Tuesday, June 1, 2010

चित्रा मूळची डोंबिवलीची.

यशाची फिलॉसॉफी

 

वयाचा आणि फिलॉसॉफीचा संबंध नाही. पण, बारावीतल्या मुलीचं वय फिलॉसॉफीबद्दल बोलण्याचं आणि लिहिण्याचं नक्कीच नाही. रुईया कॉलेजच्या चित्रा आडकरने मात्र हा समज चुकीचा ठरवला.

 

चित्रा मूळची डोंबिवलीची. तिला ग्रीसमध्ये भरणाऱ्या इण्टरनॅशनल फिलॉसॉफी ऑलिम्पियाडमध्ये भाग घेण्याची तीव्र इच्छा होती. डोंबिवलीचे प्रा. केदार सोनी हे तिचे मार्गदर्शक. युनेस्को आणि फ्रान्स एफआयएसपी या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हे ऑलिम्पियाड आयोजित करण्यात येते. भारतभरातून या ऑलिम्पियाडसाठी केवळ एक प्रतिनिधी जाणार होता. त्यासाठी आधी देशभरातून चाळणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला बसणाऱ्या देशभरातल्या विद्यार्थ्यांतून ती पहिली आली. ग्रीसच्या ऑलिम्पियाडमध्ये भाग घेणारी ही सर्वात कमी वयाची स्पर्धक.

 

या ऑलिम्पियाडमध्ये तिला चार निबंध सादर करायचे होते. एखाद्या प्रसिद्ध विचारवंताचं वचन किंवा एखाद्या प्रश्नावर हे निबंध लिहायचे होते. खरं तर खंडप्राय असलेल्या भारताचं प्रतिनिधित्व करणं हीच मोठी बाब. या परीक्षेत ती खरी उतरली. भारतासाठी ती ऑनरेबल मेन्शन घेऊन परतली. तिथे असतानाच तिला बारावीच्या परीक्षेत ८०.३३ टक्के मार्क्स मिळाल्याची बातमी पालकांनी कळवली. घरी परतताना तिच्याकडे खूश होण्याची दोन कारणं होती. सर्व लँगवेजमध्ये तिने उत्तम कामगिरी केली होती. आता, सोशिओलॉजी या विषयात तिला पदवी घ्यायची आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive