Wednesday, August 4, 2010

बोडो दहशतवाद्यांच्या तावडीतून ८२ दिवसांनी मुक्त झालेले विलास बर्डेकर

बोडो दहशतवाद्यांच्या तावडीतून ८२ दिवसांनी मुक्त झालेले विलास बर्डेकर


'लष्करी कारवाईची शक्यता दिसताच आमचा कॅम्प बदलला जायचा. एकदा असाच कॅम्प बदलताना नदी ओलांडावी लागली. खाली खोल दरी आणि वरून धबाबा कोसळणारा धबधबा. माझ्या सोबत एक युवक होता. गळाभर पाण्यात असताना माझा पाय सटकला आणि साक्षात मृत्यू अगदी जवळून पाहिला. परंतु त्या मुलाने माझा हात धरला. त्याचेही प्राण कंठाशी आले होते. तेवढ्यात त्याचा आणखी एक साथीदार आला. त्याने आम्हा दोघांचे प्राण वाचवले. हे लोक आपल्याला मारणार नाहीत, असे त्याक्षणापासून मला वाटू लागले... हे अनुभवकथन बोडो दहशतवाद्यांच्या तावडीतून ८२ दिवसांनी मुक्त झालेले सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी विलास बर्डेकर यांचे. 

जीवन-मरणाच्या सीमेवरून चालण्याचा आपला प्रदीर्घ अनुभव बर्डेकर यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत उलगडला. 

खंडणी दिलेली नाही! 

राज्य सरकारने बर्डेकर यांच्या सुटकेसाठी दहशतवाद्यांना खंडणी दिल्याची चर्चा असताना, पत्रकार परिषदेत बर्डेकर यांच्या सोबत असलेले माजी पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर यांनी त्याचे खंडन केले. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत हा विषय उपस्थित केला होता. वनखात्याने पगार थांबवल्याने बर्डेकर कुटुंबापुढे उभ्या राहिलेल्या समस्यांचा मुद्दाही खडसे यांनी मांडला होता. त्यावर, खडसे यांच्याशी बोलणे झाल्याचे सुराडकर यांनी मान्य केले; मात्र त्याचा तपशील त्यांनी दिला नाही. 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive