Friday, June 11, 2010

एकट्या’ कसाबला करायचाय लग्न

एकट्या' कसाबला करायचाय लग्न



२६/११ ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्यातील आरोपी अजमल अमीर कसाब ह्याने आता लग्न करण्याची

च्छा व्यक्त केली आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कसाबने आता सर्वसामान्य लोकांप्रमाणे लग्नाची इच्छा झाली आहे. भारतीय मुलगीही लग्नाला चालणार असल्याचे कसाबने डॉक्टरांना सांगितले.

कसाबला २६/११ हल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कसाबला गेले काही दिवस सर्दी खोकल्याचा त्रास होत होता म्हणून त्याच्या तपासणीसाठी डॉक्टर आले होते. तपासणीच्यावेळी कसाबने आपल्याला एकाकी वाटत असल्याचे सांगितले. त्याच्या वयात ह्या गोष्टी होणे हे सहाजिकच आहे यात काळजी करण्याचे कारण नाही असे डॉक्टरांनी सांगितले.

आर्थर रोड जेलमध्ये असताना कसाबने डॉक्टरांकडे लग्नाची इच्छा व्यक्त केली होती.

आर्थर रोड जेलच्या अधिक्षकांनी सांगितले की कसाब हा जेलमध्ये असताना कोणाशी बोलताना त्याच्याकडे बघतही नाही तर तो अशा खासगी गोष्टी कशा सांगू शकेल. फक्त डॉक्टर जेलच्या काही अधिका-यांशीवाय कसाबचा इतर कोणाशीही संबंध नसतो असे अधिका-यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

sterra

https://www.effectivecpmnetwork.com/ch72yvye4s?key=4a0b887dafac489a2f6ab362663b40f9

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive