिकाणी ,एकत्र असण्याचे फायदे हवेत आणि ते फायदे घेऊन झाल्यावर मात्र एकमेकांसाठी थोडी झीज सोसायची तयारी मात्र नको.
  एका अत्यंत उर्मट फ्लाट-धारकाला एकाने सुनावले ,अहो....मेल्यानंतर तरी ४ मानस लागतीलच ना तुम्हाला ? तर तो तेव्हड्याच एरंदेली स्वरात म्हणाला "मला कशाला लागतील? मी तर मेलेलो असेन , तुम्हालाच मी घरात पडून राहाण परवडणार नाही ".आता एव्हड्या टोकाचा अहं असल्यावर 'को-ऑपरेटीव्ह '
हा शब्द फक्त नावालाच उरणार.

माणसांमधला असा बदल अनुभवत असताना प्राण्यांच्या जगात 'माणूस-कि 'टिकून असल्याच अचानक
कळलं. "सद्गुरू सेवाश्रम येऊर च्या भगवानराव पटवर्धनानी सांगितलं "मध्यरात्री एका वाघाने वासरावर झडप घातली .....
जवळच्या २ बैलांनी प्राणपणाने गळ्यातली दावी तोडून वाघाशी मुकाबला केला . त्या वासराला वाघाच्या जबड्यातून
सोडवलं.इतकंच नाही तर रात्रभर वासराला मध्ये ठेवून एखाद्या संरक्षका प्रमाणे दोन्ही बाजूला दोघे शिंग रोखून उभे होते. पुन्हा वाघ आला च तर तयारीत असायला हव म्हणून.

मानस बैलासारखी वागतात ,अस का म्हणतो आपण ? बैल एव्हड शहाण्यासारखं वागताना पाहिलं कि वाटत, आपल्यातच पुष्कळ सुधारणा
  व्हायला हवी.

शेजाऱ्याच्या व्यथेवर फुंकर घालायला जो दरवाजा उघडत नाही ,तो आपल्यासाठीही जगाचे दरवाजे बंद करतो.आणि आपल्याला कधीच
 कुणाची च गरज लागणार नाही ,अशा मिजाशीत असणाऱ्यांना परमेश्वराने सतत सुखीच ठेवावं; एव्हडीच प्रार्थना आपण करू शकतो ,दुसर काय?

प्रवीण दवणे.... More Here......

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive