Thursday, June 24, 2010

दैव हरले, जिद्द जिंकली

दैव हरले, जिद्द जिंकली

असंख्य  अडथळ्यांशी  झुंजत  संदेशने  कमावले  ९०  टक्के

वडील नेहमीच आजारी . दोन भाऊ अंथरुणाला खिळलेले . आई घरी आणणारी तोडकीमोडकी कमाई शुश्रुषेतच खर्च होत असे . त्यामुळे शिक्षण महापालिकेच्या शाळेत . पण जिद्दीने स्कॉलरशिप मिळवून त्याने चौथीलाच हुशारीची चुणूक दाखविली . तरीही बेताच्या आथिर्क परिस्थितीमुळे शाळा सुटली . दोन्ही भावांचा वियोगही झेलावा लागला . पण एका दैवतेचे पाठबळ लाभले आणि यशाचा मार्ग खुला झाला . सर्व अडथळ्यांचा प्रवास पार करीत अखेर संदेश सकपाळने दहावीला ९० टक्क्यांचे शिखर गाठलेच .

२० तास अभ्यास

संदेशची आई पाळणाघर चालवते . त्या मुलांची सतत गडबड चालू असे . त्यामुळे घराजवळ असलेल्या संस्कार अॅकेडमीचा वर्ग आणि मरोळची प्रागतिक हायस्कूल याच त्याच्या अभ्यासाच्या जागा होत्या . पण सहामाहीला संदेशला अपेक्षेपेक्षा कमी म्हणजे ८४ टक्के मिळाले . त्याने दु : बाजूला सारून दिवसाचे २० तास अभ्यास सुरू केला . जिद्दीने त्याने यश खेचून आणले . आता तो सायन्सला प्रवेश घेणार आहे . एअरोनॉटिकल इंजिनीअर होण्याची त्याची इच्छा आहे .

'
दहा वर्षांत प्रथमच खुशी आली ...'

'
गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच आमच्या घरात खुशी आली ... इतकी की त्या दिवशी जेवलेही नाही ... घरावर पडलेल्या मृत्यूच्या नि आजाराच्या सावल्या पुसट झाल्या , माझ्या संदेशचा मला अभिमान वाटतो ...' हे उद्गार आहेत रंजना सकपाळ यांचे . त्यांचे पती भागुराम सकपाळ यांची मनोवस्थाही काही निराळी नाही . त्याला कारणही तसेच आहे , त्यांच्या संदेशने प्रतिकूलतेवर मात करत दहावीच्या परीक्षेत तब्बल ९० टक्के गुण मिळवले आहेत .

मरोळ पाइपलाइन परिसरात छोट्या बैठ्या घरात राहणाऱ्या सकपाळ कुटुंबाच्या चेहऱ्यावर दीर्घ यातनांनंतर आता कुठे हास्य दिसू लागले आहे . टीबी आणि डायबेटीसमुळे खिळखिळे झालेले भागुराम सकपाळ आणि मस्क्युलर डिस्ट्रोफी या दुर्धर आजारामुळे चेतना हरपल्याने अंथरुणाला खिळलेली रमेश आणि अमर ही मुले यांची शुश्ाुषा हीच रंजनाताईंची दिनचर्या बनली होती . घरात आवक अशी नव्हतीच . धाकटा संदेश महापालिका शाळेत शिकत होता . त्याने चौथीला स्कॉलरशिपही मिळवली होती . पण घरातल्या या परिस्थितीमुळे तो शाळेत जाईनासा झाला . त्याच्या चौथीपर्यंतच्या शिक्षिका असलेल्या पोयसर मराठी शाळा क्र . १मधील अभया पुरव यांनी त्याच्या घरी चौकशी केली , तेव्हा एका घरात तीन तीन पेशंट अशी अवस्था पाहून त्या हादरल्याच . हे कुटुंब तेव्हा मुंबई सोडून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील उंबरकोंड गावी परतण्याच्या मनस्थितीत होते .

पुरवबाई भेटल्या अन् घर सावरलं

'
पुरवबाईंनी माझं सर्व कुटुंबच सावरलं . सतत सावलीसारख्या आमच्यामागे राहिल्या ...' रंजनाताई कृतज्ञतेने सांगतात . अभयाताईंनी संदेशच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले . डॉ . नेने यांचे उपचार मार्गदर्शन , परिचारिका मुग्धा गावडे यांची शुश्ाुषा यांना फळ आले आणि भागुराम सकपाळ चालूफिरू लागले .

दोन भावांच्या मृत्यूचा धक्का

संदेश अंधेरी - मरोळच्या प्रागतिक हायस्कूलमध्ये जाऊ लागला होता . वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होत असली तरी रमेशची प्रकृती मात्र ढासळू लागली . सर्व हालचाली बंद होत अडीच वर्षांपूवीर् त्याचा मृत्यू झाला . दरम्यान वडील गारमेंट फॅक्टरीत कामाला जाऊ लागले . संदेश दहावीला गेल्यावर एप्रिलमध्ये शाळेच्या सुट्टीतील विशेष अभ्यासवर्गाला जाऊ लागला . पण १५ एप्रिलपासून अमरची प्रकृती ढासळू लागली आणि २१ मे २००९ रोजी तोही हे जग सोडून गेला . पोटचे गोळे गमावलेल्या रंजनाताईंवर दु : खाचे डोंगरच कोसळले होते . संदेश सांगतो , ' कितीतरी महिने आई सारखी रडतच असायची ...'

संदेशचे आईबाबा म्हणतात , ' जे काही करायचंय ते त्याने करावं , आम्ही त्याच्या इच्छेविरुद्ध नाही . मात्र पास झाल्यावर त्याला म्हटलं : देवळात जायच्या आधी पहिले पुरवबाईंना पेढे देऊन नमस्कार कर , तीच खरी देवता आहे .' संदेशने तसेच केले हे सांगायला नकोच .


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive