Monday, October 3, 2011

Unknown Information about Chhatrapati Shivaji Maharaj


Unknown Information 
about 
Chhatrapati Shivaji Maharaj 
..या भूमंडळाचे ठायी  धर्मरक्षी ऐसा नाही |
महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हाकारणे ||
समर्थांच्या या ओळींमधील जो ‘महाराष्ट्र धर्म’ हा सहा अक्षरी शब्द आहे, याचे महत्व, या शब्दात असणारा मर्म, स्वत:च्या धर्माबद्दल असणारा अभिमान आणि तो आपल्या कृतीतून वेळोवेळी सिद्ध करणारा एक सार्थ राजा - समर्थ उद्धृत हे विशेषण जर कुणास लायक असेल आणि या महाराष्ट्रधर्माचा या पृथ्वीतलावरती कुणी पुरस्कर्ता असेल तर ते नि:संकोच पणे छत्रपती शिवाजी महाराज.
आजकाल शिवाजी महाराज हे सेक्युलर कसे होते हे दाखवण्याचा उदो उदो केला जातोय आणि उगाच ची बडदास्तीच जास्त प्रमाणात दिसून येते. हिंदू  धर्मावरती होणारे यावनी आक्रमण आणि या आक्रमणास त्याच पद्धतीने चोख प्रत्युउत्तर देणे यात काही गैर नाही आणि ते नसणेच योग्य ! आणि हेच वेळोवेळी शिवाजी महाराजांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे, आजपर्यंत ह्या सर्व घटनांवरती कुणी जास्त प्रकाश टाकलेला नाही तेव्हा त्या प्रखर सुर्यप्रतापाच्या दिग्विजयी गाथेतील हे मर्म कथण्याचा मज काजव्याचा प्रयत्न …
या सगळ्या नोंदी ह्या समकालीन लोकांनीच करून ठेवल्या आहेत, सर्व बाबींचा पाठपुरावा आपण इतिहासातूनच क्रमवारीने घेऊया.
१) सर्व प्रथम महाराजंचे निकटवर्तीय कवींद्र परमानंदकृत शिवभारतामधील उल्लेख पाहूयात.
त्वया गृहित्वा कल्याणं तथा भीमपुरीमपी |
यवनांना महासिद्धीनिलया: किल पातीत: ||
- याचा अर्थ असा शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी काबीज करून यवनांच्या मशिदी जमीनदोस्त केल्या (शि.भा.अ-१८/५२).
२) हिस्टोरिकल मिसेलनी मधील जेसुइट पत्रांमध्ये मधे फादर हेरास यांचा वृतांत आहे तो पाहूयात,
- हिंदुस्तानातील यवनांचे बळ लक्षात घेऊन भविष्यात त्यांचा प्रतिकार करण्यासाठी बंदोबस्त करण्यास सुरवात केली आणि यवनांना या राज्यातून शिवाजी महाराजांनी घालवून लावताना त्यांच्या मशिदींचा अपमान केला (Desecration of Mosques)असा उल्लेख आहे. (हिस्टो.मिसेलनी – पृ-१३)
वरील दोन्ही घटनांचा विचार करता काय समजावे की शिवाजी महाराज असे कृत्य करतील ?
होय हे होते प्रत्युत्तर, औरंगजेबाने काशी विशवेश्वराचे मंदिर फोडले, त्याचे कळस जमीनदोस्त केले या कृतीचे आणि त्या औरंगजेबास त्याच कृतीने महाराजांनी उत्तर दिले तर ते चुकीचे होते का ?
३) आता आपण इतिहासाला परिचित असणारी पण बऱ्याच अभ्यासकांना अपरिचित असणारी अशी घटना काय आहे ती पाहूयात, वाचून कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही पण जे सत्य आहे ते सांगायलाच हवे.
- १६६७ साली गोव्याच्या व्हाइसरॉयने रोमन कॅथलिक धर्म वगळून इतर धर्माच्या माणसांना हद्दपारीचा हुकुम काढला, त्यावेळी या जाचक हुकुमा विरोधात तिथल्या लोकांनी शिवाजी महाराजांकडे तक्रार केली त्यावेळी महराजांचा मुक्काम बारदेश जवळच होता, महाराजांनी लगेच बारदेशवर स्वारी केली आणि तिथल्या चार पाद्री लोकांना पकडून आणले आणि विचारले ‘हिंदू होताय का ?‘ आणि त्यांनी नाकारल्यामुळे महाराजांनी त्यांची मुंडकी कापली आणि गोव्यात पाठवून दिली. दुसऱ्याच दिवसापासून व्हाइसरॉयने तो जाचक हुकुम मागे घेतला, या स्वारीत महाराजांना १५० लक्ष होनांची लुट मिळाली.(शि.प.सा.सं-ले-११८६)
४) छत्रसाल बुंदेला हा शिवाजी महाराजांना भेटायला आला तेव्हा छत्रसाल आणि महाराज यांच्यामध्ये जे संभाषण झाले ते छत्रसालाचा आश्रित लाल कवी याचे मुळ नाव गोरे लाल याने ‘छत्रप्रकाश‘ या काव्यामध्ये लिहून ठेवले आहे, या काव्यामध्ये एके ठिकाणी शिवाजी महाराज छत्रसाल याला म्हणतात
हिंदूंचा आणि तुर्कांचा मिलाप कधी झाला आहे का ? तुम्ही तर क्षत्रियांचे मुकुटमणि, तुम्ही परत जा आणि तुमची मायभूमी जिंका, या तुर्कांवरती माझी तलवार सदैव उगारलेली आहे, त्यांचा संहार करा. (Shivaji Souvenir-p-159-160)
५) इस्ट इंडिया कंपनीचा भारतातील प्रतिनिधी आणि राजापूरच्या वखारीचा प्रमुख ‘हेनरी रेव्हिंगटन’ याने १३ फेब्रु १६६० या दिवशी शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो -
- “General of the Hindoo forces” (हे हिंदू सेनाधिपती शिवाजीराजा), त्याकाळी  देखील इंग्रजांची धारणा हिच होती की शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत. (शि.प.सा.सं-ले-८०१)
६) कृष्णाजी अनंत सभासद यांनी आपल्या नोंदीमधे महारजांबद्दल सुंदर लिहिले आहे ते लिहितात
- ” या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा.हा मऱ्हाटा पातशाह येवढा छत्रपती जाला.गोष्ट सामान्य न जाली
७) शिवकालातील समकालीन कवी कविराज भूषण यांनी आपल्या शिवभूषण या काव्यमय ग्रंथामध्ये सुरेख छंद लिहिले आहेत आता ते सुधा पाहूयात,
१) वेद राखे विदित,पुराण पर सिद्ध राख्यो, राम नाम राख्यो अति रसना सुधरमे,
हिन्दुअन की चोटि, रोटी राखी हे सिपाहन की, कंधे में जनेव राख्यो,माला राखी गर में,
मिडी राखी मुग़ल,मरोड़ी राखे पातशाह, बैरी पीसी राखे, वरदान राखो कर में,
राजन की हद राखी तेग बल सिवराय, देव राखे देवल, स्वधर्म राख्यो घर में
अर्थ – शिवाजी राजांनी तलवारीच्या बळावर वेद, पुराण यांच रक्षण केल, स्वसर्वस्वाचे सार असे जे राम- नाम ते हिंदूंच्या जिव्हेवर कायम ठेवल, हिंदूंची शेंडी राखली, शिपायांची उप-जीविका चालवली, खांद्दया वरील जानवी आणि गळयातिल माळा सुरक्षित ठेवली, मुघलांच मर्दन केल, पादशहास मुरगळल, शत्रुंच चूर्ण केल, आपल्या लोकाना अभय दिले, देव- देवळांच रक्षण केल आणि घरा-घरा मधे स्वधर्म राखला.
(यातील “तेग बल सिवराय आणि स्वधर्म राख्यो घर में” ह्याचा अर्थ काय घ्यायचा ?)
२) मन कवी भूषण को सिव की भगति जिचो, सिव की भगति जिचो साधू जन सेवाने,
साधू जन जीते या कठिन कलि काल, कलि काल महाबीर महाराज महि मेवाने,
जगत में जीते महाबीर महाराजनते, महाराज बावनहु पातशहा लेवाने,
पातशहा बावनु दिली के पातशहा जीती,पातशहा हिन्दुपति पातशहा सेवाने
अर्थ – ” शिवाजी ” महाराजांना भूषणाने इथे ‘हिन्दूपति’ म्हटले आहे, भूषण म्हणतोय कवीच्या मनात शिव-भक्तिने, शिव भक्तिस साधू -जनांच्या सेवेने, साधू जनास कलि कालाने, कलि कालास शुर आणि कीर्तिवान राजानी, आणि शुर आणि कीर्तिवान राजाना बावन्न बादशहास जिंकनार्या औरंगजेबाने, आणि त्या बावन्न बादशहंच्या बादशहास म्हणजे दिल्लीपति औरंगजेबास हिन्दू पति ” शिवाजीने ” जिंकले.
(यातील “पातशहा हिन्दुपति” ह्याचा अर्थ काय घ्यायचा ?)
३) देवल गिराविते फिराविते निसान अली, ऐसे डूबे रावराने सबी गए लबकी,
गौर गणपती आप औरनको देत ताप, आपनी ही बार सब मारी गये दबकी ,
पीरा पैगंबर दिखाई देत, सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की,
कासी की कला गई मथुरा मस्जिद भई, गर सिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी
अर्थ – यवनांनी मंदिरे पाडून त्या जागी त्यांचा ध्वज फडकविला तेव्हा राव – राणे (राजे महाराजे) भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते,  इतके ते निर्बल व निस्तेज झाले, थोडेसे पुजा विधान चुकले तर भक्तांनाच ताप देणार्या देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून लपून बसण्याची वेळ आली. जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून ‘रबची’ चर्चा सुरू झाली, काशी कळाहीन झाली, मथुरेला मशीद उभी राहीली, अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर सर्व हिन्दुंची सुन्ता झाली असती.
(यातील “गर सिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी ” ह्याचा अर्थ काय घ्यायचा ?)
८) शिवाजी महाराजांचे अमात्य म्हणून पदभार संभाळनारे रामचंद्रपंत यांनी त्यांच्या आज्ञा पत्रामध्ये लिहिले आहे,
- अवनी मंडळ निर्यावनी करावे,यवनाक्रांत राज्य आक्रमावे|
निर्यावन ह्या शब्दाचा अर्थ काय ? ह्यातून शिवाजी महाराजांची धारणा काय ती अगदी सरळ स्पष्ट होते.
९) राज्याभिषेकानंतर महाराजांनी आपली भाषा यावनी भाषेने ग्रासली होती, तिचा बिमोड करण्यासाठी महाराजांनी रघुनाथपंत हणमंते आणि धुंडिराज लक्ष्मण व्यास यांच्याकडून एक शब्द-कोश तयार करून घेतला त्याला राज्यव्यवहारकोश असे नाव दिले, यावनी भाषेला पर्यायी प्रतिशब्द महाराजांनी निर्माण केले. भाषेबद्दल प्रेम कृतीतून दाखवणारा शिवाजी राजा हा पहिला आहे !
या सर्व वरील घटना क्रमाने पाहिल्यास काय सिद्ध होते ? हे सगळे समकालीन लोकांनीच लिहून ठेवले आहे, आज उगाच महाराज कसे धर्म-निरपेक्ष हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, पण स्वताच्या धर्मावरती आलेले यावनी आक्रमण हे महाराजांनी कसे परतवून लावले हे कुणीही सांगत नाही असे का ? ह्याचे उत्तर कुणाकडे आहे ?
भाषेबद्दल प्रेम असणारा, पारतंत्र्यातून स्वतंत्र निर्माण करणारा, मातृभूमी वरती प्रेम, ह्या सर्व गोष्टी शिवाजी महाराजांनी आपल्या कृतीतून सिद्ध केल्या आहेत, वरील जे संदर्भ दिले आहेत ते सगळे समकालीन आहेत याबद्दल कोणास शंका असेल तर जरूर तपासून घ्यावेत.
‘मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्र धर्म वाढवावा’, हे शिवाजी महाराजांनी केलेच. सर्व लोकांना बरोबर घेऊन त्यांनी एक स्वराज्य निर्माण केले, म्हणून धर्मावरती आक्रमण करणाऱ्या लोकांना महाराजांनी सेक्युलर बनून सहिष्णुता दाखवली नाही ! तर त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर दिले. अश्या आमच्या या राजाचा या महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे आणि नभी सूर्य चंद्र आहेत तो पर्यंत तो तसाच राहील राहील.
|| लेखन सीमा ||

संदर्भ -
- श्री शिवभारत – कवींद्र परमानंद
- शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १/२
- आज्ञापत्र – रामचंद्र अमात्य
- सभासद बखर
- हिस्टोरिकल मिसेलनी
- शिवाजी सोविनियर
- शिवभूषण

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive