काही दिवसांपूर्वी मी Nuclear Deception हे Adrian Levy व CatherineScott-Clark या लेखकद्वयीने लिहिलेले पुस्तक वाचले.
धन्यवाद.
सुधीर काळे, जकार्ता
[टीपः बुश-४१=अमेरिकेचे ४१वे अध्यक्ष जॉर्ज H. W. बुश व बुश-४३=अमेरिकेचे ४१वे अध्यक्ष जॉर्ज W. (डुब्या) बुश]फसवणूक - प्रस्तावना
गाभा-लेखकांचे मनोगत
© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळलेखक)
मराठी रूपांतर © (मूळ लेखकांच्या वतीने): सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींचीआहेत)
ही कहाणी आहे एक घोर फसवणूकीची. ही कहाणी आहेअमेरिकेच्या सरकारने त्यांच्याच निर्वाचित (अमेरिकन) लोकप्रतिनिधींची व सार्या जगाचीकशी घोर फसवणूक केली त्याची, ज्या कृत्यांचे गंभीर परिणामकदाचित कांहीं पिढ्यांनतर आपल्याला कळू लागतील. ही कहाणी आहे अमेरिकन नेत्यांच्या नैतिकअध:पाताची, त्यांच्या कवडीमोलाच्या तारतम्यबुद्धीची, अपुर्या पर्यवेक्षणाची, त्यांच्याभोवतीच्या सतत बदलणार्याजागतिक स्थितीबद्दलच्या माहितीची निष्काळजीपणाने व आळशीपणाने केलेल्या विश्लेषणांचीव पृथक्करणांची! या चुकांचा गंभीर परिणाम होणार आहे आपल्या भोवतालचे जग आणखी अस्थिरहोण्यात! या चुका करून अमेरिकन व पश्चिम युरोपियन नेतृत्वाने जागतिक धर्मयुद्ध पुकारणार्याशक्तींच्या हातात जणू एक नवे कोलीतच दिले आहे.
याची सर्वप्रथम प्रचीती आली ४ फेब्रूवारी २००४रोजी! या दिवशी पाकिस्तानचे सर्वात आदरणीय व गौरवप्राप्त शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादीरखान पाकिस्तान चित्रवाणीच्या पडद्यावर सार्या पाकिस्तानी जनतेला दिसले. डॉ. खान हेनेहमीच रहस्याच्या पडद्याआड असत कारण ते तीस वर्षाहून जास्त काळ पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीच्या"गुपचुप" कार्यक्रमात गुंतलेले होते. उर्दू भाषेतली त्यांचीभाषणे सर्वसाधारणपणे सार्या पाकिस्तानी जनतेला समजत व ती सारे लोक त्यांच्या प्रत्येकशब्दाकडे लक्ष देऊन ऐकतही. पण आज पाकिस्तानी सरकारने जाहीर केले होते कीं ते त्यांच्याचुकांची कबूली देणार आहेत. कदाचित त्यामुळे असेल. पण आज त्यांचे भाषण त्यांच्या देशबांधवांनासहज समजणार्या उर्दू भाषेत न होता सार्या जगाला समजणार्या इंग्रजी भाषेत झाले.
"माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो" अशी सुरुवात करून त्यांनी स्वत:च्या अनधिकृत अण्वस्त्रप्रसाराबद्दलच्या हालचालींचीमाहिती दिल्यावर समारोप करतांना ते म्हणाले "अल्ला पाकिस्तानला सुरक्षित ठेवो, पाकिस्तानअमर असो"!
त्यांचे भाषण संपताक्षणी पाकिस्तानी लष्करानेडॉ खान यांनी प्रे. बुश ज्यांना "अनिष्ट राष्ट्रांचा अक्ष" म्हणत (Axisof Evil) त्या उत्तर कोरिया, इराण व लिबिया या अशा गिर्हाइकांसाठी एकट्याने हा अण्वस्त्रप्रसाराचाकाळा बाजार कसा चालवला होता याची माहिती दिली. या घटनेनंतर पाकिस्तानला अण्वस्त्रेंबनवायला सहाय्य करून अमेरिकेने सार्या जगाची कशी फसवणूक केली हे पहिल्यांदाच जगाच्यानिदर्शनाला आले.
अण्वस्त्रप्रसाराबद्दल कुप्रसिद्ध असलेल्या व"टायफॉइड मेरी" या (अपमानास्पद) टोपणनावाने ओळखल्या जाणार्याडॉ खाननी अशी कबूली का दिली याबाबत सार्या जगात तावातावाने तर्क-कुतर्क सुरू झाले.कुणाला वाटले की त्यांच्या राजकीय किंवा धार्मिक श्रद्धांमुळे दिली, कुणाला वाटले की स्वत:ची इभ्रत वाढविण्यासाठी व स्थान बळकटकरण्यासाठी? कुणा बदमाष राजवटीसाठी? अफगाणिस्तानमधीलजिहाद्यांसाठी? ओसामा बिन लादेनसाठी? कींयुरोप-अमेरिकेत अणूबॉम्ब उडवू पहाणार्या अतिरेक्यांच्या टोळ्यांसाठी?
अनेक वृत्तपत्रांत आलेल्या अग्रलेखांत कुणाच्याफायद्यासाठी त्यांनी हा कबूलीजबाब दिला असावा याबाबतही तर्हेतर्हेच्या अटकळी प्रसिद्धझाल्या. प्रेसिडेंट जॉर्ज बुश यांनीही या फसवणुकीला जणू संमतीच दिली. कांहीं दिवसांनंतरते म्हणाले, "खान यांनी त्यांचे सारेगुन्हे मान्य केले आहेत आणि त्यांचे या गुन्ह्यातील सहकारी आता या धंद्यातून बाहेरफेकले गेले आहेत. खान व त्यांचे छोटे टोळके अतीशय धक्कादायक गुन्ह्यांबद्दल दोषी आहेत.पण त्यांच्यावर खटला घालायची गरज दिसत नाहीं". बुश पुढे म्हणाले, "प्रेसिडेंट मुशर्रफ यांनीमला आश्वासन दिले आहे कीं ते खान यांच्या जालाबद्दलची (network) सर्व माहिती अमेरिकन सरकारला देतील व तो देश (पाकिस्तान) अशा अण्वस्त्रप्रसाराच्यामुळाशी असू दिला जाणार नाहीं. पाकिस्तान सरकारचे या घटनेवर इतके पूर्ण नियंत्रण आहेकीं खान व त्यांच्या सहकारी शास्त्रज्ञांना अमेरिकेत खटला घालण्यासाठी अमेरिकेच्याकिंवा इतर पाश्चात्य राष्ट्रांच्या स्वाधीन करण्याची गरज नाहीं."
सत्य परिस्थिती तर अशी होती कीं खान यांची कबूलीएक दिशाभूल करण्यासाठी दिलेली कॢप्तीच होती. अण्वस्त्रांची काळी बाजारपेठ खान यांच्यानियंत्रणाखाली चालली तर होतीच, पण जाहीर व खासगी वक्तव्यात फरकअसा होता कीं अशा तर्हेचा काळा बाजार एका व्यक्तीचे काम नव्हते तर हे काम एका राष्ट्राच्या(पाकिस्तानच्या) परराष्ट्रनीतीचा भाग होता व त्याचे पर्यवेक्षण पाकिस्तानी लष्करी अधिकार्यांचीटोळी करत होती. वर हे राष्ट्र अमेरिकेच्या अतिरेक्यांविरुद्धच्या लढाईतील एक महत्वाचेदोस्त राष्ट्र म्हणून दुटप्पीपणे मिरवत होते. तीसेक वर्षें लागोपाठ सत्तेवर आलेल्याअमेरिकन सरकारांनी, मग ती रिपब्लिकन पक्षाची असोत किंवा डेमोक्रॅटिकपक्षाची असोत, तसेच इंग्लंड व इतर पाश्चात्य युरोपियन राष्ट्रांनीपाकिस्तानला अतीशय मर्यादित प्रसारण असलेले व निषिद्ध असे अण्वस्त्रांबद्दलचे तंत्रज्ञानमिळवू दिले होते. एका अनर्थपूर्ण युगात पाकिस्तानने हे निषिद्ध तंत्रज्ञान कसे अनिष्टराष्ट्रांना विकण्यात पुढाकार घेतला ही माहिती महत्वाची सरकारी साधने चुकीच्या दिशेनेवापरून व आधीचे नियम रद्दबातल करून सर्वांपासून लपवून ठेवली. गुप्त माहिती मिळवण्याच्याक्रियेचीही धार बोथट करण्यात आली आणि परराष्ट्रखाते व संरक्षणखाते यासारख्या सरकारीखात्यांना जणू वेढून राष्ट्राध्यक्षांच्या तत्वांना पाठिंबा देण्यास, प्रतिनिधीसभेला डावलण्यास व देशाचे कायदे मोडण्यास भाग पाडण्यात आले होते.अमेरिकेच्या परराष्ट्रखात्याचा प्रवक्ता रिचर्ड बाऊचर याने डॉ खान प्रकरण म्हणजे पाकिस्तानीहुकूमशहा/राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांच्या कसोटीचा क्षण असे वर्णन केले आहे. खान हेसर्व देशाचा मानबिंदू होते व त्यांचे नाव काढताच पाकिस्तानी नागरिकांची छाती गर्वानेफुगायची. पाकिस्तानला शिवणाच्या धारदार सुयासुद्धा बनवता येत नाहींत अशी मल्लीनाथीकरणार्या डॉ खान यांनी अतीशय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भारताच्या कुठल्याहीशहरावर हल्ला करू शकणारी अण्वस्त्रे मोठ्या प्रमाणावर बनविण्याची एक "असेंब्लीलाईन" उभी केली व त्यांना पाकिस्तानी जनतेनेच "अणूबॉम्बचे पिताश्री" हा जणू एक किताबच दिला.
फारच थोड्या लोकांना हे माहीत आहे की डॉ खान हेया अण्वस्त्र-उत्पादनाच्या प्रकल्पात अपघातानेच शिरले. पाकिस्तानात योग्यशी नोकरी नमिळाल्यामुळे ते चिडून उच्च शिक्षणासाठी युरोपला गेले व एका विश्वविद्यालयात प्रवेशमिळविण्याच्या रांगेत उभे असताना 'हेनी' नावाच्या एका डच मुलीच्या प्रेमात पडले व तिच्याशी विवाहबद्धझाले. एका गोर्या बाईचे पति म्हणून त्यांना एरवी मिळाली नसती अशी अतीशय संवेदनशीलअशा गोपनीय क्षेत्रात भाषांतरकाराची नोकरी मिळाली व अण्वस्त्रांबद्दलची अतीशय गुप्तअशी माहिती त्यांच्या नजरेखालून जाऊ लागली. त्याचे महत्व समजल्यामुळे त्यांनी ती सर्वकागदपत्रे व ड्रॉइंग्ज चोरली व त्या कागदपत्रांनी भरलेले तीन पेटारे घेऊन ते पाकिस्तानातपरत आले. जुल्फिकार अली भुत्तो यांच्या प्रोत्साहनाने ते अणूबॉम्ब बनवायच्या प्रोजेक्टचेप्रमुख झाले व मग त्या क्षेत्रात त्यांची व पाकिस्तानची प्रगती सुरू झाली.
त्यानंतर पुढच्या वर्षापासून पाकिस्तानी अधिकारीव पाकिस्तानी दलाल/एजंट यांनी युरोप व उत्तर अमेरिकेत त्यांना हव्या असलेल्या यंत्रसामुग्रीव इतर वस्तूंची जोरदार खरेदी सुरू केली. डॉ. खान हे सूत्रधाराचे व वेगवेगळ्या गटांमधीलसमन्वय ठेवण्याचे काम पहात होते व पश्चिम युरोपीमधील गुपचुपपणे अणूबॉम्ब बनविण्याचा कार्यक्रम राबवणार्याकंपन्यांतील वैज्ञानिक, कारखानदार, इंजिनियर व धातुशास्त्रज्ञ यांच्याबरोबरील मैत्री आणखी जवळची करून व त्यांच्याशीवागताना अतीशय गोडीगुलाबीचा वापर करून व त्यांच्यावर आपल्या गोड बोलण्याने एक तर्हेचीछाप किंवा मोहिनी टाकून अशी सामग्री मिळवण्याच्या वाटेतील अडचणी दूर करत होते.
जेंव्हा १९७७ साली भुत्तोंची पंतप्रधानपदावरूनउचलबांगडी झाली, तेंव्हा हा अणूप्रकल्प नवे हुकूमशहाज. झिया उल हक यांच्या अखत्यारीतील सैनिकी विभागाकडे जावा अशी अमेरिकन गुप्तचर संघटनासी.आय.ए.ची इच्छा होती. त्यामुळे खान यांचे जगभरच्या खरेदीमध्ये गुंतलेले गट पाकिस्तानीलष्करशहा व पाकिस्तानी गुप्तचर संघटना आय. एस. आय. यांच्या हुकुमाखाली आले. (म्हणजेचअमेरिकन गुप्तचर संघटना सी.आय.ए.ला या अणूबॉम्ब प्रकल्पाची कल्पना १९७७ पासून होती)
पण तसे असले तरी पाकिस्तानच्या अणूबॉम्ब प्रकल्पाबद्दलजास्त माहिती असणे हे तोट्याचे ठरू लागले. जिमी कार्टर हे १९७७ सालची राष्ट्रपतीपदाचीनिवडणूक जिंकून अधिकारावर आले तेंव्हा जगातली अण्वस्त्रें कमी करायची हे ध्येय समोरठेवूनच ते अधिकारावर आले होते. पण त्यांचे राष्ट्रीय सुऱक्षा सल्लागार बिन्यू ब्रेझिंस्की(ZbigniewBrzezinski) यांनी त्यांना त्यांची दिशा बदलायचा सल्ला दिला.पाकिस्तान हे राष्ट्र साम्यवादाविरुद्धच्या लढाईतील एक धक्काप्रतिबंधक (buffer) म्हणून उपयुक्त राष्ट्र असल्याचा कार्टर यांना सल्ला देण्यात आला व पाकिस्तानलाया कामात राजी-खुषी सामील करून घेण्यासाठी त्या राष्ट्राचे मन वळविण्याचाही त्यांनासल्ला दिला. झियाच्या मनसुब्याला छुपा पाठिंबा देऊन मग त्याच्या मोबदल्यात अण्वस्त्रेबनवायची ही योजना होती! पाकिस्तानने जर रशियाचा प्रतिकार केला तर त्यांच्या अण्वस्त्रेंबनविण्याच्या प्रकल्पाकडे अमेरिका दुर्ल़क्ष करेल असेही ज. झियांना सांगण्यात आले.
१९८० साली कार्टर यांच्या जागी रेगन आले व त्यांनीकार्टर यांच्या अण्वस्त्रप्रसारबंदीच्या कार्यक्रमाला केरात काढले. राष्ट्रीय सुरक्षासमिती व सल्लागार यांचेही अवमूल्यन करण्यात आले व विल्यम केसी यांच्या नेतृत्वाखालीसी.आय.ए. ही संघटना सर्वेसर्वा झाली आणि गुप्तहेरखाते एक माहितीचे साधनच न रहाता तेएक प्रे. रेगन यांच्या धोरणाच्या समर्थनार्थ वापरायचे एक हत्यार बनले.
त्यापाठोपाठ अमेरिकन अधिकारी पैसे घेऊन इस्लामाबादलापोचले व बरोबर हाही निरोप घेऊन आले कीं अमेरिका पाकिस्तानच्या वाढत्या अण्वस्त्रेंबनविण्याच्या प्रकल्पाकडे काणाडोळा करेल. पण पुढे जसजसे पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीच्याप्रकल्पाचे रोपटे भराभर वाढू लागले तसतसे तो प्रकल्प गुप्त ठेवणे अवघड जाऊ लागले.
प्रे. रेगन यांनी आशावादावर आधारित आक्रमकपणेतह/करार करण्याचा पायंडा मरगळलेल्या वॉशिंग्टनला आणला, पण उपयुक्ततेच्या व सोयीच्या तत्वावर जे परराष्ट्र धोरण सुरूकेले गेले त्याचे रूपांतर झपाट्याने एका षड्यंत्रात झाले ज्यात अमेरिकेचे परराष्ट्रखातेहीसामील झाले व पाकिस्तानच्या अण्वस्त्र-प्रकल्पाबद्दलच्या गुप्त बातम्यावर जे विरोधकरतील त्यांच्या कामात अडथळेही आणू लागले. या सावळ्या गोंधळात पाकिस्तानने १९८३ सालीस्फोटकें न वापरता केलेली अण्वस्त्रांची चांचणी (cold-testing), एवढेच नव्हे तर स्फोटकांसह चीनच्या मदतीने १९८४ साली केलेली चांचणीही (hot-testing) गुप्त ठेवण्यात अमेरिकेला यश मिळाले. पाकिस्तान व चीन या देशांमधील अण्वस्त्र-संबंधांनाखोल गाडून टाकण्यातही रेगनच्या अधिकार्यांना यश मिळाले. यात चीनकडून मिळालेली बॉम्बचीड्रॉइंग्स, रेडियो आयसोटोप्स व इतर "हवी ती व हवी तितकी" तांत्रिक मदत यांचाहीसमावेश होता. याच्या मोबदल्यात चिनी आण्विक ऊर्जा कंत्राटदारांकडून अमेरिकन कंपन्यांनीकोट्यानुकोटी डॉलर्सची कंत्राटे मिळविली.
जेव्हा प्रे. रेगन यांची कारकीर्द १९८९ सालीसंपली तेंव्हा पाकिस्तानकडे चांचणी केलेली व वापरता येण्याजोगी अण्वस्त्रे होती. वया अस्त्रांच्या निर्मितीचा बहुतांश खर्च अमेरिकेकडून 'मदत' म्हणून मिळालेल्या पैशातूनच झाला होता कारण 'मदत' म्हणून मिळालेल्या पुंजीतले अब्जावधी डॉलर्स पाकिस्तानच्या लष्करशहांनीया कामाकडे वळविले होते. अमेरिकेच्या पेंटॅगॉनमधील अधिकारी पाकिस्तानचे रक्षक/वॉचमनठरले. त्यांनी गुप्तहेरखात्यांचे अहवाल आपल्याला हवे तसे पुन्हा लिहिवले ज्यात पाकिस्तानच्याया अण्वस्त्रक्षमतेबद्दल जाणून-बुजून आहे त्यापेक्षा कमी आहे असे दाखविले गेले. तेहीअशा वेळी कीं इस्लामाबाद व दिल्ली यांच्यातला संघर्ष अगदी निकरावर आला होता. असे असूनहीजेंव्हा अफगाणिस्तानातील युद्ध संपले तेंव्हा बुश-४१ यांनी पाकिस्तानला वार्यावर सोडूनदिले व १९९० मध्ये त्या देशाला दिली जाणारी मदतही बंद केली. ही मदत म्हणजे अमेरिकाव अण्वस्त्रसज्ज पाकिस्तान या दोन देशांमधला शेवटचा संपर्क होता. त्यानंतरचा संपर्कघडून आला जेंव्हा अमेरिकेची 'क्रूज' क्षेपणास्त्रे १९९८ साली ओसामा बिन लादेन यांच्या अफगाणिस्तानमधीलप्रशिक्षणकेद्रांवर डागली गेली तेंव्हा. भारत व इस्रायल या देशांच्या गुप्तहेर संघटनांनीपाकिस्तानने अमेरिकेच्या कट्टर शत्रूंबरोबर अण्वस्त्रांचा काळाबाजार मांडला आहे असेजगाच्या व अमेरिकेच्या निदर्शनास आणून दिलेच होते. या अहवालांना युरोपीय गुप्तहेर संघटनांकडूनहीदुजोरा मिळू लागला होता. तरीही पाकिस्तानकडे कुणाचेच लक्ष नव्हते. त्याच्या पुढच्याचवर्षी पाकिस्तानातल्या लुटपुटीच्या लोकशाहीचा अंत झाला व पुनश्च लष्करशहा परवेज मुशर्रफलष्करी राज्यक्रांतीद्वारा देशाचे सर्वेसर्वा बनले.
२००१ साली बुश-४३ यांनी अध्यक्षपदाची निवडणूकजिंकून शपथ घेतली तोपर्यंत गुप्तहेरखात्याकडून अचूक गुप्त अहवालाची रिमेच्या रिमे साचलीहोती ज्यात पकिस्तानचे वर्णन "जागतिक अस्थिरतेचा केंद्रबिंदू" असे करण्यात आले होते: लष्करी अधिपत्याखालील सनातन मुस्लिम दहशतवादाचा समर्थकव आश्रयदाता या भूमिकेत उभे असलेले पाकिस्तान हे राष्ट्र भांडवल व राजकीय प्रभाव मिळविण्यासाठीआज सामूहिक नरसंहार करू शकणार्या शस्त्रास्त्रांचा सर्रास व्यापार करण्यात गुंतलेहोते व अमेरिका ज्यांना शत्रू समजते अशा राष्ट्रांशी हा व्यापार चालला होता. ११ सप्टेंबर२००१ च्या कांहीं दिवस आधी 'सीआयए'चे संचालक जॉर्ज टेनेटयांनी ज्येष्ठ अधिकार्यांचा एक छोटा संघ प्रस्थापित केला (ज्यात परराष्ट्रमंत्री कॉलिनपॉवेल, त्यांचे कनिष्ठ मंत्री रिचर्ड आर्मिटाज,राष्ट्रीय सुरक्षा समितीचे उपसल्लागार स्टीफन हेडली, 'सीआयए'चे उपसंचालक जॉन मॅकलाफलिन व राष्ट्रीय सुरक्षा मडळाच्या अण्वस्त्र प्रसारबंदीचेसंचालक रॉबर्ट जोसेफ यांचा समावेश होता) व त्यांच्याबरोबर एक 'आणीबाणीची शिखर परिषद'ही घेतली.
आता तर जहाल गटाचे लोकही पाकिस्तानबरोबरच्या संबंधांचेस्वरूप बदलायला तयार असलेले दिसले. वुल्फोवित्स यांनीही वरवर थोडेसे पडते घेऊन "आपण आपली परराष्ट्रनीती पत्त्यांच्या बंगल्यावर उभी करू असे लोकांना वाटत होते.पाकिस्तानी सरकार काय करत आहे हे अमेरिकन प्रतिनिधीगृहाला समजणार नाहीं असेही या लोकांनावाटत होते. माझी तर नेहमीच खात्री होती कीं प्रतिनिधीगृहापासून माहिती लपवून ठेवण्याचेधोरण शेवटी नक्कीच अयशस्वी होईल व प्रतिनिधीगृहाला अशा तर्हेची माहिती पूर्णपणे देणेहे कायद्याने आपल्यावर बंधनकारक आहे" असे मान्य केले.
पण ११ सप्टंबरच्या भीषण घटनेनंतर परिस्थिती अचानकबदलली व ते एक नवा पत्त्यांचा बंगला बांधण्यात गढून गेले.
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी 'अल-कायदा' या संघटनेला नष्ट करण्याचे, त्यांच्यानेत्यांना अमेरिकेकडे सुपूर्द करण्याचे व अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवरील दुर्गमव अवघड भागातील लपण्याच्या जागा उखडून टाकण्याचे टाकण्याचे वचन अमेरिकेला दिले होते.बुश-४३च्या सरकारने एक संभाव्य मित्रराष्ट्र असल्याचा फायदा एका बाजूला तर अण्वस्त्रांच्या निर्मितीच्या कार्यक्रमापासूनउद्भवणारा धोका दुसर्या बाजूला अशा तर्हेने पाकिस्तानच्या (व मुशर्रफच्या) उपयुक्ततेचेमूल्यमापन केले. असेच मूल्यमापन कार्टर व रेगन यांनीही केले होते. पाकिस्तानच्या विरुद्धएका बाजूने अतिरेक्यांना लपवून ठेवून अमेरिकेपासून वाचवणारे व दुसर्या बाजूला याचअतिरेक्यांना अण्वस्त्रनिर्मितीची माहिती गुप्तपणे देणारे असे दुटप्पी धोरण राबविणारेराष्ट्र असल्याचा भरपूर पुरावा असूनही अमेरिकेने याबाबत कांहींच केले नाहीं. कारण अमेरिकेच्याविमानांना मुक्त संचार देऊन, अतिरेक्यांबद्दलच्या गुप्त बातम्याअमेरिकेला पुरवून व जिथे पाश्चात्य सैन्य जाऊही शकणार नाहीं अशा दुर्गम डोंगराळ विभागातस्वत:चे सैन्य पाठवून मुशर्रफ (व पाकिस्तान) अमेरिकेच्या सुरक्षानीतीतील एक अव्वल मोहराचबनला होता. दरम्यान वुल्फोवित्स, चेनी व रम्सफेल्ड या (चांडाळ?)त्रिकुटाने इराक, इराण व उत्तर कोरिया ही राष्ट्रेजास्त धोकादायक आहेत असे पडघम वाजवायला सुरुवात केली. सद्दामकडे सामूहिक नरसंहार करणारीशस्त्रे (WMD) आहेत व त्याला उडवायचे कामही अर्धवट राहिल्याबद्दलअपप्रचार सुरू केला. अशा तर्हेने सर्व जगाचे लक्ष पाकिस्तानकडून या दुसर्या राष्ट्रांकडेवळविण्यात हे त्रिकुट यशस्वी झाले कारण या सांप्रदायिक प्रवृत्तीच्या नेत्यांना पाकिस्तानच्याया समस्येमुळे इराक व सद्दामविरुद्ध करायच्या कारवाईच्या कार्यक्रमावर परिणाम व्हायलानको होता.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतही अमेरिकेचेत्यावेळचे परराष्ट्रमंत्री कोलिन पॉवेल यांनीही या त्रिकुटाचीच री ओढली. अमेरिकेच्यासर्व गुप्तहेर संघटना पाकिस्तानला अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा स्वैर प्रसार करणारे व अत्यंतविघातक राष्ट्र समजत असताना पॉवेल यांनी इराककडे नरसंहार करणारी रासायनिक शस्त्रे आहेतअसा सूर लावला. सनातनी नेत्यांच्या एकंदर 'लीलां'मुळे पॉवेल जरा नाराज होते व ते बुश-४३ने निवडणूक परत जिंकल्यास त्याच्या सरकारातते भाग घेणार नव्हते. पण तोपर्यंत बुश-४३ सरकारला कसेही करून पॉवेलला आपल्या बाजूलाठेवायचे होते. मग एक नाटक करण्यात आले. प्रे. मुशर्रफ यांनी वचन दिले कीं जर अमेरिकेनेत्यांच्या लष्करी क्रांतीद्वारा राज्यावर आलेल्या सरकारला मान्यता दिली तर ते (मुशर्रफ)पाकिस्तान करत असलेला अण्वस्त्रप्रसाराचा काळा बाजार पूर्णपणे बंद करेल!
२००३ च्या मे मध्ये बुश-४३ यांनी "फत्ते झाली"ची (Mission accomplished) दवंडी पिटली. डेविड के यांच्या नेतृत्वाखाली एक पथक महासंहारक अस्त्रांच्याशोधार्थ इराकला रवाना झाले. पण आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेने (IAEA) जमा केलेल्या पुराव्यानुसारपाकिस्तान अद्यापही हा काळाबाजार करतच होता. मग बुश-४३ य़ांनी व त्यांच्या सहकार्यांनीपाकिस्तान सरकारला दोष न देता कांहीं विश्वासघातकी शास्त्रज्ञांनी आरंभलेला बेकायदेशीरव्यवहार असे नवे तुणतुणे वाजवायला सुरुवात केली. जेंव्हा इराकमध्ये महासंहारक अस्त्रेसापडली नाहींत तेंव्हा के यांनी २००४च्या जानेवारीत राजीनामा दिला व अमेरिकन प्रतिनिधीगृहालातसे सांगितले. एका आठवड्यानंतर डॉ. खान यांना पाकिस्तानी दूरचित्रवाणीवर स्वार्थी कारणासाठीअण्वस्त्र तंत्रज्ञाचा काळाबाजार करणारा खलनायक या रूपात दाखविण्यात आले व पाकिस्तानीसरकार 'गुणी बाळ' ठरविण्यात आले, दहशतवादाविरुद्धची मित्रराष्ट्रांची एकजूट अभेद्य राहिली व ही सनातनी मंडळीइराकनंतर इराणकडे डोळे वटारून पाहू लागली. पण दक्षिण आशियातले तज्ञ अमेरिकेला इशारादेतच राहिले कीं पाकिस्तानच सगळ्यात मोठी समस्या असून त्याविरुद्ध कांहीं तरी पावलेउचललीच पाहिजेत. कारण पाकिस्तानला आज भेडसावणारे प्रश्न अजूनही गंभीर होतील,पाकिस्तानी सरकार या अतिरेक्याबाबतचे आपले परस्परविरोधी धोरण चालूच ठेवेल,पाकिस्तानी लष्कर या अतिरेकी व जहालमतवादी टोळ्यांबरोबरचे आपले संबधदृढ करेल व शेवटी अण्वस्त्रे नको त्या (व बेजबाबदार) लोकांच्या हाती पडण्याची शक्यतावाढेल! तरी अमेरिकेने याबाबत योग्य कारवाई करावी.
शेवटी झाले तसेच. २००६ साली इराणचे सरकार बदलण्याविषयीचाकल्लोळ खूप वाढला, मुशर्रफने गुपचुप गुप्तहेरसंघटनांकडूनचाललेली डॉ. खान यांच्याविरुद्धची चौकशी थांबवली, पाकिस्तानच्यावायव्य सरहद्दीवरील वन्यजमातींच्या सीमांवरच्या भागात (नवा) 'पाकिस्तानी' तालीबान पुन्हा जोर धरून उभा राहिला वतिथून अफगाणिस्तानातील अफगाणी, अमेरिकी व ब्रिटिश सैन्यावर जीवघेणेहल्ले करू लागला, 'अल-कायदा'चे लोक पाकिस्तानी स्थानीय अतिरेक्यांबरोबर एक होऊ लागलेव नवी प्रशिक्षणकेंद्रे, नवी रिक्रूटभरती, व नवी ध्येये आकार घेऊ लागली. २००७ साली पाकिस्तानी अण्वस्त्र तंत्रज्ञाचाकाळाबाजार पुन्हा तेजीत चालू झाला व जसजसा अतिरेक्यांचा प्रभाव वाढून त्यांची पावलेपाकिस्तानी भूमीवर ठामपणे उभी राहू लागली तसतशी पाकिस्तानची अमेरिकेच्या मदतीने व पैशानेबनलेली अण्वस्त्रे नियंत्रणाबाहेर जाऊ लागली.
पाकिस्तानातील वाढता दहशतवाद व वेगात उभरू लागलेलीअण्वस्त्रांची बेकायदेशीर निर्यात यांची एकी होऊन प्रलयंकारी घटनांकडे जगाला न्यायलाकिती वेळ लागेल? आज सारे जग नव्या जागतिक दहशतवादाशीदोन हात करत असताना इराकमध्ये चिखलात अडकलेला पाय, इराणबरोबरदोन हात करायची तयारी व उत्तर कोरियाबरोबर वटारलेल्या डोळ्यांचे युद्ध अशा परिस्थितीतहे पुस्तक या सर्व समस्यांना कारणीभूत पाकिस्तानबरोबरचे अमेरिकेचे व पाश्चात्य सरकारांचेनिष्काळजी व निकृष्ट धोरणच कसे आहे हे उघडकीसा आणते!
आणि या सर्व प्रकाराची सुरुवात कशी झाली? तर अब्दुल कादीर खान या एका महत्वाकांक्षी तरुणाला पाकिस्तानातनोकरी मिळू शकली नाही...!
(क्रमश:)
----------------------------------------------------
No comments:
Post a Comment